ताज्या घडामोडी: भाग ७

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
20 Jul 2017 - 1:41 pm
गाभा: 

राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.

मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत.

पुढच्या फेर्‍यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

27 Jul 2017 - 9:40 pm | गॅरी ट्रुमन

प्रश्न विरोधी पक्षांमध्ये कोण कोणाबरोबर हातमिळवणी करेल हा नाहीच. कोणीही कोणाबरोबरही युती करून निवडणुक लढवू शकतो. त्याला काहीच करता येणार नाही. प्रश्न आहे या युतीच्या विश्वासार्हतेचा. म्हणजे बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल किंवा काँग्रेस+तृणमूल+डावे अशी जरी युती झाली तरी ती युती केवळ मोदीविरोध हाच अजेंडा ठेऊन असेल त्यामुळे बिहारमध्ये झाले त्याप्रमाणे ती युती अस्थिरच असेल हा संदेश मतदारांमध्ये या घटनेमुळे गेला आहे. त्यामुळे अशा संधीसाधू युत्यांना अन्यथा मिळाली असती त्यापेक्षा मते कमी मिळतील. आणि त्यातून नितीशकुमारही भाजपबरोबरच गेले आहेत. नितीशकुमारांना इतके महिने सुशासनबाबू असे विरोधकच प्रोजेक्ट करत होते. तेच भाजपबरोबर गेल्यामुळे चांगल्या सरकारसाठी आणि सुशासनासाठी मोदींशिवाय पर्याय नाही हा पण मतदारांमध्ये संदेश जायला मदत झाली आहे. विरोधकांच्या युतीमध्ये पाचर मारणे असे मी जे म्हटले आहे त्यात मला ही गोष्ट अपेक्षित आहे.

सुबोध खरे's picture

27 Jul 2017 - 7:01 pm | सुबोध खरे

याचा एक फायदा असाही होऊ शकतो कि लालू प्रसाद मायावतींना बिहारमधून राज्यसभेवर निवडून देऊ "म्हणत होते" ते आता त्यांना जास्त कठीण जाईलआणि स्वतःचे घर भरण्यासाठी त्यांना आता मायावतींना डच्चू देणे आवश्यक होईल.
फुलपुर मधिल जागा जर भाजपने खाली केली नाही( केशवप्रसाद मौर्य ना केंद्रात नेऊन तर मायावतींच्या दृष्टीने हा राजकारणाच्या अंताची नांदी ठरू शकेल. (एकंदर त्यांचे राजकारण पहिले तर त्या अशा सहजा सहजी रणांगण सोडतील असे वाटत नाही तरीही)

अनुप ढेरे's picture

27 Jul 2017 - 3:55 pm | अनुप ढेरे

केवळ बिहार नाही तर यु.पी देखील याने प्रभावित होईल. ही दिन राज्य मिळुन १२० सिटा आहेत. यात २०१४मध्ये भाजपाला ~११० सिटा होत्या. या दोन्ही राज्यांत महागठबंधन तयार झालं असतं तर भाजपाला यातील अर्ध्या देखील सिट नसत्या मिळाल्या. यावर्षीदेखील जर मुलायम -मायावती-काँग्रेस युती असती तर भाजपाचा पूर्ण धुव्वा उडाला असता. २०१९ला या दोने राज्यांत विरोधकांची युती होऊ न देणं हे भाजपासाठी पॅरामाऊंट होतं.

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2017 - 6:26 pm | अभिजीत अवलिया

केवळ नितीशकुमारांची नाही तर भाजपाची विश्वासघातकी वृत्ती देखील समोर आली आहे. सत्तेचे लोणी चाखण्यासाठी हा पक्ष देखील कुणाबरोबरही कधीही हातमिळवणी करू शकतो हे पुन्हा एकदा दिसून आले. एकंदरीत आपल्याकडील निवडणुका म्हणजे नालयकांमधील त्यातल्या त्यात कमी नालायकाला मत देणे असे ठाम मत झाले आहे.

अभिदेश's picture

27 Jul 2017 - 9:05 pm | अभिदेश

वर चढण्यासाठी जी शिडी वापरायची ती शिडी वर चढल्यानंतर ढकलून देणे हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे. हे भाजपाने नाही का केले शिवसेने बाबतीत ?

