बाप्पाचा नैवेद्यः साधे सोपे मलई पेढे

मीता's picture
मीता in पाककृती
5 Sep 2017 - 8:59 am

IT मधल्या लोकांना (म्हणजे मी.. ) नीट काही जमत नाही असा माझ्या मातोश्रींना जाम विश्वास आहे . निदान यावेळेस तरी बाप्पाला काहीतरी स्वतः बनवून खाऊ घाल असा विनंतीवजा हुकूम आल्यावर मी आणि बाप्पाने एकाचवेळेस आवंढा गिळला ..

नेमकं काय बनवायचं याच्यावर विचार करताना - ते सोपं पाहिजे, चवीला चांगलं पाहिजे , दिसायलाही छान दिसलं पाहिजे , मेहनत कमी हवी आणि अतिमहत्वाचं म्हणजे बाप्पा आणि मातोश्रींना ते आवडलं पाहिजे . ..खूप विचार करून (कोण गुगल म्हणालं?) हि सोपी रेसिपी -

साधे सोपे मलई पेढे

साहित्य:

१ कप घरी बनवलेले मऊ पनीर
२ चमचे मिल्क पावडर
१ चमचा क्रीम
४ चमचे साखर
वेलची पावडर
केशर काड्या सजावटीसाठी

कृती ;

१. पनीर, साखर, मिल्क पावडर, क्रीम हे सगळं हाताने नीट एकत्र करून घ्या.
२. मिश्रण नॉनस्टिक कढईमधे मध्यम आचेवर परता. सारखं परतत राहायला लागेल..हात दुखतोय वगैरे म्हणालं तर तिकडून लगेच फुकटचा आहेर .. मग आम्ही कसे करत होतो.. आणि मग पुढचे डायलॉग माहित असतीलच. (तुझ्या वयात मला २ पोरं होती... )
३. मिश्रण कोरडं होऊन कढईला चिकटेनास झालं कि ते ताटामध्ये काढून घ्या. वेलची पावडर घालून मिश्रण मळून घ्या. जर मिश्रण मऊ वाटत नसेल किंवा मिळून येत नसेल तर मिक्सरमधून अगदी थोड्या वेळासाठी फिरवून घ्या आणि पेढे बनवा.
४.सजावटीसाठी केशराची काडी लावा

फोटोत जरी फिल्टर वापरला असला तरी दिसायला खरंच छान झाले होते आणि चवीलासुद्धा ..
.
.

1
.

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 9:54 am | सविता००१

मीता... खूप सुरेख केले आहेत पेढे. मस्त

सु रे ख पाकृ. फोटो पण सुंदर आलाय.

अनन्न्या's picture

5 Sep 2017 - 10:44 am | अनन्न्या

सोपे पण

स्वाती दिनेश's picture

5 Sep 2017 - 12:09 pm | स्वाती दिनेश

मस्तच आहेत ग मलई पेढे!
स्वाती

अहा!उचलून घ्यावासा वाटतोय पेढा!सुंदरच झालाय.पाकृ सोपी करुन सांगितली आहेस.मस्तच.

मितान's picture

5 Sep 2017 - 12:32 pm | मितान

मस्त !!!! आजच पनीर केलंय. पेढे करते आता :)

पद्मावति's picture

5 Sep 2017 - 1:02 pm | पद्मावति

खुप आवडले हे पेढे.

सिरुसेरि's picture

5 Sep 2017 - 1:25 pm | सिरुसेरि

छान

कविता१९७८'s picture

5 Sep 2017 - 3:07 pm | कविता१९७८

अगदि चविष्ट , मी पुण्यात आले की मला खाउ घाल, आता अजयानेच पुण्यात घर घेतल्यावर माझ्या फेर्‍या वाढणार हे नक्की

देखणे झालेत पेढे. फोटू व कृती मस्त.

पैसा's picture

5 Sep 2017 - 5:00 pm | पैसा

पाकृ सोपी आणी फटू कातिल!!

मीता's picture

5 Sep 2017 - 5:39 pm | मीता

धन्यवाद :)

सानिकास्वप्निल's picture

5 Sep 2017 - 7:26 pm | सानिकास्वप्निल

सुरेख दिसतायेत पेढे.

सूड's picture

5 Sep 2017 - 8:09 pm | सूड

मस्तच!!

सस्नेह's picture

5 Sep 2017 - 9:14 pm | सस्नेह

भारी !!

रुपी's picture

6 Sep 2017 - 1:19 am | रुपी

सुरेख!

तुझा पेंटमधला बाप्पापण छान होता.

इडली डोसा's picture

6 Sep 2017 - 1:59 am | इडली डोसा

छानच दिसतायेत पेढे.

विशाखा राऊत's picture

6 Sep 2017 - 2:32 am | विशाखा राऊत

वाह

पियुशा's picture

6 Sep 2017 - 2:07 pm | पियुशा

क्लास्स्स !!!!!!

फोटो आणि पाकृ दोन्ही सुंदर!

कवितानागेश's picture

8 Sep 2017 - 3:29 am | कवितानागेश

फोटो बघूनच पटकन लॉगिन करून आले. मस्त !

पाकृ सोपी आणि सुटसुटित आहे.