बंधु आणि भगिनिंनो
माझा असा विचार आहे की खालील प्रमाणे पिठ वापरुन पराठे बनवावे,
कृपया मला सांगा की यात काही अजुन करता येईल का, कींवा यात काय चुकीच आहे
पिठ :-
गहु १ किलो, १०० ग्रा. सोयाबिन, १०० ग्रा. बदाम एकत्र दळुन तयार केलेल पिठ
यामुळे पिठातील प्रोटिन प्रमाण वाढेल का? , माझे काही चुकत आहे का? किंवा अजुन काही घटक वाढवावे का?
यानंतर नेहमी प्रमाणे, पालक किंवा मेथी किंवा धनिया टाकुन पराठा बनवणे.
प्रतिक्रिया
11 Sep 2017 - 11:04 am | धर्मराजमुटके
.
11 Sep 2017 - 12:12 pm | केडी
आमच्याकडे पीठ दळताना त्यात सोया आणि मेथी टाकून दळून घेते आई ...बदाम चालतील बहुदा,...
11 Sep 2017 - 12:55 pm | sagarpdy
अजून पौष्टिक करायचे असतील तर कणिक भिजवताना पाण्या सोबत साय काढून दूध पण वापरता येईल. पोळ्यांना एक रिच टेस्ट पण येते.
होऊ दे खर्च
11 Sep 2017 - 1:30 pm | दीपक११७७
गूड आयडिया
11 Sep 2017 - 1:35 pm | ज्ञानोबाचे पैजार
दिपकरावांनी माझ्या मेहुण्यांना हा प्रश्र्ण विचारला असल्या मुळे माझा पास.
पण अजुन एकाही मेव्हणीने उत्तर दिलेले नाही.
पैजारबुवा,
11 Sep 2017 - 2:12 pm | सूड
भगिनिंना प्रश्न असल्याने पास.
11 Sep 2017 - 7:57 pm | रमेश आठवले
रामदेव बाबांची पतंजली कम्पनी मेथी आटा विकते . नेट वर किंमत किलोला ८७ रुपये.
11 Sep 2017 - 8:12 pm | सुबोध खरे
एक किलो गव्हात १४० ग्राम प्रथिने(१४%) आहेत.
यात १०० ग्राम सोयाबीन टाकल्यास ३६ ग्राम(३६%) प्रथिने मिळतील आणि २० ग्राम तेल ( या तेलामुळे विशिष्ट वास आणि चव येते)
१०० ग्राम बदाम टाकले तर २१ ग्राम (२१%) आणि ५० ग्राम तेल
आणि मेथी टाकली तर २२ ग्राम (२२%) प्रथिने मिळतील.६ ग्राम तेल. ( यामुळे कडूपणा येतो)
एक सोपा उपाय छोटा वजन काटा असेल तर २०० ग्राम च्या तीन वेगवेगळ्या पिठात २० ग्राम बदाम , २० ग्राम सोयाबीन आणि २० ग्राम मेथी यांचे मिक्सर मध्ये पीठ मिश्रण करून खाऊन पहा. जे आवडेल ते पुढे चालू ठेवा अन्यथा गाजराची पुंगी.
भगिनी नसताना प्रतिसाद देण्याचा आगाउपणा केल्याबद्दल क्षमस्व
12 Sep 2017 - 10:11 am | दीपक११७७
नेहमी प्रमाणे उपयुक्त माहीती- मर्गदर्शन
धन्यवाद सर
11 Sep 2017 - 8:19 pm | कंजूस
सोयाबिन१ चालणार नाही. मुगाचे पीठ थोडे टाका ,चवीला मेथी पाने,कोथिंबिर,ओवा .
*१ सोयाबिन पचवण्याची शक्ती फक्त जनावरांना आहे. रवंथ करतात.
- काही पंजाबी लोक सराटे२ टाकताना लहानपणी पाहिले आहे.
*२ पायवाटेने जाताना गोल काटेरी फळे कपड्यांना चिकटतात त्यातले टणक बी.
शक्तिसाठी आयुर्वेदात कौंचबिज ( खाजकुइलीचे बी ) दिले आहे.
कौंचपाक याचेच बनवतात.
हिमालयातली सफेद मुसळी ही खास आजारातून उठलेल्यांसाठी वापरतात. परदेशात याचे डबे मिळतात. ( फार महाग असते)
सोपा चांगला उपाय मुगाचे पीठ वापरणे.
12 Sep 2017 - 10:32 am | दीपक११७७
साधारण एका पराठ्यात सगळी पोषक तत्वं विपुल प्रमाणात मिळावी असा विचार आहे.
म्हणजे एक पराठा बनवला की झाले. शिवाय तेल कमी लागते तसेच मसाल्या पासुन सुटका.
