मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
1 Jul 2017 - 11:13 am
गाभा: 

मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण.
पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?

प्रतिक्रिया

मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का हे तुमच्या पाळण्यावर अवलंबून आहे. लांबी-रुंदी पाहून घ्या. उगाच लहान व्हायला नको. पूर्वी लाकडी मिळायचे. आता स्टीलचे असतात. खाली गादीऐवजी गोणपाट टाका. मांजरपाट ब्येष्ट. एखाद्याला जेवायचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये ही म्हण मांजरांकडे पाहूनच लोकांना सुचली असावी हे शंभर टक्के. थोडक्यात, मांजराच्या जातीला जास्त डोक्यावर घेऊ नये. अजून थोडक्यात म्हणजे फार लाडावून ठेऊ नये. फार पूर्वी एक लाड म्हणून होते इकडे. त्यांची मांजर होती. फार लाडाची होती. गेली बिचारी. असो. शुभेच्छा. मांजरीला.

(रच्याकने, कुत्रा फक्त चिन्यांना चालतो असे वाचले आहे. खरेखोटे नेपाळी जाणोत.)

योगी९००'s picture

1 Jul 2017 - 12:30 pm | योगी९००

खूप छान.... ह.ह.पू.वा.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 12:33 pm | अमरेंद्र बाहुबली

लांबी रुंदी पाहण्याची गरज नाही. तीला एक स्पेश्यल रूमच देऊन टाकतो.

सतिश पाटील's picture

1 Jul 2017 - 12:45 pm | सतिश पाटील

कुत्रा, मांजर, गाय, बैल, घोडा,म्हैस, हे पालीव प्राणी आहेत. हे आम्हाला शाळेत शिकवले होते.

आम्ही बोका पाळला आहे. आता त्याने त्याच्या गर्ल्फ्रेंडला पण घेउन आला, अणि तिला ३ पिल्लै पण झाली.
पहिल्या मजल्यावरचा छोटा बोकाही आमच्याचकड़े पडीक असतो. एकुण ६ मांजरी अणि आम्ही घरातले ५ जण सगले सुखात आहोत.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली

पण आमच्या कडे शेजारी पाजारी देखील मांजरीकडे अशे बघतात जसा साप बघताय.

खेडूत's picture

1 Jul 2017 - 1:34 pm | खेडूत

का ब्वा! ती चालत नाही का? सरपटते की काय? की धुळ्यात इतर मांजरेच नाहीत?
मांजरीचा फोटू पाहयला आवडेल. कदाचित ती काळी, गूढकथेतल्यासारखी दिसत असेल!
फोटू टाकायची पाककृती इथे आहे.

आपल्या पालकांच्या सल्ल्याने मांजरी पाळावी. त्यांना कुत्रे चालत असेल तर कुत्रे आणावे. काय त्यात येव्हढे नाही का?
आईवडिलांच मन कद्धी मोडू नये.
.

माझ्या एका मित्राची आठवण झाली. म्हणजे तो मांजर नाहीय, पण त्याला मांजरे आवडतात फारच. आम्ही आभ्यासाला त्याच्या घरी गेलो की मांजर मधे मधे येत असे. आम्हाला आमच्या पुस्तकांची काळजी वाटे..मांजराचा काय नेम नाही का? त्यामुळे अभ्यासापेक्षा मांजर घाण करणार नाही ना? त्याचे केस श्वासातून जाऊन काय आजार होईल? असले प्रश्न पडत. त्यात मांजर बराच वेळ दिसली नाही तर हा मित्र 'आमची ही' कुठेय बघून येतो म्हणून तासभर गायब होई. त्यामुळे आम्ही त्याला बोक्या म्हणत असू.म्हणजे आज इतका मोठा झालाय तरी म्हणतो. अशी आहे सगळी मांजरांची गंमत! तुमच्या मांजरीलाही दुधाची वाटी गच्च भरून शुभेच्छा!

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2017 - 12:06 pm | अमरेंद्र बाहुबली

.
हीच ती मुकी बिचारी.

दीपक११७७'s picture

1 Jul 2017 - 2:22 pm | दीपक११७७

कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांतील फरक म्हणजे

कुत्रा हा मालक या व्यक्तीला बांधलेला असतो . मालक जाईल ती कडे हा जातो. मागे लागतो

तर

मांजर ही घराला बांधलेली असते. म्हणजे मालक घर रिकामे करुन गेला तरी ही तेथेच राहु शकते/राह्ते मागे लागत नाही.

या वरुनच कुत्रा हा मांजरी पेक्षा का श्रेष्ठ आहे याचा अंदाज यावा

भारी निरिक्षण आहे.

