फायनान्स सेक्टरमधले प्रश्न: भाग -१

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
21 Jul 2017 - 1:16 pm
गाभा: 

या धाग्यावर अकाउंटींग, कॉर्पोरेट फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, बँकींग, इन्वेस्टमेंट बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, इंटरनॅशल फफायनान्स, इंटरनॅशनल ट्रेड, स्टॉक्स, डेरिवेटिवज, ऑडिट, कंपनी सेक्रेतरियल वर्क्स, काँट्रॅक्ट्स, स्टार्ट्प, इ इ बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारावेत. शुद्ध पर्सनल फायनान्स आणि शुद्ध इकॉनॉमिक्स वरचे प्रश्न टाळलेले बरे. क्रमांक दिलेले बरे.

सुरुवातीला मी इथे दोन प्रश्न देत आहे.

प्र‌श्न‌ क्र‌मांक‌ १ - (विष‌य - प्रोजेक्ट‌ फाय‌नान्स‌) आप‌ण‌ संपूर्ण प्रोजेक्ट‌ कॉस्ट‌ कॅपिट‌लाईज‌ क‌र‌तो. त्यात‌ स‌ग‌ळे इन‌पुट‌ इन‌डाय‌रेक्ट‌ टेक्सेस देखिल आले, ते देखिल कॅपिटलाईज झाले. एक‌दा का प्रोजेक्ट‌ चालू झाला कि म‌ग‌ या क‌रांचे क्रेडिट ऑप‌रेश‌न्स‌च्या काळात‌ घेता येते का? उदा. मी १०० रु + जी एस टी देऊन = ११८ रुपये देऊन मशिन घेतली तर कमिशनिंगनंतर मला जो मशिनमधे वापरायला कच्चा माल लागेल, त्यावरच्या कराकरता मी हे मागचे १८ रु वापरू शकतो का?

प्र‌श्न‌ क्र‌माक‌ं २ - (विष‌य‌ - अप्र‌त्य‌क्ष‌ क‌र‌) जी एस टी च्या काळात‌ किंवा एर‌वीही इन‌डाय‌रेक्ट‌ क‌राचे क्रेडिट‌ एका आर्थिक व‌र्षातून दुस‌ऱ्या आर्थिक‌ व‌र्षात‌ किती घेता येते याला काय‌ काय‌ बंध‌ने आहे.

उत्तर सर्वसाधारणपणे जेनेरिक द्यावे. जेनेरिक देता येत नसेल तर आपल्या क्षेत्रातले द्यावे.

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

21 Jul 2017 - 4:20 pm | धर्मराजमुटके

डिसक्लेमर : मी फायनान्समधला किडा नाहिये पण व्यवसाय करण्यासाठी अधूनमधून काहि गोष्टींची माहिती घ्यावी लागते त्या अनुषंगाने उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तरे संपुर्ण / अर्धवट बरोबर / चुक असु शकतील. जाणकारांनी दुरुस्ती सुचविल्यास (स्वतःला अतिशहाणे न समजता) आनंदच होईल.

प्र. १ आणि २ चे उत्तर : होय. माझ्या माहितीप्रमाणे हे क्रेडीट पुढील १ आर्थिक वर्षापर्यंत घेता येते. अगोदर बहुधा याची मुदत ६ महिने होती. जर तुम्ही आत्ताचा व्हॅट मधे खरेदी केलेल्या मालाचा स्टॉक दाखवला ( १ जुलै २०१७ रोजी) आणि त्याची वैध बिल्स असतील तर हे क्रेडीट घेता येईल. मात्र व्हॅट ची टक्केवारी ६%, १३.५% असलेला माल आता बहुधा १८% च्या कॅटेगरीत असेल तेव्हा नक्की किती क्रेडीट मिळेल याबाबत मी देखील माहिती मिळवत आहे. मात्र १ वर्षाअगोदर (बहुधा १ आर्थिक वर्ष) खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या टॅक्सचे क्रेडीट वापरता येणार नाहिये हे नक्की.

