सुके प्रॉन्स / कोळंबी मसाला .

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
6 Sep 2017 - 2:52 pm

कोळंबी मसाला ..
मी शुद्ध शाकाहारी न नवरा पक्का मांसाहारी आहे :( म्हणून असे उपदव्याप करायला शिकतेय हळूहळू
कोळंबीला कधी हात हि न लावलेली मी ,शेंडा कोणता न बुडुख कोणते न कळणारी मी, हे सहज बनवू शकते तर कोणीही बनवू शकेल नक्किच :)
साहित्य :
सुके प्रॉन्स / कोलंबी ( मी एक डिश भर घेतल्यात )
३ सुक्या बेडग्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
आले तुकडा एक इंचभर
चिंच एक बुटुक
ओला नारळ - १ वाटी
टॉमॅटो बारीक चिरून -अर्धी वाटी
कांदा बारीक चिरलेला - अर्धी वाटी
हळद अर्धा छोटा चमचा
लाल तिखट अर्धा छोटा चमचा
कोथिंबीर सजावटीला
मीठ चवीपुरते
कृती :
ड्राय कोलंबी तव्यावर कोरड्या भाजून घ्याव्यात , त्याचे डोके खुडून टाकावे
आता मिक्सर मध्ये मिरच्या ,नारळ , लसूण , आलं , चिंच यांचं थोडं पाणी घालून वाटण करून घ्याव
कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात कांदा परतावा कांदा सोनेरी झाला कि टॉमेटो परतून घावा .तेल सुटू लागलं कि लाल तिखट , हळद न चवीनुसार मीठ घालावं परतून घेऊन त्यात वाटण घालून एकजीव करावं न मग त्यात भाजल्या कोलंबी घालून मिश्रण हलक्या हातानं एकजीव करावं न कोथिंबीर घालून सजवावे :) शंपी रेसेपी :) फोटू काढूपर्यंत नवर्यानी अर्धी डिश फस्त केली होती , म्हणून कशी बशी अर्धी वाटी का होईना फोटॊपूर्ती उधार घेऊन संपवलं एकदाच :)
k
m
l
f
g

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

6 Sep 2017 - 3:13 pm | कविता१९७८

वाह, मुलगी शिकली प्रगती झाली.

पैसा's picture

6 Sep 2017 - 4:31 pm | पैसा

पिवशे लै भारी आहेस!

सस्नेह's picture

6 Sep 2017 - 4:40 pm | सस्नेह

भारी लिवलंय !
चकल्या ते कोळंबी ...प्रवास हृद्द्य आहे !

ते दिसतंय छान पण पिश्वे , काय हे ! रुकी मिस्टेक .... असली कामं नवर्‍याच्या गळ्यात घालायची... तू पहिल्याच वर्षात नॉनव्हेज करायला घेतलंस मग त्याला करायला काय राहिलं? ;) मी मसाला करते तू प्रॉन्स साफ कर वगैरे तरी कर च पुढच्या वेळेला :प

है हे सृजा बस क्या, कोलम्बी साठी नारळ नवारोबा कडूनच खऊन घेतलाय म्हटलं अशी कशी वीसरेल तुझी शिकवनी म्हणते मी ;)

इशा१२३'s picture

7 Sep 2017 - 5:05 pm | इशा१२३

शिकवणी लावायला दुसर कोणी गुरु मिळाला नाही का तुला?

बाकी पदार्थ कामाचा नसला तरि प्रगती वाचण्यासाठी आले बर
धाग्यावर.
सुगरण पियु!

स्रुजा's picture

7 Sep 2017 - 11:45 pm | स्रुजा

:) :)

एका मिपाकरणीच्या मुलाला पण मी फ्लॉवर च्या भाजीच्या बदल्यात शिकवणी देणार आहे, बघच तू ;)

मी तर म्हणते मुलाला दत्तकच घे!फ्लॊवर काय पडवळ,भोपळा,नवलकोल सगळ्या भाज्या मिळतील :)

पियुशा, तू अगदी टिपिकल बायको झालीस. नवर्‍याला काय आवडतं वगैरे....................संसाराचे धडे देताना धडा सहावा, 'मी तुळस तुझ्या अंगणातली' हा तू नीट पाठ केला होतास याची प्रचिती आली.
चल, आता एक उखाणा घे मुली.

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 8:26 pm | गामा पैलवान

करंदीच्या सुकटीला लावलं कोळंबीचं नाव
पतिदेवा, जेवू घालते आता मला पाव

-गा.पै.

