कॅब व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
27 Jun 2017 - 12:19 pm
गाभा: 

एक कॅब विकत घेऊन आणि एक चालक अपॉईंट करुन ओला किंवा उबेर या कंपन्यांच्या कॅब नेटवर्कशी जोडून घेता येते.
चालकाला प्रति फेरी प्रमाणे किंवा महिन्याचे/ आठवड्याचे पैसे देऊन कॅब मार्फत उत्पन्न मिळवता येते.
एवढेच माहिती आहे. या बिझनेस मॉडेलची संपूर्ण माहिती, या धंद्यातील खाचाखोचा, धोके, द्यावा लागणारा वेळ , नोकरी करुन हा व्यवसाय करण्यातील अडचणी इत्यादी गोष्टींची महिती हवी आहे.
ओला च्या कार्यालयात जाऊन प्राथमिक माहिती, कागद पत्रे वगैरे विचारायचे आहेच. पण न दिसणारे धोके वगैरे बाबी पण जाणून घ्यायची इच्छा आहे.

शिवाय जर जुस्त दायल ला फोन केला आणि कॅब हवी असे सांगितले तर नंतर ५ मिनिटात लोकल कॅब सर्व्हिस वाल्या वेंडरचे अनेक फोन येतात.
ते बिझनेस मॉडेल पण जाणून घ्यायचे आहे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

या धंद्यात खूप उशिरा एन्ट्री मारत आहात. चोथा झाला आहे या लाईनचा.

तरी कॅब धंदा स्वतः केला तर तर फायदा आहे. ड्राइवर स्वतःच्या घरातला/जवळचा विश्वासू नातेवाईक असला पाहिजे.

बाकी तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..!!

अप्पा जोगळेकर's picture

27 Jun 2017 - 12:53 pm | अप्पा जोगळेकर

मी कोणत्याच धंद्यात एन्ट्री मारण्याचा निर्णय घेतला नाही अजून. वेगवेगळी बिझनेस मॉडेल तपासून पाहात आहे.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jun 2017 - 12:54 pm | अप्पा जोगळेकर

ड्राइवर स्वतःच्या घरातला/जवळचा विश्वासू नातेवाईक असला पाहिजे.
हे खरे आहे. पण असे कोणी मिळेल याची शाश्वती नाही.

रघुनाथ.केरकर's picture

27 Jun 2017 - 6:03 pm | रघुनाथ.केरकर

खरच चोथा झाला आहे.

Rahul D's picture

27 Jun 2017 - 6:35 pm | Rahul D

धंदा स्वतः केला तर तर फायदा आहे. ड्राइवर स्वतःच्या घरातला/जवळचा विश्वासू नातेवाईक असला पाहिजे.

सतिश पाटील's picture

27 Jun 2017 - 1:08 pm | सतिश पाटील

अप्पासाहेब ....

तुमच्यासारखाच मी सुद्धा नोकरी करुण या व्यवसायात आहे.
सविस्तार प्रतिक्रिया लवकरच देईन.

सतिश पाटील's picture

28 Jun 2017 - 12:47 pm | सतिश पाटील

मी अणि माझ्या एका मित्राने भागीदारी करुण या व्यवसायात येण्याचे ठरवले.

पण त्याधिचा फ्ल्याश्बैक असा होता की, मला घरगुती वापरासाठी एखादी २हैण्ड ४ चाकी घ्यायची होती. बजेट होते २.५ लाख डिजेल गाडीसाठी. गाडीचा वापर शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी, गावाला जाण्यासाठी व शहराबाहेर भटकंतीसाठी. रोज ऑफिससाठी ८० km शहरात चालावंने मला संयुक्तिक वाटत नाही. त्यासाठी माझ्याकडे दुचाकी आहे.

याच दरम्यान मित्राने मला भागिदारित हा व्यवसाय करण्याची कल्पना दिली. म्हणजे एक कमाई देखील होइल आणि जेव्हा मला गरज असेल तेव्हा ती गाडी वापरता देखील येइल अणि मुख्य म्हणजे माझे २.५ ते ३ लाख देखील वाचतील.

