दक्षिण भारतीय वडे..(नक्की नाव नाही समजलं)

प्राजु's picture
प्राजु in पाककृती
16 Oct 2008 - 12:01 am

नवरात्रामध्ये मी इथल्या साऊथ इंडियन ग्रुप मध्ये ललितासहस्त्रनाम वाचन करायला जात होते. तिथे प्रसाद म्हणून मिळणार्‍या पोंगल, खीर इ. गोड पदार्थांसोबतच हे वडे केले होते. मला आवडले. मी रेसिपी विचारून घेतली. खवय्ये मिपाकरांसाठी रेसिपी इथे देत आहे.

तांदूळ - २ कप
चणा डाळ- १ कप
उडिद डाळ - १ कप.
कडीपत्ता
कोथिंबीर
आलं साधराण १ इंच. (बहुतेक प्रसाद होता म्हणून लसूण घातला नसावा. आपण घालायला हरकत नाही)
मिरच्या ४-५.
धणे-जिरे पावडर २ टीस्पून
मेथीचे दाणे १ टीस्पून
ओवा चिमूटभर
मिठ चवीप्रमाणे
लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे

१. प्रथम डाळी , तांदूळ , आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुवून ४ तास भिजत घालावेत.
२. पाणी पूर्णपणे काढून मग तांदूळ, डाळी, मेथीचे दाणे, आलं, कोथिंबीर, मिरच्या, कडीपत्ता सगळे एकत्र वाटून घ्यावे. शक्यतो पाणी घालू नये. लागल्यास खूप थोडे घालावे.
३. या मिश्रणात लाल मिरची पावडर, ओवा, धणे जीरे पावडर आणि मिठ घालावे. चांगले हलवून साधारण अर्धा तास तसेच झाकून ठेवावे.
४. यात आता चिमूट भर सोडा घालून चमच्याने किंवा जमत असेल तर हाताने गोल आकार देउन वडे तळून घ्यावेत.
अतिशय स्पाँजी होतात हे वडे. आणि कोणत्याही चटणी, सॉस सोबत मस्त लागतात.
करून पहा आणि आवडले तर माझ्या दक्षिण भारतीय मैत्रिणीला धन्यवाद द्या.

- प्राजु

प्रतिक्रिया

ललिता's picture

16 Oct 2008 - 12:36 am | ललिता

शनिवारी करुनच पाहाते!

विजुभाऊ's picture

16 Oct 2008 - 3:42 pm | विजुभाऊ

याला अळु बोंडे हे नाव आहे.
कन्नड पदार्थ आहे हा

छोटा डॉन's picture

16 Oct 2008 - 7:42 pm | छोटा डॉन

हे "आलु बोंडे" नसावेत कारण हे वाचा ...

४. यात आता चिमूट भर सोडा घालून चमच्याने किंवा जमत असेल तर हाताने गोल आकार देउन वडे तळून घ्यावेत.

आम्ही गेल्या १ वर्षात कर्नाटकात ठिकठिकाणी खाल्लेल्या आलुबोंड्याचा आकार व स्वरुप पाहुन त्याला "चमच्याने आकार देणे अथवा हाताने नाजुकपणे गोल करणे" अशक्य आहे असे माझे मत आहे ...
साधारणता ह्या कर्नाटकी आलुबंड्यांचा आकार "आपले कमीत कमी ३-४ मोठ्ठे बटाटेवडे" बसतील एवढा मोठ्ठा असतो, थोडक्यात एका हाताच्या ओंझळीत माऊ शकेल एवढा, मुठीत बसणे शक्य नाही ...

हा, ऊलुंधू असु शकते ...

फोटो दाखवल्यास १०० % खात्रीने सांगेन ...
व खाऊ खातल्यास ते "तुम्ही म्हणता तेच आहे" ह्याला समहत असेन ....

(सुस्पष्ट ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सायली पानसे's picture

23 Oct 2008 - 11:32 am | सायली पानसे

आलु बोंडा हा वेगळा आहे... हा आपल्या बटाट्या वड्या सारखा असतो पण आकाराने खुप मोठा आणि गोडसर.
ह्या पदार्थ आहे पेरिप्प वडा.. पेरिप्प म्हणजे डाळ... थोडक्यात डाळवडा.
ह्यात लसूण घालत नहित ... माझे यजमान केरळ चे आहेत त्यामुळे मला नक्कि माहित आहे... आणि माझा फार आवडता आहे.

मानस's picture

16 Oct 2008 - 12:38 am | मानस

पाकृ छान आहे, बहुतेक बोंडा किंवा ऊलुंधू असा काहीसा प्रकार आठवतो खाल्ल्याचा.

अजुन येऊ देत..........

प्राजु's picture

16 Oct 2008 - 12:43 am | प्राजु

पण जे काही होतं ते एकदम फंडू होतं. म्हणून मी आपलं 'दक्षिण भारतीय वडे' असं नाव दिलं. तसंही नाम मे क्या रखा है??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मानस's picture

16 Oct 2008 - 12:47 am | मानस

तसंही नाम मे क्या रखा है?? यस् .... सहमत

आपण "मसाला वडा" म्हणुयात :)

रेवती's picture

16 Oct 2008 - 7:52 pm | रेवती

तसंही नाम मे क्या रखा है??

खरंच गं, नावात काय आहे?
गरम गरम करून घातलेस तर तुझ्या नावाचा जयजयकार करू.....वड्यांच्या (नसलेल्या) नावाचा नाही.;)
रेवती

प्राजु's picture

16 Oct 2008 - 7:56 pm | प्राजु

गरम गरम करून घातलेस तर तुझ्या नावाचा जयजयकार करू.....वड्यांच्या (नसलेल्या) नावाचा नाही.