आधुनिक भाषेत

कुत्रा हा मालक या व्यक्तीला बांधलेला असतो . मालक जाईल ती कडे हा जातो. मागे लागतो

कुत्र्याला मॅनेजरचा लळा असतो. जिकडे मॅनेजर जाईल तिकडे जातो.

मांजर ही घराला बांधलेली असते. म्हणजे मालक घर रिकामे करुन गेला तरी ही तेथेच राहु शकते/राह्ते मागे लागत नाही.

मांजराला कंपणीचा लळा असतो. मॅनेजर जरी सोडुन गेला तरी मांजर कंपनीतच राहते.

त्याचं कसंय, ते म्हणतात ना....शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात..
तसंच आम्ही म्हणतो...प्राणी पाळावे पण ते शेजारच्या घरात!!
दुसऱ्याने पाळलेले प्राणी बघायला मला फार आवडतात.....

त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे...
मांजर हा मी पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
उत्तर : नाही

मांजर हा तुम्ही पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
उत्तर: हो !! (मुंगीपासून ते डायनासोर(शाकाहारी) पर्यंत हेच उत्तर असेल)

मांजर हे समोर दिसले तर लाथ घालण्यायोग्य प्राणि आहे,
कपाउंडवर बसलेले असले तर ढकलून देण्यायोग्य प्राणि आहे.
त्याच्यामागे ताणा काढून पळवण्यागोग्य प्राणि आहे.
हातात येईल ते फेकून मारण्यायोग्य प्राणि आहे.
.
एकूणच ह्या सगळ्या गोष्टीत लै मज्जा येत असल्याने मांजर टाइमपास प्राणी आहे.

उगा काहितरीच's picture

1 Jul 2017 - 4:08 pm | उगा काहितरीच

:D :D :D लै वेळा सहमत .

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2017 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्यात ती मांजर शेजार्‍याची असेल तर शेजार्‍याच्या समोर त्या मांजरड्याच्या कंबरड्यात लाथ घालायला अजूनच मज्जा येते.
आणि शेजारणीची असेल तर?..... तरीसुध्दा....
पैजारबुवा,

जेनी...'s picture

1 Jul 2017 - 4:37 pm | जेनी...

काय हे !! :(

मांजर पण एक जीव आहे ... त्याला इतकं वाइट नसतं वागवायचं ...

मांजर कवटाळन्यायोग्य प्राणी आहे...
खेळवण्यायोग्य प्राणी आहे..
खांद्यावर बसवुन फिरवण्यायोग्य प्राणी आहे...
हातात घेवुण गोंजारण्यायोग्य प्राणी आहे ...

पैबु काका तुमच्याकडुन हि अपेक्षा नव्हती :-/

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 7:58 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत

घरात एकमत नसेल तर दानधर्म,उपवास,देवदेव,प्राणी पाळणे काही करू नये.

ह्या लिस्टीत लग्न पण अ‍ॅड करा. ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली

तीचा लळा लागल्याने सर्वांची नाराजी ओढवून पाळणे सुरू आहे. पण मांजर लाथ घालण्या योग्य प्राणी आहे. हे काही पटले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली

आणी मांजरीच्या केसाने दमा होतो. असं ही काही जण सुनावून गेलेय खरय का?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 3:01 pm | अमरेंद्र बाहुबली

आणी मांजरीच्या केसाने दमा होतो. असं ही काही जण सुनावून गेलेय खरय का?

सतिश पाटील's picture

1 Jul 2017 - 3:49 pm | सतिश पाटील

आणी मांजरीच्या केसाने दमा होतो. असं ही काही जण सुनावून गेलेय खरय का?

मी लहान असल्यापासून आमच्या घरात मांजर आहे. पण तिच्या केसामुले आम्हाला कधीच दमा झाला नाही. फक्त जास्त वेळ क्रिकेट खेळल्याने दम लागतो. आमच्या मांजरना आम्ही चांगल्या प्रतीच्या शिकेकाई ने अंघोळ घालतो, त्यामुले त्यांचे केस गळत नाहीत.
मी लहान असल्यापासूनच दम मारत आहे.

तुमच्या प्रतिसाद " दम दमा दम " आहे

कौतुकास्पद आहे !