म्हणून आम्ही ८ लाखाची डिजेल गाडी घेतली. त्यासाठी ४ लाखाचे क्याश्मधे डाउनपेमेंट त्याने केले आणि उरलेले ४ लाख मि ब्यांकेकडून कर्ज घेतले. गेल्याच वर्षी घरासाठी कर्ज घेतले आहे तरी त्यानी मला पुन्हा गाडीसाठी कर्ज दिले. ही सगळी सेटिंग ओलावाले करुण देतात.
गाडी आणि ओलाचे परवाना माझ्या नावावर होता. गाडीचे कर्ज ४ वर्षांसाठी होते.
गाडी तो ड्रायवर म्हणून चालवणार होता, महिन्याचे जी काही मिळकत होईल त्यातून आधी ओलाचे कमीशन, नंतर गाडीचा हप्ता, नंतर डिजेल्चा खर्च, नंतर ड्रायवरच पगार ( ड्रायवरचा पगार हा प्रत्येक ट्रिप मागे १०० रूपये म्हणजे १० ट्रिप दिवसाला केल्या तर १००० रुपये ) , नंतर उरलेल्या फायद्यातुन ५०- ५० टक्के विभागणी अशी योजना होती. जो पर्यंत गाडीचे कर्ज आहे तो पर्यंत गाडी माझ्या नावावर त्यानंतर ती त्या मित्राच्या नावावर करायची आणि त्यानंतर देखील व्यवसाय आधी सारखाच चालू राहिल अणि मलाही गरजेला गाडी वापरता येइल.

वरकरणी हे खुप सोपे वाटत होते. कारण ड्रायवरनेच यामधे अर्धी गुंतवनुक केल्यामुले तो पलुन जाण्याचा प्रश्नच न्हवता व गाडीदेखील माझ्याच नावावर होती त्यामुळ धोका तसा कमीच होता.

त्यानंतर

गाडी जेव्हा प्रत्यक्ष धन्ध्याला लागुन २- ३ महीने गेले तेव्हा खालील गोष्टी लक्ष्यात आल्या.

तुम्ही कितीही वेळ गाडी चालवली तरी तुम्हाला ८-१० भाडीच मिळतील. १० भाड्यासाठी १२ ते १३ तास लागतात.
दिवसाची कमाई २५०० हजार रुपयांच्या वर जाणारच नाही. कितीही घासा
एका भाड्यात तुमची कमाई ओलाचे कमीशन देऊन २५० ते २७० रुपये.
म्हणजे १० भाडी गुणिले २५० रुपये = २५०० रुपये दिवसाची कमाई.
आता यातून वजाबाकी पहा कशी आहे.

दिवसाच्या २५०० रुपयात ड्रायवरने १० भाडी मारली आहेत, म्हणून त्याचे एक ट्रिपचे १०० रुपये या प्रमाणे दिवसाचे १००० गेले.
उरले १५०० रूपए. त्यातून ५०० रुपयाचे डिजेल वजा करा. उरले १००० रुपये.
रोजचे १००० रुपये या प्रमाणे गाडी महिन्यातून २६ दिवस जरी चालली तरी झाले २६००० रुपये.
आता त्यातून गाडीचा हफ्ता १३००० रुपये वजा केले, मग उरले १३००० रुपये .
१३ हजारात त्याला अणि मला २ हिस्से. 1 हिस्सा ६५०० रुपये.

म्हणजे ड्रायवरला मिळालेली कमाई पहा - एक ट्रिपचे १०० रुपये गुणिले रोजचे १० भाड़े = १००० रुपये गुणिले महिन्याचे २६ दिवस = २६००० रुपये अधिक उरलेल्या फायद्यातुन ६५०० रुपये = ३२५०० रुपये
अणि मला मिळाले ६५०० रुपये तेही ४ लाख रुपये गाडीत गुंतवून. गाडीचा इन्शुरन्स , टैक्स, अणि मेंटेनन्स हे अजुन पकडले नाही.