गव्हाच्या पिठात कार्बोहाईड्रेड जास्त असतात, त्यात जर प्रथीने वाढवले तर परिणाम कारक होईल असे वाटते
पण.. शरीरात कीती शोषले जाईल सांगता येत नाही
परंतु आणखी दुस-या पध्दतीने सेवन केल्यास शोषले जाईलचं याची काय गॅरेंटी आहे.
11 Sep 2017 - 8:29 pm | कंजूस
पदार्थांत ( म्हणजे शाकाहारी डाळी,कडधान्ये) नत्र किती टक्के आहे हे फार तांत्रिक आहे॥ इकडच्या डाळींत २० -२८ टक्के आ णि सोयाबिनमध्ये ३५ -४० आहे याला काही अर्थ नसतो कारण शरिरात ते पचवले जात नाही.
डाळी भिजवून आंबवल्या की त्यातले नत्र उघडे होते. ( हे थोडक्यात सांगितले)
अशा डाळी वाटून त्यात फोडणी कच्चा कांदा लावले की जी चटणी ( = डांगर, चटका )होते ती उपयुक्त असते.
12 Sep 2017 - 10:35 am | दीपक११७७
या बाबत सविस्तर वाचायला आवडेलं
11 Sep 2017 - 8:30 pm | सुबोध खरे
सफेद मुसळी हि वाजीकरण (APHRODISIAC) प्रक्रियेत वापरली जाणारी वनस्पती आहे. त्याने आपल्या कामजीवनात तारुण्य जोम आणि उत्साह वाढतो असा दावा आहे. पण रोजच्या जीवनात त्याने शक्ती वाढते असा दावा कुठें केल्याचे वाचले नाही.
12 Sep 2017 - 10:33 am | दीपक११७७
सहमतं
12 Sep 2017 - 7:35 am | रेवती
समजा हे काहीच न करता कणिक ही कणकेसारखी, डाळीचे पीठ हे डाळीच्या पिठासारखे वापरले तर काय होईल?
आपले पूर्वज काय करत होते? (मी नै हां, ऋजुता दिवेकर असं म्हणते) एकेकाळी मी पेप्रात छापून आलेल्या लेखाने प्रभावित होऊन असले उद्योग केले होते व ते थोड्या काळाने बंद पडले. ऋजुता म्हणाली की जे सस्टेनेबल नाही ते करूच नका आणि खरच, डोक्याला नस्ता ताप आणि आपल्याला सत्रा कामं असताना आणखी वाढीव कामांचा व्याप होतो. सोयाबीन मी वापरत नाही म्हणून माहित नाही पण बदाम वगैरे अठवड्यातून दोनेकवेळा मूठभर घेऊन खावा म्हणजे काम संपेल. ही मिसळामिसळीची कामं तुम्ही स्वत: करणार आहात का? नाहीतर घरच्यांना कामाला लावाल. तसं नको.
12 Sep 2017 - 10:21 am | दीपक११७७
फूड प्रोसेसर मधुन एकत्र करण्याचा मानस आहे.
साधारण एका पराठ्यात सगळी पोषक तत्वं विपुल प्रमाणात मिळावी असा विचार आहे.
सध्या एक पालेभाजी व गव्हाचे पिठ एकत्र करुन पराठे घरी बनवले जतात.
12 Sep 2017 - 8:01 pm | उगा काहितरीच
कितीही पौष्टिक , रुचकर पदार्थ असला तरी सलग काही दिवस खाल्ला तर नंतर नंतर अजिबात खावासा वाटणार नाही. त्यामुळे एकाच पदार्थात सगळे पोषक घटक मिळवायचा प्रयत्न करण्यापेक्षा वेगवेगळ्या चवीचे , कमी अधिक पोषक घटक असलेले खाल्लेले चांगले . अर्थातच माझे वैयक्तिक मत ! जाणकार लोक अजून प्रकाश टाकू शकतील .
12 Sep 2017 - 3:26 pm | दीपक११७७
भगिनिंनो,
एवजी
बंधु आणि भगिनिंनो
असा बदल केला आहे,
आता सगळे जण प्रतिक्रीया देवु शकतात.
12 Sep 2017 - 9:18 pm | कंजूस
उगा काहितरीच बोलत नाहीत खरे बोलतात
# डाळी भिजवून आंबवल्यावर त्यातले नत्र पचायला सोपे जाते.
12 Sep 2017 - 9:33 pm | बाजीप्रभू
पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात विराट राजाच्या नगरीत भीमसेन पाकनिपुण म्हणून पाकशाळेत बल्व म्हणून राहिला होता हा इतिहास माहितीच असेल तुम्हाला... पण कदाचित तुम्हास हे ठाऊक नसेल कि भीमाने तेव्हा रोजच्या सोप्या पारंपरिक पदार्थांबरोबरच कमी-अधिक पाककौशल्याने सिद्ध होणारे पदार्थ आणि विशेष म्हणजे मांसाहारी व मत्स्याहारी पदार्थांचे कौशल्यपूर्ण वर्गीकरण करून स्वतःच्या डायरीत पाण्डुलिपित लिहून ठेवले होते.
