नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे.

अनामिका's picture
अनामिका in काथ्याकूट
16 Oct 2008 - 1:18 pm
गाभा: 

नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे अशी बातमी मटा मधे वाचली.आणि पुन्हा मागच्याच सगळ्या प्रश्नांचे मोहोळ उठले डोक्यातं.नेताजींच्या अस्तित्वा बद्दल याआधी देखिल बरिच चर्चा झाली आहे.मागे काही वर्षांपुर्वी हिंदुस्थान टाईम्स ने नेताजींचे कुठे कुठे आणि किती साला पर्यंत वास्तव्य होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता .
नेहरु गांधी या द्वयी मुळेच हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्याचा गोबेल्स प्रचार आज गेली सहा दशके करण्यात आला आहे.ज्या नेताजींचा धसका ब्रिटिश सरकारने घेतला ,त्या हिंदुस्थानच्या एका सामर्थ्यवान सुपुत्राच्या नशिबी असा अज्ञातवास का आला असावा?याचे उत्तर कधीतरी मिळेल का?की इतर अनुत्तरीत प्रश्नांमधे नेताजींची देखिल वर्णि लागणार?
"अनामिका"

प्रतिक्रिया

मनीषा's picture

16 Oct 2008 - 1:33 pm | मनीषा

अगदी योग्य शब्द ..
नेताजींचा मृत्यु विमान अपघातात झालाच नव्हता असे म्हणतात .. कोणी म्हणतात नंतर त्यांचे वास्तव्य नाशीक येथे होते . नेताजींच्या डायर्‍या आणि काही जुने फोटो तिथल्या एका व्यक्ती जवळ सापडले म्हणे ..पण --
ते जर नेताजीच असतील तर ते अज्ञातवासात का राहीले असावेत ?
आणि त्यांच्या डायर्‍या आणि फोटो एखाद्या व्यक्तीकडे असणे म्हणजे ते नेताजी असल्याचा पुरावा होउ शकत नाही.

विजुभाऊ's picture

16 Oct 2008 - 1:46 pm | विजुभाऊ

नेताजी हयात असले काय आणि नसले काय असा काय फरक पडतो.
पन्नास वर्षे एखादा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहु शकतो यावर विष्वास बसत नाही

सखाराम_गटणे™'s picture

16 Oct 2008 - 2:01 pm | सखाराम_गटणे™

>>पन्नास वर्षे एखादा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहु शकतो यावर विष्वास बसत नाही
सहमत

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Oct 2008 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll

नेताजींसारखा माणूस खरेच इतके दिवस अज्ञातवासात नसता राहीला. कारण चीनचे आक्रमण बघून खरेच संतापून उठला असता. परत 'आझाद हिंद' घेऊन शत्रूवर तुटून पडला असता. त्यामुळे नेताजी विमानअपघातून वाचले असतीलही पण भारताबाहेरच कुठेतरी राहीले असतील असे वाटते.

अवांतर: ते लोक विज्ञानात नवीन शोध लावतात आणि आम्ही इतिहासात :)

पुण्याचे पेशवे

सागर's picture

16 Oct 2008 - 2:18 pm | सागर

पन्नास वर्षे एखादा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहु शकतो यावर विष्वास बसत नाही
१००% सहमत
नेताजीं सारखा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहीन ते ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर.
अशक्यच....

(देशभक्त) - सागर

जैनाचं कार्ट's picture

16 Oct 2008 - 2:24 pm | जैनाचं कार्ट (not verified)

पुर्ण बातमी येथे आहे ! - दुवा

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

ऍडीजोशी's picture

16 Oct 2008 - 3:34 pm | ऍडीजोशी (not verified)

उन्होंने बताया सुभाषचंद्र बोस साढ़े सात वर्ष बस्ती जिले में, ढाई वर्ष अयोध्या में तथा तीन वर्ष सिविल लाइन फैजाबाद में रहे। आजादी के बाद नेताजी के छिपे रहने के बारे में पूछे जाने पर उन्होंने बताया कि ब्रिटिश शासन से देश की आजादी के मौके पर दो इकरारनामे हुए थे जिसमें भारत पाकिस्तान का बंटवारा और नेताजी को जिंदा या मुर्दा ब्रिटेन को सौंपना शामिल था। यह अनुबंध 2002 तक लागू रहा।

हे कारण असू शकेल. आपल्या हरामखोर नेत्यांनी त्यांना इंग्रजांच्या हाती दिलंही असतं.

