मोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे?

सांरा's picture
सांरा in तंत्रजगत
5 Sep 2017 - 9:04 pm

सर्वप्रथम हा धागा चुकीच्या ठिकाणी असल्यास क्षमस्व. सदाहरित धागा गूगल वर शोधून बघितला पण सापडला नाही. तसेच प्रश्नोत्तरे सदरात Access Denied असे लिहून आले.

काल मोबाईल( मोटो जी ४+) पाण्याच्या बाटली जवळ ठेवला होता. अचानक बाटलीला धक्का लागून पाण्याने मोबाईलला अंघोळ घातली. त्यानंतर मी पहिली चूक (मोबाईल सुरु करून पाहणे) केली. फोन सुरु होत नव्हता. त्याला कोरडे केले. ड्रायर ने वाळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तांदुळात ठेऊन दिला. संध्याकाळी दुसरी चूक केली ती म्हणजे चार्जिंगला लाऊन पाहणे.

आज सर्विस सेंटर ला घेऊन गेलो. एक तास वाट बघायला लावल्यावर त्याने ७५०० लागतील असे सांगितले. मोबाईलला ११ महिने असूनही पाण्यामुळे वॉरंटी लागत नाहीआणि पूर्ण मदरबोर्ड बदलावा लागेल असे बोलला. आधी लॅपटॉप प्रकरणात भाजून घेतल्यामुळे ( काहीच बिघडले नसतांना अव्वाच्या सव्वा रेट सांगणे ) सेकंड ओपिनिअन घेण्याचे ठरवले. एका दुकानात गेलो आणि पुन्हा एक तास वाट बघून झाल्यावर तो ३५०० लागतील कारण डिस्प्ले गेलाय असे बोलला.
या अगोदर कधी मोबाईल भिजला नाही त्यामुळे काय करावे ते समजत नाहीये. मिपाकर अशावेळी काय करतील/करतात?

पर्याय १ : सर्विस सेंटर ला परत जाणे - पण १३००० च्या मोबाईलला ७५०० लावणे परवडणार नाही. त्यापेक्षा दुसरा स्वस्त घेता येईल.
पर्याय २: दुकानात जाणे - पण भरोसा नाहीये हो.
पर्याय ३: तीन हजारापर्यंत नवा घेणे आणि पुन्हा कधी महाग मोबाईलचे नाव न काढणे.

अजून एक शंका अशी कि सध्या आयडियाचा ४०४ चा पॅक मारून ठेवला आहे. त्याचे काय करावे नेतसेटर मध्ये ४जि सीम बसेल का? सध्या सीम आपल्या मिस्टर डिपेंडेबल नोकिया ५२३३ मध्ये चालवत आहे(जो आतापर्यंत अडगळीत होता. आणि विकण्याचा विचार सुरु होता.).

-आपला राक्षस

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2017 - 9:13 pm | मराठी कथालेखक

दुकानात जाण्याचा पर्याय ठीक वाटतो आहे.. थोडी रिस्क आहेच शिवाय उरलेल्या अकरा महिन्यांत पण वॉरंटी मिळणार नाही (कारण एकदा दुसरीकडे दुरुस्त केला)
अजून एक उपाय म्हणजे , कंपनीच्याच दुसर्‍या सर्विस सेंटरला बघू शकता, कधी कधी दोन सर्विस सेंटरच्या खर्चाच्या आकड्यात तफावत असू शकते
नेटसेटर मध्ये ४ जी चे सिम चालेल पण ३ जी चे स्पीड मिळेल

सांरा's picture

5 Sep 2017 - 9:26 pm | सांरा

प्रश्नावरून असे वाटत आहे कि ११ महिने उरले आहेत. वास्तविक रित्या मला ११ महिने झाले आहेत. आहे म्हणायचे होते.
दुकानावर भरोसा नाही वाटत कारण होत फक्त डिस्प्ले गेला असे सांगत आहे. पुन्हा जाऊन त्याने समोर मदरबोर्डचे हि काम काढले तर ३५०० हि जातील आणि वरून मदरबोर्डलाही द्यावे लागतील.

तो फेकून द्या व नवा घ्या!
एखादी वस्तू आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याचे लाईफ व आपला वापर याचे गणित लावून पहा. उदा मोबाईल 1 वर्ष लाईफ कारण, टेक्नॉलॉजी सतत अपडेट होते.

सप्तरंगी's picture

6 Sep 2017 - 4:55 pm | सप्तरंगी

म्हणजे १३००० चा मोबाईल फक्त एक वर्षे वापरायचा?