अगदी भगीरत प्रयन्त करून ती डायरी मी मिळवली आहे.. पाण्डुलिपिचा अभ्यास लवकरच पूर्ण करून मिपावर "पौराणिक पाकशास्त्र आणि पाककृती" ची एक मालिका लिहिणार आहे. ३१०० ईसा पूर्व पदार्थ कसे असायचे हे या मालिके निमित्ताने पहिल्यांदाच मिपावर येतील.
तुमच्या या छोट्या, छोट्या शंकांचं निसरन त्या मालिकेत होईल.. फक्त थोडी वाट पाहावी लागेल आणि रेडिमेड पिठावर काम चालवावं लागेल.
13 Sep 2017 - 10:59 am | दीपक११७७
वाट पाहत आहोत पण....
लई वाट पहायला लावु नका?
25 Sep 2017 - 10:20 pm | नूतन सावंत
लवकर लिहा.
13 Sep 2017 - 12:49 am | सही रे सई
वरती उगा काहितरीच यांनी सांगितल्या प्रमाणे रोज तेच तेच (म्हणजे पराठा) खाल्लात तर कंटाळा येईल आणि मग काहीतरी पौष्टिक खाल्ले जावे हा उद्देश सफल होणार नाही.
त्या पेक्षा नेहमीचेच कणिक आणि थोडे डाळीचे पीठ (बेसन) आणि आवडीच्या भाज्या / पालेभाज्या मिक्स करून मधे अधे पराठा करता येईल. त्याच बरोबर त्याच जातकुळीतील पदार्थ पण करा .. जसे कि भाजणीचे थालीपीठ किंवा भाजणीचे पातळ डोश्यासारखे पीठ करून त्याचे धिरडे, वेगवेगळ्या डाळी मिक्ष करून त्याचे पीठ दळून आणावे आणि त्याचे पण धिरडे करणे, डाळ भाताच्या खिचडी मधे वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरून खाणे असे करावे असे सुचवते. बदाम रोज रात्री भिजत घालून सकाळी खाल्लेले चांगले.
26 Sep 2017 - 11:16 am | दीपक११७७
यस
25 Sep 2017 - 10:02 pm | Ana
मी माझ्या आईने सांगितलेल्या प्रमाणे अर्धा कि.तांदूळ मागच्या महिन्यात शिल्लक राहिलेल्या सगळ्या प्रकारच्या डाली कडघान्य एकत्र दलून आणते.प्रमाण काही नाही पण साधारणपणे एक किलो होते.त्या पिठाचे डोसे आप्पे थालिपीठ करते .गेले सहा महिने करत आहे छान लागतात
26 Sep 2017 - 11:14 am | दीपक११७७
अजुन सविस्तर सांगता येईल का?
25 Sep 2017 - 10:02 pm | Ana
मी माझ्या आईने सांगितलेल्या प्रमाणे अर्धा कि.तांदूळ मागच्या महिन्यात शिल्लक राहिलेल्या सगळ्या प्रकारच्या डाली कडघान्य एकत्र दलून आणते.प्रमाण काही नाही पण साधारणपणे एक किलो होते.त्या पिठाचे डोसे आप्पे थालिपीठ करते .गेले सहा महिने करत आहे छान लागतात
23 Dec 2018 - 7:25 pm | पाटलांचा मह्या
कच्चे सोयाबीन पचनास जाड असते. दळण करताना भाजलेले सोयाबीन घालावे. सोयाबीन भाजल्याने त्यातील प्रथिने ब्रेक होतात आणि आपले आटते ते प्रथिने शोषून घेऊ शकतो त्यामुळे ते बाधत नाही.
27 Dec 2018 - 4:02 pm | तनमयी
unprocessed सोयाबीन खावू नये
चीनी लोग processed सोयाबीन खातात नेट मिळेल यावर शोधाल तर
त्यापेक्षा काळा चना पाव किलो टाका पाच किलोला
जवस टाका दहा वीस ग्राम
बदाम डिंक खारीक लड्डू बनवा
बदाम डिंक खजूर लड्डू पण छान लागतात
27 Dec 2018 - 4:20 pm | तनमयी
When you get wheat ground from the flour mill, mix 1 kg of corn flour for every 10 kg of wheat flour. Oil extracted from corn is cholesterol free... Also, if you mix the two to prepare wheat dough using this proportion, it prevents the wheat roti from becoming hard like leather. It removes the dryness from the roti, aids digestion and makes the preparation tasty too.