वाढणी - ४ व्यक्तींसाठी
साहित्यः २ वाट्या तांदूळ, ३ वाट्या पाणी (तांदळाच्या प्रतीनुसार कमी- जास्त लागू शकते) - मी साधा कोलम र्तांदूळ वापरला आहे. १ चक्रीफूल, १ तमालपत्र, २ हिरव्या वेलच्या, मीठ चवीनुसार, १ मध्यम जुडी पालक, ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ मोठे कांदे, १ टोमॅटो, १ चमचा जिरे, १/२ टीस्पून तिखट१/चिमूटभर हिंग, १/२ चमचा गरम मसाला, ३ टीस्पून तेल
कृती: तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. एकीकडे पालकाची पाने धुवून ब्लांच करून घ्या. एका पॅन मध्ये १ टीस्पून तेल घालून त्यात एक मोठा कांदा पातळ लांब चिरून परतायला ठेवा. अगदी मंदाग्नीवर. तळणार नाही त्यामुळे १५-२० मिनिटे लागतात याला कुरकुरीत व्हायला.
दुसर्या एका पातेल्यात एक टीस्पून तेल घालून ते तापलं की त्यात जिरे, तमालपत्र, चक्रीफूल आणि वेलच्या घाला. तांदूळ घालून थोडेसे परता. त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण न ठेवता शिजत ठेवा.
आता मिक्सरच्या भांड्यात कांदा बारीक करून घ्या. नंतर टोमॅटो ची प्युरी करून घ्या. पालक पेस्ट करा.
एका भांड्यात उरलेले एक टीस्पून तेल घेउन त्यात आधी थोडे जिरे, हिंग, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी क्रमाक्रमाने घालून परता. पालक पेस्ट त्यात घालून गरम मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ, घाला. एवढं होईतो भात जवळजवळ शिजत आलेला असेल. त्यात ही पालक पेस्ट घालून नीट ढवळा. या पेस्ट मध्येही पाण्याचा अंश असतोच. त्यामुळे भात नीट शिजतो. तरीही एकदा पाहून हवे वाटल्यास थोडे पाणी घालावे.
पालक राईस तयार. कुरकुरीत केलेला कांदा त्यावर घाला. टोमॅटो सार, पापड, लोणचं नाहीतर एखादी कोशिंबीर असा मस्त बेत करता येतो.
प्रतिक्रिया
19 Jun 2017 - 1:01 am | पद्मावति
वाह!
20 Jun 2017 - 4:38 am | रुपी
मस्त.. नक्की करुन बघेन
21 Jun 2017 - 12:48 am | जुइ
नक्कीच करून बघेन!
29 Jun 2017 - 6:07 pm | पुंबा
उत्तम.. ब्लांच करून म्हणजे काय?
29 Jun 2017 - 6:09 pm | पुंबा
अक्षरश: तोंपासु.
29 Jun 2017 - 9:25 pm | सविता००१
करायचं म्हणजे उकळत्या पाण्यात किंचित मीठ घालून पालकची धुतलेली पाने २ मिनिटे ठेवायची. आणि लगेच ती पाने एका चाळणीवर ओतून त्यावर थंड पाणी घालायचे. किंवा गरम पाण्यातून ती पाने ताबडतोब बर्फाच्या पाण्यात घालायची. यामुळे त्या पालकचा हिरवा रंग टिकतो. कारण या भाज्या शिजल्या की त्यांचा रंग बदलतो.
30 Jun 2017 - 12:16 pm | पुंबा
ओहके..
धन्यवाद ताई.. हे जरूर करून बघणार आहे.
30 Jun 2017 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी. अजुन येऊ दे...!
-दिलीप बिरुटे
2 Jul 2017 - 5:40 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa