शाळेत जाऊन खरोखरच काहीआर्थिक फायदा होतो का? किंवा शाळेत जाऊन इथे कुणाला काही आर्थिक फायदा झाला आहे का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Jun 2017 - 9:50 pm
गाभा: 

डिस्क्लेमर : खालील काही अनुभव हे माझे वैयक्तिक आणि काही कौटुंबिक आहेत. त्यात जराही सरसकटीकरण नाही. चुकुन माकून सरसकटीकरण जाणवल्यास, ती माझ्या लेखनातील किंवा माझे विचार मी व्यवस्थित पणे नी ट मांडू शलो नाही, ह्याची असेल. मी सर्वज्ञ नाही.

आमची प्रेरणा : तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ? http://www.misalpav.com/node/40012

हा वरील धागा (http://www.misalpav.com/node/40012) वाचला आणि मी परत भूतकाळात गेलो.प्रत्येक क्षणी वर्तमान काळात मला तरी जमत नाही.

दहावीला मी कसा काय पास झालो? ह्याही पेक्षा मी शाळेतच का गेलो? ह्याचा मला मूलभूत प्रश्र्न पडला.शाळेतील कुठलेच शिक्षण मला व्यवहारात उपयोगी पडले नाही. शाळे नंतरचे शिक्षण जरी इंजिनियरिंगचे घेतले तरी ते शिक्षण घेतांना माझी मानसीक कुचंबणा मात्र खूप झाली. (ह्या मानसीक त्रासाचा मात्र व्यवहारात खूप उपयोग झाला. आता मी कुठल्याही सार्वजनिक वाहनाची, कितीही वेळ वाट बघू शकतो.नशीबात असेल तर ते वाहन नक्की मिळते.चिकाटी मह्त्वाची.)

डिप्लोमाच्या वेळी नातेवाईक फार चिंतेत असायचे.आता ह्या वर्षी तरी हा बाबा पास होणार का? इतकी वाट आमच्या कुटुंबातील एका हुषार विद्यार्थ्याच्या (तो खरोखरच विद्यार्थी होता.परिक्षार्थी न्हवता.) दहावीच्या निकालाच्या वेळी पण त्यांनी कधी दाखवली नाही. त्याला दहावीला त्या काळी ९०% गूण मिळाले पण बोर्डाच्या मेरीट लिस्ट मधील त्याचा क्रमांक एका गूणाने गेला.त्याच वर्षी मी पण नेमका एका विषयात पास झालो.त्यामुळे त्याच्या दू:खा पेक्षा ही , हा बाबा एक स्टेप पुढे गेला ह्याचाच आनंद बर्‍याच जणांना झाला.

डिप्लोमा झालो, हातात निकाल यायच्या आत, नौकरी पण मिळाली. पुढे त्यात रस पण निर्माण झाला.अनुभव मिळत गेला आणि मग बर्‍यापैकी पैसा पण मिळत गेला.अर्थात ह्यात नशीबाचा भागच जास्त.

पण माझी आवड शेतीची हे मात्र मला वयाच्या २७व्या वर्षी समजले. शाळेत जर मी वयाच्या ६व्या वर्षी गेलो असेन तर जवळपास २० वर्षे माझी वायाच गेली.कारण आमच्या पिताश्रीं कडे त्यावेळी पण माझ्या साठी शेती विकत घ्यायला पैसे होते.

मुळात मी शाळेत काय शिकलो....तर फल्त लिहायला आणि वाचायला शिकलो.बरे शाळेत आपल्याला हवे ते विषय घेता येत नाहीत.मला खरे तर भाषा हा विषय आवडायचा.त्याकाळात हिंदी सिनेमे बर्‍यापैकी बघायला मिळायचे, त्यामुळे हिंदी बर्‍यापैकी यायची. म्हणजे मी जे काही त्या भाषेत बोलायचो, ते इतरांना समजायचे. म्हणजे , तुम शोधो. आई बाहेर गई है, आज मै और मेरा भाई पिक्चर देखेंगा.....

खरे तर भाषा ही बोलणे-ऐकणे ह्याही व्यतिरिक्त देहबोलीतून पण व्यकत होत असतेच. पण शाळेत व्याकरण शिकवायचाच जास्त प्रय्त्न केला जातो. कर्मणी प्रयोग काय? कर्तरी प्रयोग काय? आणि आता हे दोन कमी म्हणून पण मग परत भावे प्रयोग आहेच.

आपण संभाषण करतांना कधीच ह्या प्रयोगांकडे लक्ष देत नाही. निदान मी तरी नाही.संभाषण होणे महत्वाचे.

जी गोष्ट भाषेची तीच गोष्ट इतिहासाची. मुळात आपला इतिहासच फार वेगळ्या तर्‍हेने शिकवला जातो. छ. शिवाजी राज्यांना स्वराज्य स्थापन करावे असे का वाटले? संभाजी राज्यांचा वध औरंगजेबाने कसा केला? ह्याचा इतिहास शाळेत शिकवत नाहीत. किंबहूना कुठल्याच शाळेत इतिहासाला महत्व दिले जात नाही.शास्त्र आणि गणित शिकवणारे तेच खरे शिक्षक.बाकी इतर विषयांना काय कुणीही चालतील, अशीच भावना असायची.

पुढे विविध शाळेत भेटी देण्याचा योग आला.

ज्याला काहीच येत नाही तो शिक्षक होतो. असेच माझे आजकाल मत झाले आहे.

