मिक्सर वापरताना

इलेक्ट्रॉनिक्स's picture
इलेक्ट्रॉनिक्स in तंत्रजगत
8 Sep 2017 - 9:28 pm

मागे व्हॅट सॅप वर एक पोस्ट वाचली
तुम्ही कितीही मोठे इंजिनियर असले तरी घरचा मिक्सर दुरुस्त करता आला नाही तर तुमच्या आई च्या दृष्टीनें तुम्ही डोबल्याचे इंजिनियर
मिसळ पाव साठी लिखाण करताना पहिले लिखाण एखादी तंत्र वर करावे अशी ईच्या झाली .
मिक्सर गृहिणीस लागणारी गरजेची वस्तू ते जर बंद असल्यास तुमचे पाकीट बरेच खाली होऊ शकते
काळजी कशी घ्यावी
१ मिक्सर चालू करताना मिक्सर वरचे बटन बंद असल्याची खात्री करा
२ मिक्सरची पिन सॉकेट मध्ये टाकताना बोर्डावरचे स्वीच बंद असल्या ची खात्री करा .
३ जे पदार्थ तुम्हाला मिक्सर करायचे आहे ते भांड्यात टाकून भांडेचे झाकण बंद करून मिक्सर चालू करणे
४ मिक्सर चे काम झाल्यावर मिक्सर तात्काळ धुवावे
५ मिक्सर ची wire चे आवरण नेहमी तपासावे
बाकी चर्चा तुमच्या प्रश्नांवर व तुमच्या शंकेवर

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

8 Sep 2017 - 10:18 pm | रामपुरी

"तुमचे पाकीट बरेच खाली होऊ शकते???"
म्हणजे काय? कुठपर्यंत खाली?

अवांतर-
(हिंदी) खाली = (मराठी) रिकामे
(मराठी) खाली = (हिन्दी) नीचे.

राघवेंद्र's picture

8 Sep 2017 - 10:22 pm | राघवेंद्र

पहिला प्रयत्न चांगला आहे

पुढील लेखांसाठी विषय -
Jack _Bauer यांची प्रेरणा घेऊन मिक्सर, ग्राइंडर, फूड प्रोसेसर, मॅजिक बुलेट, निन्जा, वेट ग्राइंडर अश्या सर्व प्रकारावर.
तसेच हॉर्स पॉवर ते फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटरचा प्रवासावर
आणि मराठी मिक्सर म्हणजे फरसाण, गुजराथी गाठिया आणि दक्षिण भारतीय मिक्सर वर काही तुलनात्मक

उपयोजक's picture

8 Sep 2017 - 11:36 pm | उपयोजक

एवढी मोठी पोस्ट कधी वाचायची?

काही संभाव्य प्रश्नोत्तरे देऊन लेख वाढवा

आपल्याला मिक्सर चे भांडे की मिक्सर धुवायाचा आहे.

जाऊबाई जोरात's picture

10 Sep 2017 - 9:52 pm | जाऊबाई जोरात

त्यात पाणी जाईल

औरंगजेब's picture

14 Sep 2017 - 9:16 pm | औरंगजेब

वा!

नाखु's picture

16 Sep 2017 - 12:22 am | नाखु

गृहीणींचा "जिव्हा"ळ्याचा विषय !!!!

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2017 - 1:45 pm | प्रकाश घाटपांडे

मिक्सर मोकळा फिरवला तर आवाज येत नाही पण आत माल असेल तर फार मोठा आवाज येतो. माझ्या मते मोटर व भांडे यांचे गिअर मधे गॆप असेल तर असे होत असावे

Nitin Palkar's picture

22 Sep 2017 - 9:37 pm | Nitin Palkar

मिक्सरच्या गती नियमनाबद्दल बऱ्यापैकी गैरसमज/अज्ञान असते. फूड प्रोसेसर मध्ये काही जोडण्या (attachments) फक्त धीम्या गतीवर वापरायच्या असतात हे अनेकांना माहित नसते. ओले पदार्थ वाटतांना योग्य तेवढे पाणी घातले नाही तरीही वाटण बिघडू शकते व विजेचाही अधिक वापर होतो.
याच धर्तीवर प्रेशर कुकर वापरावर टिप्स यायला हरकत नाही.