केडीट पुढचे कितीही वर्षे घेता येते, त्याचे विवरण देण्याचे काम पुढचे सहा महिने करता येते.
=====================
मंजे मी समजा मी १०० रुपयांचे सामान, इनपुट टॅक्स १८ = ११८ रुपये दिले. मग माझे उत्पादन १५० रु ला त्याच वर्षि विकले. नेट कर ९ रु.
पण मी ते पुढचे १० वर्षे प्रत्येक वर्षी १५०/९ इतके विकले तर, मी रुपये १८/१० इतके क्रेडिट दरवर्षी घेऊ शकतो. फक्त दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मी सांगायचे की मी १८ रु कर भरला आहे (आणि भरायचा देखिल.)
@ज्ञानोबाचे पैजार - कन्फर्म प्लिज.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2017 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार

GST Credit Example

पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

21 Jul 2017 - 4:23 pm | धर्मराजमुटके

'स्वतःला अतिशहाणे न समजता' हा उल्लेख माझ्या स्वतःसाठी आहे. प्रतिसादकर्त्यांसाठी नाही याची कृपया नोंद घेणे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

21 Jul 2017 - 5:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

:):)

हतोळकरांचा प्रसाद's picture

21 Jul 2017 - 5:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

खुप छान धागा!

नुसते छान नको कुणी उत्तरे द्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2017 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार

- मशीनरी कॅपिटलाइज करताना जर त्यावरचे टॅक्सेसही जर कॅपीटलाईज केले तर त्या टॅक्सचे क्रेडीट घेता येणार नाही. पण त्यावर इनकमटॅक्स मधे त्यावर डेप्रीसीएशन क्लेम करता येईल.
- आता मुळ प्रश्णा कडे - समजा कच्चा माल १० रुपयांना खरेदी केला आणि त्यावर १ रुपया जीएसटी भरला तर जीएसटीचे उपलब्ध क्रेडीट झाले १९ रुपये (मशीनचे १८ + १)
- जर तयार माल २० रुपयांना विकला आणि त्यावर देय जी एस टी २ रुपये आहे असे मानले तर या दोन रुपयां ऐवजी जी एस टी लायबलीटी होइल शुन्य रुपये व उपलब्ध जी एस टी क्रेडीट होईल १७ रुपये ( १९ - २)

प्रश्ण २ -
जर करदाता नियमित पणे विवरण पत्रे भरत असेल (रिटर्नस) तर कोणत्याही इनडायरेक्ट (अप्रत्यक्ष) कराचे)क्रेडीट एका वर्षातुन दुसर्‍या वर्षात कॅरी फॉर्वर्ड करण्यासाठी कोणतेही बंधन नाही.

(प्रतिसादा मधे फारच जास्त इंग्रजी शब्द झाले आहेत. शुध्द मराठी वापरले असते तर कदाचीत समजायला अवघड गेले असते. )

पैजारबुवा,

arunjoshi123's picture

22 Jul 2017 - 2:20 pm | arunjoshi123

ते बाकी कळलं.

जर त्यावरचे टॅक्सेसही जर कॅपीटलाईज केले तर

अर्थातच करेल ना कंपनी? कि दुसरा ऑप्शन आहे? काय आहे?

- जर तयार माल २० रुपयांना विकला आणि त्यावर देय जी एस टी २ रुपये आहे असे मानले तर या दोन रुपयां ऐवजी जी एस टी लायबलीटी होइल शुन्य रुपये व उपलब्ध जी एस टी क्रेडीट होईल १७ रुपये ( १९ - २)

आता हे क्रेडिट पुढचे किति वर्षे वापरता येईल? समजा माझा प्रत्येक वर्षी हाच पॅटर्न आहे तर दरवर्शी १ रु करत १८ वर्शे कॅरि फॉर्वाड?

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2017 - 4:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी वरती म्हणालो तसे कंपनी कडे दोन पर्याय आहेत.

पर्याय १. टॅक्स कॅपिटलाइज करणे :-
म्हणजे १०० रुपयांचे मशिन + १८ रुपये कर असे एकुण ११८ रुपये कॅपीटलाइज करता येतील व संपुर्ण ११८ रुपयांवर डेप्रीसीएशन क्लेम करता येईल. पण या मधे १८ रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट क्लेम करता येणार नाही.

पर्याय २. टॅक्स कॅपिटलाईज न करणे :-
यात १०० रुपयांवर डेप्रिसिएशन क्लेम करता येईल तर १८ रुपये इनपुट टॅक्स क्रेडीट म्हणुन वापरता येतील.

तुमच्या दुसर्‍या प्रश्णाचे उत्तर मी खाली दिले आहे.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2017 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार

धर्मराजमुटके सरांनी दिलेले प्रश्ण क्र २ चे उत्तर वाचून अजून एक खुलासा करावासा वाटतो.

जी एस टी मधे वार्षिक विवरण पत्र भरे पर्यंत केव्हाही इनपुट क्रेडीट घेता येईल.