ज्याला उत्तम गूण मिळाले आहेत ते डॉक्टर, इंजिनियर्,सी.ए.,वकील,आय.ए.एस.,कारकून होतात आणि ज्याला दहावीत ६०-७० टक्क्याच्या आसपास गूण मिळाले आहेत ते शिक्षक होतात.जो आय.आय.टी.त शिकलेला आहे आणि तरी पण शाळेत शाळेत शिकवत आहे, असा शिक्षक मला तरी दुसरा भेटलेला नाही. (एकमेव उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील भरत करमरकर. आय.आय.टी.ला प्रवेश मिळण्या इतकी बुद्धीची पात्रता असून देखील, बी.एस.सी. करून खेड्यात शिकवणारा.) डोंबिवली सारख्या (सो कॉल्ड) सांस्कृतीक जाग असलेल्या शहरातील ही स्थिती आहे, होती आणि असेल.

आपल्या आय.आय.टी. झालेल्या मुलाला किंवा मुलीला जाणीवपुर्वक शिक्षक करणारे पालक पण अद्याप मला भेटायचे आहेत.

शात्र हे प्रयोगशीलच असते.पण काही ठरावीक विद्यार्थ्यांना हे विषय समजले की, सगळ्याच वर्गाला हे विषय समजले असे शिक्षकांना वाटते. पाचवी पर्यंत मी शंका विचारायचो. मृदा म्हणजे काय? ही मी विचारलेली पहिली आणि शेवटची शंका.त्याचे उत्तर "आले, "गप्प बैस." मुकाट दहावी पर्यंत शिकलो.बरे हे विषय मुद्दाम कठीण का करतात? खरे तर दहावी नंतर शात्रा आधारीत पुढील सगळेच सिक्षण इंग्रजी भाषेतून. मग त्याची पूर्व तयारी आधी पासूनच का करून घेत नाहीत?

उगाच डिस्टिलेशनला उर्ध्वपातन, डायमीटरला व्यास असे नामांतर कशाला? बरे ठीक आहे तुम्ही करा नामांतर पण मग ते शब्द इंग्रजीच्या पुस्तकातून तरी शिकवा. तर इंग्रजीच्या पुस्तकात असते तरी काय? तर सीता, अहमद आणि गोपाळ (ह्या "गोपाळाला" पण म्हणतांना गोपालच म्हणायचे, कारण काय तर इंग्रजांना "ळ" , "ट" आणि "ण" म्हणता येत नाही. इंग्रज गेले पण जातांना गुलामांची मानसिकता मात्र तशीच ठेवून गेले. असे माझे मत.)

माझ्या अकरावीचे पहिले २ दिवस तर सेंटर म्हणजे केंद्र आणि रेडियस म्हणजे त्रिज्या हे समजण्यातच गेले पण मग तिसर्‍या दिवशी जिमचा पत्ता मिळाला आणि मग मी संपूर्ण ११वी आणि १२वी जिम मध्येच काढली.फक्त प्रयोगा पुरतेच प्रयोगशाळेत जायचो. मित्र जे काही त्यांच्या वहीत उतरवतील ते घरी जावून उतरवून घ्यायचो. जावू दे ते फारच रम्य दिवस होते. बाप जेवू घालत होता आणि मित्र सांभाळून घेत होते.( मित्रांच्या बाबतीत मात्र मी भलतच नशीबवान, देवाने अतिशय उत्तम मित्र दिले.)

("मृदा म्हणजे माती", हे समजे पर्यंत दहावी पास झालो आणि शिक्षणाची माती होणे म्हणजे काय? हे मात्र पुढे शेती करतांना जाणवले.)

एखाद्या विषयात जर एखाद्या मुलाला/मुलीला रस नसेल तर मूद्दाम तो विषय का शिकवला जातो? मी आणि माझा मित्र तर, गणित आणि शात्र ह्या विषयांना फुली-गोळा आणि भेंड्यांचे विषय असेच म्हणायचो. असे करतांना पकडल्या गेलो तर वर्गा बाहेर उभे रहायची मस्त सिक्षा मिळायची. मग बाहेर अजून एका बाहेर उभ्या असलेल्या मुलाला वाकुल्या दाखवायचो. कधी-कधी वर्गात उभे रहायची पण शिक्षा मिळायची.आपण म्हनजे लाई भारी, असेच वाटायचे.

सुरुवाती-सुरुवातीला, शाळेतील सगळ्यात आवडते विषय म्हणजे, संगीत,सारिरीक शिक्षण, चित्रकला,हस्तकला आणि चित्रकला, पण ह्यात देखील पुढे अनावश्यक गणिते आणि सूत्रे आली आणि आमची त्या-त्या विषयातली गोडी पण कमी होत गेली.चंगले खो-खो खेळायचे सोडून (खरे तर खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी हे खेळ १० बाय १२ फूटाच्या खोलीत पण खेळता येतात आणि गाणे तर कुठेही म्हणता येते. रागदारी किंवा रागातील कोमल स्वर म्हायीत नसलेली व्यक्ती पण उत्तम गायक होवू शकते (आणि जर त्या व्यक्तीच्या पालकांना तसे वाटत असले तर योग्य त्या गुरुंकडे त्या व्यक्तीला पाठवतीलच की... (त्या व्यक्तीच्या मनात असले तरी हे असे उफराटे धंदे करायला बरेचसे पालक तयार होत नाहीत) पण मग उगाच आमच्या सारख्या दगडांना हा त्रास कशाला?

त्यामुळे उगाच शाळेत जाऊन माझ्या आयुष्यातली सगळी कुमार वयातली आणि थोडी पौंगडावस्थेतील वर्षे वायाच गेली.

पण ह्याचा फायदा मात्र मला माझ्या मुलांची शेती करतांना झाला. दोघांना एक वाक्य सांगूनच शाळेत पाठवले, तुम्ही कधीही शिक्षण सोडू शकता.शाळा तुम्हाला एखादे सर्टिफिकेट देईल पण कुठलेही व्यावसायिक शिक्षण मात्र घ्या.चपला शिवा किंवा कपडे, पण मिळवलेला प्रत्येक रुपया स्वकष्टाचा मात्र असू दे.

