मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
1 Jul 2017 - 3:42 pm
गाभा: 

मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?

मांजर विशेषत: महिलांचा लाडाचा विषय आहे. मांजराला कवटाळून त्याचे लाड करणाऱ्या मुली पाहिल्या की मांजराचा हेवा वाटतो. पण मांजराच्या केसांमुळे दमा होतो असे ऐकले आहे. मांजराला खूप जास्त चोंबाळले की मांजर पंजा मारते असेदेखील ऐकले आहे.

मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 3:46 pm | मुक्त विहारि

हो आहे...

सतिश पाटील's picture

1 Jul 2017 - 3:54 pm | सतिश पाटील

म्हनुनच मी बोका पाळला आहे. त्याला कितीही चोम्बाळले तरी तो पंजा मारत नाही.
बोक्याला मि कितीही मिठ्या मारू शकतो, विनयभंग केला वेगैरे असे काही आक्षेप तो घेत नाही म्हणून तो मला पंजा मारत नाही.

कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांतील फरक म्हणजे

कुत्रा हा मालक या व्यक्तीला बांधलेला असतो . मालक जाईल ती कडे हा जातो. मागे लागतो

तर

मांजर ही घराला बांधलेली असते. म्हणजे मालक घर रिकामे करुन गेला तरी ही तेथेच राहु शकते/राह्ते मागे लागत नाही.

या वरुनच कुत्रा हा मांजरी पेक्षा का श्रेष्ठ आहे याचा अंदाज यावा

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या हीला कवटाळले की पंजा उगारते.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2017 - 11:07 pm | श्रीगुरुजी

तसं असेल तर तुमच्या हीला 'टाळा', अजिबात 'कवटाळू' नका.

योगी९००'s picture

1 Jul 2017 - 10:30 pm | योगी९००

हहपुवा...

चोंबाळले हा शब्द फार आवडला.

आशु जोग's picture

3 Jul 2017 - 12:18 pm | आशु जोग

या धाग्याला महीलांनी कवटाळले नाही असे म्हणावे का . . .

मांजर फेकल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा मारहाणीत मृत्यू

शेजारच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२) रात्री नऊच्या सुमारास घडली. प्रभा मोहन रणपिसे (वय ४०, रा.म्हाळुंगे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

http://www.loksatta.com/pune-news/women-dies-in-beating-of-neighbor-for-...

उपाशी बोका's picture

6 Jul 2017 - 8:31 am | उपाशी बोका

मांजर कुणाची यावर अवलंबून आहे. ;)

आशु जोग's picture

6 Jul 2017 - 10:37 am | आशु जोग

;)