बाप्पाचा नैवेद्यः बटाट्याचे कानवले

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
29 Aug 2017 - 9:49 am

नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच. आज केलेत बटाटा्याचे कानवले/करंजी.

साहित्य:

बटाटे उकडुन कुस्करलेले दोन वाट्या
खसखस : एक चमचा
सुकामेवा: हवा तेवढा
गूळ : एक ते दीड वाटी
वेलदोडा पूड: एक चमचा
तूप: एक चमचा
तेल : तळणीपुरते

करंजीच्या पारीसाठी :

कणिक+दोन चमचे
बारीक रवा+एक चमचा
तेलाचे मोहन
.
1
.
.
1
.
.
कृती:

प्रथम कुस्करलेला बटाटा तुपावर खमंग परतून घ्यावा, छान चोकलेटी रंग आल्यावर त्यात गूळ मिसळून परतून घ्यावे. छान गोळा तयार झाला की त्यात खसखस, सुकामेवा, वेलदोडा पूड घालून एकत्र करुन घ्यावे. खमंग सारण तयार होइल.

पारीसाठी कणकेत बारीक रवा आणि गरम तेलाचे मोहन घालून एकत्र करुन घ्यावे त्यात पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. साधारण अर्धा तासानंतर बटाट्याचे सारण भरून करंज्या तयार करुन घ्यव्यात व तळाव्यात.
.
.
1

प्रतिक्रिया

पियुशा's picture

29 Aug 2017 - 11:00 am | पियुशा

वेगळ आणि यूनिक प्रसाद :)

पैसा's picture

29 Aug 2017 - 11:45 am | पैसा

एकदम नवीन पाकृ! फोटो आणि सादर करण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मस्त!!

गोडात बटाटा कसा लागेल याचा विचार केला नव्हता. एकदा करुन बघावं लागेल.

नूतन सावंत's picture

29 Aug 2017 - 1:28 pm | नूतन सावंत

बटाट्याच्या गोड पाककृती खूप आहेत,सूड भौ.वड्या,गुलाबजाम,शिरा ,जिलबी,कीस, चिवडा,

बटाट्याच्या गोड वड्या, गुलाबजाम, शिरा, जिलबी हे पदार्थ कधीही खाल्लेले नाहीत.
बटाट्याचा कीस खाल्लाय पण तिखट.
नाही म्हणायला गोडसर चवीचा बटाट्याचा चिवडा मात्र खाल्लाय.

सुरन्गी ताई या निमित्ताने या सर्व पाकृ येउ द्या.

नूतन सावंत's picture

29 Aug 2017 - 1:24 pm | नूतन सावंत

खूप छान सादरीकरण.छान पाककृती.

स्वाती दिनेश's picture

29 Aug 2017 - 1:49 pm | स्वाती दिनेश

छान दिसत आहेत कानवले/करंज्या..
स्वाती

पद्मावति's picture

29 Aug 2017 - 2:48 pm | पद्मावति

मस्तच!

वेगळाच नैवेद्याचा पदार्थ. छान आहे.

स्रुजा's picture

29 Aug 2017 - 7:21 pm | स्रुजा

अरे वा ! सुरेख .... मी आले की फ्लॉवर ऐवजी बटाटे आणुन ठेव ;)

नाहि ह!फ्लॉवर म्हणजे फ्लॉवरच!खास तुझ्यासाठी!

सविता००१'s picture

29 Aug 2017 - 8:50 pm | सविता००१

मस्तच!

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2017 - 9:40 pm | पिलीयन रायडर

गोड बटाटा?!! वेगळीच पाककृती!

अनन्न्या's picture

29 Aug 2017 - 11:54 pm | अनन्न्या

पण हे नवीण आहे! मस्तच!

अनन्न्या's picture

29 Aug 2017 - 11:56 pm | अनन्न्या

प्रतिक्रिया पण देत येत नाहीयेत.

छान! वेगळाच पदार्थ आहे.

विशाखा राऊत's picture

31 Aug 2017 - 2:37 am | विशाखा राऊत

वाह छान

सानिकास्वप्निल's picture

31 Aug 2017 - 4:29 pm | सानिकास्वप्निल

बटाट्याचे गोडाचे प्रकार बर्‍याचदा खाद्यपूस्तकात वाचले होते पणकधी बनवले नाही.
हे कानवले भारी दिसतायेत.
पाककृती आवडली.

छान पाकृ. तुझ्याकडेच येऊन खाल्ली तर जास्त चांगली लागेल ;)

इशा१२३'s picture

1 Sep 2017 - 10:08 am | इशा१२३

हा!हा!ये कधिही.

कविता१९७८'s picture

3 Sep 2017 - 4:45 pm | कविता१९७८

मी पण येणार

प्राची अश्विनी's picture

1 Sep 2017 - 8:43 am | प्राची अश्विनी

विंट्रेस्टिंग. नक्की करून बघेन.

पूर्वाविवेक's picture

1 Sep 2017 - 3:42 pm | पूर्वाविवेक

नया है यह! किती आगळी वेगळी कृती ! खूप सुंदर!

मृत्युन्जय's picture

1 Sep 2017 - 4:10 pm | मृत्युन्जय

मस्त एकदम

मनिमौ's picture

2 Sep 2017 - 11:01 pm | मनिमौ

गोडात बटाटा हे थोड वेगळे प्रकरण आहे. पण खमंग लागत असणार एकदम

कविता१९७८'s picture

3 Sep 2017 - 4:42 pm | कविता१९७८

खुपच छान , आहेचस तु सुगरण , ऐन गणपतीच्या वेळी पुण्यात असल्याने तु खाउ घातलेल्या पापातल्या चिरोट्यांची चव अजुन जीभेवर रेंगाळत आहे.

कविता१९७८'s picture

3 Sep 2017 - 4:43 pm | कविता१९७८

पाकातल्या चिरोट्यांची असे वाचावे

कविता१९७८'s picture

3 Sep 2017 - 4:44 pm | कविता१९७८

पाकातल्या चिरोट्यांची असे वाचावे

जुइ's picture

8 Sep 2017 - 1:39 am | जुइ

अनोखा प्रकार आहे अगदी.