प्रतिक्रिया

शाळेत जाऊन कुणाला काही आर्थिक फायदा झाला आहे का?

शिक्षकांना

** शाळेत वर्षे वाया जातात **

हे बरोबर आहे. आपली शालेय व्यवस्था जुनाट आहे आणि वार्षिक परीक्षा मुले हुशार मुलांना विनाकारण फटका पडतो. १-१० पर्यंत चे शिक्षण मी सहज रित्या ७ वर्षांत संपवले असेल आणि जॉब मार्केट मध्ये ३ वर्षे आधीच येऊ शकले असते. त्या दृष्टीकोनातून शाळेंत मी किमान ३ वर्षे वाया घालवली ह्यांत शंका नाही.

** शिक्षणाचा आर्थिक फायदा **

शिक्षणाचा आर्थिक फायदा नक्कीच आहे. सरकारी शाळेंत दर मुलांमागे वर्षाला सुमारे २० हजार रुपये खर्च होतो. सुमार दर्जाचे असले तरी हे शिक्षण १-१० वी पर्यंत २ लाख रुपयांचे होते. तुम्ही जर शिक्षण वापरून २ लक्ष रुपया पेक्षा जास्त पैसे पुढील आयुष्यांत कमावले तर हा फायद्याचा व्यवहार ठरतो.

** शिक्षणाचे आर्थिक नुकसान **
पण हा फायदा फारच कमी आहे. १० वर्षे आणि २ लक्ष रुपये म्हणजे फारच मोठी गुंतवणूक आहे. सर्वानाच हि उपयोगाची असेल असे नाही. आपणाला सामान्य शेतकरी बनायचे असेल तर ५ वर्षे लिहायला वाचायला शिकून इतर वर्षे शेती विषयक गोष्टी शिकलात तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. अभियंता व्हायचे असेल तर इतर विषय सोडून विज्ञान, गणित हेच विषय कोळून प्यायला ८ वर्षे पुरेशी आहेत.

सध्या शिकवणी वर्ग हेच तर करतात. फारच कमी खर्चांत आणि फारच कमी वेळांत शिकवणी वर्ग मुलांना फार खूप आणि हवे तेच ज्ञान देतात. म्हणून तर पालक शिकवणी वर्गांत जास्त गुणतवणूक करताना दिसतात.

** उंटावरून शेळ्या हाकणे **

शिक्षणक्षेत्रातील सरकारी लुडबुडीमुळे उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आमच्या मुलांनी कोणते विषय कधी आणि कसे शेकावेत ह्याचे निर्णय घेतात. ह्या मूर्खांमुळे समाजाचे आणि आमच्या मुलांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते.

बबन ताम्बे's picture

16 Jun 2017 - 5:38 pm | बबन ताम्बे

परवा सीबीएससी च्या मराठीच्या पुस्तकात रितेश देशमुखवर धडा पाहीला.
धड्याच्या शेवटी प्रश्न होता. "रितेश देशमुखचा जन्म कुठे झाला ? "

आता काय म्हणावे असा सिल्याबस बनवणार्यांना ? पोरांनी हे शिकायचे आणि ही प्रश्न उत्तरे पाठ करायची !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2017 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे

काय योगायोग पहा !

पैसेवाले (शिक्षणासह/शिवाय) कंपनी काढतात; आयआयटी/इंजिनियरिंग कॉलेजची डिग्री घेणारे तेथे (उच्च/मध्यम/कनिष्ठ) मॅनेजरची नोकरी करतात; डिप्लोमावाले किंवा जरा कमी शिकलेले तिथे नोकरदार असतात; त्यातल्या कमी शिकलेल्यांपैकी काही युनियनचे पदाधिकारी बनून या सगळ्यांना पिडतात आणि काम न करता पगार व इतर सवलती मिळवतात... आणि जे दहावीपेक्षा कमी शिकलेले असतात ते राजकारणी-मंत्री बनून या सगळ्यांवर राज्य करतात आणि त्या सर्वांना लुटतात!

...हे बर्‍याच जणांनी बर्‍याचदा म्हणताना ऐकले आहे.

तुम्ही हा धागा टाकलात आणि योगायोगाने आजच कायप्पावरून खालचा संदेश मिळाला. तो भारतातिल एका राज्याकडे जरासा झुकणारा असला तरी; तो प्रत्यक्षातले उदाहरण देऊन मूळ मुद्दा प्रकर्षाने दाखवतो आहे...

O' Canada...! Oh, Bihar...! What a Contrast...!

Canadian Cabinet :

1) Minister of Health is a Doctor.

2) Minister of Transport is an Astronaut.

3) Minister of National Defense is a Sikh Veteran.

4) Minister of Youth is under 45.

5) Minister of Agriculture and Agri-Food is a former Farmer.

6) Minister of Public Safety and Emergency Preparedness was a Scout.

7) Minister of Innovation, Science and Economic Development was a Financial analyst.

8 ) Minister of Finance is a successful Businessman.

9) Minister of Justice was a crown Prosecutor and is a First Nations leader.

10) Minister of Sport, and Persons with Disabilities is a visually impaired Paralympian.

11) Minister of Fisheries and Oceans, and Canadian Coastguard is Inuit.

12) Minister of Science is a Medical geographer with a PhD.

13) Minister of Immigration, Citizenship and Refugees was an Immigration critic.

There are Scientists in the Cabinet, and it is made up of 50% Women...!

Now see this...

Bihar Cabinet :

A Look at the Bihar Cabinet and the Educational Qualifications of the Ministers :

1) Nitish Kumar - Chief Minister, Home, General Administration - (Bachelor Of Engg.)

