ग्रेनफेल ईमारतीची आग

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
17 Jun 2017 - 8:48 am
गाभा: 

ईंग्लडातल्या ग्रेनफेल ईमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची घटनेची बातमी आहे . आपण इंग्रजांना सहसा अभ्यासू आणि शिस्तप्रीय मंडळी समजतो. त्यामुळे ऊंच ईमारतींचे आगी पासून संरक्षणासाठी त्यांनी यथा योग्य काळज्या घेतल्या असाव्यात असे आपण गृहीत धरतो. पण त्यांचेही कुठेतरी व्यवस्थापन चुकले, परिणाम ३० मृत्यू ७० लापता आहेच पण उरलेल्यांसाठी ईमारत वापरण्या लायक शिल्लक राहीली आहे का ? अशा स्वरुपाचे प्रश्नही निर्माण होताना दिसतात.

जर ईंग्लडात समस्या आहेत तर आपण भारतीय स्वभावतः हलगर्जी आहोत. लोक्संख्येच्या प्रभावाने आणि व्यावसायिक कारणानेही आपल्याकडे (भारतात आणि महाराष्ट्रातही) उंच उंच ईमारतींचे पिक येत आहे. फर्निचरसाठी प्लायवूडनेघरे आतून मढवली जाताहेत. बाहेरून लावलेले छान छान दिसणार्‍या क्लँडींगचे आगीच्या संदर्भाने प्रश्न असू शकतात हे ही इंग्लंडातील बातमी वाचे पर्यंत माहितही नव्हते.

आपल्या कडच्या व्यावसायीक आणि राह्ण्याच्या दोन्ही ईमारतींना आगी संबंधीत आव्हानांचे स्वरुप काय आहे आणि काय काळजी घेतली पाहीजे या बद्दल चर्चा व्हावी म्हणून हा धागा.

* जगभरच्या उंच ईमारतींना लागलेल्या आगीं बद्दल इंग्रजी विकिपीडिया लेख दुवा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Jun 2017 - 9:11 am | कंजूस

१) लपवलेले concealed electric wiring
२) गॅसचे पाइप्स
३)भिंतींना झाकणारे लाकडी पॅनेल्स
४)फोमच्या गाद्या

१ आणि २ चा पुरवठा खालून बंद करता येतो परंतू ३ आणि ४ पेटले की थांबवता येत नाही.

उगा काहितरीच's picture

17 Jun 2017 - 9:47 am | उगा काहितरीच

लापता ! चक्क आपल्याकडून ?

पुंबा's picture

20 Jun 2017 - 5:41 pm | पुंबा

हेच म्हणायचे आहे.

जेम्स वांड's picture

17 Jun 2017 - 6:38 pm | जेम्स वांड

आजकाल प्लाय, लॅमीनेट, सनमायका वगैरे सगळे सुशोभीकरण साहित्य 'बोरर प्रूफ' अन 'फायर प्रूफ' मिळते, ते सुद्धा स्वस्तात स्वस्त ते महागात महाग रेंज मध्ये, इंग्लंडमध्ये ते नसावे हे काहीसे न पटण्यासारखे आहे. इंग्लंड निवासी कोणी मिपाकर असले तर ते काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते.

बरोबर. प्लाइवुड वगैरे जळत नाही.
१) इमारतीस completion certificate देताना पाहात असले तरी नंतर रहिवासी लोक काय सामान ठेवतात यावर काहीच अटी चेकिंग नसते.
उदा० एसीच्या डक्ट्सला इन्सुलेशन हे ग्लासवुलचे न वापरता थर्मोकोलचे वापरलेले आपण पाहतो. हे फार जळते. त्या इमारतीतून जे आगीचे लोळ दिसत होते ते पाहूनही कोणीही सांगू शकेल की हे असले पदार्थ जळत होते. गिरगावातल्या इमारती जळतात तेव्हा त्यात लाकडी जिने,रेलिंग,माळे असतकत परंतू आता नवीन इमारतींत हे कोणालाच परवडणारे नाही. गॅस,कागद,रंगाचे सामान,रसायनं यांची आगही वेगवेगळी दिसते.

कुंदन's picture

17 Jun 2017 - 6:56 pm | कुंदन

मागे दुबईत पण ३१-१२-२०१५ ला बुर्ज खलिफा शेजारी असलेल्या अ‍ॅड्रेस हॉटेलला पण अशीच आग लागली होती अन आक्खे हॉटेल जळुन खाक झाले होते.
क्लॅडींग साठी वापरलेल्या मटेरियल मध्ये अति ज्वलन्शील पदार्थ होते म्हणे.