प्रत्यक्षात ४ महिन्यात मला एकही रूपया कमाई झाली नाही. कारण आमचा ड्रायवर + भागीदार त्याचे राजेशाही थाट आहेत. मनाला येइल तरच गाडी काढतो. आज ६ वा दिवस आहे गाडी त्याच्या दारातच उभी आहे. तो खिशातून गाडीचे पेशे भरतोय.
तलवार आणि कंदील घेउन फिरलो तरी ड्रायवर मिळत नाही ही वस्तुस्थिति आहे.

आज जर तुम्ही या ओलावाल्यान्कडे पहाल तर तुम्हाला लक्षात येइल की ते ड्रायवर नाहीत तर मालक आहेत. सुरुवातील २८-३० हजार महिना कमवून सर्व ड्रायवर लोकांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या आहेत. तुम्ही स्वतः गाडी चालवणार असाल तरच विचार करा.

आता मी हे माझ्या गाडीचे उरलेले कर्ज त्याच्या नावावर करतोय. कर्ज पण तूच फेड अणि गाडीपण तूच ठेव अणि जेव्हा वाटेल तेव्हा धंधा कर.
४ महिन्यात मला आर्थिक फायदा किंवा नुक्सान काहीच झाले नाही परंतु डोक्याला फुकटचा ताप खुप झाला.
बाकी उबेरबद्द्ल मला माहित नाही अणि त्यात आता रसही नाही.

जाता जाता- २ ते २.५ लाखापर्यंत डिजेल गाडी घ्यायची आहे.. कमी मेंटेनन्स असलेली. मिपा परिवारात कुणाला विकायची असल्यास जरुर सांगा. व्यनी करा.
नवी मुंबईत राहतो मी.

विशुमित's picture

28 Jun 2017 - 12:58 pm | विशुमित

ड्राइवर स्वतःच्या घरातला/जवळचा विश्वासू नातेवाईक असला पाहिजे.

== तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मी "जवळचा विश्वासू नातेवाईक" या तिन्ही शब्दांना माझ्या प्रतिसादातून हटावतो.

अप्पा जोगळेकर's picture

28 Jun 2017 - 1:48 pm | अप्पा जोगळेकर

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

27 Jun 2017 - 1:41 pm | अभिजीत अवलिया

एक कॅब विकत घेऊन आणि एक चालक अपॉईंट करुन ओला किंवा उबेर या कंपन्यांच्या कॅब नेटवर्कशी जोडून घेता येते.

--> मुंबई वगळून अन्य कोणत्याही शहरात ओला/उबरला ह्या क्षणापर्यंत तरी RTO ची परवानगी नाही. पण लवकरच मिळेल असे वाटतेय.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jun 2017 - 4:18 pm | अप्पा जोगळेकर

रिअली ? जरा तपशील वार लिहिता का. म्हणजे इतके चालक, मालक आणि ग्राहक बेकायदेशीर वाहतूक करत आहेत का.
विस्कटून सांगा जरा.
सतिश पाटील साहेबांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

अभिजीत अवलिया's picture

28 Jun 2017 - 10:20 am | अभिजीत अवलिया

http://www.esakal.com/pune/rto-ready-give-license-ola-and-uber-14210

वरील बातमी ऑक्टोबर २०१६ ची आहे. तसेच काही दिवसांपूर्वी लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती. त्यात हे नमूद केले होते की ओला/उबरला अजूनपर्यंत मुंबई वगळून महाराष्ट्रात अन्य कोणत्याही शहरात परवानगी नाही पण सरकार लवकरच देण्याच्या तयारीत असून त्यासाठी नियमावली तयार केली जात आहे. पण लवकरच म्हणजे कधी ते आपण सांगू शकत नाही. कारण 'सरकारी काम आणि ६ महिने थांब' ही म्हण भारतात काही नवी नाही.

अभिजीत अवलिया's picture

30 Jun 2017 - 7:06 am | अभिजीत अवलिया

आप्पा,
आजचा लोकसत्ता (पुणे) वाचा.
(प्रवाशांच्या अडवणुकीवर ओला उबरचा उतारा ही बातमी पूर्ण वाचा.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 3:52 pm | धर्मराजमुटके

चांगला धागा ! लक्ष ठेऊन आहे. जीएसटीत धंदा नाही चालला तर कार चालवायला मदत होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2017 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

युटयुब वर ओला आणी उबेर चालकांचे काही फिडब्याक आहेत ते एकदा ऐकुन घ्या.