2) Tejaswi Yadav - Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare - (Ninth std Fail)

3) Tej Pratap Yadav - Health, Irrigation, Transport - (Twelfth Fail)

4) Abdul Bari Siddiqui - Finance - (Twelfth)

5) Vijendra Prasad Yadav - Electricity - (Tenth Fail)

6) Lalan Singh - Drinking water - (Eighth Std)

7) Manju Varma - Social Welfare - (Twelfth)

8 ) Manmohan Jha - Land development - (Seventh)

9) Madan sahini - Fertilizers - (Tenth Std)

10) Ashok Choudhary - Education & IT (Tenth Std)

11) Vijay Prakash - Labour - (Fifth Standard)

12) Ram Vichar Rai - Agriculture(10th pass)

13) Kapildev Kamath - Panchayati Raj - (Third Std)

14) Santosh Nirala - SC/ST Welfare - (Twelfth)

15) Abdul Jaleel Masthaan - Programme Implementation - (Eighth Std)

16) Abdul Gafoor - Minority Welfare - (Tenth Std)

17) Chandrika Rai - Transport (MA, Patna University)

18) Maheswar Hajari - Urban Development - (Twelfth)

19) Chandrashekar - Disaster Management - (Fourth std)

20) Jaykumar singh - Industries And Science and Technology - (Tenth Std)

21) Anitha Devi - tourism - (Twelfth Failed)

22) Awadesh Singh - Animal Husbandry - (Fifth Standard)

23) Muneshwar Choudhary - Mines and Geology - (Twelfth)

24) Krishnanandan Verma - Law - (Eleventh)

25) Khurshid Feroz Ahmed - Sugarcane Industry - (Fifth std)

26) Shailesh Kumar - Village Administration - (Second Standard)

27) Alok Mehta - Co-operatives - (Third standard)

28) Shravan Kumar - Village Development - (Twelfth Standard)

29) Shivachandra Ram - Arts and Culture - (ILLITERATE)"

आता बोला ! मी ताडून पाहिले नाही आणि या संदेशात काहीशी अतिशयोक्ती असू शकते... पण लालूच्या दोन सुपुत्रांची (तेजस्वी यादव, Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare (नववी नापास) आणि तेजप्रताप यादव, Health, Irrigation, Transport (बारावी नापास)) शैक्षणिक पात्रता जगजाहीर आहेच. तेव्हा...
जर केवळ आर्थिक फायदा हवा असेल तर फुका शिक्षणात वेळ न घालवता अशिक्षित राजकारणी होणे सर्वात जास्त फायद्याचे ;) :D

मुक्त विहारि's picture

16 Jun 2017 - 4:15 pm | मुक्त विहारि

ह्याला पुरावा आहे आणि तो म्हणजे " कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक. आमचा धर्मग्रंथ तरी तोच.

जे चंद्रगुप्ताच्या काळात तेच छत्रपती शिवाजी राज्यांच्या काळात. त्यांच्या मंत्री मंडळातील प्रत्येक मंत्री त्या=त्या कामात वाकबगार होता.

शाळेत हा इतिहास शिकवत नाहीत आणि समाजाचा शैक्षणिक पाया पण त्यामुळे कमकुवत रहायची शक्यता पण जास्त.

अयोग्य माणूस निवडला की काय होते? हे विचारायचे असेल तर फोर्ड आणि ली आयकोका आणि सायप्रस मोदी आणि रतन टाटा ह्यांचा अभ्यास करावा. (भेंडी, शाळेत जर असे अभ्यासाचे विषय असते तर आमच्या सारखी शैक्षणिक गवांर मंडळी तर नक्कीच तयार झाली नसती....

शाळा, शालेय शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रमातील वैविध्य, ह्या सगळ्यांकडे पाहण्याचा तुमचा एक विद्यार्थी म्हणून काय दृष्टिकोन आहे ह्यावर शाळा, महाविद्यालये इत्यादी साधनांची तुमच्यासाठी असलेली उपयुक्तता अवलंबून असते. आणि दुसरे म्हणजे फायदा हा कुठल्या बाबतीत मोजायचा, निव्वळ आर्थिक की अजून काही, ह्या तुम्ही स्वतः स्वतःसाठी ठरवलेल्या किंवा इतरांनी तुमच्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांवरदेखील अवलंबून असते.

मला वैयक्तिकरित्या विचाराल तर शाळेला, महाविद्यालयाला, व्यावसायिक जीवनाला मी केवळ एकेक टप्पा म्हणून पाहिलं, माझा संपूर्ण ध्यास हा जीवन जगण्याच्या 'प्रोसेस'चा जागरूकपणे अनुभव घेत राहण्यावर होता आणि आहे. त्यातून मिळणारे 'ज्ञान' आणि त्यामुळे येणारी वैयक्तिक समृद्धी ही माझ्यासाठी अनमोल आणि स्तिमित व्हावं इतकी महाप्रचंड आहे. त्यासाठी मी या आनंदाचा स्रोत असलेल्या सर्व घटकांचा, घटनांचा आणि साधनांचा अत्यंत ऋणी आहे.

(नोंद : शालेय शिक्षण, महाविद्यालयीन पदव्या, सरधोपट नोकरी, व्यवसाय, इत्यादी टप्पे मला इतरांना सर्वसामान्यपणे पूर्ण करावे लागतात तसे व त्या क्रमाने करता आले नाहीत याचा एका प्रकारे मला फायदाच झाला.)

- हेल्पिंग इन सेल्फ-अॅक्च्युअलायझेशन शुड बी द गोल ऑफ एज्युकेशन असे मानणारा (एस).