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2017 - 10:26 pm | श्रीगुरुजी

नाही. महाराष्ट्रात शिवसेनेची शिडी वापरून भाजप वर चढलेला नसून शिवसेनाच भाजपच्या शिडीमुळे वर पोहोचली आहे. भाजपने शिवसेनेला खांद्यावर घेतले नसते तर आजतगायत शिवसेनेचे अस्तित्व मुंबई-ठाण्यातील काही प्रभागांच्या पलिकडे गेले नसते.

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2017 - 10:31 pm | श्रीगुरुजी

नाही. महाराष्ट्रात शिवसेनेची शिडी वापरून भाजप वर चढलेला नसून शिवसेनाच भाजपच्या शिडीमुळे वर पोहोचली आहे. भाजपने शिवसेनेला खांद्यावर घेतले नसते तर आजतगायत शिवसेनेचे अस्तित्व मुंबई-ठाण्यातील काही प्रभागांच्या पलिकडे गेले नसते.

अभिदेश's picture

28 Jul 2017 - 1:15 am | अभिदेश

काय अस्तित्व आहे गुर्जी ? प. महाराष्ट्रात ? आयात केलेल्या लोकांना सोडून ?

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2017 - 1:43 pm | श्रीगुरुजी

भाजपशी युती होण्यापूर्वी कोकणात शिवसेनेचे किती अस्तित्व होते? भाजपने कोकणात किंवा प. महाराष्ट्रात किती जणांना आयात केले आहे याची काही आकडेवारी आहे का? तशीच आकडेवारी शिवसेनेने आयात केलेल्यांची सुद्धा दिलीत, तर तुलना करणे सोपे जाईल?

अभिदेश's picture

28 Jul 2017 - 10:09 pm | अभिदेश

धर्तीवर मुंबई, ठाणे , कोकण , मराठवाडा इथे भाजपचे युतीपुर्वी किती अस्तित्व होते?

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2017 - 10:59 pm | श्रीगुरुजी

युतीपूर्वी १९८० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्राच्या विविध भागातून (कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, विदर्भ, मराठवाडा इ.) १२ आमदार निवडून आले होते. हीच संख्या १९८५ मध्ये १६ वर पोहोचली होती. या दोन्ही निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट होती. शिवसेनेच्या स्थापनेपासून १९८५ पर्यंत वेगवेगळ्या ५ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे किती आमदार निवडून आले होते?

अभिदेश's picture

28 Jul 2017 - 11:50 pm | अभिदेश

माहीत नाही कि मुद्दाम दुर्लक्ष करताय माहीत नाही पण १९८५ पूर्वी शिवसेनेने विधानसभा निवडणुका फारश्या गाम्भीर्याने लढवल्या नव्हत्याच. तेव्हा जोर फक्त महापालिका निवडणुकांवरच असायचा. नक्की साल आठवत नाही पण ८४-८५ मध्ये औरंगाबाद मध्ये सुद्धा शिवसेना निवडून आली होती महानगरपालिकेत , मोरेश्वर सावे महापौर झाले होते. तेव्हा तुमचाही म्हणणे की मुंबई , ठाणे सोडून अस्तित्व नव्हते हे चूक आहे. कोकणात पहिल्यापासून शिवसेनेचाच जोर आहे. आता वेगवेगळे लढून सुद्धा शिवसेनेचीच आमदार जास्त आहेत कोकणातून. युतीमुळे दोघांनाही फायदा झाला , हे मान्य करून आता ह्या वादावर पडता टाकूया. तिकडे तुम्ही दुसरा धागा सुरु केलाय ताज्या घडामोडींचा.

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2017 - 12:01 am | श्रीगुरुजी

१९८५ पूर्वी शिवसेनेने विधानसभा निवडणुका फारश्या गाम्भीर्याने लढवल्या नव्हत्या हे अपयश झाकण्याचं कारण झालं. परंतु ते खरे नाही. अगदी १९७८ मध्ये सुद्धा सेनेने विधानसभेला ३५ उमेदवार उभे केले होते. त्या निवडणुकीत जनता पक्ष, इंदिरा काँग्रेस व समाजवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होती. ज्या पक्षाकडे हक्काची मतपेढी आहे अशा चौथ्या पक्षाला तिरंगी लढतीत नक्कीच फायदा व्हायला हवा होता कारण शिवसेनाविरोधी मते ३ वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली होती. निदान सेनेला आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात तरी (म्हणणजे ठाणे-मुंबई आणि कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोकणसुद्धा) काही आमदार निवडून आणता आले असते. प्रत्यक्षात सेनेला त्या निवडणुकीत भोपळा मिळाला. त्यापूर्वीच्या म्हणजे १९६८ व १९७३ च्या आणि १९८० च्या निवडणुकीतही सेनेला भोपळाच होता. १९८५ मध्ये सेनेचा एकमेव उमेदवार निवडून आला होता. हे अगदी स्पष्ट आहे की १९८५ च्या निवडणुकीपर्यंत सेनेला महाराष्ट्रात अत्यल्प जनाधार होता. भाजपचा जनाधार खूप प्रचंड होता अशातला भाग नाही. परंतु भाजपने स्थापनेनंतर अवघ्या दीड महिन्यात १२ आमदार निवडून आणले होते व नंतर ही संख्या १६ वर गेली होती.

