अरुणाचल बद्दल माहिती हवी आहे..

कबीरा's picture
कबीरा in भटकंती
11 Sep 2017 - 10:26 pm

नमस्कार,

यंदा दिवाळी मध्ये आई आणि दोन आज्या ह्यांना घेऊन एखाद्या धार्मिक स्थळी अथवा अशी एखादी जागा जिथे शांतपणे ध्यानधारणा करता येईल, राहायची व खायची सोय योग्य असेल, आणि जिथे शांतपणा अनुभवता येईल अशा ठिकाणी जायचा मानस आहे. साधारण ५-६ दिवस हाताशी आहेत. शक्यतो जिथे खूपच गर्दी असेल ती ठिकाणे टाळायची आहेत (अर्थात दिवाळी सुट्ट्यांमुळे हे कितपत शक्य आहे माहित नाही ). गोंदवल्याला आणि निंबाळ ला साधारण वर्षातून ४-५ वेळा जाणे होते त्यामुळे ह्यावेळेस नवीन ठिकाणी जायचा विचार आहे. गेले काही महिने रमण महर्षिंबद्दल बरेच वाचन झाल्यामुळे अरुणाचल ला जायची इच्छा आहे पण तिकडे राहायची सोय होते का / बंगळुरू वरून कसे जावे / कुणाला संपर्क करावा लागतो आणि आजींना पुणे - अरुणाचल - पुणे प्रवास झेपेल का असे प्रश्न आहेत. कोणाला माहिती असल्यास त्याबद्दल जरूर सुचवावे. नाहीतर इतर ठिकाणे सुचवावी.

दिवस :- ५-६
जाणार कसे:- सर्व पर्याय खुले आहेत (विमान- रेल्वे - चार चाकी)
निघायचे ठिकाण - पुणे

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

11 Sep 2017 - 11:51 pm | कपिलमुनी

शांतपणा अनुभवता येईल असे ठिकाण म्हणजे इथला आश्रम !

मी-सौरभ's picture

12 Sep 2017 - 4:41 pm | मी-सौरभ

हा पर्याय पण चांगला असू शकतो.
**वैयक्तिक अनुभव काहीही नाही.

मंजूताई's picture

13 Sep 2017 - 8:31 am | मंजूताई

अरूणाचल मध्ये लोअर दिबांग व्हँली गेलेय पण तिथे धार्मिक स्थळे नाहीत. निवांत शांत ठिकाणे आहेत. प्रवास खूप आहे. ज्येना किती झेपेल व खाद्य संस्कृती एकदम वेगळी आहे ह्याचा विचार करावा.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Sep 2017 - 10:31 am | प्रकाश घाटपांडे

मनोभवे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश हे शशीधर भावे यांचे पुस्तक जरूर वाचा.

संजय पाटिल's picture

13 Sep 2017 - 11:38 am | संजय पाटिल

अरुणाचल प्रदेश नव्हे, त्यांना तमीळनाडू मधिल अरुणाचल बद्दल माहिती हवी आहे असे वाटतेय...

कबीरा's picture

16 Sep 2017 - 3:41 am | कबीरा

अगदी बरोबर

संजय पाटिल's picture

13 Sep 2017 - 11:38 am | संजय पाटिल

अरुणाचल प्रदेश नव्हे, त्यांना तमीळनाडू मधिल अरुणाचल बद्दल माहिती हवी आहे असे वाटतेय...

समर्पक's picture

13 Sep 2017 - 12:08 pm | समर्पक

तिरुवन्नामलाई, तामिळनाडू...

बंगळूर व चेन्नई दोन्हीकडून तसे सारखेच पडेल. बंगळूर वरून पॉंडिचेरी एक्सप्रेस रेल्वे ए सी बेस्ट. आज्जींच्या वयानुसार हा प्रवास झेपेल कि नाही हे तुम्ही ठरवा, पण बसपेक्षा रेल्वे बरी असावी.

राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. बरेच आधी आरक्षित करावे लागते पण. अधिक माहिती: https://www.sriramanamaharshi.org/ashram/accommodation/

अरुणाचल पर्वताची प्रदक्षिणा हा तिथला खरा अनुभव परंतु आजींना झेपेल असे नाही, पण तरीही आश्रम भेट व अग्नीतत्वाचे शिवस्थान अरुणाचलेश्वराचे भव्य मंदिर हे निश्चित त्यांना आवडतील.

कबीरा's picture

16 Sep 2017 - 3:36 am | कबीरा

माहिती साठी धन्यवाद. संपर्क केलेला आहे बघूया बुकिंग मिळते का.

मूकवाचक's picture

15 Sep 2017 - 5:48 pm | मूकवाचक

मी रमणाश्रमात नेहेमी जातो. या वर्षी डिसेंबर महिन्यात जायचा विचार आहे. कृपया व्य. नि. करा, सविस्तर बोलता येईल.

कबीरा's picture

16 Sep 2017 - 3:40 am | कबीरा

व्य.नि केला आहे.