त्याच्या म्हणण्यानुसार, दूरचे भाडे असेल तर आणि स्वतःची गाडी असेल तर आणि घरचा ड्राव्हर असेल, तर आणि तरच हा व्यवसाय परवडतो.

रिस्क फॅक्टर कमी होतो.

मागच्या शुक्रवारी कॅबवाल्या साहेबांनी कॅबमध्ये बसल्या बसल्या पहिल्यांदाच विचारले की ओलामनी आहे की कॅश आहे. कारण विचारल्यावर म्हणाले की ओलामनी मधून कंपनीकडे जाणारे पैसे अनेक प्रकारच्या चाळण्या लाऊन; कट होऊन यांच्याकडे परत येतात.

हा नक्की काय प्रकार असतो..? ताबडतोब मिळणारी कॅश आणि [भाडे वजा (कंपनीचे कमीशन+गाडीला ओलाकडून झालेला दंड)] यापेक्षा वेगळा कांही प्रकार आहे का..?

गॅरी ट्रुमन's picture

27 Jun 2017 - 9:39 pm | गॅरी ट्रुमन

काही दिवसांपूर्वी उबरने प्रवास केला. काही ड्रायव्हर बोलके असतात त्याप्रमाणे तो ड्रायव्हर बोलका निघाला. त्याने काहीकाही गोष्टी सांगितल्या त्या खर्‍या असतील तर बाहेरचा ड्रायव्हर ठेवून गाडी उबरला लावणे हा एक तापदायक प्रकार असेल. सुरवातीला कंपनीने अगदी तोट्यात जाऊन गाडी मालकांना भरपूर पैसे दिले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून कंपनीने पैशाचे प्रमाण कमी केले आहे. तसेच (मुंबईत) एका ट्रिपचे १०० रूपये ड्रायव्हरना दिले जातात. अंतर कितीही असले तरी. त्यातून होत असे आहे की ड्रायव्हरचे पैसे, इंधन, मेन्टेनन्स, इन्शुरन्स इत्यादी खर्च वजा जाता गाडी मालकाला फार मिळत नाही. अर्थात माझ्या माहितीचा स्त्रोत तो उबरचा ड्रायव्हर आहे. खरेखोटे माहित नाही.

मी उबरने बराच प्रवास करत आलेलो आहे. असे जाणवते की आता कंपनीने दर बर्‍यापैकी वाढवले आहेत. विशेषतः २०१५ च्या शेवटी किंवा २०१६ पेक्षा सध्या तेवढ्याच अंतरासाठी जास्त पैसे भरावे लागतात. पूर्वी पेटीएमवरही बर्‍याच उबरच्या डिल्स असायच्या. त्या आता नाहीत. बहुदा आता उबरचा वापर कमी करावा लागणार असे दिसते.

दशानन's picture

27 Jun 2017 - 9:45 pm | दशानन

थोडी जाहिरात करून घेतो ;)
पुणे-मुंबईसाठी गाडी हवी असेल तर संपर्क करा :P

"आम्ही मिपाकर आहोत आणि मिपाकरांना सूट देखील देतो"
:D

मुक्त विहारि's picture

27 Jun 2017 - 9:49 pm | मुक्त विहारि

नोटेड

अमर विश्वास's picture

28 Jun 2017 - 2:53 pm | अमर विश्वास

एक पर्याय आहे ..
ओला / उबेर ऐवजी गाडी कंपनीला लावायची ...

अनेक IT कंपन्या तसेच कॉल सेंटर्स यांना कॅब सर्व्हिस असते. ही सर्व्हिस "सबकॉन्ट्रॅक्टर" चालवतो. अशा ट्रॅव्हल कंपन्यांना गाडी भाड्याने लावणे हा उत्तम पर्याय आहे

इथे पण ड्राइवर स्वतः पाहिजे तरच परवडते. आणि कंपन्या/काँट्रॅक्टर्स वर्किंग कॅपिटलच्या सबबी सांगून वेळेवर पेयमेंट्स करत नाहीत. पण कर्जाचा हफ्ता चुकणार आहे का ?

