नमस्कार,
यंदा दिवाळीच्या सुट्टीत हंपी चा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. अर्थातच, फॅमिली मध्ये आमचा श्वान दुशन्त उर्फ बोल्ट ला देखील न्यायचे आहे.
जाणार:- पुणे-हंपी-पुणे
दिवस :- ४.५ (हा अर्धा दिवस का ते पुढे येईलच)
फॅमिली:- २ मोठे, २ लहान (वय वर्ष ५ आणि १३) + एक श्वान
जाणार कसे:- स्वतःच्या ४ चाकीने
थोडक्यात रूपरेषा
१. सुट्ट्या कमी असल्यामुळे हापिसातून जरा लवकर निघून कोल्हापूर/किंवा थोडं पुढे एक ब्रेक घायचा प्लॅन आहे (हाच तो ०.५ दिवस).
२. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून थेट हंपी गाठायचा प्लॅन आहे.
३. हंपी वास्तव्य आणि मग तिथे साधारण दोन ते अडीच दिवस साईट-सिईंग
४. शेवटच्या दिवशी डायरेक्ट हंपी-पुणे रिटर्न
कश्या संदर्भात मदत हवी आहे?
१. कोल्हापूर/निप्पाणी इथे पेट फ्रेंडली हॉटेल/सर्विस अपार्टमेंट/गेस्ट हाऊस माहिती आहेत काय? राहण्याचा अनुभव आहे का?
२. हंपी ला सुद्धा वरील प्रमाणे काही पेट फ्रेंडली/किड फ्रेंडली गेस्ट हाऊस ची नावे माहिती आहेत का? [किड फ्रेंडली म्हणजे खेळायला जागा, स्विमिन्ग पूल असेल तर अजून उत्तम]
३. तिथे फिरायचे २/३ ऑपशन आहेत (मी आणि मुलगा बहुदा सायकल वापरू, बायको आणि मुलगी जिथे परवानगी असेल तिथे कार ने किंवा मग मोपेड/रिक्षा भाड्याने घेऊन प्रवास करतील. ह्यात नक्की काय दक्षता घ्यावी? फिरताना काय आणि कसे सुरु करावे? कुठल्या जागा नक्कीच बघाव्यात?
४. हंपी सोडून, अजून जवळपास काही बघण्या सारखे आहे का वाटेत/थोडी वाकडी वाट करून, पण चुकवू नये असे काही?
५. जेवणा खाण्याची उत्तम ठिकाणे, [हे फारच महत्वाचे! :-)] काही माहिती असतील तर तिथे काय नक्की ट्राय करावे/करू नये, हे देखील सांगा
मी एयर-बीनबी वर शोध सुरु ठेवतोय, पण कोणाला अनुभव असतील (वरील कुठल्याही पॉईंट्स वर) तरी नक्की शेयर करावेत.
आभारी आहे!
_/\_
प्रतिक्रिया
28 Aug 2017 - 12:57 pm | प्रीत-मोहर
मी कालच हंपीहुन परत पोचलेय गोव्यात. कश्या संदर्भात मदत हवीय मधल्या मुद्दा क्र. ३ आणि ४ वर मदत करु शकते.
१. रिक्षावाले गंडवतात. सायकल /मोपेड बरेच कडे जाते असे असले तरी तुम्हाला बरेच पायी फिरावे लागते. वाहने पार्किंग ला ठेउन फिरवतात.
त्यामुळे चालायची मानसिक तयारी करुन जा. आम्ही आमची कारच घेऊन फिरलो सगळीकडे, म्हणजे जिथवर कार जात होती तिथवर ,उरलेले चालत फिरलो.
लोक तसे चांगले आहेत. कन्नड (किमान) कामचलाऊ आली तर उत्तम. थोड्या लोकांना हिंदी येते.
२. जाण्याआधी थोडा हंपीचा रिसर्च करुन जा. hampi.in बेसिक माहिती मिळेल. मी अॅमेझोनवरुन एक पुस्तक मागवुन अभ्यास करुन गेले होते.
