साहित्य
६ ते ८ चिकन चे लेग पिसेस
तंदुरी मसाला
१५ ते २० लसूण पाकळ्या
१ इंच आलं
४ चमचे घट्ट दही
अर्ध्या लिंबाचा रस
२ चमचे तेल (सरसो असेल तर उत्तम)
१ चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा काश्मीरी लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा काळीमिरी पावडर
१ चमचा आमचूर पावडर
१/२ चमचा खायचा लाल रंग (ऐच्छिक)
१ चमचा चाट मसाला (ऐच्छिक)
मीठ चवीनुसार
२ मोठे चमचे तूप
१ ते २ कोळशाचे तुकडे
कृती
चिकन चे लेग पिसेस स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्यावेत. त्यावर सुरीने दोन्ही बाजूला चिरा मारून घ्याव्यात. तंदुरी मसाल्याचे जिन्नस मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून, हा मसाला चिकन च्या लेग पिसेस ला व्यवस्थित लावून घ्यावा. एका प्लास्टिक च्या पिशवीत हे पिसेस ठेवून ते रात्रभर किंवा किमान ४ ते ५ तास मुरात ठेवावेत (फ्रिज मध्ये).
गॅसवर ग्रिल पॅन ठेऊन तो चांगला तापला कि त्यावर ब्रशने थोडं तेल लावून, चिकन चे पिसेस ठेवावेत. गॅस आधी ३ ते ४ मिनिटे मोठा ठेवावा. मग कमी करून, वरून झाकण ठेऊन साधारण १० ते १२ मिनिटे भाजून घ्या. पिसेस उलटे करून, पुन्हा गॅस मोठा करून ३ ते ४ मिनिटे मोठ्या आचेवर भाजून घ्या. [हे करत असताना चिकन हलवू नये, नाहीतर ते पॅन ला चिकटेल]. गॅस कमी करून हि दुसरी बाजू पुन्हा १० ते १२ मिनिटे भाजून घ्या. भाजताना वरती झाकण ठेवावे.
शेवटी दोन्ही बाजूला थोडं ब्रशने तूप लावून एक ते दोन मिनिटे भाजावे आणि चिकन च्या सर्वात मांसल भागात सूरी खुपसून ते नेट शिजलंय कि नाही ते तपासून, चिकन पिसेस एका भांड्यात काढून घ्यावेत. भांड्यावर झाकण ठेवावे [असे केल्याने चिकन मॉईस्ट राहील. ह्याला रेस्टिंग युअर मीट असे म्हंटले जाते]. सगळे चिकन चे पिसेस अश्या पदतीने खरपूस भाजून घ्यावेत.
चिकन भाजून होत आल, कि गॅसवर जाळी ठेवून त्यावर कोळसे ठेवावे. ते लाल झाले कि एका वाटीत काढून घ्यावे. हि वाटी चिकन च्या भांड्यात ठेवून,
वरून १ चमचा तूप सोडून भांडण्यावर झाकण ठेवावे. अश्या पद्धतीने चिकन ला तुपाची धुरी द्यावी. वरून चाट मसाला भुरभुरून, गरमागरम चिकन तंदुरी / पनीर टिक्का कांदा, लिंबू सोबत खायला घावे!
पनीर टिक्क्या साठी :-
शाकाहारी मंडळींनी हाच मसाला आणि पद्धत वापरून पनीर च्या जाड कापलेल्या क्युब्स ला लावून कांदा आणि ढोबळी मिरची वापरून पनीर टिक्का सुद्धा छान लागतो. पनीर चे तुकडे, कांदा आणि ढोबळी मिरचीचे तुकडे, बांबू स्कुवर्स मध्ये ओवून भाजून घ्यावेत. हे फार तर १ तास मुरत ठेवावे. अर्थातच चिकन एवढा वेळ भाजायचे नाही, पनीर सगळ्या बाजूने थोडंसं शिजलं, कि भांड्यात काढून तुपाची धुरी द्यायची.
प्रतिक्रिया
25 Jun 2017 - 2:55 pm | अभ्या..
बाकी कै मांसाहाराची आवड नाहि पण तुमची फोटोग्राफी.....अहाहाहा, क्या केहने.
अप्रतिम प्रेझेंटेशन. अल्टीमेट एकदम. डोळ्याचे पारणे फिटते.
25 Jun 2017 - 3:00 pm | केडी
धन्यवाद!
_/\_
25 Jun 2017 - 11:15 pm | चाणक्य
च्यायला काय काय करतो राव हा माणूस. त्रास आहे साला.
25 Jun 2017 - 11:37 pm | दशानन
जीवनासाठी खावं, पण खाण्यासाठी जीवन द्यावे असा पदार्थ म्हणजे तंदुरीच!!!
26 Jun 2017 - 4:07 am | एस
वाह!
26 Jun 2017 - 12:57 pm | वेताळ
जाम आवडले
26 Jun 2017 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा
दुत्त दुत्त! :-/
28 Jun 2017 - 8:41 pm | कपिलमुनी
तोंपासु का ??
27 Jun 2017 - 8:40 am | सविता००१
मस्तच दिसतंय. कसले कातिल फोटो काढतोस रे....
27 Jun 2017 - 3:40 pm | केडी
प्रयत्न करतो ग..अजून खूप शिकायचंय... तुझा ब्लॉग पण फॉलो करतो सध्या...कीप इट अप!
28 Jun 2017 - 8:26 pm | Nitin Palkar
अप्रतिम फोटोज! सुंदर कृती लेखन !!वर ठेवा!!! (KEEP IT UP)
28 Jun 2017 - 8:53 pm | केडी
धन्यवाद!
_/\_
28 Jun 2017 - 9:28 pm | मुक्त विहारि
कधी बोलावताय?
29 Jun 2017 - 12:42 pm | सस्नेह
आणि नीटस प्रेझेन्टेशन . सोपी वाटतेय पाकृ.
1 Jul 2017 - 4:25 am | पिलीयन रायडर
बाब्बो!!!! काय ते फोटो! एवढ्यासाठी धाग्यावर चक्कर मारतेच मी.
16 Aug 2017 - 11:14 pm | पाटलांचा मह्या
झाकून ठेवल्यावर पाणी नाही का सुटणाथ?