अॅपल पाय
बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळे काय करता येईल हा नेहमीच विचार असतो. प्रसादासाठी म्हणून खूप फळे येतात, तेव्हा एकदा फ्रुट सॅलेड होतेच. तरीही बरेचदा उरलेल्या सफरचंदांचे काय करायचे हा प्रश्न असतो.असेच मनात आले की अॅपल पाय केला प्रसादाला तर काय हरकत आहे? मागच्या वर्षी नाही का बाप्पाला बर्लिनर आवडले होते, तर ह्या वर्षी अॅपल पाय खायला घालू या. तसे अॅपलपायचे खूप प्रकार आहेत पण अगदी सोपा, पटकन होणारा मार्सेलाच्या रेसिपीने केलेला हा अॅपल पाय गरम,गार,कोमट कसाही खाता येतो. वॅनिला आइसक्रिम बरोबर, व्हिप्ड् क्रिम बरोबर किवा नुसताही खायला छान लागतो.
साहित्य-
५ ते ६ सफरचंदे,
३, ४ मोठे चमचे साखर, मूठभर बेदाणे,
मूठभर बदाम तुकडे ,
१ वाटी भरून मैदा,
अर्धी वाटी लोणी/बटर,
अर्धी वाटी साखर,
चिमूटभर मीठ
२ चहाचे चमचे दालचिनी पावडर
कृती-
३ ते ४ मोठे चमचे साखर + १ चहाचा चमचा दालचिनी पावडर, बेदाणे+बदाम तुकडे एकत्र करून ठेवा.
सफरचंदांची साले काढून लहान तुकडे करा व हे तुकडे बदाम बेदाण्याच्या मिश्रणात एकत्र करा.
एका बेकिंग ट्रेला ग्रिझिंग करून घ्या व त्यात हे सफरचंदाचे मिश्रण पसरा.
मैदा+साखर+लोणी+मीठ + १चमचा दालचिनी पावडर एकत्र करुन चांगले मळा.
दालचिनी पावडर सफरचंदाच्या मिश्रणात आणि मैद्याच्या मिश्रणात दोन्हीत घातली की छान स्वाद येतो.
मैद्याच्या मिश्रणाच्या बारीक, बारीक गोळ्या, गुठळ्या करा. (streusel)
व त्यांनी बेकिंग ट्रे मधील सफरचंदांचे मिश्रण झाकून टाका.
१८० अंश से. तापमानावर ३०-३५ मिनिटे बेक करा.
बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि खा.
'
प्रतिक्रिया
4 Sep 2017 - 12:15 pm | इशा१२३
मस्तच! सध्या सफरचंद भरपुर झालियेत घरात, करुन पहाते.उद्या बाप्पाचे विसर्जन होईल त्याला जरा हा वेगळा नैवेद्य दाखवते.
4 Sep 2017 - 12:23 pm | पैसा
बाप्पा नक्कीच खुश होणार!!
4 Sep 2017 - 12:45 pm | कविता१९७८
वाह , मस्तच
4 Sep 2017 - 1:47 pm | पद्मावति
वाह, फारच मस्तं.
4 Sep 2017 - 6:01 pm | अनन्न्या
फोटो झकास आलाय!
4 Sep 2017 - 6:18 pm | रेवती
मस्त! खूपच टेस्टी पाय असणार असे दिसते आहे.
सिंगल क्रस्ट पाय कधी केला नाहीये. सोपा वाटतोय.
एरवी अनुश्रुतीच्या रेसिपीने डबल कस्ट करते त्याला बर्याच पायर्या आहेत.
त्यामानाने तू दिलेला सोपा वाटतोय.
4 Sep 2017 - 8:28 pm | पलाश
वा !! छान आहे. फोटोपण अतिसुंदर आला आहे.
5 Sep 2017 - 10:01 am | सविता००१
सुरेखच गं स्वातीताई. मस्त आयडिया
5 Sep 2017 - 10:21 am | अजया
छान सोपी पाकृ. सध्या घरात सफरचंद खूपच आहेत. करुन पहावे की काय वाटतेय.
5 Sep 2017 - 7:30 pm | सानिकास्वप्निल
मस्तं, सोपी पाककृती.
5 Sep 2017 - 7:31 pm | सानिकास्वप्निल
मस्तं, सोपी पाककृती.
6 Sep 2017 - 1:55 am | रुपी
मस्तच!
दालचिनीबरोबरच जायफळाची पूडही घालते आणि नेहमीच्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर हे घालूनपण खूप छान लागतो पाय..
6 Sep 2017 - 2:34 am | विशाखा राऊत
मस्तच
6 Sep 2017 - 2:09 pm | पियुशा
बाप्पाला खुप आवडला असेल नैवेद्य :)
7 Sep 2017 - 9:05 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness
12 Sep 2017 - 2:42 am | जुइ
अॅपल पाय अगदी अनोखा प्रकार आहे नैवैद्यासाठी.