दशानन's picture

1 Jul 2017 - 3:10 pm | दशानन

तुम्ही सरळ वाघ पाळा!
नंतर सर्व शांत शांत होईल व असले प्रश्न देखील पडणार नाहीत ;)

धर्मराजमुटके's picture

1 Jul 2017 - 3:28 pm | धर्मराजमुटके

जीएसटीमुळे मांजर पाळणे महाग होणार की स्वस्त ह्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा.
आमच्या समोरच्या अब्दुलमियांकडच्या मांजरीने १०० चुहे खाल्ले नंतर ती हज ला गेली.

तुम्हाला घरात पाहुणे यावेसे वाटत नसतील तर कुत्रा पाळा.
तुमचे शेजारी मोठ्या आवाजात टिव्ही , टेप लावत असतील तर कुत्रा पाळा.

नोकरीत यशस्वी व्हायचे असेल तर मांजर पाळा.
लाळघोटेपणा कसा ककरावाहे शिकायला याच्यासारखा चांगला प्राणी नाही.
गर्लफ्रेंड पाळायच्या वयात असेल तर मांजर पाळा. 'हव्वे तेवढे लाड करुन घ्यायचे पण वेळ आल्यास नख्या काढायच्या' हे सहन करण्याची शक्ती तुमच्या अंगी येईल.

कृपया प्राणीप्रेमी / स्त्रीवादी संघटनांनी घरावर मोर्चा आणू नये. आम्ही बिल्डींगच्या टॉप फ्लोअरवर राहतो. आमची लिफ्ट चालू असतांनाच कधेमधे अचानक बंद पडते. ती जेव्हा चालू असते तेव्हा बर्‍याचवेळा एमेशिबीवाले लाईट बंद करुन वीज वाचविण्याचे धडे देत असतात.

:)

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 3:39 pm | मुक्त विहारि

मांजर जरूर पाळा.

शेतघरात, मांजर (साप. पाली, झुरळे, उंदीर आणि घूशी मारायला.), कूत्रा (कुठल्याही संकटाची चाहूल ह्यांना फार लवकर लागते आणि अतिशय प्रेम करतात.), कोंबडी (विंचवांना अजिबात घरात येवू देत नाहीत.शिवाय अंडी फूकट.पालन-पोषण पण फूकटच.शेतभर बागडतात.शेतातील किडे खातात.) हे हवेतच.

प्रसाद_१९८२'s picture

1 Jul 2017 - 4:25 pm | प्रसाद_१९८२

कोंबडी (विंचवांना अजिबात घरात येवू देत नाहीत.शिवाय अंडी फूकट.पालन-पोषण पण फूकटच.शेतभर बागडतात.शेतातील किडे खातात.) हे हवेतच.

----

बाकि कोंबडी पाळल्याने इतक सगळ फुकट मिळत असले तरी,
एक कोंबडी पाळायला 'शेत' विकत घेणे हे फारच खर्चिक काम आहे असे वाटते.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 4:39 pm | मुक्त विहारि

शेतघर असेल तर....

कोंबडी पाळन्यासाठी शेत विकत घ्या, असा प्रतिसादाचा रोख नाही.

दीपक११७७'s picture

1 Jul 2017 - 5:05 pm | दीपक११७७

कोंबडी मुळे विंचवां पासुन सुटका झाली तरी, बिबट्या अणि तत्सम प्राण्यांना आमंत्रण सुध्दा दिल्या जाते. असो.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 12:33 am | मुक्त विहारि

रात्री त्यांना घरात घ्यायचे...

बादवे,

माणसांपेक्षा नतद्रष्ट प्राणी कुठलाही नाही. माकडे अद्यापही अणूबाँब बनवू शकली नाहीत हे आपले नशीब. माणसा नंतर दुसरा नंबर माकडांचाच.

सस्नेह's picture

3 Jul 2017 - 12:49 pm | सस्नेह


माणसांपेक्षा नतद्रष्ट प्राणी कुठलाही नाही.


... हजार नव्हे, करोडो वेळा सहमत !
प्लॅस्टिकच्या कचर्यापासून अन्तरिक्षातील इलेक्ट्रॉनिक कचर्‍यापर्यंत सगळीकडे कचरा करणारा एकेमेव प्राणी म्हणजे माणूस !!