अभिदेश's picture

29 Jul 2017 - 1:33 am | अभिदेश

हा जनसंघाचा नवीन अवतार , त्यामुळे तुमच्या परंतु भाजपने स्थापनेनंतर अवघ्या दीड महिन्यात १२ आमदार निवडून आणले होते व नंतर ही संख्या १६ वर गेली होती. , ह्याला काही अर्थ नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे , शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका ह्या गाम्भीर्याने लढवल्या नव्हत्या. नुसते उमेदवार उभे करणे म्हणजे निवडणूक लढवणे नाही. आणि जरा तुमचे तर्कट लावावयाचे म्हटले तर , भाजपाला १६ वरून ४०+ जायला शिवसेनेचीच मदत झाली हे तुम्हाला मान्य करायला का जड जातंय ते मला काळात नाही. जर भाजपाची स्वतःची एवढी ताकद होती तर आधीच त्यानंआ मजल मारता आली पाहिजे होती ,आणि जनसंघ ची पार्श्वभूमी ,रा. स्वयंसेवक संघ पाठीशी असतांना त्यांना शिवसेनेची गरज का लागली ह्या प्रश्नाचे उतार देता येईल का ?

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2017 - 2:41 pm | श्रीगुरुजी

जसा भाजप जनसंघ या रूपात अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता, तशीच शिवसेनाही १९६६ पासून अस्तित्वात होती. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीचे अजिबात वावडे नव्हते. १९६९ मध्ये साम्यवादी आमदार कृष्णा देसाई यांचा खून झाल्यानंतर (या खुनाचा शिवसेनेवरच संशय होता. हा महाराष्ट्रातील पहिला राजकीय खून समजला जातो.) झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केला होता व तो उमेदवार चक्क निवडून आला होता (हे बहुतेक वामनराव महाडीक असावेत). हा शिवसेनेचा महाराष्ट्रातील पहिला आमदार. त्यानंतर आपला दुसरा आमदार निवडून आणण्यासाठी सेनेला तब्बल १९८५ पर्यंत वाट बघावी लागली होती. दरम्यानच्या काळात शिवसेनेने १९७३, १९७८ व १९८० ची निवडणुक लढवून पाहिली. परंतु तिन्ही निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला होता. शिवसेनेने इंदिरा काँग्रेसशी युती करून १९८० च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील २ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. पण ते दोघेही मोठ्या फरकाने पडले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबईत उमेदावार उभे केले होते. नंतर १९८५ च्या विधानसभा निवडणुकीतही सेनेने उमेदवार उभे केले होते. त्यातील फक्त छगन भुजबळ निवडून आले. हा सर्व इतिहास पाहिला तर शिवसेना भाजपबरोबर युती होण्यापूर्वी विधानसभा निवडणुक गांभिर्याने घेत नव्हती हा दावा चुकीचा ठरतो.