जयजयकार नाही केला तरी मी नक्की घालेन करून. कधी येते आहेस सांग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वल्लरी's picture

16 Oct 2008 - 6:04 pm | वल्लरी

हो ऊलुंधू च ...
ऊलुंधू च नाव आहे.मी माझ्या South Indian friend कडुन confirm केले... :)]
तिला रेसीपी वाचुन दाखवली तेव्हा ती पटकन ऊलुंधू च बोललि.

विसोबा खेचर's picture

16 Oct 2008 - 1:03 am | विसोबा खेचर

अतिशय स्पाँजी होतात हे वडे. आणि कोणत्याही चटणी, सॉस सोबत मस्त लागतात.
करून पहा आणि आवडले तर माझ्या दक्षिण भारतीय मैत्रिणीला धन्यवाद द्या.

वा! सुंदर पाकृ..!

तुझ्या मैत्रिणीला अवश्य धन्यवाद देऊ! :)

प्राजू, एखादा फोटू का नाही टाकलास?
(वड्यांचा बर्र का! मैत्रिणीचा नाही...!) :)

आपला,
(दक्षिण भारतीय खाण्याचा अन् दाक्षिणात्य स्त्रियांच्या सौंदर्याचा चाहता) तात्या.

प्राजु's picture

16 Oct 2008 - 1:05 am | प्राजु

फोटो असायला नको का टाकायला? तिथे कुठे गर्दित त्या वड्यांचा फोटो काढू??
आता या विकेंडला घरी करेन आणि मग फोटो पाठवेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

16 Oct 2008 - 4:07 am | शितल

प्राजु,
अग आपल्या येथे अप्पे कसे करतात साधारण तसे लागतात ना हे वडे.
करून नक्की बघीन. :)

प्राजु's picture

16 Oct 2008 - 6:49 am | प्राजु

शितल आपण आप्पे करतो तेव्हा तांदूळ, डाळी वाटून ते पिठ आंबवण्यासाठी ठेवून देतो. त्यामुळे आप्पे थोडेसे आंबट लागतात. पण या वड्यासाठी आंबवण्याची गरज नाही. ४ तास भिजत घालावे फक्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

16 Oct 2008 - 4:49 am | रेवती

वेगवेगळ्या डाळींमुळे पौष्टीकही आहेत हे वडे.

रेवती

शिप्रा's picture

16 Oct 2008 - 9:27 am | शिप्रा

मस्त्त्त्त्त्त्..फोटो नसला तरी नुसते इमॅजिन करुनच वाचताना पाणी सुटले होते तोंडाला...
शनिवारी लगेच करुन बघणार...

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

धुमधडाका's picture

16 Oct 2008 - 6:38 pm | धुमधडाका

तरी म्हंटल आजकाल आपल्याकडे राज्यात पुर का येतो.

बाकी वडे छान!!!!!

एकदम धुमधडाका

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2008 - 11:29 am | स्वाती दिनेश

प्राजु.. करुन पाहिलेच पाहिजेत हे वडे..:)मानसने दिलेले मसाला वडे हे नावही छान आहे..
शंका- तांदूळ कोणता वापरला होता? उकडा की साधा?
स्वाती

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Oct 2008 - 11:45 am | घाशीराम कोतवाल १.२

(दक्षिण भारतीय खाण्याचा अन् दाक्षिणात्य स्त्रियांच्या सौंदर्याचा चाहता) तात्या.
आता ईथ खान्याचा विषय चालु असताना दाक्षिणात्य स्त्रियांच्या सौंदर्या कोठुन आली
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

प्रभाकर पेठकर's picture

16 Oct 2008 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर

आपल्या मराठमोळ्या पाककृतीत ह्याला 'मिश्र डाळींचे वडे' असे म्हणतात.मस्त लागतात.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

शाल्मली's picture

16 Oct 2008 - 3:38 pm | शाल्मली

छान आहे पाकृ. आणि करायलाही सोपे आहेत.
लवकरच करून बघितले पाहिजेत.

आणि मसाला वडा नावही छान :)

--शाल्मली.

प्राजु's picture

16 Oct 2008 - 7:33 pm | प्राजु

याला लावायला तिने टोमॅटोची चटणी कि लोणचं केलं होतं. इतकं भारी होतं ते. मी त्याचीही रेसिपी विचारली आहे. लिहिण थोडे दिवसात.
टोमॅटो, हरभरा डाळ, उडीद डाळ... लाल मिरच्या, चिंच असं बरंच काही होतं त्यात. लवकरच लिहिन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

17 Oct 2008 - 10:34 pm | चकली

मी पण त्या चटणीची मोठी फ़ॅन आहे. लवकर दे रेसिपी!

चकली
http://chakali.blogspot.com

सायली पानसे's picture

23 Oct 2008 - 11:39 am | सायली पानसे

अग ह्याला पेरिप्प वडा असेहि म्हणतात केरळ मधे. ह्यात लसुण घालत नाहीत.
infact there is one variation also
u can make this wada with tur dal only. tur dal soak for 4hrs. rest all same just dont put methi dana. and put kanda barik chirun. it is yummy.

मनस्वी's picture

23 Oct 2008 - 12:13 pm | मनस्वी

मस्त पाककृती. नक्की करून बघीन. तुला आणि तुझ्या दाक्षिणात्य मैत्रिणींना धन्यवाद.