ज्योति अळवणी's picture

1 Jul 2017 - 9:22 pm | ज्योति अळवणी

मांजरामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. आमच्याकडे 3 मांजरी होत्या आणि माझ्या भावाला झाला होता लहानपणी. तरीही हौस असली तर पाळा. कारण मांजराच काही करावं लागतं नाही. त्याला दूध खाणं नाही दिलत तरी ते आपली सोय करत कशीही

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2017 - 11:26 pm | श्रीगुरुजी

गेल्या २-३ महिन्यांपासून रोज रात्री २ मांजरांचा ऐकू येत असलेला संवाद -

मांजर १ - म्यॅव
मांजर २ - म्यॅव

मांजर १ - म्यॅS
मांजर २ - म्यॅS

मांजर १ - म्यॅSSS
मांजर २ - म्यॅSSS

मांजर १ - म्यॅSSSSSSSSSSSSSSS
मांजर २ - म्यॅSSSSSSSSSSSSSSS

मांजर १ - म्यॅSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
मांजर २ - म्यॅSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

नंतर एकत्रित आवाज म्यॅव ... फिस ... फिस ... फिसफिसफिसफिस . . . . .@*&^%$# *&^%%@@@)० . . . जोरदार झटापटीचे आवाज ......

काही क्षणानंतर एक मांजर जीव खाऊन पळून जात असल्याचा आणि दुसरे त्याचा पाठलाग करीत असल्याचा आवाज आणि ५-६ सेकंदानंतर शांतता!

मांजर दिसले की लगेच हात दगड उचलायला खाली जातो. हात खाली जाताना दिसल्याक्षणीच मांजर जीव खाऊन पळून जाते. गच्चीतून पाहत असताना मांजर दिसले तरी गच्चीत फेकण्याजोगे जे काही सापडेल ते मी मांजराच्या दिशेने फेकतो. अहिंसक वृत्ती असल्याने फेकताना ती वस्तू मांजराला न लागता बाजूच्या जमिनीवर आपटून जोरात आवाज व्हावा व त्या आवाजाने मांजर पळून जावे ही इच्छा असते. जमिनीवर वस्तू आपटल्या क्षणी आलेल्या आवाजाने मांजराला पळता भुई थोडी होते. काही वेळा गच्चीत उभे असताना खाली दोन मांजरे समोरासमोर उभे राहून एकमेकांना आव्हान देत असतात. मी लगेच घरात जाऊन एका छोट्या पेल्यात पाणी आणून वरून त्यांच्यावर टाकतो. पाणी पडताक्षणी दोन्ही मांजरे विरूद्ध दिशेला पळून जातात.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 11:37 pm | अमरेंद्र बाहुबली

श्री गुरूजी तुमच म्हणजे "मेरे देश की धरती मांजर म्याव म्याव करती." अस झालं. ( हा हा हा! मला पण मिपा च पाणी लागल.)

मला वाटले आपले श्री गुरुजी मोदीकाकांच्या नजरेतून बिहारचे वर्णन करतेत का काय ;)

अनुप ढेरे's picture

3 Jul 2017 - 11:33 am | अनुप ढेरे

हा हा हा. एकदम चपखल!

अभिजीत अवलिया's picture

2 Jul 2017 - 7:56 am | अभिजीत अवलिया

मांजरे विनाकारण एखाद्याला छळतात का?
आमच्या सोसायटीत एक मांजर आहे. मी रात्री कितीही वाजता आॅफीसमधून घरी आलो तरी ते मांजर जिन्यात वाट बघत बसायचे आणि माझ्या मागोमाग येऊन घरात घुसायचा प्रयत्न करायचे.जवळपास ६ महिने त्रास दिल्यावर आता तसे करत नाही ते पण आता माझ्या दुचाकीच्या सीटवर सगळीकडे मांजराचे पाय उमटलेले दिसतात खूपदा. त्याच मांजराचे असावेत असा माझा अंदाज.

माणसांशिवाय, कुठलाही प्राणी, (तो पिसाळला नसेल तर), शक्यतो उगाच दुसर्‍याला त्रास देत नाही.माणसे मात्र हकनाक त्रास देतात, विशेषतः झूंड असेल तर जास्तच.

अभिजीत अवलिया's picture

3 Jul 2017 - 10:59 am | अभिजीत अवलिया

तुमचा प्रतिसाद त्या मांजराला तसेच विनाकारण एखादे कुत्रे भुंकत मागे लागते तेव्हा त्या कुत्र्यास वाचायला देतो.

गाडीच्या सीटला / टाकीला ओरखडे पडले आहेत का..?

अभिजीत अवलिया's picture

3 Jul 2017 - 2:18 pm | अभिजीत अवलिया

अजूनपर्यंत तरी नाही. पण रोज जवळपास निम्म्या सीटवर मातीने भरलेले पाय उठवलेले असतात. गिअरलेस स्कूटर असल्याने टाकी सीटखाली आहे.

ओरखडे पडले की हा धागा वाचा - उपाय सुचवाल ?

आणि रामदास काकांचा हा प्रतिसाद आत्ता वाचला तरी चालेल.

सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका.