कवितानागेश's picture

16 Jun 2017 - 9:48 am | कवितानागेश

सध्या एकीकडे हाच विचार डोक्यात आहे.
मुलीला शाळेत घातले तर उपयोगाचे काय मिळेल आणि निरुपयोगी काय मिळेल शिवाय नको त्या तापदायक गोष्टी काय काय शिकेल यांचा तौलनिक अभ्यास सुरु आहे.
माझा स्वतः चा शाळेचा अनुभव अजिबात वाईट नाही. मी भरपूर खेळलेय आणि छान मजेत शिकलेय पण तसे शिक्षक आणि मित्र मैत्रिणी आता असतात का याबद्दल शंका आहे. हल्ली मुलं एकेकांकडे स्पर्धक म्हणून बघायला शिकलीयेत. आणि शिक्षक बरेचसे शिकवण्याचे पालकांवरच ढकलून देतायत असंही दिसतंय....
त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो कि शाळेची भरमसाठ फी भरून त्या शाळेच्या ब्रँडिंग शिवाय अजून काय काय मिळेल?

गॅरी ट्रुमन's picture

16 Jun 2017 - 4:06 pm | गॅरी ट्रुमन

आमची शाळा-- ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल खूपच चांगली होती आणि सगळ्या शिक्षकांनी आमच्यावर खूपच मेहनत घेऊन आम्हाला अगदी उत्तम प्रतीचे शिक्षण दिले. त्याचा पुढील आयुष्यात नक्कीच फायदा झाला. पण ते श्रेय शिक्षकांचे. शाळेत मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कृपेने शिकविल्या जाणार्‍या सिलॅबसचे अजिबात नाही. शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. उदाहरणार्थः

१. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या काळात कुठच्या प्रकारच्या घरात राहतात.
२. सॅव्हाना गवताळ प्रदेशाला दक्षिण अमेरिकेत काय म्हणतात (बहुदा पंपास) आणि युरेशियात काय म्हणतात (बहुदा स्टेप्स किंवा प्रेअरीज)
३. बदाऊन टोळ्यांची जीवनपध्दती कशी असते. ते कोणत्या प्राण्यांची शिकार करून खातात.
४. ब्लास्ट फरनेसच्या कुठल्या भागात किती तापमान असते
५. कुठच्याकुठच्या अनेकविध रसायनांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग. नववीमध्ये असताना केमिस्ट्रीमध्ये एक धडा होता त्यात १२ वेगवेगळी रसायने आणि त्यांचे गुणधर्म-उपयोग होते. तो सगळा धडा ऑप्शनला टाकला होता. एखादे रसायन समोर दिसले तरी ते ओळखता येणार नाही पण ते रसायन प्रयोगशाळेत 'रिएजन्ट' (म्हणजे नक्की काय?) म्हणून वापरतात हे घोकणे मंजूरच नव्हते.

इत्यादी इत्यादी अनेक.

या विषयांना मी नक्कीच कमी लेखत नाही. पण ज्या गोष्टी नंतरच्या आयुष्यात चुकूनही आपल्या वाट्याला यायची फारच थोडी शक्यता आहे त्या गोष्टी सरसकट सगळ्यांना का शिकवायचे कोणास ठाऊक. त्यापेक्षा प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल. एकूणच ज्याला सगळ्यात जास्त निरूपयोगी माहिती तोंडपाठ तो सर्वात हुषार असे चित्र आपल्या शालेय शिक्षणात उभे केले जाते ते किती खोटे असते हे नंतर लक्षात आल्यावर जाम डोक्याला शॉट गेला होता.

प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल.

+१

पण मला वाटतं विज्ञानाच्या प्रयोगात आणि गणिती प्रमेय सिद्ध करण्यात ही स्किल्स डेव्हलप होतात.

प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या.

अजून एक म्हणजे आपल्याकडे सर्व मुलांना डिबेट करायला शिकवलं पाहिजे.

गॅरी ट्रुमन's picture

17 Jun 2017 - 7:24 pm | गॅरी ट्रुमन

प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या.

भूगोलाविषयी माहित नाही. मला तो विषय कधीच आवडला नव्हता त्यामुळे फार लिहिता येणार नाही. पण इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येणे शक्य आहे. म्हणजे नुसत्या सनावळ्या किंवा दुसर्‍या महायुध्दाचे परिणाम, कारणे यांची १०-१२ कलमी यादी न देता खरोखरच घटना घडल्या त्या कशामुळे, दोन वेगळ्या प्रदेशात/ कालखंडात घडलेल्या घटनांची सांगड घालता येईल का वगैरे वगैरे अभ्यास करता येणे शक्य आहेच.

आम्हाला एन.टी.एस ला दिपक पवार म्हणून एक सर इतिहास आणि नागरिकशास्त शिकवायला होते (सध्या ते मराठी अभ्यास केंद्र चालवतात). त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा शिकवताना स्वातंत्र्य नक्की कशाकरता (मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार असायला पाहिजे) इथपासून सुरवात केली होती. तसेच कोणतीही बाजू बरोबरच असणार (उदाहरणार्थ क्रांतिकारकच किंवा गांधीच) असा पूर्वग्रह न बाळगता नक्की काय झाले आहे हे अनेक सोर्सेसमधून माहित करून घ्या आणि मग त्यावर आपला विचार करून आपले मत बनवा हे पण त्यांनीच आम्हाला शिकवले. अशाप्रकारे इतिहास शिकवता येणे अशक्य नक्कीच नाही.

लोनली प्लॅनेट's picture

17 Jun 2017 - 10:13 am | लोनली प्लॅनेट

@गॅरी ट्रुमन
तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातात
विश्वविषयी कुतूहल असलेली व्यक्ती एकसुरी आयुष्य जगूच शकत नाही

गॅरी ट्रुमन's picture

17 Jun 2017 - 7:15 pm | गॅरी ट्रुमन

तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातात

उद्देश तो असला तरी ज्या पध्दतीने त्या अभ्यासक्रमात असतात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या पध्दतीने त्यावर परीक्षा घेतल्या जातात त्यावरून अशा गोष्टींविषयी कुतुहल निर्माण होण्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मनात दुरावाच निर्माण होत असेल असे वाटते.