म्हणजे एखाद्या खरेदीचे बील एप्रिल २०१८ चे आहे. तर त्या बीलावरचे इनपुट टॅक्स क्रेडीट व्यापार्‍याला मार्च २०१९ साला पर्यंत केव्हाही घेता येईल.

मार्च २०१९ च्या विवरण पत्रात जरी क्रेडीट घेतले नाही तर ते वार्षिक विवरण पत्रात घेता येइल. पण एकदा का त्याने वर्ष २०१८-१९ चे वार्षिक विवरण पत्र भरले की मग त्याला त्या वर्षाचे कोणतेही क्रेडीट क्लेम करता येणार नाही.

वार्षिक विवरणपत्र भरायची मुदत पुढील वर्षाच्या ३० सप्टेंबर पर्यंत आहे. याचाच अर्थ एप्रिल महिन्याच्या बीलांसाठी इनपुट टॅक्स क्रेडीट क्लेम करण्याची मुदत १८ महिने तर मार्च मधील बीलांसाठी ही मुदत ६ महिने इतकी होते.

(वरील उत्तरे मी माझ्या कडे उपलब्ध असलेल्या जी एस टी बद्दलच्या माहितीच्या आधारे दिली आहेत. या करता मी सध्या प्रचलीत असलेल्या कायद्याचा आधार घेतला आहे. या उत्तरांचा उपयोग योग्य पडताळणी केल्याशिवाय करु नये ही नम्र विनंती) (किंवा माहितगार काका म्हणतात तसे काहितरी :- उत्तरदायकास नकाराधीकार लागू आहे.)

(अजूनएक माझे लेखाविषयक (अकांउटस) किंवा वित्तविषयक (फायनान्स) ज्ञान परीपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही. या उत्तरांमधे जर काही सुधारणा हव्या असतील तर त्या जरुर सुचवाव्या.)

पैजारबुवा,

arunjoshi123's picture

22 Jul 2017 - 2:41 pm | arunjoshi123

वार्षिक विवरणपत्र भरायची मुदत पुढील वर्षाच्या ३० सप्टेंबर पर्यंत आहे.

माफ करा, पण आपली दोन उत्तरं वाचून मी अल्पसा संभ्रमित झालो आहे.
१. व्यवहार कोणत्याही वर्शाचा असो, इनपुट टॅक्स क्रेडिट पुढच्या वर्शि (तो शटकोन कसा टाईप करतात?) मिळते असं पहिल्या प्रतिसादात वाटतं.
२. दुसर्‍या प्रतिसादात मात्र केवळ मागचे हिशेब निस्तरायचा अवधी अजून सहा महिने आहे असे वाटते. तर दुसर्‍या उदाहरणात, मागच्या वर्शिच्या क्रेडिटने पुढच्या वर्शिच्या व्यवहारांवरील करांना पण ऑफ सेट करता येते का? किमान सहा महिने?

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2017 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकदा क्रेडीट क्लेम केले की मग त्याला कितीही वर्षे पुढे कॅरी फॉर्वर्ड करता येईल. मात्र टॅक्स क्रेडीट ज्या वर्षाचे त्याच वर्षी क्लेम करायचे. एकदा का आपण एखाद्या वर्षाचे वार्षिक विवरणपत्र दाखल केले की त्या वर्षाचे दरवाजे बंद.

हे क्रेडीट कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी नियमीत टॅक्स भरावा लागेल आणि त्याची विवरणपत्रे नियमित भरावी लागतील.

पैजारबुवा,

दोन्ही प्रतिसाद एकदम कूल.
दोन पर्यांयांपैकी काय करायचं हे मी कसं ठरवावं यावर हे मुक्त चिंतन-
१. अप्रत्यक्ष कर कॅपिटलाइज करणे : समजा मशिनचं लाईफ १० वर्षे आहे. तर १८ रु एस एल एम मेथडने दरवर्षी १.८ रुपये याप्रमाणे डिप्रिशिएशन म्हणून दाखवले जातील. आणि ३०% आयकराच्या हिशेबाने माझे ही दहा वर्षे ०.६*१० = ६ रुपये इतकी नॉमिनल सम वाचेल. बाकिचे १२ बुडाले.
२. कर कॅपिटलाईज न करता, पुढे कॅरि फॉर्वाड करणे - यामुळे कमिशनींगच्या तारखेपुढे माझ्या ऑपरेशन्स मधे जर बराच इनडायरेक्ट करांचा पेमेंट असेल, समजा दर वर्षि ३ रु असेल तर सहा वर्षांत मी पूर्ण १८ रु वापरेन. म्हणजे नॉमिनम व्हॅल्यूत ० बुडाले.