अस केल्याने, कोणतं सर्किट कधी करायचं हे तुम्हाला ठरवता येईल, आणि त्या त्या जागेवर गेलात की संदर्भ लक्षात येतील ऐतिहासिक.
३. काय काय बघायच हे खरं तर ज्याच्या त्याच्या प्रायोरिटीप्रमाणे असतं. आम्ही सुरवात केललोलोटस महल वाल्या सर्किट ने.
मग महानवमी डिब्बा , हजारराम टेंपल वाल सर्किट. त्यानंतर विरुपाक्ष मंदिर वालं स्र्किट. तिथेच जवळ
असलेला मातंग पर्वत ही चडलो, आणि अच्युतराय टेंपल ही बघितलं.
दुसर्या दिवशी विट्ठल मंदिर सर्किट, ए एस आय म्युजिय्म आणि इतर गोष्टींना ठेवल्या.
तुंगभद्रा धरण नक्की बघा.
हंपीच्या आजुबाजुच्या गावांम्धेही खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आम्ही एक दोन गावं तर रस्ता फुटेल तिथपर्यंत भटकलो. ज्याम धम्माल आली.
हंपी/ होसपेट/ बेल्लारी हे खाणपट्ट्यातले भाग असल्याने धूळ धूळ असते सगळ्याला. शिवाय इतरही बरंच अस्वच्छ आहे. ह्या अस्वच्छ वरुन आठवलं, होसपेट आधी एक कोप्प्ळ नावाच गाव लागतं तिथला किल्ला ही छान आहे. नक्की बघा. पण पायथ्याशी इतकी घाण आहे की विचारु नका. आम्ही धीर करुन वाट काढलीत्यातुम्न. सगळ्या तर्हांचे प्रवाह, त्यात वराह वगैरे वगैरे घाण कॉमन आहे.
28 Aug 2017 - 2:05 pm | केडी
कृपया पुस्तकाचे नाव सांगाल का? मला मिळालं तर घेतो ते. मुलाला (वय वर्ष १३) विजयनगर बद्दल भरपूर माहिती आणि जिज्ञासा आहे, त्याला नक्कीच आवडेल.
28 Aug 2017 - 2:13 pm | प्रीत-मोहर
नाव लक्षात नाही, हंपी / विजयनगर अस काही तरी होतं पण लेखक fritz आहेत. घरुन नीट नाव पण कळवते
31 Aug 2017 - 3:22 pm | मोदक
हे आहे का..?
2 Sep 2017 - 6:48 am | केडी
हेच, मी मागवलंय .....अमेझॉन वरून....
7 Sep 2017 - 9:50 am | प्रीत-मोहर
हो हेच!! छान आहे पुस्तक
7 Sep 2017 - 1:03 pm | केडी
पुस्तक आलं, माहिती छान आहे, सध्या मुलगा आणि बायको ने ताबा घेतलाय पुस्तकाचा, त्यामुळे चिंता नाही! :-).
28 Aug 2017 - 12:59 pm | प्रीत-मोहर
जेवण!! जवळपास सगळ्या खानावळी आवडल्या नाहीत :(
आमचं हॉटेल मस्त होत जेवणाच्या बाबतीत. हॉटेल क्लार्क्स इन किंवा रॉक रिजेंसी मस्त हॉटेल्स होती
28 Aug 2017 - 1:15 pm | केडी
धन्यवाद! उत्तम फर्स्ट हॅन्ड माहिती दिल्याबद्दल! हंपी.इन वर वाचन सुरु आहेच, त्यांनी एक तो राऊट मॅप दिलाय तो देखील बघून झालाय. म्हणजे थोडक्यात कार ने फिरणे आणि नंतर पायी हेच बहुदा चांगला ऑप्शन दिसतंय सध्या.....
तुम्ही दिलेली हॉटेल्स ना कॉल करून बघतो, सध्या महत्वाचा प्रश्न श्वान आहे! त्यांनी परवानगी दिली तर फारच सोपा होऊन जाईल सगळं..
आभारी आहे!