अमर विश्वास's picture

16 Jun 2017 - 4:20 pm | अमर विश्वास

शाळेत जाऊन आर्थिक फायदा.. ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे.
शाळेचे शिक्षण हे व्यवसायाभिमुख किंवा अर्थार्जनासाठी नाही. ह्या शिक्षणामुळे पाया पक्का होतो.

पृथवीच्या पोटावर विषुवृत्त नावाचा पट्टा आहे .. आता आम्ही काय चोरायला निघालो होतो का तो पट्टा ? हे पुलंचे वाक्य गम्मत म्हणुन ठीक आहे ...
पण आपण शाळेत काय शिकलो ? याचे उत्तर इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान इत्यादी असेल तर परत एकदा विचार करा ...

आज या धाग्याच्या निमित्ताने विचार करताना शाळेचे मला झालेले फायदे (अर्थात हा आजचा विचार आहे .. जेंव्हा शाळेत होतो तेंव्हा एव्हडा विचार करत नव्हतो :) )

शिस्त : शाळेत वेळेवर जाणे , गृहपाठ करणे .. अन्यथा शिक्षा .. अर्थात आमच्या वाट्याला जास्त वेळा हीच यायची
वाचन - विचार करणे - लक्षात ठेवणे - अभिव्यक्ती (लिहिणे) : एखादा विषय जरी आवडत नसला तरी त्याचे पुस्तक वाचणे , लक्षात ठेवणे , उत्तरे लिहिणे इत्यादी
वाचनाची आवड शाळेत असतानाच लागली हे किती बरे झाले ..
सामुदायिक प्रार्थना / कवायत / इतर उपक्रम जे आपल्याला घरातून बाहेर पडून इतरांबरोबर राहायला शिकवतात
असे अनेक मुद्दे आहेत,

थोडक्यात आपण नुसते पुस्तकी ज्ञान मिळवत नाही तर घडत जातो ...

शाळेत कशाला जायचे? मी मोठा (वयाने) झाल्यावर CA होईन .. असे होत नाही ..

तेंव्हा शाळेत का जायचे याचे माझे उत्तर तरी "घडण्यासाठी" असेच आहे. याचा आर्थिक फायद्यांशी काहीही संबंध नाही

अनुप ढेरे's picture

16 Jun 2017 - 4:24 pm | अनुप ढेरे

शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.

शाळेतलं शिक्षण हे तुमचा एरिआ ऑफ ईन्टेरेस्ट काय आहे हे शोधायला असतं असं माझं (आता बनलेलं ) मत आहे. There are many things that you don't know you don't know. आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार?

बाकी ते अकरावीला सायन्स कॉमर्स आर्ट्स ही विभागणी चूक आहे असं माझं मत आहे. We try to specialize too early.

गॅरी ट्रुमन's picture

16 Jun 2017 - 5:06 pm | गॅरी ट्रुमन

आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार?

हो नक्कीच. पण आपल्या शालेय अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने विविध गोष्टी दिलेल्या असतात त्यातून त्या गोष्टी नक्की कशाकरता आहेत हा प्रश्न मात्र नक्कीच पडतो. जर का भरभरून गोष्टींचे नुसते गुणधर्म आणि उपयोग दिले पण ते केमिकल समोर दिसले तरी ओळखता येईल यासाठी त्या अभ्यासक्रमात काहीच नसेल तर मग नुसते गुणधर्म आणि उपयोग माहित का करून घ्यावेत हा प्रश्न नंतर पडणारच की.

हे सगळे विषय कमी महत्वाचे आहेत असे नक्कीच नाही. पण इतकी स्पेसिफिक माहिती द्यायला जातात पण एकूणच एखाद्या गोष्टीचा अभ्यास कसा करावा हा दृष्टीकोन तयार होण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमात फारसे काहीही नसते ही तक्रार आहे.

अप्पा जोगळेकर's picture

16 Jun 2017 - 5:11 pm | अप्पा जोगळेकर

जर शाळेत जायचे नाही तर लहान पोरांनी घरी बसून करायचे काय.
चार निरुपयोगी गोष्टी वाचल्याने काय नुकसान होते. शालेय जीवन संपल्यावर आपण कोण्त्याच आर्थिक लाभ न देणार्‍या गोष्ती करत नाही का ?

वरुण मोहिते's picture

16 Jun 2017 - 5:32 pm | वरुण मोहिते

कठीण आहे .

मुक्त विहारि's picture

16 Jun 2017 - 5:43 pm | मुक्त विहारि

गप्प बसण्यापेक्षा,

विचार मांडलेले उत्तम.

शिवाय मिपावरील विचारमंथनातूब किंवा चर्चेतून मला तरी अमृतच मिळालेले आहे. (कुणी प्रतिसादात्मक विष दिले तरी ते वेळप्रसंगी पचवायची मानसीक ताकद पण इथेच मिळालेली आहे.)

तुमचे विचार माझ्यापेक्षा वेगळे असले तरी अयोग्य नक्कीच नाहीत.

