सेन्सेक्स १०,००० च्या खाली

सागर's picture
सागर in काथ्याकूट
17 Oct 2008 - 3:20 pm
गाभा: 

सेन्सेक्स १०,००० च्या खाली

शेवटी ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले.
सेन्सेक्स आज बंद कदाचित १०,००० च्या वर होईलही. पण आज सेन्सेक्स ने १०,००० च्या खाली बुडी मारली .आत्त्ता मी पाहीले तेव्हा सेन्सेक्स (९९४१) वर होता.
काल जगात सगळीकडेच शेअरबाजारांनी दाखवलेली निराशा आपल्या बाजाराने दाखवली नाही तर नवलच.

गुंतवणुकदारांनी काय करावे? हा खूप मोठा प्रश्न पडला असेन.

मागच्या आठवड्यातच मी म्हटले होते की सेन्सेक्स १०,००० च्या खाली येण्याचे स्पष्ट संकेत असतानाही सेन्सेक्स लगेच ह्या मर्यादेच्या खाली जाणार नाही. तेव्हा २ दिवसातच सेन्सेक्सने परत ११,००० च्या वर उसळी मारली. आणि तेव्हा जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. सगळ्याच घडामोडी निराश करणार्‍या आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांना एव्हाना परिस्थिती हाताबाहेर चालली आहे हे स्पष्टपणे कळून येत आहे. तेव्हा आर्थिक मंदीचे स्वरुप मर्यादीत असेन की भीषण असेन हे येणारा काळच सांगेन. तरी साधारणपणे २००९ च्या मार्च - जून पर्यंत जगाला परिस्थितीचे स्पष्ट संकेत मिळून जातील.

जगातले सर्व शेअर बाजार कोसळण्याचे प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकदारांची गमावलेली विश्वासार्हता....
आणि बाजारात असलेला तरलतेचा (लिक्विडिटी) अभाव.

अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी हात आखडता घेणे हेच योग्य राहीन. कारण अशीच परिस्थिती राहिली तर नाना म्हणतात तसे सेन्सेक्स जोरात कोसळेलच पण आपला देश मोठ्या आर्थिक संकटातून जाईन हे ही तितकेच खरे.

कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे हे खरे आहे. पण आपल्या देशाचा बराच रोजगार विदेशी कंपन्यांवर आणि व्यवसाय विदेशी बाजारांवर अवलंबून आहे. तेव्हा अमेरिका , ब्रिटन व तत्सम युरोपिय देश यांना जागतिक मंदीची जेवढी तीव्र झळ बसेन तेवढी आपल्याला बसणार नाही. पण बाजारातली आर्थिक तरलता अदृष्य होईल यात मात्र शंका नाही. यामुळे रोजचे जीवनमान प्रभावित होईल. ज्यांच्या डोक्यावर कसलीही कर्जे नाही त्यांना चिंता नाही. पण जे कर्जबाजारी आहेत त्यांना मात्र मोठ्या संकटातून जावे लागेल. तेव्हा सुज्ञ पणा यातच राहीन की सुरक्षित ठिकाणी तुमच्या ठेवी ठेवाव्यात व पैसा सध्या साठवून ठेवावा. विपरित परिस्थितीत त्याचा योग्य तो उपयोग होईलच.

जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर विजय मिळवलेला आहे असा इतिहास आहे. तेव्हा हे भीषण संकट लवकरच टळेल आणि जगाची घडी सावरेल असा विश्वास वाटतो.

तात्या, नाना, देव काका व इतरही सर्व जाणकारांनी येथे या समस्येवर काथ्याकूट करावा ही नम्र विनंती...

(मानवाच्या कर्तृत्वावर विश्वास असणारा आशावादी ) सागर

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

17 Oct 2008 - 3:38 pm | घाटावरचे भट

>>जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर विजय मिळवलेला आहे असा इतिहास >>आहे. तेव्हा हे भीषण संकट लवकरच टळेल आणि जगाची घडी सावरेल असा विश्वास वाटतो.