28 Aug 2017 - 1:31 pm | कंजूस
माझा धागा आहे जुना परंतू तो हाइटेक नाही. स्थानिक बस,मुंबईहून रेल्वे असा. सर्व पायी फिरलो.
बाकी होस्पेट बस स्टँड ते होस्पेट रेल्वे स्टेशन रग्गड हॅाटेल्स आहेत.
कसं फिरायचं - रूट - दिला आहे तो वापरता येईल.
पार बिजापूर- बदामी-पट्टदकल- ऐहोळे-हंपि-लखुंडि आहे. पाच दिवस. सर्व पाहिलं, एकदोन देवळं सुटली.
कारने तुम्हाला आणखी सोपं जाईल असं वाटत असलं तरी चालणे चुकत नाही. मुले कंटाळतील
28 Aug 2017 - 2:03 pm | केडी
कृपया इथे लिंक द्याल का धाग्याची?
28 Aug 2017 - 7:18 pm | कंजूस
विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो(२)
लिंक:http://www.misalpav.com/node/28777
विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो(१)
लिंक:http://www.misalpav.com/node/28762
भटकंती कर्नाटकातली
लिंक:http://www.misalpav.com/node/28053
माहितीसाठी चांगले पुस्तक - South India - lonely planet- first edition 1998.
गाइडची जरुरी लागणार नाही अशी.
नंतर आलेल्या २००८, २०११,२०१५ या आवृत्तींमध्ये हॅाटेल्स पत्ते यावर भर आहे पण माहिती नाही.
29 Aug 2017 - 12:37 pm | केडी
धन्यवाद...
लोन्ली प्लॅनेट विसरलो होतो, आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद! कोणाकडे मिळतंय का बघतो, नाहीतर लायब्ररी मध्ये असेल तर तिथून आणतो.
28 Aug 2017 - 7:24 pm | कंजूस
सूचना: कलादालन धाग्यांतले फोटो दिसत नाहीत कारण त्यावेळी photobucket या साइटवरून शेअर केले होते ते आता त्यांनी थर्डपार्टी शेअरिंग फ्री अकाउंझला बंद केले, फक्त पेड अकाउंटलाच देत आहेत. काही खटपट करून परत आणेन.
28 Aug 2017 - 1:50 pm | चौकटराजा
चालत चालत हंपी परिसर पहाणे यातच मजा आहे. आमची ट्रीप कधीच खादाडीची नसते त्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही. स्थानिकात डोसे , इडली ई नाष्टा सकाळी मिळतो. कमलापूर् येथे हाय फाय हॉटेल्स ची शक्यता आहे. आमचा बेल्लारी किल्ल्ला व डॅम बघायचे राहिले . पुन्हा एकदा चक्क्कर मारणार आहे.
वर कंजूस काकानी सांगितलेली पूर्ण ट्रीप केली तर उत्तम ! मग कारचा फायदा नक्की होईल.
28 Aug 2017 - 7:45 pm | यसवायजी
वाचनखूण साठवली आहे. कामाला येईल लवकरच.
29 Aug 2017 - 8:49 am | प्रचेतस
पेट फ्रेंडली हाऊसेसबाबत माहिती नाही पण खुद्द हंपी गावात (जे अतिशय लहान आहे) घरगुती स्वरुपाची गेस्ट हाऊसेस आहेत अर्थात ती बॅकपॅकर्ससाठीच योग्य आहेत. तुंगभद्रा नदीच्या पलीकडेही विरापूर गड्डे भागात भाताच्या हिरव्यागार शेतांमध्ये काही टुरिस्ट हट्स आणि गेस्ट हाऊसेस आहेत पण तिकडून इकडे यायला बांबूच्या वेतांपासून बनवलेल्या गोलाकार होड्यांचा वापर करावा लागतो. हंपीच्या अगदी जवळ कमलापूरला मात्र राहण्यासाठी केटीडीसीचे रिसोर्ट तसेच क्लार्क्स इन सारखी काही चांगली ठिकाणे आहेत. केटीडीसी निर्विवादपणे सुंदर आहे. प्रशस्त शिवाय स्वस्त. मात्र स्विमिंग पूल वगैरे नाही. कमलापूरपासून रॉयल सेंटर अर्थात शाही परिसर जेमतेम किलोमीटरभर अंतरावर आहे. शिवाय कमलापूरचे पुरातत्त्व संग्रहालय आणि पट्टाभिराम मंदिर आवर्जून बघण्याजोगे.