सतिश पाटील's picture

28 Jun 2017 - 3:53 pm | सतिश पाटील

नोकरी करता करता गाड्याचा धंधा करने तेवढे सोपे नाही. भरपूर वेळ द्यावा लागतो आणि धावपळ बरीच करावी लागते.
त्यात अणि ड्रायवर ठेवला असेल तर अवघड जागेचे दुखणे.

अनुप ढेरे's picture

28 Jun 2017 - 6:09 pm | अनुप ढेरे

उमेरिकेत लोक पार्टटाईम उबर चालवतात तसं आपल्या इथे करता येतं का?

विशुमित's picture

28 Jun 2017 - 6:16 pm | विशुमित

जमेल की.

त्रिवेणी's picture

29 Jun 2017 - 10:29 am | त्रिवेणी

माझ्या मामीचा भाऊ चाकणला एका कंपनीत जॉब करतो. त्याची शिफ्ट संपली की ओलासाठी स्वतःच स्वतःची गाडी चाकण ते एअरपोर्ट साठी चालवतो. अजूनतरी व्यवस्थित सुरू आहे.

जेवढ्याना विचारले ते सर्व म्हणत आहेत "पगारी चालक असला की तोच मालकापेक्षा जास्त कमावतो!"
सो, तुम्ही स्वतः चालवणार असला तर उत्तम नाहीतर... :)

+ १

आमच्या डोंबोलीत पण हीच स्थिती आहे.

(आणि तसेही डोंबोली हे जागतीक केंद्र असल्याने, जे डोंबोलीत तेच सर्वत्र, असा आमचा दावा आहे. )

सुज्ञ's picture

10 Jul 2017 - 11:10 am | सुज्ञ

अप्पाजींच्या या धाग्यालाच एक पुरवणी म्हणून ट्रक व्यवसायाबद्दल कोणी अशीच माहिती पुरवू शकेल काय ? मुख्य म्हणजे हा व्यवसाय अतिशय धोकादायक आणि RTO वगैरेंशी हितसंबंध असल्याशिवाय होऊच शकत नाही किंवा टेबलाखालचे च व्यवहार यात करावे लागतात वगैरे समज या व्यवसायाबद्दल आहेत ते कितपत खरे आहेत ? येथे ट्रक व्यवसायात वाळू डंपर वगैरे मला अपेक्षित नाही .

रघुनाथ.केरकर's picture

11 Jul 2017 - 11:42 am | रघुनाथ.केरकर

माझा एक मित्र मुंबई गोवा मुंबई रुट वर आयशर १०.४९ चालवतो. मुंबै ला त्याने एक कंपनी बांधुन घेतलीय. तीचा माल तो वेरणा (गोवा) हुन आणतो, आणी जाते वेळी कार्गो वरुन वेर्णा कींवा कारवार असे भाडे घेउन जातो. मध्ये मध्ये वाशीहुन सुधा माल टाकतो. कधी पार्ट-लोड घेतो तर कधी फुल्ल लोड घेतो. मे महीन्यात घरांच्या शीफ्टींगची पण भाडी मारतो. पण दोन्ही रुट भरुन आणतो. तीन दिवसात येउन जाउन १८ ते २० हजारचा रीपोर्ट झाला पाहीजे असं तो म्हणतो. त्याचा होत असेल. स्वता मालक असुन स्टेरींग वर बसतो. सोबत एक बदली ड्रायवर पण असतो. एका भाड्यात येता जाताचं डीजेल निघालं पाहीजे. दुसर्‍या भाड्यात ड्रायवर जेवण नाईट भत्ता मेंटेनंस आणी टोल. लोकल भाडी पण घेत असतो. मुख्य म्हणजे एकही गिर्‍हाइक परत पाठवत नाही. त्यामुळे बर चाललय त्याचं.