आमेन!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सेन्सेक्स ९,९७५.३५ वर बंद झाला
स्त्रोतः http://www.bseindia.com/ सेन्सेक्स ची अधिकृत साईट

- सागर

विसुनाना's picture

17 Oct 2008 - 5:13 pm | विसुनाना

१६/१०/२००१ = २९९२
.
.
.
.
०८/०१/२००८ = २०८७३
.
.
१७/१०/२००८ = ९९७५
.
०८/०१/२००९ = ३०००???
.
.
(करवतदाती ) पुनःश्च हरीॐ!!!

जैनाचं कार्ट's picture

17 Oct 2008 - 5:19 pm | जैनाचं कार्ट (not verified)

देवा शपथ चहा पिताना हेच आकडे डोक्यात जमा झाले होते.. व प्रतिसाद लिहणारच होतो ;)

३००० तर नाही पण ८००० पर्यंत नक्कीच !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

17 Oct 2008 - 5:21 pm | अवलिया

पुनरपि जननम् पुनरपि मरणम्

सर्व संचयाचा अंत क्षयात, संयोगाचा वियोगात, उन्नतिचा पतनात, जन्माचा मृत्युत होत असतो.

हे लक्षात ठेवले की प्रत्येक दिवस नवीन असतो अन आयुष्य तटस्थपणे निवांत जगता येते.

गर्दित असुन एकांत अन गोंगाट असुन शांतता लाभते.

बदल बदल बदल

सुरक्षितता असणे हीच फार मोठी असुरक्षितता असते ... पण फारच थोडे हे जाणतात.

जे जाणतात ते पार होतात.

भवसागर फार खोल नाही .. फक्त कमरेएवढाच आहे... तो काळा २८ युगांपासुन सांगतोय .. पण कोणी ऐकत नाही.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2008 - 8:17 am | प्रकाश घाटपांडे

सुरक्षितता असणे हीच फार मोठी असुरक्षितता असते ... पण फारच थोडे हे जाणतात.

काय टाकलाय राव नाना! बेष्ट
प्रकाश घाटपांडे

असहमत ....५५००/६५०० सेन्सेक्स नक्की येणार.अमेरिका व युरोप मधील मंदी निदान ५ वर्षे तरी राहणार. आपण मंदीतुन २०१० नंतर बाहेर पडु.सर्वात मोठा फटका आयटी कंपन्याना बसणार.
वेताळ

विसुनाना's picture

17 Oct 2008 - 6:26 pm | विसुनाना

या हिशेबाने २००००चे २४००च होतात! ६००० म्हणजे भरपूर झाले. ;) ... :(

वेताळ's picture

17 Oct 2008 - 7:16 pm | वेताळ

०८/०१/२००९ नाही पण ०८/०३/२००९ पर्यंत तरी नक्कीच ६००० सेन्सेक्स होणार,इन्फोसिस चा दर ८००/८५० ,रिलायन्स इंडस्ट्रिज ९००????????????
वेताळ

स्वामि's picture

17 Oct 2008 - 8:07 pm | स्वामि

नाना तुमचि प्रतिक्रिया वाचलि,........दिल को टच कर गइ.

विकास's picture

17 Oct 2008 - 9:01 pm | विकास

भारतीय शेअरबाजारासंदर्भात नाही पण अमेरिकन शेअरबाजारासंदर्भात आजच्या न्यू यॉर्क टाइम्स मधील वॉरेन बफे चा "Buy American. I Am. "लेख वाचनीय आहे.

मला वाटते तो भारतीय अवस्थेस पण लागू आहे. विचार करा हर्षद मेहता आणि केतन पारेख (मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाल्यावरचे) येऊन गेले, त्यांनी वादळे आणली पण नंतर मार्केट खालीच राहीले का वर गेले? कितीही गोंधळ झाला असला तरी माझा आपल्या अर्थव्यवस्थेवर पण विश्वास आहे! :-)

असो. वरील लेखातील आवडलेले वाक्य : Be fearful when others are greedy, and be greedy when others are fearful.