जेम्स वांड's picture

7 Sep 2017 - 8:33 am | जेम्स वांड

तंत्रज्ञान पुढं धावतं आहे म्हणून आपण धावलंच पाहिजे असं नसतं, ९०% लोक उपलब्ध तंत्रज्ञानाचा ऑप्टिमम उपयोग देखील करीत नाहीत/करू शकत नाहीत. आधी हातात आहे ते तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने वापरणे शिकायला हवं, तंत्रज्ञान काय धावतच राहणार, पुढं काम उपलब्ध रिसोर्सेसना झेपणार नाही तेव्हा पाहता येईल नवं तंत्रज्ञान.

त्यांचे नेटसेटरसाठी डोंगल आणि सिम वेगळे घ्यावे लागते आणि रिचार्जही वेगळा असतो.

अजून एखाद्या रिपेअरीवाल्याला दाखवून बघा. असे तर आता ६/७ हजारात नवा बर्‍यापैकी ४जी मोबाईल हँडसेट मिळतो. कदाचित ३ ४ हजारात अजून कमी रॅम, जुने अँड्रॉईड व्हर्शन वगैरे असलेले मिळत असावेत. ते मोडल्यास मात्र रिपेअर अजिबात करू नयेत.

कोंबडा's picture

5 Sep 2017 - 9:58 pm | कोंबडा

फेकून द्या
राक्षसाला कशाला पाहिजे मोबाईल

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2017 - 10:38 pm | अमरेंद्र बाहुबली

राक्षसीनीला काँल करायला. ( ह. घ्या.)

सांरा's picture

6 Sep 2017 - 11:54 pm | सांरा

पण तेच म्हणणार होतो ..

विनिता००२'s picture

6 Sep 2017 - 10:00 am | विनिता००२

माझा पण मोबाईल पावसामुळे भिजला होता. भिजण्याची वॉरंटी मिळत नाही. डिस्प्ले गेला होता. सर्व्हिस सेंटरने ३०००/- खर्च सांगितला.
विचार करुन शेवटी नवीन मोबाईलच घेतला एक्स्ट्रा वॉरंटीसकट!

उपयोजक's picture

6 Sep 2017 - 12:35 pm | उपयोजक

मोबाईल काही तास तांदूळाच्या डब्यात ठेवा.तांदूळ मॉईश्चर चांगल्या प्रकारे शोषून घेईल.करून पहा.

सस्नेह's picture

6 Sep 2017 - 12:45 pm | सस्नेह

काही दिवस तसाच ठेवून द्या कपाटात ! दोनेक महिन्यांनी आपोआप चालू होईल. (स्वानुभव)
तोपर्यंत कोणता वापरायचा , नवीन की सेकंडहॅण्ड , हे मात्र तुम्हीच ठरवा !

भित्रा ससा's picture

6 Sep 2017 - 1:28 pm | भित्रा ससा

राक्षस भाऊ आपल्या समोर दोन पर्याय आहेत
1)नवा मोबाईल विकत घेणे
सध्या बाजारात 7000 ते 9000 दरम्यान आपल्या मोबाईल इतक्याच क्षमतेचे भरपूर मॉडेल आहेत
बरेसचे दुकानदार बंद मोबाईल विकत घेतात अंदाजे तुमचा मोबाइल 2000 पर्यंत विकू शकतो
2) सर्विस सेंटर पेक्षा बाहेरील दुकानात पार्ट स्वस्त मिळतात पण दुकान प्रतिष्ठित असलेले निवडा व तेथे डिस्प्ले बदलून घ्या

तुमचा आयडियाचा पॅक जरी 4जी चा असला तरी ते कार्ड 3जी नेटसेटरमध्ये चालते
जर नवीन नेटसेटर घेणार असलात तर dlink कंपनीचे 4जी चालणारे डोंगल विकत घ्या

गेल्या महिन्यात कळसुबाई ट्रेक केला. तुफान पाउस होता. दोन्ही नवीन स्मार्टफोन पाणी जाउन बंद पडले. जवळजवळ ३५ हजारांचा फटका, खुप हळहळले , बल्ब चालु करुन त्याखाली धरुन पाणी सुकवण्याचा प्रयत्न केला पण काहीच नाही झाले शेवटी आयडीया सुचली. हीटींग पॅडवर अक्षरश: पोळीप्रमाणे पुढुन मागुन शेकले. असे ३-४ वेळा केले आणि ४ दिवसांनंतर दोन्ही फोन्स आजपर्यंत व्यवस्थित चालतायत.