उगा काहितरीच's picture

16 Jun 2017 - 7:28 pm | उगा काहितरीच

मला शाळेत गेल्यामुळे लिहीता वाचता आले. आकडेमोड करता आली. भारताचा , जगाचा नकाशा कळतो. (google map वापरता येतो) शिवाजी महाराज कोण होते ? त्यांनी काय काम केले हे कळालं. भारतात निवडणूक कशी होते , राष्ट्रपतीची निवड कशी होते हे कळालं . पृथ्वीवर पाऊस कसा पडतो ? वादळ का येते हे कळालं . पेट्रोल टाकल्यावर वाहन कसे चालते हे कळालं. एकंदरीत भरपूर गोष्टी कळाल्या . हे सोडून पण भरपूर मज्जा केली. शाळेत केलेले उपद्व्याप लिहायला बसलो तर १०० पानांची वही पण कमी पडेल. माझ्या हातात असलं असतं ना जीवनभर विद्यार्थी म्हणून शाळेत आनंदाने गेलो असतो . ;-)

नेहमीच्या शाळेत न गेला असता तर ह्या गोष्टी तुम्हाला आल्या नसता असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय. सध्याच्या शाळा निरुपयोगी आहेत ह्याचा अर्थ असा नाही कि पर्याय फक्त घरी बसण्याचा आहे. खाजगी शिक्षण पद्धती, शिकवण्या, होम स्कुलिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. सरकार खाजगी बोर्ड ना परमिशन देत नाही त्यामुळे विशेष असे पर्याय सध्या उपलब्ध नाही.

होम स्कुलींग हा पर्याय खरोखर इतका उपयोगी आहे काय? त्या पद्धतीचेसुद्धा काही तोटे असतीलच जे शाळेत असं काय शिकवतात या लेबलखाली दुर्लक्षिले जाऊ नयेत असं वाटतं. शाळेत जे सहा सात तास आपल्या वयाच्या, वेगळ्या आर्थिक स्तरातून आलेल्या, घरची वेगळी पार्श्वभूमी असलेल्या, अनेक स्वभावाच्या मुलांशी जुळवून घेण्याची, मित्रमैत्रिणी जोडण्याची जी संधी मिळते ती होम स्कुलींग करणाऱ्या मुलांना कितपत मिळू शकते?किती नाही म्हणल तरी अशा मुलांचं फ्रेंड सर्कल हे सोसायटी किंवा आई वडिलांच्या ओळखीतले यापुरतं मर्यादित होत नाहीये ना हे आईवडिलांनाच जाणीवपूर्वक पहावं लागणार. आय.क्यू इतकाच इमोशनल कोशंटही महत्वाचा आहे. एक काहीतरी कोट आहे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाईल्ड. आपण आधीच टेक्नॉलॉजीच्या अती वापराने मुलांचं समाजाशी असलेलं एक्स्पोजर इतकं कमी करून ठेवलंय त्यात शाळा हे हक्काचं माध्यम त्यांच्याकडून हिरावून घेऊ नये असं वाटतं. मुलांवर किती प्रेशर टाकायचं, त्यांना रॅट रेसपासून कसं दूर ठेवायचं हे पालक म्हणून आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. वेळप्रसंगी शिक्षक चुकीचं वागत असतील तर त्यांनाही चार शब्द सुनावता आले पाहिजेत. मुख्य म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा आपण नकळत त्यांच्यावर लादत नाहीये एवढं लक्षात आलं तरी खूप झालं.

लोनली प्लॅनेट's picture

17 Jun 2017 - 10:09 am | लोनली प्लॅनेट

@ उगा काहीतरीच
तुमच्याशी 100% सहमत
ते गाणं फार आवडतं... "स्कुल चले हम"

इडली डोसा's picture

17 Jun 2017 - 5:22 am | इडली डोसा

पर्यायी शिक्षण पद्धती उपलब्ध असयला काहीच हरकत नसावी. सुजाण पालक आपल्या मुलांना जी शिक्षण पद्धती अनुरुप असेल त्याची निवड करु शकतील.

शाळेत गेल्यावरच मुलाचा एमोशनल कोशंट वाढेल आणि घरी राहुन असं मुलं एकल्कोंड होईल असं म्हणणं सरसकटीकरण ठरेल. शाळेत जाणारा प्रत्येकजण साक्षर होईल पण सुजाण आणि सुसंस्कारीत होईलच असं काही नाही.

अजुन खूप लिहिण्यासारखं आहे. नंतर येऊन लिहिते.

शाळेत गेल्यामुळे काय काय झाले?
एक तर अठरा पगड जातीची मुले वर्गात होती. (हे अर्थात १२ नंतर समजले कि कुणा कुणाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळाले) परंतु शाळेत असताना कोण कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे याने खरंच फरक पडला नव्हता आणि नाही. शेजारी बसणारा मुलगा कुठे राहतो आणि कुठल्या धर्माचा आहे याने काहीच फरक पडत नव्हता. त्याला क्रिकेट चांगले खेळता येते किंवा चित्रकला चांगली आहे किंवा सर्व प्रकारची वाद्ये वाजवू शकतो हे गुण तेवढे महत्त्वाचे असत.
दुसरे शाळेतील मुलांबरोबर खेळताना एक नाते तयार झाले ते केवळ जातीवर आधारित नव्हते तर आर्थिक स्तरावरहि आधारित नव्हते. वर्गात श्रीमंत घरातील मुले होती(सहा रुपये महिन्याची फी भरण्यासाठी एकाच्या वडिलांनी १००० रुपयाची नोट आणली होती ते मला आजही आठवते) तशीच अगदीच वाईट परिस्थितीतील होती. किंवा आमच्यासारखी मध्यम वर्गीय खाऊन पिऊन सुखी पण मुले होती.
आज इतक्या वर्षांनी परत भेटलो तरी जुनाच ओलावा जाणवतो. एक मित्र कापडाच्या दुकानात कामगार म्हणून काम करतो. त्याच्या वडिलांच्या आरोग्य विषयक तक्रारीचा मी सहज निचरा करू शकलो.
केवळ वर्गमित्र म्हणून तुम्ही कुणाला सहज मदत करू शकता. एका मित्राची कंपनी बंद पडल्यावर नोकरी गेली. त्याच्या भविष्य निर्वाह निधीचे काम अडकले होते. मी दुसऱ्या एका डॉक्टर मित्राला फोन केला जो राजस्व खात्यात आहे. त्याच्या मदतीने याचे काही लाख रुपये परत मिळाले.
हा नातेबंध शाळेमुळे सर्वाना एकाच पातळीवर आणले जाते म्हणून निर्माण होऊ शकतो. अन्यथा डून स्कुल सारख्यशाळाही आहेत ज्या फक्त समाजाच्या सर्वात वरच्या स्तरावरील लोकांसाठी आहेत.
सामान्य शाळेत शिकलात कि तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्तराशी नाते जोडू शकता हि वस्तुस्थिती.
मी हुशार विद्यार्थी होतो त्यामुळे पास होणे हा हेतू कधीच नव्हता. पहिला किंवा दुसरा नंबर असे. पण शिक्षकांनी काय शिकवले कि आम्ही गृहपाठ केला कि नाही असा आमच्या वडिलांनी कधीच अभ्यासाबाबत डोक्यावर ताण दिला नाही. त्यामुळे शिक्षण हसत खेळत झाले.
शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही.
teaching and learning are mutually exclusive.