विकास's picture

16 Oct 2008 - 4:19 pm | विकास

गांधी-नेहरूंमुळे स्वराज्य मिळाले हे सारखे बिंबवल्यामुळे अनेकांना तसेच खरे वाटते (दे दी हमे आझादी बीना खड्ग बीना ढाल...). तसेच काहीसे नेताजींच्या अपघातातून वाचणे नसेल ना असे देखील वाटते.

....नेताजी को जिंदा या मुर्दा ब्रिटेन को सौंपना शामिल था। यह अनुबंध 2002 तक लागू रहा।

नेहरू तसे करू शकले असते इतपत मान्य (अमेरिकेत / मेक्सिकोतरहाणार्‍या क्रांतिकारी पांडूरंग सदाशिव खानखोजे यांना स्वातंत्र्यानंतर "वाँटेडःम्हणून अटक करून परत पाठवले होतेच!). तरी देखील असा करार झाला असता तर तो एकट्या नेहरू-गांधींबरोबर होऊ शकला नसता. तसेच, जर तो करार नेताजींना माहीती होता (म्हणून ते बाहेर आले नाहीत) तर तो इतरांना पण माहीती असला पाहीजेच.

जरा तर्कच लढवायचे असतील तर असे म्हणता येईल की: (पूर्णपणे तर्क याला कुठलाही संदर्भ नाही!) "नेताजी दुसर्‍या महायुद्धात हिटलर, जपान आदी फॅसिस्टांच्या बाजूने होते." अर्थातच महायुद्धानंतर आंतर्राष्ट्रीय बंधनांप्रमाणे त्यांना नाझी समजून वाँटेड केले असले तर आश्चर्य वाटायला नको. त्यात मग त्यांनी जर काही गुप्त समझौता करून आपल्या हाताखालील सैन्याला आपल्या अज्ञातवासाच्या मोबदल्यात मोकळे केले असले तर वरील मुद्दा लागू ठरतो..."

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Oct 2008 - 6:14 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझ्या माहीतीनुसार दुसर्‍या महायुद्धान॑तर ब्रिटिशा॑नी 'युद्धखोर' ठरविलेल्या लोका॑ची जी यादी होती त्यात नेताजी॑चे नाव होते. मी आजही जालावर थोडेफार शोधले पण अचूक माहीती मिळत नाही. खालील बातमीही वाचावी
http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990721/ige21014.html
गोबेल्स डायरीत नेताजी॑ना ब्रिटिशा॑नीच ठार मारले असा उल्लेख आहे.
सत्य कधीच बाहेर येणार नाही असे मला वाटते. एकतर खूपच जुनी गोष्ट आहे व कदाचित ते सत्य फारच जहाल असू शकते म्हणून जाणूनबुजून पुरावे नष्ट केले असतील.

भास्कर केन्डे's picture

17 Oct 2008 - 2:51 am | भास्कर केन्डे

काही मुद्दे...

  • नेताजींच्या अस्थींची डिएनए चाचणी अद्यापपर्यंत केलेली नाही...(त्यांच्याच आहेत ना त्या अस्थी?)
  • अद्यापपर्यंत डझनावर संशेधकांनी त्यांचे गुप्त अहवाल सरकारला दिले. एकदाही एकही अहवाल गुलदस्त्यातून बाहेर आला नाही. म्हणे की जर सत्य बाहेर आले तर देशाच्या (गांधी/नेहरुंच्या?) प्रतिमेला तडा जाईल.
  • नेताजींनी जमा केलेली व खर्च न झालेली संपत्ती कुठे गेली... आठवा एक-एका शहरातून त्यांची सूवर्णतुला केली होती. असे शेकडो ठिकाणी धन जमा झाले होते. ... (विचार)... त्यांचे धन लाटण्यासाठी अपघातातून वाचल्यावर (वा अपघात न करताच) त्यांना गायब केले गेले असेल का? त्यांना गायब करणे कोणाच्या हिताचे होते?.... याचा तुटक संदर्भ महानायक वा सरदार पुस्तकात वाचल्याचे आठवते (चु भू द्या घ्या).

आपला,
(साशंक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सहमत.केन्डे तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत्?नेताजींच्या विमानाला अपघात झाला असेल असे धरुन चालले तरि तो का झाला आणि तो करण्यामागे कुणाचा हात होता हे पुन्हा गुलदस्त्यातच राहिले. या सगळ्या रहस्यांमुळेच नेहरु गांधी व काँग्रेस यांच्या एकुण हेतु बद्दलच संशय निर्माण होतो मनात.
"अनामिका"