सागर's picture

18 Oct 2008 - 11:38 pm | सागर

मी वाचला हा लेख.... एकदम भन्नाट आहे.

अर्थव्यवस्था ही वर खाली होतच राहते... सध्याची परिस्थिती बिकट आहे हे खरे. पण वॉरेन बफेट साहेबांनी यापूर्वीही अशा भयानक परिस्थितीतून आपण गेलो आहोत याची जाणीव करुन दिली आहे. आणि गंमतीने असेही या लेखात म्हटले आहे की फक्त त्यांनीच या परिस्थितीत बाजारातील गुंतवणुक चालू ठेवली तर १००% समभागांची मालकी त्यांच्याकडेच येईल....

असो.. मुद्दा इतकाच की या ही परिस्थितीतून आपण बाहेर येऊ हा आत्मविश्वास या धनाढ्य व्यावसायिकाला नक्कीच आहे.
तेव्हा आपल्यासारखे सामान्य आशावादी तर नक्कीच परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा करु शकतात. :)

तेव्हा चिंता नको. सेन्सेक्स ९५०० ला जाईन ... ३००० ला जाईन.... परत २०,००० ला जाईन. ५०,००० ला पण जाईन
जरा कळ काढा हो मित्रांनो.....

५ वर्षांनी तर नक्की फायद्याच्या पायर्‍या सापडायला सुरुवात होईल :)

(जय शेअर बाजार) - सागर

भारतातील खाजगी कंपन्यात नौकरी करणार्‍या लोकांची स्थिती काय असेल? २००१/२ मध्ये बर्‍याच लोकांना सेवानिवृती घ्यावी लागली होती. ह्याचीच पुनरावृती होईल का?

दुसरे म्हणजे या काळात कोणी नौकरी बदलावी का? समजा कोणी विदेशी निवेशावर चालणारी कंपनी सोडून थोडी स्थिर असणारी नौकरी स्विकारावी का?

कोठे इतरत्र वाचल्याप्रमाणे सुचीकांक ८५०० पर्यंत जाणार का?

कोणती कंपनी किती स्थिर आहे हे कोणीच सांगू शकत नाही....

आणि प्राप्त परिस्थितीत कंपनी बदलली आणि ती कंपनी आर्थिक संकटात सापडली तर बकरे होतात ते नव्याने कंपनीत रुजू झालेले कर्मचारी. तेव्हा असा विचार या परिस्थितीत करावा असे मी सुचविणार नाही.

उलट आत्त्ताच्या कंपनीत स्वतः चे काम व्यवस्थित असेन तर मॅनेजमेंट तुमच्याकडून अशाच सहकार्‍याची अपेक्षा करतील. व त्याचे दूरगामी फायदे तुम्हाला नक्की मिळतील....

तेव्हा काळ बिकट आहे.... थोडी कळ काढा एवढेच सुचवतो....

(जगाची चिंता करणारा ) सागर

जैनाचं कार्ट's picture

18 Oct 2008 - 9:48 am | जैनाचं कार्ट (not verified)


Hong Kong HSI-HANG SENG चा एक वर्षाचा विदा आहे हा !

वाह क्या स्पीड है ;) ५८ % डाऊन !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

रामदास's picture

18 Oct 2008 - 12:06 pm | रामदास

डोम तयार होतो आहे का?

जैनाचं कार्ट's picture

18 Oct 2008 - 3:56 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हे घ्या अजून एक बँक गेली खड्यात French bank Caisse d'Epargne loses $800M

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अजुन भारतातुन काहीच ऐकु येत नाही म्हणजे आपले सगळे ऑलबेल आहे असे समजु नका. ही तर वादळापुर्वीची शांतता आहे.आहे त्या नोकरया ठिकवुन ठेवणे गरजेचे आहे.
वेताळ

मिपाकर्स, आताच अच्युत गोडबोलेंचा अतिशय सुंदर लेख वाचला, बघा वाचुन.
http://loksatta.com/daily/20081019/lr02.htm

diggi12's picture

29 Nov 2022 - 6:07 pm | diggi12

वर आणण्यासाठी