बाप्पाचा नैवेद्य : खवा-पिस्त्याचे मोदक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
5 Sep 2017 - 7:14 pm

.

साहित्यः

१ वाटी खवा
१/४ वाटी पिस्ते सालं, काढून, ४-५ चमचे दुधात घालून मिक्सरला वाटून घेणे
अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्तं पिठीसाखर
१ चमचा वेलचीपूड
खायचा हिरवा रंग २ थेंब (ऐच्छिक)
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
साजुक तूप मोदकाच्या साच्याला लावण्यापुरतं

कृती:

नॉन-स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर परतून घ्यावा.
त्यातच पिस्त्याची पेस्ट घालून तूप सुटेपर्यंत परतणे.
आता त्यात खायचा हिरवा रंग, पिठीसाखर घालून मिश्रण गोळा होईपर्यंत परतणे.
मिश्रण गोळा होऊ लागले की गॅस बंद करावा.
थोडे थंड झाले की त्यात वेलचीपूड मिसळावी.

.

आता पेढे- मोदकाच्या साच्याला तुपाचा हात फिरवून मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
वरून चांदीचा वर्ख लावावा व बाप्पाला नैवेद्य दाखवावा.

.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

5 Sep 2017 - 7:21 pm | राघवेंद्र

फोटोतील जिलेबी मस्त !!!!

पाकृ नेहमीप्रमाणेच ....

गणपती बाप्पा मोरया !!!

अजया's picture

5 Sep 2017 - 7:32 pm | अजया

क्लास!

कविता१९७८'s picture

5 Sep 2017 - 7:51 pm | कविता१९७८

जीव घेणार तु सानिका

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 8:31 pm | सविता००१

सुरेखच..... मार डाला

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 8:32 pm | सविता००१

सुरेखच..... मार डाला

अप्रतिम सानि. खुप सुंदर दिसत आहेत मोदक.

पैसा's picture

5 Sep 2017 - 9:50 pm | पैसा

गणपतीची आरास तूच केलीस का?

सानिकास्वप्निल's picture

6 Sep 2017 - 12:22 am | सानिकास्वप्निल

हो गं. यंदा बाळांसाठी बाप्पांचे आगमन घरी झाले त्यामुळे सगळे घरीच केले.

मिसळ's picture

5 Sep 2017 - 10:04 pm | मिसळ

मोदक जबरदस्त दिसत आहेत. सोबत जिलेबीचे ताट पाहून बाप्पाला देखील हे घेऊ कि ते असे झाले असेल. :)

वाह! मोदकांना वेगळा रंग पाहून छान वाटले.
एक वाटी खव्याचे बारा मोदक होतात असे प्रमाण दिसतेय.

सानिकास्वप्निल's picture

6 Sep 2017 - 12:21 am | सानिकास्वप्निल

बारा नाही सोळा ते अठरा होतात. प्रसादाच्या वाटीत ही थोडे आहेत शिवाय बाप्पाच्या हातावर ही मोदक आहे :)

रुपी's picture

6 Sep 2017 - 1:49 am | रुपी

सुरेख!

विशाखा राऊत's picture

6 Sep 2017 - 2:30 am | विशाखा राऊत

वाह

मोदक तर भारीच. पण माझी नजर बोक्यासारखी जिलेबीच्या ताटावरच खिळून राहिली की..

स्वाती दिनेश's picture

6 Sep 2017 - 12:13 pm | स्वाती दिनेश

मोदक मस्त!
स्वाती

पियुशा's picture

6 Sep 2017 - 2:08 pm | पियुशा

अहाहा किती सुबक न चवदार :)

मदनबाण's picture

7 Sep 2017 - 8:28 pm | मदनबाण

सुंदर !

{ मोदक प्रेमी }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness

इशा१२३'s picture

9 Sep 2017 - 10:47 am | इशा१२३

सुरेख! रंग अप्रतिम आलाय.

जाऊबाई जोरात's picture

9 Sep 2017 - 11:01 pm | जाऊबाई जोरात

छान