अभिजीत अवलिया's picture

3 Jul 2017 - 3:10 pm | अभिजीत अवलिया

:-D

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 10:32 am | जेम्स वांड

मांजर एकंदरीत अतिशय हलकट हरामखोर प्राणी असून त्याला बडवायच्या किंवा पोत्यात घालून बुडवायच्याच लायकीचा तो असतो, हे आमचे बालपणीचे मत अजून अबाधित आहे, त्यामुळे आम्ही पुढे बोलावे असे काही ह्या धाग्यावर नसावे

दीपक११७७'s picture

2 Jul 2017 - 12:19 pm | दीपक११७७

मांजर मारल्याने सोन्या/चांदी ची मांजर वाहत्या पाण्यात सोडावी लागते म्हणे म्हणुन मांजर मारत नाही
तसेच कुत्राही मारत नाही, एकंदर कुठलीही हिंसा करत नाही, तरी आजारचे-शेजारचे ,"कशाला कुत्रे मारत फिरतो?" असे विचारायचे.

बादवे,

हिंसाचार कधिही वाईटच, अणूबाँब बनवणे हे तर त्या पेक्षाही वाईट

लोकांनी मला कितीही हिनवलं की तुला अणूबाँब बनवता येत नाही तु माकडं आहेस तरी चालेल पण मी अणूबाँब बनवणार नाही.

:-D :-D :-D :-D :-D

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 12:41 pm | जेम्स वांड

तसं पाहता हा धागासुद्धा फालतू चारोळी पिंका ह्याच सदरात मोडतो.

मदनबाण's picture

2 Jul 2017 - 5:39 pm | मदनबाण

मांजरं एक नंबर ची लबाड्ड असत्यात... ;)
येउन जाउन बारीक लक्ष ठेवून असत्यात ! ;)
येडा बनुन खवा खाण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकत नाही ! ;)

[बोका] ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 11:04 pm | जेम्स वांड

असे वाटणाऱ्या सगळ्यांनाच हा व्हिडीओ समर्पित

प्रसाद_१९८२'s picture

3 Jul 2017 - 10:49 am | प्रसाद_१९८२

मांजराला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने महिलेची हत्या
http://abpmajha.abplive.in/pune/pimpari-woman-allegedly-killed-for-askin...

मांजर पाळण्यापेक्षा श्रावण पाळा म्हणजे निदान पुण्य तरी लाभेल. श्रावणात उपास-तापास शक्य नसल्यास आणि नॉनव्हेज न खाता राहू शकत नसल्यास एखादा बोका पाळून त्याचेच नाव 'श्रावण' ठेवा. म्हणजे सांगता येईल कि आम्ही बारा महिने श्रावण पाळतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2017 - 1:50 am | अमरेंद्र बाहुबली

मि तसं करू शकतत नाही. कारण बाजूलाच श्रावण काका रहातात..

सध्या आहेत का हो तुमच्याकडे मांजरी?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2023 - 7:25 pm | अमरेंद्र बाहुबली

हो. वर ऊल्लेखलेल्या मांजरीची आठवी दहावी पिढी असेल.

मूकवाचक's picture

2 Sep 2023 - 9:04 pm | मूकवाचक

मांजर वृत्तीने घरातल्या लोकांशी लाडीगोडी करणारा, लळा लावणारा आणि तरीही स्वातंत्र्यप्रिय, खेळकर प्राणी आहे.

देशी मांजर पाळताना फारशी जिकीर नसते. वर्षातून एकदा लसीकरण करून घ्यावे लागते.

पर्शियन मांजर असेल तर ८-१० दिवसांनी आंघोळ घालण्याची आणि combing करण्याची जबाबदारी वाढते.

देशी मांजराला Cat food ची सवय विचारपूर्वक लावावी कारण ती कायमची जबाबदारी पत्करावी लागते.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2023 - 9:13 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत. मांजराचे वैशिष्ट्य म्हणजे बाधून ठेवावे लागत नाही, घाण करत नाही, चावत तर आजिबात नाही. पण माणसाळल्यामूळे स्वसंरक्शन विसरते नी रस्त्यावरील कूत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडते.

मांजर दुसऱ्या कुणाला त्रास देत नाही.

>>रस्त्यावरील कूत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडते.>>
कारण ? कुत्रे उगाचच मांजरांना मारत नाहीत. कचऱ्यात कुणी मासळी साफ केलेली पुडी टाकली असेल तर मांजर ते खायला जाते. ते पाहून तिथले कुत्रे येऊन मांजराला मारतात आणि स्वतःही ती मासळीची पुडी उलगडून खात नाहीत.