कविता१९७८'s picture

6 Sep 2017 - 2:58 pm | कविता१९७८

एक फोन सॅमसंग आणि एक विवो आहे

सांरा's picture

6 Sep 2017 - 11:55 pm | सांरा

_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2017 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जवळजवळ ३५ हजारांचा फटका

बाप रे...! लैच महागाचे फोन वापरता तुम्ही असे वाटते.

हीटींग पॅडवर अक्षरश: पोळीप्रमाणे पुढुन मागुन शेकले.

खरं म्हणजे देव तारी त्याला कोण मारी त्या प्रमाणे या फोनचेही आयुष्य झाले आहे.
वाचले तर वाचले नै तर नवाच घ्यावा लागतो. आपण लकी आहात.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

मोबाईल ला पोहायला शिकवून ठेवा म्हणजे पाण्यात बुडणार नाही.

विशुमित's picture

6 Sep 2017 - 4:00 pm | विशुमित

पोहायला येणे १३ हजाराच्या मोबाईल मध्ये इनबिल्ट पाहिजे राव...! (धागा लेखक कृपया हा.घ्या.)

सांरा's picture

6 Sep 2017 - 11:57 pm | सांरा

कमी लाइफ जाकीट, निदान भोपळा तरी असायला पाहिजे.

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 7:10 pm | गामा पैलवान

मोंबाईल पाण्यात पडल्यास काय करावे यापेक्षा काय करू नये हे अधिक महत्त्वाचे आहे. पाण्यात पडल्यावर पहिली गोष्ट म्हणजे लगेच सुरू करून पाहू नये. ओल्या फोनचं लगेच त्रुटीमंडल (= शॉर्टसर्किट) होतं. दोनतीन दिवस पूरपणे सुकवून मगंच चालू करून पहावा.

अधिका माहिती : http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%...

-गा.पै.

सुबोध खरे's picture

6 Sep 2017 - 8:38 pm | सुबोध खरे

एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायरने/ व्हॅक्युम क्लिनरने आत गरम/ साधी हवा सोडू नका. त्याने आत गेलेले पाणी अजूनच आत जाते आणि अजून बिघाड होऊ शकतो. याऐवजी व्हॅक्युम क्लिनरने आतील पाणी उलटे शोषून घ्या. यानंतर जेजे भाग सुटे करता येतील ते ते सुटे करा आणि टेबल लॅम्प च्या खाली थोड्यासहा अंतरावर फोन केवळ कोमट होईल अशा तर्हेने काही तास ठेवा .यानंतर हेच भाग एखादा दिवस उन्हात ठेवा. यानंतर ७०-७५ % फोन चालू होतात.
माझा नोकिया ३३०० फोन हात धुताना पाण्याच्या बालदीत पडला तेंव्हा हे सोपस्कार करून तो पूर्ण चालू झाला होता.

सांरा's picture

7 Sep 2017 - 12:06 am | सांरा

सांगायची राहिली वाटते. ब्लोवर गरम होऊ देऊन मग तो फोन वर सोडणे.
मला वाटते या धाग्यावर आतापर्यंत सर्वांनी जे जे म्हणून करू नका असे सांगितले ते सर्व मी आधिच करून बसलोय.
RIP
फोरप्लस जी. मोटो
(२०१६-२०१७)

धर्मराजमुटके's picture

7 Sep 2017 - 8:08 pm | धर्मराजमुटके

काय साहेब ! रणगाड्याची (नोकिया ३३१०) तुलना तुम्ही मारुती ८०० बरोबर कशी काय करता ?

सुबोध खरे's picture

8 Sep 2017 - 11:43 am | सुबोध खरे

धर्मराज साहेब
फोन वर पाणी पडणे आणि फोन पाण्याच्या बालदी मध्ये पडणे यात फरक नाही का?
जुन्या काळातील मराठी चित्रपटात नटी भिजते दाखवणे
आणि मंदाकिनी/ झीनत अमान नदीत अंघोळ करतात यात असावा तसा फरक आहे हा
)))---(((

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2017 - 10:33 pm | अमरेंद्र बाहुबली

एका प्लास्टिकच्या पिशवीत तांदूळ गच्च भरा! त्यात मोबाईल ठेवा! पिशवी चं तोंड हवा बंद करा! दोन दिवसाने बघा! मोबाईल गेला. हे समजून कुठेही दुकानात न जाता प्रतिक्रियेतील उपाय वापरा! चालू झाल्यास मला व्य नि करा! ( हा उपाय न चाल्ल्यास स्नेहांकिताजीं चा ऊपाय सर्वोत्तम).