पियुशा's picture

6 Sep 2017 - 8:42 pm | पियुशा

धन्य ----^------- :) :) :)

मीता's picture

6 Sep 2017 - 9:17 pm | मीता

भारी दिसतय

जेम्स वांड's picture

6 Sep 2017 - 9:23 pm | जेम्स वांड

उत्तम रेसिपी, पहिल्यांदाच केली म्हणताय पण रंग अन प्रेझेंटेशन इथवर पोचलं, म्हणजेच सुगंधही झ्याकच असणार, तुम्हाला खूप शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2017 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुके प्रॉन्स / कोळंबी नव्हे... सुकट म्हणतात तिला !

चित्रात दिसते ती मोठ्या आकाराची सुकट = करंदी (सुकट)
लहान आकाराची सुकट = जवळा (सुकट)

सुकटीचे सर्व पदार्थ अत्यंत आवडते आहेत (स्लsssर्प). केवळ कांदा व मसाल्यावर परतलेली सुकट एक नंबर लागते. खोबरे वापरल्याने सुकटीचा मूळचा चवदार स्वाद मारला जातो :(

येस्स! कांद्यातली करंदी/जवळा आणि बरोबर भात किंवा तांदळाची भाकरी. लवकरच करणे भाग आहे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही :)

@पियुशा, प्रयत्न छान आहे. सुकट (भाजून किंवा न भाजता) पाण्यात दहापंधरा मिनिटं भिजत घालून हलके पिळून मग फोडणीला टाकल्यास नीट शिजते. नुसतं भाजून आमच्याकडे सुका जवळा किंवा बोंबिल खातात, पण करंदी नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2017 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुकट पाण्यात दहापंधरा मिनिटं भिजत घालून हलके पिळून मग फोडणीला टाकल्यास नीट शिजते.
+१

भाजलेल्या सुकटीची चव न भाजलेल्या सुकटीपेक्षा फार वेगळी असते. चटणी करायला भाजलेली सुकट ब्येष्ट. पण, इतर पदार्थांत भाजून मूळ सुकटीची चव मारून टाकणे शक्यतो टाळावे.

केवळ कांदा व मसाल्यासह तव्यावर परतलेल्या सुकटीत थोडेसे वांग्याचे बारीक तुकडे (व थोड्याशा बटाट्याच्या पातळ काचर्‍या) टाकल्यास मस्तं लागतात.

+१ अगदी, आमच्याकडे पण, बाकी मग सुक्या बांगड्याची कुसबीर भरपूर कांदा आणि खोबरं घालून.....बाप्पा गेले, आता करतोच ह्या वीकएंड ला!

बाकी पाकृ आणि फोटो छान!

निशाचर न म्हात्रे सर तुमच्या पद्धतीने करून बघेल :) धन्स बर का :) मला काय इतकं माहिती नाही ह्या पदार्थ बद्दल एकदम च अडाणी म्हणालात तरी चालेल त्यामुळे अस होत माझं पण ह्याला माझया सासु बाई प्रॉन्स च म्हणता मग मी पण तेच लिहिलं इमानदारीत ;)

काय आठवण काढलीत डॉक! जवळा, करंदी, सोडे, बोंबिल, ...!

पियुशाताई, छान केलाय पदार्थ.

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 12:14 am | गामा पैलवान

पियुशा,

पण ह्याला माझया सासु बाई प्रॉन्स च म्हणता

सुकट = प्रॉन्स ....?

घोर कलियुगातलं अज्ञानाचं तांडव म्हणतात ते हेच !

आ.न.,
-गा.पै.

कविता१९७८'s picture

7 Sep 2017 - 7:14 am | कविता१९७८

असे म्हणणे बरोबर नाही हो गामाजी , प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असु शकते.

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 1:30 pm | गामा पैलवान

कविता१९७८,

म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. सुकट या अस्सल देशी शब्दाची जागा प्रॉन्स या अर्थविपर्यस्त इंग्रजी शब्दाने घेतल्याचं पाहून अंमळ यातना झाल्या. ;-) (या यातनांची भरपाई पियुशा यांनी मला अश्शीच सुकट खिलवली तरंच होईल.) कांदटलेली तिखटजाळ सुकट हाणतांना की म्हणतांना सुके प्रॉन्स डोळ्यासमोर येतंच नाहीत हो ! नव्हे नव्हे ते तत्त्वचि वेगळे !!