गामा पैलवान's picture

17 Jun 2017 - 11:16 pm | गामा पैलवान

माहितगार,

या आगीची सार्वजनिक चौकशी (=पब्लिक एनक्वायरी) होणार आहे.

आग ज्या वेगाने पसरली त्यास केवळ वर्षानिरोधक आवरण जबाबदार आहे. शीतक (फ्रीज) फुटल्याने आग लागली अशी वदंता आहे. मात्र शीतकात फ्रीयॉन नामे अज्वलनशील वायू असतात. त्यामुळे आग लागण्याचा संभाव नाही. दुसरी शक्यता म्हणजे कार्तपथ (= कापून टाकलेला रस्ता = शॉर्ट सर्किट). पण अशी आग लागली तरी ती इमारतीच्या अंतर्भागात सुरू झालेली असणार. याउलट वर्षारोधक बाहेरील अंगास आहे.

माझ्या अंदाजाप्रमाणे आग बॉंबस्फोटाने लागलेली देखील असू शकते. प्रस्तुत इमारतीत बहुसंख्य मुस्लिम राहायचे. त्यातले बरेचसे सोमालिया आणि चाड देशांतले होते. त्यांच्या आडून एखादं दहशतवादी सुप्तकेंद्र (=स्लीपर सेल) चालवंत असू शकतो.

नुकतीच या इमारतीच्या देखभालीवर १ कोटी पौंड इतकी प्रचंड रक्कम केन्झिंगटन नगरपरिषदेकडून खर्च करण्यात आली होती. त्या कंत्राटांच्या लाभार्थींची चौकशी होईल अशी आशा आहे. तसेच विम्याचा लफडा देखील तपासून पाहिला पाहिजे. यथावकाश सत्य बाहेर येईलंच.

आ.न.,
-गा.पै.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Jun 2017 - 9:10 am | योगेश लक्ष्मण बोरोले

भन्नाट शब्द (निदान माझ्यासाठीतरी) वापरतात. मजा येते वाचायला.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Jun 2017 - 9:24 am | योगेश लक्ष्मण बोरोले

कोणत्याही वस्तुला अग्निरोधक आवरण देता येते. पण ते महाग असते म्हणुन बर्‍याच वेळा रहिवाशी भागात वापरणे टाळले जाते. बहुतांष औद्योगिक उपकरणांना हे आवरण दिलेले असते.
मला वाटते पीव्हीसी सारख्या बहुवारीकांचा (पाॅलिमेरीक मटेरीअल्स) उपयोग रहिवाशी ईमारतींमध्ये जास्तीत जास्त वाढवायला हवा. लाकुड, प्लायवुड वगैरेंचा उपयोग कमीत कमी करुन हळुहळु थांबवायलाच हवा. पीव्हीसी हे क्लोरीनयुक्त संयुग असल्याने, आग पकडत नाही व खुप तापमानामध्ये विघटन पाउन क्लोरीन व हायड्रोक्लोरीक अॅसिड तयार करते जे आगीला विरोधच करतात. अर्थात हे वायु मानवाला अतिशय धोकादायक असल्याने त्यामुळे जिवीतहानी होउ शकते. पण अशा आगींमध्ये तसेही गुदमरुन होणारे मृत्यु टाळता येत नाहीतच.

चर्चा सावकाश पण पुढे जाते आहे. प्रतिसाद आणि चर्चा सहभागा साठी आभारी आहे.

इरसाल कार्टं's picture

19 Jun 2017 - 4:35 pm | इरसाल कार्टं

आगीची बातमी पाहताना माझ्या मनातही सर्वप्रथम हाच प्रश्न आला कि अशी आग भारतात भडकली तर काय अवस्था होईल.
आपल्याकडे बहुसंख्य इमारतींमध्ये आग विझवण्यासाठी व्यवस्था नसते आणि अग्निशामक दलाकडेही पुरेशी साधनं नसतात.

पिंगू's picture

19 Jun 2017 - 10:13 pm | पिंगू

दुर्दैवाने आपल्या इथे आगप्रतिबंधक यंत्रणेबद्दलच निष्काळजीपणा दाखवला जातो.

तेव्हा भारतात कुठे असे अपघात घडले, तर आश्चर्य वाटणार नाही.