सांरा's picture

7 Sep 2017 - 12:00 am | सांरा

पासून तांदुळाच्या कोठीतच आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Sep 2017 - 12:07 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मोटो आहे ना? फ्लिपकार्टवर एक्सेंज ऑफर आहे.नवीन घ्या व हा देऊन टाका.

सांरा's picture

7 Sep 2017 - 12:16 am | सांरा

फोन नाही घेत ते.

तांदुळापेक्षा चहापावडर भारी काम करते. दमट झालेली काडेपेटी ठेवली तर खुटखुटीत कडक होते!!

पैसा's picture

7 Sep 2017 - 7:06 am | पैसा

दमट हवेमुळे आमच्या काड्यापेट्या नेहमी धारातीर्थी पडतात.

बाजीप्रभू's picture

7 Sep 2017 - 7:54 am | बाजीप्रभू

अन्निसच्या धाक, भिती, दहशतीमुळे मी उपाय/तोडगे सांगू शकत नाही तरी देखील एक सत्य सांगतो कि जर तुमच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानात तुळेचा शनि आणि सप्तम स्थानात मकर राशीचा मंगळ असल्यास खराब झालेला मोबाईल जिवंत होत नाही. मारुतीची /रुद्राची उपासना फलदायी ठरते असा अनुभव आहे.

बाजीप्रभू's picture

7 Sep 2017 - 7:55 am | बाजीप्रभू

_/\_ ह. घ्या.

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Sep 2017 - 9:54 am | श्री गावसेना प्रमुख

मोटोरोलाचा हा(जी ४ प्लस) मोबाईल वॉटर रेजिस्टंस असल्याने पाण्यात पडुन बंद पडला असेल हे खरे वाटत नाही,माझा मोटो जी ३ टर्बो मी पाण्याने नेहमी स्वच्छ धुतो ,धुतल्या नंतर मागील कव्हर काढुन लागलेले पाण्याचे थेंब तेव्हढे पुसुन घेतो.

फक्त मोटो जी ३ वॅाटरप्रुफ होता.

बाकीचे वॅाटर रिझिस्टंट आहेत म्हणजे फार अपेक्षा न ठेवणे.

पिशी अबोली's picture

7 Sep 2017 - 10:40 am | पिशी अबोली

बाकी सगळे उपाय करून झाले असतील, तरी 2-3 दिवस कडकडीत उन्हात जमेल तेवढा सुटा करून ठेवून बघा. अजिबात सुरू करू नका तेवढा काळ.

ऍमेझॉनवर सिलिका जेल म्हणून मिळते, ती आणा आणि त्या पुड्यांमध्ये मोबाईल ठेऊन द्या. सिलिका जेल सर्व आर्द्रता शोषून घेईल.

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 1:35 pm | गामा पैलवान

सिलिका जेल विषारी आहे. विकत आणलं तर लहान पोरांपासून दूर ठेवा.

-गा.पै.

मंदार कात्रे's picture

7 Sep 2017 - 1:13 pm | मंदार कात्रे

माझे मोटो जी फर्स्ट जनरेशन आणि एम आय फोर आय अनेक वेळा पावसात ? पाण्यात भिजून बन्द पडलेले. ते उन्हात / गॅसवर तवा ठेवून त्यावर कॉटन चा पंचा सदॄश्य कापड ठेवून गरम करून चालू झालेले होते . शेवटी एम आय फोर आय गेल्या वर्‍षी जबर पावसात भिजल्याने मदरबोर्ड गेला . गॅरन्टीचे ११ महिने सम्पले होते व १ महिना बाकी होता . पण नशिबाने रेनलॉक शाबूत होते . त्यामुळे मुंबई मालाड सर्व्हिस सेन्टर मध्ये दाखल केला . ४ महिने उडवाउडवीची उत्तरे देत होते. शेवटी फोन / ईमेल्स / चॅट इत्यादितून जबरदस्त भांडणे करून रेड्मी नोट३ रिप्लेसमेन्ट पदरात पाडून घेतला . पण त्याची बॅटरी वीक होती... शेवटी तो गेल्या महिन्यात विकून रेड्मी नोट ४ परवा घेतला .............

