श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ६ : माझा मी जन्मलो फिरुनी

Primary tabs

Kishan Vasekar's picture
Kishan Vasekar in लेखमाला
31 Aug 2017 - 11:26 am

२० जुलै २०११ - माझ्या मागच्या जन्मातील शेवटचा दिवस आणि कदाचित ४० दिवसांनंतर मी आयसीयूमधून बाहेर पडून पुनर्जन्म. हो, मी जे आता लिहीत आहे, तो मानला तर विज्ञान व अध्यात्म यांच्या संयोगाचा एक चमत्कारच आहे.

२० जुलै २०११ रोजी ऑफिसमध्ये काम करत असताना मी कोसळलो व १० मिनिटांत जवळच्या हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. दोन तासांत निदान होऊन मला सांगितले गेले की दोन दिवसांपूर्वी सायलेंट हार्ट अटॅक येऊन माझे हृदय डॅमेज झाले आहे. रक्ताची मोठी गुठळी आत अडकली आहे. माझ्यावर उपचार करणारे सर्जन ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर अक्षरशः चालत आले. मला बेशुद्ध करून ऑपरेशन करण्यात आले. तोपर्यंत पत्नी व मुलगा बंगळुरूहून अन बरीच मित्रमंडळी मुंबईतून हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.
मी पहिल्या धक्क्यातून वाचलो, पण माझा उजवा पाय थोडा अधू झाला होता. दोन दिवसांनी आमच्या मुलांनी (दोन्ही मुली तेव्हा अमेरिकेत होत्या) मला मुंबईतल्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तेथेच मोठ्या दिव्यास सुरुवात झाली. मी पूर्ण शुद्धीत होतो. जवळच्या सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा व देवाचा धावा सुरू केला. पुढील घडामोडींवर तुमचा किती विश्वास बसेल माहीत नाही, मी क्रमशः जसे घडले व मला जसे आठवते तसे लिहीत आहे. माझा मृत्युंजयाचा जप सुरू असताना झोपेत मोठ्याने ओरडून मी जागा झालो. त्या वेळी असे दिसले की यमदूत जणू बाजूला होते, पण ते नंतर नमस्कार करून निघून गेले. त्यामुळे मी आता मृत्यूच्या विळख्यातून सुटलो याची खातरी झाली.

त्यानंतर आठ दिवसांनी कळले की माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. डॉक्टरांनी यातून रिकव्हर होण्याची आशा फारच कमी असल्याचे सांगून डायलिसिस देण्यास सुरुवात केली. आम्हा सर्वांच्या परीक्षेची वेळ होती. मीदेखील सर्व देवांची परीक्षा देण्याचे ठरविले. हनुमानास आवाहन करून संजीवनी आणण्यास सांगितले. डायलिसिस सुरू असताना सतत जप, प्रार्थना चालूच होत्या. १० सिटिंग्जनंतर रात्रीच थोडेसे युरीन पास झाले व किडनी रिकव्हर होऊन चमत्कार घडला. डॉक्टरदेखील आम्हा सर्वांच्या श्रद्धेपुढे नतमस्तक झाले.

आता थोडेसे हायसे वाटू लागले. पण अचानक एका रात्री हृदयाच्या ठोक्यांची गती वाढून मी अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलो. नंतर मी ४ दिवस व्हेंटिलेटरवर होतो. मला एवढे आठवते की चौथ्या दिवशी सकाळी मला श्री स्वामी समर्थ माझ्या पलंगाजवळ किडे फोडून खाताना दिसले. मी जेव्हा त्यांना विचारले की “आपण काय करत आहात?” त्यावर ते मला म्हणाले की “तुझ्या शरीरातले किडे खात आहे व आता तू बरा होशील.” नंतर ते गुप्त झाले. त्या दिवसानंतर १० दिवसांत मी बरा झालो. एकूण ४० दिवसांनंतर मला हॉस्पिटलातून डिस्चार्ज मिळाला.
मला नंतर असे समजले की आमची अमेरिकेतली डॉक्टर मुलगी मुंबईला आली. तिने स्वामी समर्थांच्या मठात प्रार्थना करून तिच्या पतीच्या सल्ल्याने एक नवीन औषध सुचविले. (तिचा पती अमेरिकेत कार्डिऑलॉजिस्ट आहे). आता माझे ब्लड सेप्सिस बरे झाले. ‘मी तुझ्या शरीरातले किडे खात आहे’ याचा सर्वांना अर्थ कळला व ते अशक्यही शक्य करू शकतात याचा प्रत्यय आला. त्यानंतर दोन वर्षे सातत्याने औषधे, आयुर्वेदिक उपचार, व्यायाम, ध्यानधारणा या सर्वांच्या प्रयोगांनी व प्रयत्नांनी माझ्या प्रकृतीत विलक्षण सुधारणा झाली. देवाने मला निवृत्त करायचे ठरविले आहे असे मानून मी हृदयरोगाचा व भगवद्गीतेचा अभ्यास जोमाने सुरू केला. 'आनंदी हृदयाचा मंत्र' अशी व्याख्याने दिली व 'जीवनाचे बनविले एकच लक्ष – वाचवू या हृदये दशलक्ष' या नवीन अवतारकार्यास सुरुवात केली.