तुम्हाला हवी तशी हॉटेल्स हॉस्पेटमध्ये मिळू शकतील पण ते १२ किमी दूर आहे. होस्पेटला कृष्णदेवरायाचे त्याच्या मुलाच्या स्मरणार्थ उभारलेले अनंतशयनगुढी मंदिर बघण्यासारखे आहे.
हंपीला तुम्हाला बर्याच ठिकाणी कार वापरता येईल. मात्र रिव्हरसाइड रुइन्स बघण्यासाठी चालतच सफर करावी लागेल (तिथे मोपेड्/सायकलचाही उपयोग नाही). हा पट्टा म्हणजे विरुपाक्ष मंदिर ते विठ्ठ्ल मंदिर हा जवळपास ३ किमी अंतराचा पट्टा. ह्या पट्ट्यात तुंगभद्रा नदी, तिच्या काठचे असंख्य लहानमोठे अवषेश, अच्युतराय मंदिरासारखे भव्य मंदिर, सुले बाजार, राजतुला अशी अनेक महत्वाची ठिकाणे बघता येतात. विठ्ठल मंदिराला कारने जाता येते ते मात्र पलीकडून जवळपास ९/१० किलोमीटरचा वेढा घालून.
हंपी गावात काही इस्रायली पदार्थ पुरवणारी हॉटेल्स आहेत. तसेच तिथे मॅन्गो ट्री नामक रेस्टॉरंटमध्ये चांगले जेवण मिळू शकते (मॅन्गो ट्री ट्राय कराच). कमलापूरमध्ये केटीडीसीचे रेस्टॉरंट आणि क्लार्क्स इन मध्ये उत्तम जेवण मिळते तसेच तिथे काही कन्नड मेस आहेत.
बाकी हंपीला आजूबाजूला बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे दारोजीचे अस्वल अभयारण्य, अनेगोंदी, कांपिली इथले विजयनगरच्या साम्राज्याचे काही अवषेश.
सध्या मी हंपीवर मालिका लिहित आहे त्याची लिंकही येथे देतो.
हंपी १
हंपी २
हंपी ३
29 Aug 2017 - 12:35 pm | केडी
तुमची मालिका वाचून काढतो. सध्या बुकिंग.कॉम वरून पद्मा गेस्ट हाऊस आणि हेमा गेस्ट हाऊस हि दोन मिळाली आहेत जी पेट फ्रेंडली आहेत. अजून काही बरी हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस मिळाली तर ठीक, नाहीतर ह्यातला एक फायनल करेन.
7 Sep 2017 - 9:54 am | प्रीत-मोहर
यातली जवळपास सगळी ठिकाणं
बघितली. पट्टाभिराममंदिराचं मेजर रेस्टोरेशन काम सुरु आहे. तसच विट्ठल मंदिराचं सुद्धा. तिथे मुख्य मंदिरात कुणाला हातही लाऊ देत नाहीयेत. जे अर्थातच योग्य आहे. विरुपाक्ष मंदिराजवळ मातंग हिल वर नक्की चढणे. वरुन अच्युतराय देवळाचा इतका सुंदर नजारा दिसतो. त्यात पाऊस पडत असेल तर क्या केहने. !! माझे फोटो नक्की शेअर करते.
29 Aug 2017 - 1:51 pm | जयंत कुलकर्णी
http://www.misalpav.com/node/22689
29 Aug 2017 - 2:35 pm | केडी
छान लिहिलंय, आता निवांत वाचतो सगळं....
31 Aug 2017 - 11:55 am | पद्माक्षी
पायी फिरावे लागते पण फार कठीण नाही..मुलांना सुद्धा.