यात डिप्रिशिएशनचे दर खूप जास्त नसतिल तर हे ६ रुपये देखिल सावकाश वाचणार प्रोजेक्ट लाईफ सायकल मधे. म्हणजे सेविंगची नेट प्रेझेंट व्हॅल्यू पण कॅरी फॉर्वाडच्याच केस मधे जास्त असणार.

असं वाटतं कि आय आर आर च्या दृष्टिनं, शक्य असल्यास कंपनीनं दुसरं ऑप्शनच चोखंदळून पहावं. पहिल्याचे फायदे काय आहेत हे कळत नाहीय. कुणाला माहिते?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2017 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे

'shift + s' + h = ष

चौकटराजा's picture

24 Jul 2017 - 10:21 am | चौकटराजा

मला वाटले हा जी एस टी मधला एखादा फॉर्म्युला आहे की काय ..... ? :))

टर्मीनेटर's picture

26 Jul 2017 - 9:00 pm | टर्मीनेटर

:) :P

प्रश्न क्रमांक ३ टॅक्स डिप्रेसिएशनसाठि आपण वस्तूला १००% डिप्रिशिएट करू शकत नाही. केवळ ९५% का काहितरी करता येते. याचे नक्की नियम काय आहेत?

सतीश कुडतरकर's picture

24 Jul 2017 - 2:34 pm | सतीश कुडतरकर

९५% करू शकतो. ५% रेसिड्युअल व्हॅल्यू दाखवावी लागते.

arunjoshi123's picture

22 Jul 2017 - 2:47 pm | arunjoshi123

प्रश्न क्रमांक ४ - व्हॅल्यूएशन (मूल्य ठरवणे) करताना कंपनीची वाढ इ इ सर्व स्थिर होऊन काही वर्शांनी एक स्थिर पॅटर्न दिसू लागतो. त्यानंतरची पूर्ण व्हॅल्यू आपण टर्मिनल मूल्य घेऊन काढतो. तर टर्मिनल व्हॅल्यू किती वर्षांनी काढावा? किति वर्षे फायनांशियल्य्स प्रोजेक्ट करावेत?

जोशीबुवा तुम्ही जर अकाउंट्सची टेक्स्टबुक्स वाचलीत तर तुमचे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात कारण त्यात अकाउंटिग प्रिन्सपल्सची व्यापक माहिती देत नाहीत॥तर अशा पुस्तकांत हे सर्व -काय करता येते/नाही हे कळेल. मुळात मोठ्या कंपन्यांचे अकाउंटिंग सिएलोक करत असल्याने ते हे सर्व नियमांतच करतात. मालक लोक कॅश फ्लो दाखवण्यासाठी काही खरेदी कॅपिटलाइज करायला भाग पाडतात. ( खर्चाची एंट्री डेबिटला पडते पण ती प्राफिटलॅासला जाते; कॅपिटलाइज म्हणजे ते अॅसेट दाखवल्यास एन्ट्री डेबिटलाच होते परंतू बॅलन्स शीटमधून पुढच्या वर्षी कॅरीफॅरवर्ड होते).
होतं काय की ओडिटला यावर रिमार्क येऊ शकतो,तुमचं कॅपिटलाइजेशन अडमिट केलं जात नाही.
आता १००% डिप्रिशिएट म्हणजेच = इक्सपेन्सिज झाले हो।
आता मुद्दा जिएसटीचा. दिर्घकाळाने अथवा त्यांचा ओफसेट टाइमलिमिटच्या बाहेर गेला म्हणून क्रेडिट रद्द ठरवले तरी नुकसानच (२८%).

ओडिटला यावर रिमार्क येऊ शकतो,तुमचं कॅपिटलाइजेशन अडमिट केलं जात नाही.

१००% डीप्रिशिएशन म्हणजे एक्सपेंस दाखवता येणं हे कंपनीच्या कधिही फायद्याचं आहे. मूळात ऑप्शन असता तर कंपनीनं कधीच काहीच कॅपिटलाईज केलं नसतं आणि सगळा लॉस कॅरी फॉर्वार्ड केलं असतं.
१. कॅपिटलाएझेशन केले : म्हणजे कर ३०% असेल तर डिप्रिशिएशन केल्यावर्षि आणि पुढच्या प्रत्येक वर्षी असेटची व्हॅल्यू * डिप्रिशिएशन्चा दर * ३०% इतकाच लाभ मिळतो.
२: नाही केले : असेट व्हॅल्यू (खर्च म्हणून वजा होणार)* ३०% इतका लाभ मिळतो जो पहिल्या केसपेक्षा खूप जास्त आहे.