आ.न.,
-गा.पै.

विशाखा राऊत's picture

7 Sep 2017 - 2:39 am | विशाखा राऊत

पियुडे अग काय हे... डायरेक्ट सुकलेली मच्छी.
आम्ही ह्याला काड म्हणतो. ह्याची सिंपल रेसेपी सांगते, भरपुर कांदा, टोमॅटो, आल लसुण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, कोकम. तेल (जरा जास्तच ;) ) गरम करुन कांदा गुलाबी परतुन घे. त्यात आल लसुण पेस्ट परतुन घे. अब टोमॅटो फ्राय. हळद, तिखट, मीठ घालुन व्यवस्थित परतुन घे तेल सुटेपर्यंत. सुकी कोळंबी (काड, सुकट म्हणशील ते) थोडावेळ भिजवुन नीट साफ करुन घे आणि परतलेल्या मसाल्यामध्ये एकत्र करुन नीट शिजवुन घे. अस्सा घमघम्माट पसरतो की बस नवरा खुष होईल बघ ;)

बाय द वे, ताज्या मच्छीचा बाजार जवळ असताना सुकी कशाला करतेस?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2017 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

ताज्या मच्छीचा बाजार जवळ असताना सुकी कशाला करतेस?

असं कसं, असं कसं ?!

उत्तम प्रत असलेली सुकट, सोडे आणि बोंबील वापरून सुगरणीने बनवलेले पदार्थ ताज्या मासळीच्या पदार्थांना तोडीस तोड असतात बरं का ! अर्थातच, दोन्ही आपापल्या जागी एकूण फर्मासच :)

विशाखा राऊत's picture

8 Sep 2017 - 2:46 am | विशाखा राऊत

हो पण नवशिक्याने डायरेक्ट सुकटाला हात लावला म्हणजे.. सिक्सर :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2017 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणूनच कौतूकाने थोडा क्लास घेतला ! "कॅच देम यंग, यू नो !" =))

धन्स गो विशाखा, मी शिकतेय ग अजून मच्छी तल पण काय कळत नाय अजून मला नीट पण शिकेल तुमच्या सारखे गुरुवर्य आहेत ना ;)

नाश्ता असायचा माझा कित्येक वेळी . वर म्हात्रे सरांनी सांगितलेली रेसिपी उत्तम आहे . कांद्यावर परतून घेण्याची

इरसाल's picture

7 Sep 2017 - 1:36 pm | इरसाल

कोलीम-भुक्का( बुख्खा)-बारीक जवळा- जवळा-करंदी-अंबाडी-सोडे-कोलंबी

पद्मावति's picture

7 Sep 2017 - 10:00 pm | पद्मावति

आहा मस्त पाकक्रुती.

पिवशे, ह्यांना प्रॉन्स म्हणत नाहीत. सुकट आहे ती.

बाकी पाककृती चांगली बनवली आहेस. नवरोबाला जागु तै च्या स्टाईलने मासे बनवून खाऊ घाल..

Nitin Palkar's picture

22 Sep 2017 - 9:15 pm | Nitin Palkar

स्वतः शाकाहारी असून सुकटीची पाक्रु केल्याबद्दल अभिनंदन. सुकटीची डोकी आणि चिंगुल्याशा शेपट्या भाजण्यापूर्वी काढून घ्याव्यात. ओल्या खोबऱ्या ऐवजी सुकं खोबरं वापरून बघा वेगळा स्वाद येतो. ताजे मासे बनवायलाही नक्की शिकाल. पुढील पाक्रुला शुभेच्छा.

आनंदी गोपाळ's picture

4 May 2018 - 8:52 pm | आनंदी गोपाळ

चित्रांना जोडणार्‍या साखळ्या मेलेल्या आहेत.
शुद्ध मराठीत,
पिक्चर लिन्क्स आर डेड.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2018 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

पिक्चर लिन्क्स आर डेड. डेड नाही एक्सपायर्ड. फरक आहे ;) :)

लेखिकेने बहुतेक (अ) चित्रे अल्बममधून काढून टाकली आहेत, (आ) अल्बम डिलीट केला आहे, (इ) चित्रे एडिट केली आहेत, किंवा (ई) चित्रांचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढून टाकला आहे.

कपिलमुनी's picture

4 May 2018 - 9:45 pm | कपिलमुनी

माझा एकट्याचाच गणेशा झालाय की सर्वांचा ??