31 Aug 2017 - 3:22 pm | केडी
हॉटेल मल्लिगी ला कॉल करून झालाय, नो पेट्स अलाऊड, हो पायी फिरायचे आहेच, पोरं देखील चालतील, बघूया...
31 Aug 2017 - 5:53 pm | कंजूस
नक्की जाणार का?
कोणत्या महिन्यात?
हम्पी उत्सव असतो तीन दिवस त्या तारखा नेटवर मिळतील //तेव्हा जाऊ नका//
बदामी बनशंकरी जत्रे / फेस्टिवल तारखा मिळतील त्या पौर्णिमेअगोदर चार दिवस गर्दी असते.
1 Sep 2017 - 10:47 am | केडी
हो, पण तुम्हाला एवढी शंका का यावी? आणि नाही गेलो तरी इतरांना मदत होईलच कि, ह्या धाग्याची? आमचे हॉटेल बुकिंग झालेले आहे हे वर लिहिलेले आहेच.
ऑक्टोबर
तो उत्सव जानेवारीत असतो (नेट प्रमाणे ०९ ते ११ जानेवारी)
इथे जाणार नाहीये, धाग्यात लिहिल्या प्रमाणे फक्त हंपी एवढाच सध्या प्लॅन आहे
धन्यवाद!
6 Sep 2017 - 2:55 pm | त्रिवेणी
शक्य असेल तर करून या बदामी पण. छान आहे ते पण.आम्हीपण बाय रोड गेलो होतो, पुण्यातून सहा ला निघालो होतो ते संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो होतो. रस्ते चांगले आहेत त्यामुळे प्रवास चांगला झाला होता. मी मागच्या वर्षी जानेवरीतच गेले होते त्या वेळी नेमकी बनशंकरी च्या यात्रे दिवशी गेले होते गर्दी होती मुख्य मंदिरात पण बाकी सगळीकडे मस्त आरामात बघता आले.
7 Sep 2017 - 1:01 pm | केडी
हो जमलं तर बदामी सुद्धा करणार आहे...बहुदा वेळ मिळेल, आणि स्वतःची गाडी असल्यामुळे जमेल...
1 Sep 2017 - 5:30 pm | कंजूस
शंका नाही. फक्त त्याच गर्दीच्या तारखांना नको एवढंच॥ कर्नाटकात नवरात्रातही( दसरा) गर्दी वाढते॥
1 Sep 2017 - 5:34 pm | केडी
अच्छा, आला लक्षात, तुम्ही आणि इतरांनी दिलेली माहिती वाचून ट्रिप प्लॅन फायनल करणार आहे, त्यामुळे पुंन्हा एकदा धन्यवाद! जाऊन आल्यावर किमान फोटो तरी टाकीन इथे.
_/|\_
8 Sep 2017 - 2:36 pm | सुज्ञ माणुस
हंपीला ४ दिवस राहिलात तरी कमी पडेल इतके बघायला आहे. सगळे स्पॉट इतरांनी सांगितलेले आहेतच पण अच्युतराय मंदिराच्या समोर, सुग्रीवाची गुहा आहे तेथून पुढे तुंगभद्रेच्या काठाने चालत जायला पायवाट आहे. त्याने मधल्या टेकडीला वळसा घालून गेल्यावर झोपलेल्या विष्णूची दगडात कोरलेली शिल्प अगदी पाहण्यासारखी. येथे सहसा कोणी येत नाही सुरक्षारक्षकांना विचारून जात येईल. येथेच कोटीतीर्थ म्हणून १ कोटी (१ कोटी नसाव्यात पण खूप आहेत .) शंकराच्या छोट्या छोट्या पिंडी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या आहेत असे म्हणतात या पण कमाल आहेत.
मातंग हिल्स म्हणून डोंगर आहे तो पोलीस स्टेशन पासून चढून त्याच्या विरुद्ध बाजूने उतरल्यावर एका दाट शेतात उतरतो. (आम्ही येथे वाट चुकलो) या वाटेने आपण पानसुपारी बाजार म्हणजे हजारराम मंदिरापाशी निघतो.