माझे विचार व अनुभव मी भाषण व प्रत्यक्ष संभाषण, यू ट्यूब, फेसबुक, व्हॉटस ऍप, ईमेल इत्यादी माध्यमांतून सातत्याने मांडत असतो. आजवर औरंगाबादेत व कोकणात आठ-दहा वेळा भाषण देण्याचा योग आला. मी मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांतून विषय मांडतो व आजवर उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव, अध्यात्म व विज्ञान यांचा संयोग यामुळे माझे म्हणणे सर्वांना साधारणपणे पटते असे मला वाटते. मिसळपाव.कॉमच्या माध्यमातून मला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल असा विश्वास आहे.
परमेश्वरी व श्री समर्थकृपेने मी भगवद्गीता इंग्लिशमधून व मराठीतून पद्यात लिहीत आहे. तसेच हनुमानचालिसाचे मराठी रूपांतर झाले आहे.
माझ्या जीवन अवतारकार्याचा आता आरंभ झाला आहे. असे वाटते की...

स्वामी समर्थ कृपेने मृत्यूस हरवुनी
अवतारकार्य करण्यास 'जन्मलो मी फिरुनी'.
जय श्री स्वामी समर्थ

किशन वसेकर, औरंगाबाद
ईमेल - omqualityguru@gmail.com;
यूट्यूब चॅनेल

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

31 Aug 2017 - 4:32 pm | पद्मावति

इतक्या गंभीर परीस्थीतून देवाने आपल्याला बाहेर काढले ते अनेकांना मदत करण्यासाठी ही तुमची भावना खूप हृदय स्पर्शी आहे. प्रेरणादायी आहे. अतिशय उत्तम काम करीत आहात __/\__

रेवती's picture

31 Aug 2017 - 5:35 pm | रेवती

लेखन आवडले. श्रद्धेमुळे आजारपणातून बाहेर पडायला मदत झाली व आपली प्रकृती आता चांगली आहे हे वाचून बरे वाटले. यामुळे जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला व आपण जी समाजसेवा करताय त्याबद्दल अभिनंदन.

अप्पा जोगळेकर's picture

31 Aug 2017 - 5:43 pm | अप्पा जोगळेकर

आपली प्रकृती आता चांगली आहे हे वाचून बरे वाटले.
बाकी लेखाबद्दल. असो.

mayu4u's picture

1 Sep 2017 - 8:30 pm | mayu4u

लेखमालेसाठी आलेला प्रत्येक लेख प्रकाशित करायचा, असं काही संपादकीय धोरण होतं/आहे का?

पैलवान's picture

31 Aug 2017 - 6:24 pm | पैलवान

अशा संघर्ष काळाच्या आधी व नंतर आयुष्य हे साधारण असते. पण आपण बदललेलो असतो. हा जो मधला काळ असतो, त्यातलं आपलं वागणं, आपले निर्णय, आपल्या कुटूंबीय-आप्त-मित्रमंडळींची साथ हे सर्वात महत्वाचे असतात.
इतक्या मोठ्या आजारपणातून बाहेर पडून तुम्ही इतरांनाही प्रेरणा व मार्गदर्शन करत आहात. _/\_

स्वाती दिनेश's picture

31 Aug 2017 - 7:55 pm | स्वाती दिनेश

इतक्या मोठ्या आजारपणातून बाहेर पडून तुम्ही इतरांनाही प्रेरणा व मार्गदर्शन करत आहात.
असेच म्हणते,
स्वाती

पैसा's picture

31 Aug 2017 - 8:26 pm | पैसा

पुनर्जन्म झाला तुमचा. त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात याचे फार कौतुक वाटले.

दशानन's picture

31 Aug 2017 - 9:16 pm | दशानन

असेच म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2017 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतक्या कठीण परिस्थितीतून सावरून तुम्ही समाजकारणाचा जो वसा घेतला आहे तो अत्यंत स्पृहणिय आहे ! तुमच्यापासून स्फूर्ती घेऊन अनेक आयुष्ये सावरली असतील यात शंका नाही ! अनेक धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !!