मंदार कात्रे's picture

7 Sep 2017 - 1:13 pm | मंदार कात्रे

माझे मोटो जी फर्स्ट जनरेशन आणि एम आय फोर आय अनेक वेळा पावसात ? पाण्यात भिजून बन्द पडलेले. ते उन्हात / गॅसवर तवा ठेवून त्यावर कॉटन चा पंचा सदॄश्य कापड ठेवून गरम करून चालू झालेले होते . शेवटी एम आय फोर आय गेल्या वर्‍षी जबर पावसात भिजल्याने मदरबोर्ड गेला . गॅरन्टीचे ११ महिने सम्पले होते व १ महिना बाकी होता . पण नशिबाने रेनलॉक शाबूत होते . त्यामुळे मुंबई मालाड सर्व्हिस सेन्टर मध्ये दाखल केला . ४ महिने उडवाउडवीची उत्तरे देत होते. शेवटी फोन / ईमेल्स / चॅट इत्यादितून जबरदस्त भांडणे करून रेड्मी नोट३ रिप्लेसमेन्ट पदरात पाडून घेतला . पण त्याची बॅटरी वीक होती... शेवटी तो गेल्या महिन्यात विकून रेड्मी नोट ४ परवा घेतला .............

माझा सोनी एक्स्प्रिया पण भिजला. पार पाण्यातच. सर्व्हिस सेंटरवाल्याने डिस्प्ले आणि ट्चचे ८००० सांगितले. मग चार दिवस कोटेशन देणे, फोन करणे, एसएमेस येणे ह्यात गेले. शेवटी नाद सोडला. नवीन एक घेतला ९००० चा. तो आणि जुना फोन घेऊन घरी आलो. तीन दिवसानी सहज बघावे म्हणून चार्जिंगला लावला. काहीच फरक नाही पडला. रात्री ३ ला अचानक बॅटरी जागृत झाली. कसकाय चालू झाला कुणास ठाउक. उजेडाने जागा झालो तर फोन चालू झाला. अजुन आहे माझ्याकडे एक्दम चालू कंडीक्शनमध्ये. एक्प्रियाची बॅटरी जबरदस्त आहे शिवाय आवाजाला एक लंबर अस्ल्याने तो कायम राहणार माझ्याकडेच. नवीन मॉडेल मात्र येईनात सध्या सोनीचे. :(

विशुमित's picture

7 Sep 2017 - 4:17 pm | विशुमित

दिव्य साक्षात्कारच झाला म्हणायचा रात्री ३ वाजता..!!

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Sep 2017 - 5:19 pm | अमरेंद्र बाहुबली

मग तो नवा 9000 वाला राक्षसांना देऊन टाका! कशाला उगाच दोन दोन मोबाईल हवे??

माझ्या पोराला देणारे. खेळायला. त्याने बिघडवला की राक्षसाची भीती घालेन.

माझ्या पोराला देणारे. खेळायला.

अभिनंदन !!

चांदणे संदीप's picture

8 Sep 2017 - 6:12 pm | चांदणे संदीप

काँग्रॅच्युलेशन्स!!!

Sandy

काही दिवस तांदुळात ठेवल्यावर माझा धीर सुटला आणि फोन बहिणीजवळ ओळखीच्या दुकानात दुरुस्तीसाठी शहरात पाठवून दिला. वरून असेही सांगितले कि २ च्यावर सांगेल तर फोन रसायकल करून टाक. पण गाडी चांगला निघाला आणि १५०० मध्ये फोन बारा झाला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने बॅटरी, विब्रेटोर इत्यादी पार्ट बदलले आहेत. माझ्या चुका बघता बॅटरी जाणे साहजिकच होते. एक दुर्दैवी जीव अपघातात त्याचा फोन तोडून बसला आणि त्याची बॅटरी माझ्या कामात आली. जरी अजून किती दिवस फोन राहील याची गॅरंटी नाही. जेवढे दिवस होतील तेवढे चालवू. पण पुढील फोनचा विमा नक्कीच काढावा लागेल.

बाबा योगिराज's picture

2 Nov 2017 - 2:13 pm | बाबा योगिराज

नमस्कार,
दीड-दोन वर्षापूर्वी माझ्या मोब्ल्याला पण हाच प्रोब्लेम झालेला. मध्यरात्री कुलर ची नळी निसटल्याने घरात पाणीच पाणी झालेले. आणि मोब्ल्यारात्रभर पाण्यात भिजलेला. कॉल सेंटर वाला ७५००/- म्हणत होता. ओळखीच्या दुकानदाराने २५००/- सांगितले होते. फोन गेला अस समजूनच रिस्क घेतली. ओळखीच्या दुकानदाराकडेच मोब्ल्या दुरुस्त करून घेतला. अजूनही व्यवस्थित चालू आहे.

विचार करा, आणि निर्णय घ्या.

बाबा योगीराज.