तुंगभद्रा नदी ओलांडून हंपीच्या दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर ६ वाजता शेवटची बोट आहे. १० रु तिकीट. ती गेल्यावर ५० रु माणशी गोल टोपल्यासारखी बोटेने जावे लागते.
तुंगभद्रा नदीच्या पल्याड मोपेड घेतली तर २०० रु भाडे आहे आणि पेट्रोलचे २ लिटर (१००रु लिटर) याप्रमाणे ४०० रु सुरवातीलाच घेतात . प्रत्यक्षात अर्धा लिटर पेट्रोल पण लागत नाही. तेव्हा घासाघीस उत्तम. येथून सुमारे ८-१० किमी नव-वृन्दावन म्हणून स्पॉट आहे. धार्मिक स्पॉट आहे पण तेथे बोटीतून जावे लागते हे पण मस्त आहे. बाकी सगळे स्पॉट्स नकाशात आहेतच. झोपलेल्या विष्णूची शिल्पे चुकवू नका.
बदामीला केव्ह्स पाहायला जाताना काही सामान नेता येत नाही आणी खाली ठेवायची सोय नाही. कार असल्याने हा प्रश्न येणार नाही. केव्ह्स पाहायला खायचे पदार्थ काहीही नेऊ नयेत.
9 Sep 2017 - 10:59 pm | केडी
ह्या माहिती बद्दल आभार!
28 Sep 2017 - 12:35 pm | लई भारी
कोल्हापूर-बेळगाव च्या मध्ये चांगले हॉटेल मिळणे जरा कठीण वाटतेय. बेळगाव पर्यंत गेलात तर हायवे च्या जवळ काही हॉटेल्स आहेत. स्वतः राहिलो नाही, पण पै रिसॉर्ट चांगले आहे बहुधा. 'फैरफिएल्ड' हायवेवर काकती ला आहे, पण फक्त रात्रीच्या थांब्यासाठी जरा महाग होईल.
कोल्हापूर मध्ये २-४ किमी आत जावं लागेल हायवे पासून आणि १०० किमी आधीच थांबाव लागेल, त्यापेक्षा बेळगाव बरं पडेल.
23 Oct 2017 - 2:32 pm | केडी
कालच रात्री हंपी वरून परत आलो. तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा खूपच फायदा झाला. हंपी बद्दल इतर लोकांनी इतका भरभरून, विस्तृत आणि सुंदर लिहिलंय, कि मी काही लिहिणे योग्य नाही, म्हणून काही निवडक छायाचित्र देत आहे. कोणास काही अधिक माहिती हवी असल्यास व्यनि करावा
राहायला आम्ही KSTDC च्या मयूर भुवनेश्वरी मध्ये राहिलो, कारण ते हंपी पासून साधारण ५ किमी वर आहे, आणि ते पेट फ्रेंडली आहे. राहायची सोया उत्तम, जेवण ठीक, दिवाळीमुळे स्टाफ अभावी सर्विस अगदीच ढिसाळ. त्यापेक्षा जेवायला क्लार्क्स इन् केव्हाही बरे. [राहायला देखील क्लार्क्स इन् चांगले वाटले, पण पेट फ्रेंडली नसल्यामुळे आम्ही नाही राहिलो]. वेळ कमी असल्यामुळे फक्त हंपी मध्येच भरपूर फिरलो, आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी तुंगभद्रा धरणाच्या परिसरात जाऊन आलो. मुलांसाठी तिथली बाग, कारंज्याचा शो हे छान आहे.
विरुपाक्ष मंदिर
हंपी बाजार
विठ्ठल मंदिर
23 Oct 2017 - 4:17 pm | भ ट क्या खे ड वा ला
फोटो छान .. घरबसल्या हंपी दर्शन झालं....
23 Oct 2017 - 4:17 pm | भ ट क्या खे ड वा ला
फोटो छान .. घरबसल्या हंपी दर्शन झालं....