हा तुमच्या श्रद्धेचा विजय आहे . शुभेच्छा .

प्रचेतस's picture

1 Sep 2017 - 1:29 pm | प्रचेतस

लेख वाचून निराशा झाली.
अजिबातच पटला नाही.

अर्थात तुम्ही बरे झालात हे उत्तमच.

सुचिता१'s picture

1 Sep 2017 - 8:29 pm | सुचिता१

लेख वाचून निराशा झाली.
अजिबातच पटला नाही.

अर्थात तुम्ही बरे झालात हे उत्तमच.

अगदी। सहमत !!!

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 8:10 pm | ज्योति अळवणी

+1

कठिण प्रसंगातून निघालात!!

कुमार१'s picture

1 Sep 2017 - 5:49 pm | कुमार१

लेख वाचून निराशा झाली.
अजिबातच पटला नाही.

अर्थात तुम्ही बरे झालात हे उत्तमच. >>>> सहमत

जुइ's picture

1 Sep 2017 - 9:10 pm | जुइ

तुम्ही बरे झाल्यावर स्वतःची जिवनशैली तर बदलली शिवाय तुमच्या अनुभवानी तुम्ही इतरांनाही आरोग्यपूर्ण आयुष्य जगायला मदत करत आहात. हे वाचुन चांगले चाटले.

Kishan Vasekar's picture

1 Sep 2017 - 9:11 pm | Kishan Vasekar

Dhanywad.I have seen comments and naturally it is mixed bag.
What I wish to underscore is Positive Thinking and Faith in God helps.One can have different methods to keep self in Positive Mood ,even under the most trying circumstances.I had hardly any faith in God after passing out from IITB in 1975 and when I was literally on road in 1982 , I did not get any help from people around , I prayed intensely for 4 days to Shirdi Saibaba and since then my life is full of celestial coincidences or Divine Interventions.
I am not able to type in Marathi , so this response is in English.
Hope to see you all soon in Minneapolis.Om Sairam

विवेकपटाईत's picture

2 Sep 2017 - 6:23 pm | विवेकपटाईत

मरणाचा दारावरून परत आल्यावर माणसाच्या आयुष्यात फरक पडतोच. सन २००८ मध्ये कार्यालयात (PMO) प्रवेश करताच मी कोसळून पडलो. ९ वाजायचे होते, तरीही तिथे डाक्टर (बहुतेक केबिनेट ११ वाजता असते, डॉक्टर हि १० पर्यंत येतात) मेडिकल रूम मध्ये आलेले होते. त्वरित प्राथमिक उपचार झाला. नंतर हृदयात stent लागले. डीस्पेन्सरी तून औषधी घेण्यासःती दर तीन महिन्यांनी हॉस्पिटल मध्ये दाखविणे जरुरी. त्या साठी सफदरजंग मध्ये जात होतो. असेच एकदा २०१० जुलै , हॉस्पिटलच्या आवारात शिरताच कोसळून पडलो, cardio विभागाचे प्रमुख उभे होते. शीघ्र उपचार मिळाला. त्या वेळी फक्त angiography झाली. २०१४ २९ जुन महिना. ७४० बस मधून केंद्रीय सचिवालयावर उचललो. साउथ ब्लाक जाण्यासाठी रस्ता नॉर्थ ब्लॉक मधून जातो. नेहमी मी नॉर्थ ब्लॉक जवळ आल्यावर आई कार्ड गळ्यात घालीत असेल. त्या दिवशी न जाणे का. बस मधून उतरताच आय कार्ड गळ्यात घातला. रकाब गंज गुरुद्वाराच्या दारासमोर अचानक चक्कर आल्या सारखे वाटले, आणि कोसळून पडलो. गळ्यात हिरवा पट्टा त्या वर MHA लिहिलेले. त्वरित RML हॉस्पिटल मध्ये बाबू लोक घेऊन गेले, माझ्या मोबाईल ने घरच्यांना हि कळविले. रात्री अन्जिओ झाल्यावर बाय पास करावे लागेल असा निर्णय डॉक्टर ने दिला. नंतर escort हॉस्पिटल मध्ये बाय पास झाली. नेहमीच मनात विचार येतो, प्रत्येक वेळी मला त्वरित मदत व उपचार मिळाली. निश्चित हा योगायोग असू शकत नाही. काही न काही विधात्याचा हेतू यात दडलेला असेल किंवा पूर्व जन्मी केलेले चांगले कर्म. बहुतेक सौ. ने केले असावे.