जशी भाजपला १६ वरून ४२ वर जायला सेनेची मदत झाली तशीचे सेनेलाही १ वरून ५२ वर जायला भाजपची मदत झाली. सेनेबरोबर युती केल्याने भाजपला २६ जागांचा फायदा झाला तर सेनेला जवळपास दुप्पट म्हणजे ५१ जागांचा फायदा झाला होता. सेनेच्या ५२ जागांमध्ये भाजपकडून हिसकावून घेतलेले काही मतदारसंघ होते (उदा. शिवाजीनगर). हे मतदारसंघ भाजपचे असताना सेनेने दांडगाई करून ते स्वतःच्या खिशात घातले व तिथे भाजपच्या मतांवर आयताच विजय मिळविला. सेनेकडे मात्र स्वतःचा हक्काचा जोपासलेला एकही मतदारसंघ नव्हता. फारतर छगन भुजबळ माझगावमधून (फक्त) एकदाच निवडून आल्याने तो मतदारसंघ आमचाच हक्काचा असे सेना म्हणू शकते. परंतु या व्यतिरिक्त सेनेने जोपासलेला व ज्यात सेना हक्काने विजय मिळवू शकेल असा एकही मतदारसंघ सेनेकडे नव्हता. मुंबई-ठाणे हा आपला बालेकिल्ला या भ्रमात तेव्हा सेना होती व अजूनही तो भ्रम टिकून आहे. परंतु मुंबई-ठाण्यात सेनेचा बालेकिल्ला समजला जाईल असा एकही विधानसभा मतदारसंघ सेनेकडे नव्हता ही वस्तुस्थिती आहे. तशी ही युती दोघांनाही फायदेशीर होती. परंतु युतीचा फायदा भाजपपेक्षा सेनेला खूप जास्त मिळाला. सेनेशी युती झाली नसती तरी भाजपला जवळपास तेवढ्याच जागा मिळाल्या असत्या कारण त्या परिस्थितीत भाजपने १०५ पेक्षा जास्त जागा लढविल्या असत्या आणि मुख्य म्हणजे १९८४ च्या वाताहातीनंतर भाजपने बर्‍यापैकी जनाधार मिळविलेला होता. पण तसे सेनेच्या बाबतीत सांगता येणार नाही.

मूळ मुद्दा असा होता की सेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला का भाजपमुळे महाराष्ट्रात सेना वाढली हे कसे ठरवायचे. याचे उत्तर निर्विवाद असे आहे की भाजपमुळे सेनेची वाढ झाली कारण भाजपला मुंबई-ठाण्यासहीत महाराष्ट्राच्या सर्व भागात थोड्याफार प्रमाणात जनाधार होता व भाजपने तो प्रयत्नपूर्वक वाढवित नेला होता, परंतु सेनेला मुंबई-ठाण्याच्या बाहेर फारसे अस्तित्व नव्हते. हे सिद्ध होण्यासाठी वरील आकडेवारी पुरेशी आहे.

अभिदेश's picture

31 Jul 2017 - 8:32 pm | अभिदेश

तुमच्या प्रतिसादात बरेच विरोधाभास आहेत , आत्ता वेळ नाही जास्त . सविस्तर उत्तर देतो नंतर.

नितीश काय करणार हे मला तीन-चार महिने आधीच माहिती होतं! तीश कुमार भाजपला जाऊन मिळणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती पडले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

हा गौप्यस्फोट की हास्यस्फोट :) ??

नॉस्ट्रडेमसची पण मान खाली गेली असेल आज :))

गॅरी ट्रुमन's picture

27 Jul 2017 - 3:30 pm | गॅरी ट्रुमन

हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती पडले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

कमाल आहे. मग या ३-४ महिन्यात असे होऊ नये यासाठी राहुल गांधींनी नक्की काय प्रयत्न केले? म्हणजे २०१९ साठीची आपली प्रस्तावित आघाडी संकटात पडू शकेल अशी घटना घडणार ही चाहूल आधीपासून लागली असेल तर तसे होऊ नये म्हणून नेत्याने काहीही करायला नको?

अमितदादा's picture

27 Jul 2017 - 3:59 pm | अमितदादा

राहुल गांधी यांचं पुढचं स्टेटमेंट असे असणार
"२०१९ ला मोदींच सरकार येणार हे मला आधीच माहित होत , उमर अब्दुलांचं ट्विट मी वाचलं होत त्यामुळे आम्ही सध्या २०२४ ची तयारी करतोय ".
राहुल गांधी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहेत, साक्षात मोदी जरी काँग्रेस मध्ये आले तरी राहुल गांधींचा नेतृत्वाखाली काँग्रेस जिंकणार नाही.

इरसाल's picture

27 Jul 2017 - 5:42 pm | इरसाल

आजपर्यंतचा सगळ्यात कहर प्रतिसाद आहे.

प्रसाद_१९८२'s picture

27 Jul 2017 - 6:12 pm | प्रसाद_१९८२

मला वाटते आता नविन धागा सुरु करायला हवा.
दोन पाने झाल्यावर, नविन प्रतिसाद शोधायला फारच त्रास होतो.