मग कोणि कॅपिटलायझेशन करेलच कशाला? आणि कायदा आहे म्हणून केले तर हा कायदा फक्त असेटच्या मूळ व्हॅल्यूला आहे, नि तिच्यावरच्या करांना नाही हे विचित्र वाटते.

कंपनीतला टॅक्स बघणारा अधिकारी पक्की खात्री केल्यावरच अडजस्टमेंट करेल॥ परंतू मालकानेच लक्ष घालून अमुकच कर पुढचंपुढे बघू निर्णय घेतल्यास वेगळे.

arunjoshi123's picture

29 Sep 2017 - 10:48 am | arunjoshi123

http://www.mondaq.com/article.asp?articleid=632080&email_access=on&chk=2...
रेराने बांधकाम व्यवसायात जे अनेक विमे बंधनकारक केले आहेत त्यांत टायटल इन्शुरन्स एक आहे. हे क्षेत्र भारतात विकसित होईल काय? विकासाला ठप्प करणारी कोर्टातली लाखो भांडणं दूरगामी भविष्यात थांबतील काय? सारी राज्य सरकारं लॉ बनवताना हा विमा अपवाद करणार करणार नाहीत, प्रेशरला बळी पडणार नाहीत अशी आशा करता येईल का?

जीएसटी च्या पूर्वीच्या काळामध्ये जे सगळे सर्टिफाइड valuers होते ते तेव्हा VAT आणि सर्विस टॅक्स या कायद्यांच्या अनुसार रजिस्टर झालेले होते. आज घडीला हे सगळे कायदे repeal झालेले आहेत. मग हे सारे सर्टिफाइड रिव्हर्स आज देखील कायद्याप्रमाणे सर्टिफाइड मानता येतील काय? IBBI ने प्रमाणित केलेले चार प्रकारचे सर्टिफाइड valuers हे आजचे अधिकृत valuers मानले जातात. त्यांना एक परीक्षा द्यायला लागते. पण ते केवळ कॉर्पोरेट insolevency प्रोसेस मध्येच भाग घेऊ शकतात. मग बाकीच्या सर्टिफाइड व्हॅली वरचा आज कायदेशीर स्टेटस काय आहे यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय?

सर्टिफाईड व्हॅल्यूअर्सचे स्टॅटस
17 Feb 2020 - 2:19 pm | arunjoshi123

>>जीएसटी च्या पूर्वीच्या काळामध्ये जे ~~~~>>
-
Certified valuers कार्यकालाची मर्यादा असेलच. त्यानंतर त्याचे नुतनीकरण अपेक्षित असणार.
-------
तुमचा प्रश्न इंग्रजीत विचारा म्हणजे तो कॉपी करून ओळखीच्या मनुष्यास पाठवून विचारेन.

arunjoshi123's picture

17 Feb 2020 - 9:30 pm | arunjoshi123

Businesses are free to decide whatever value of transaction as they agree. However, to avoid evasion of tax on the transaction, the government requires that valuation of the scope is done by a certified valuer. It could be a CA, CMA, valuers certified by an government institution. Before GST regime, the respective acts required to determine the taxable value. These acts themselves defined who is the eligible person to give a valuation certification for tax purposes. With all these acts being repealed (except for customs & direct taxes) in GST regime, the status of authenticity or validity of these valuers is not clear. My question is - what is the latest notification or guideline on their status.
With formation of IBBI new certified valuers have been defined in the IBC code. However, their sole purpose is valuation during CIRP.
What if I need government certified value of corporate assets but I am not under insolvency process? I need it for other business purposes, say, during M&A negotiations.

Tax संबंधित प्रश्न असले तर CNBC AWAAZ TV 18 channel वर Rajguru कार्यक्रमांत फोन इन लाईव किंवा इमेलने पाठवून विचारता येतात.
@ arunjoshi123 ,
हा प्रश्न एका जिएसटीची कामे करणाऱ्याला आणि एका LLM ( commercial) वकिलाला विचारतो/पाठवतो.

अरुणजोशी सर, प्रश्न पाठवला जीएसटीवाल्या वर्गमित्राकडे.
त्याचे उत्तर "CA ,सर्टिफाई करून देईल जीएसटी योग्य भरला आहे आणि ट्याक्स लाएबिलटी नाही."