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 8:13 pm | ज्योति अळवणी

अरेबापरे विवेकपटाईत जी काळजी घ्या

जेम्स वांड's picture

2 Sep 2017 - 10:09 pm | जेम्स वांड

डीस्पेन्सरी तून औषधी घेण्यासःती दर तीन महिन्यांनी हॉस्पिटल मध्ये दाखविणे जरुरी. त्या साठी सफदरजंग मध्ये जात होतो.

ह्याचा अर्थ काय ते कळले नाही, सांगाल का?

Kishan Vasekar's picture

6 Sep 2017 - 7:23 pm | Kishan Vasekar

Shri Pataitji,
Tumachaa Anubhav avismaraniya aahe.No doubt God in HIS mysterious ways saved you .
Will love to get connected.We are in MN for a month and then will be in Aurangabd.
Vasekars e mail, omqualityguru@gmail.com
God Bless Om Sairam

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 7:08 pm | श्रीगुरुजी

श्रद्धेच्या बळावर सत्वपरीक्षेतून सुखरूप बाहेर पडलात. परमेश्वरील श्रद्धा नक्कीच मदत करते असा मलाही अनुभव आहे.

लेख वाचला. वेगळा अनुभव आहे.
तुमच्या श्रद्धेने तुम्हांला बळ दिले, म्हणायला हरकत नाही.

कधी कधी काही योग्य का जुळून आले हे सांगणे अवघड असते, त्यावेळी आपले मन एक कल्पना तयार करत असावे! असो, तुम्ही सुखरूप मग झाले तर!
एन्जॉय!!!!

उपयोजक's picture

3 Sep 2017 - 8:32 am | उपयोजक

समर्थ किडे फोडून खाताना दिसले! हे जरा अतिच आहे!

सुचिता१'s picture

3 Sep 2017 - 2:09 pm | सुचिता१

अती कीलसवाणे वाटले .

Kishan Vasekar's picture

6 Sep 2017 - 7:28 pm | Kishan Vasekar

Agree that this sounds impossible .However HIS ways are not easy to understand.This happened when I was unconscious or half awake when on ventilator.
All other incidents , I was awake , praying , meditating and doing Positive Visualisation that I am getting well.
Thanks God Bless

अगम्य's picture

5 Sep 2017 - 9:09 am | अगम्य

तुम्ही बरे झालात हे वाचून फार आनंद झाला. माझा स्वतःचा स्वामी समर्थ किंवा देव ह्यांच्यावर विश्वास नाही. पण मानवी मन हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. अशा परिस्थितीत शारीरिक व्याधींबरोबरची लढाई काही प्रमाणात मानसीक बळावर अवलंबून असते. हे मानसीक बळ वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकते. तुम्हाला स्वामी समर्थांवरील श्रद्धेच्या रूपाने हे बळ मिळालं तर चालतंय की! इतर कुणाला स्वामी समर्थांच्या ऐवजी सनी लिऑनी नाचताना दिसली असती आणि तिच्या ओढीने मनाला उभारी आली असती तरी चालतंय! जोवर तुमच्या श्रद्धेमुळे कुणाचं (आणि तुमचं स्वतःचंही) नुकसान होत नाही तोवर ह्यात काही वावगे नाही. उद्या शास्त्रज्ञ "श्रद्धा" ह्या गोष्टीसाठी "virtual support technique for psycho-physiological reinforcement" असं काहीसं नाव देतील तर बरेच लोक मग ते technique वापरायला लागतील आणि अगदी त्यांच्या pet rock पासून मानसीक बळ मिळवतील तर तेही चालतंय! जो जे वांछील तो ते लाहो! त्यामुळे तुमच्या श्रद्धेशी सहमत नसलो तरी त्या श्रद्धेच्या मदतीने तुम्ही बरे झालात ह्याबद्दल तुम्हाला हिणवावे असे मला अजिबात वाटत नाही. उलट आनंदच आहे.

Kishan Vasekar's picture

6 Sep 2017 - 7:35 pm | Kishan Vasekar

Thanks.
Bhgvad a Gita says , Shraddhavan Labhate Dnyanam.May be Even chanting Sunny leone,s name will help.However I don't know how many people will do that.Point , I wish to underscore the fact that
Great PowerfulSouls like Swami Samartha , Shirdi Sai , Gajanan Maharaj ,do not live today.
Most of the Babas who are alive and claim as Gurus are fraud.I never worship or do Aarati of their photos.
Best is to experience thru Meditation , Japa .I happened to learn Meditation in 1978 and is doing it regularly ,in my own way.
God Bless , ShriSwami Samartha