उगा काहितरीच's picture

17 Jun 2017 - 9:03 pm | उगा काहितरीच

शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही

वा ! आवडला विचार . अगदी बरोबर आहे . एकाच शाळेत , एकाच बेंचवर बसणार्या दोन विद्यार्थ्यांपैकी एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो अन् एखादा दरोडेखोर ! शेवटी आपण काय घेतो हेच महत्वाचं .

..... याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही."

आणि

"सामान्य शाळेत शिकलात कि तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्तराशी नाते जोडू शकता हि वस्तुस्थिती."

१०० टक्के मान्य...

स्मिता.'s picture

18 Jun 2017 - 2:49 am | स्मिता.

काही वेगळ्या शारिरीक/मानसिक गरजा असलेली मुलं वगळता तरी बाकीच्या सामन्य मुलांकरता मला 'होम स्कूलिंग' हा पर्याय अजिबात पटत नाही. कारणे खरेकाका आणि आणखी काही सदस्यांनी यांनी दिलेली आहेतच. शाळेत गेल्याने जे अनुभवविश्व मिळतं ते कितीही प्रयत्न करून केवळ 'होम स्कूलिंग' मधून मिळणं मला तरी अशक्य वाटतं. शाळा-शाळांच्यात दर्जा/पद्धतीचा फरक असू शकतो पण म्हणून शाळाच डावलणं हे मला जरा अतिरेकी वाटतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2017 - 12:04 am | डॉ सुहास म्हात्रे

सहमत !

यापुढे अजून एक पाऊल जावून असे म्हणता येईल की, एकाच गावात स्थायिक असलेल्या मुलांचे भावविश्व तेच ते मित्र/नातेवाईक/ओळखिचे इतपत सीमीत राहते. त्यातून सगळे जग तसेच असेल अशी घट्ट धारणा होण्याची व त्यामुळे पुढच्या आयुष्यात अनेक धक्के बसण्याची शक्यता असते.

याविरुद्ध, आईवडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे अनेक गावांतील शाळा-हायस्कूल-कॉलेजमध्ये शिक्षण झाले आणि त्याबरोबरच हॉस्टेलचा अनुभवही गाठीला असला तर भावविश्व अधिकाधिक समृद्ध होते.

दर ठिकाणच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या शिदोरीमुळे, नंतर व्यवसाय-नोकरीसाठी जगभरात कुठेही जायला बुजल्यासारखे होत नाही की भिती वाटत नाही. तिथल्या सगळ्या प्रकारच्या बर्‍यावाईट माणसांशी आणि प्रसंगांशी एकट्याने दोन हात करायची धमक हे अनुभव देतात... तसेच गाव-शहर-राज्य-राष्ट्र यांच्या सीमेपारचे अनेक प्रकारचे खूप मित्रही मिळतात... "हे विश्वची माझे घर" म्हणजे काय असेल याची स्वानुभवाने नकळत कल्पना येते.

अतरंगी's picture

17 Jun 2017 - 10:46 pm | अतरंगी

जर आर्थिकच मोजायचा असेल तर आमच्या लेखी तरी कोट्यवधी मध्ये असेल.

दोन पिढ्यांपूर्वी आमची खायची ददात होती. वडील शहरात आले शिकले नोकरी पकडली. आम्हाला शिकवलं. आम्ही नोकऱ्या करून पोट भरतोय.

या शिवाय मान सन्मान, आदर, माणूस म्हणून वागवलं जाणं, लाचार न होता आयुष्य जगता येणं हे कोणत्या आर्थिक मोबदल्यात मोजता येईल??

आपल्या देशात गरीब, अशिक्षित यांच्या आयुष्यात डोकावलं की आपल्याला शिक्षणाने काय दिलं हे अगदी व्यवस्थित कळतं.

शिक्षणाने आमच्या सारख्याना पैसे आणि रोजगार दिला त्याची किंमत फार कमी आहे. पण शिक्षणाने बाकी जे काही दिलं ते खूप काही आहे.....

जेम्स वांड's picture

17 Jun 2017 - 11:11 pm | जेम्स वांड

डॉक्टर खरेंचे विचार पटलेले आहेत.

महेन्द्र ढवाण's picture

18 Jun 2017 - 12:25 pm | महेन्द्र ढवाण

जर आर्थिकच मोजायचा असेल तर आमच्या लेखी तरी कोट्यवधी मध्ये असेल.

दोन पिढ्यांपूर्वी आमची खायची ददात होती. वडील शहरात आले शिकले नोकरी पकडली. आम्हाला शिकवलं. आम्ही नोकऱ्या करून पोट भरतोय.

या शिवाय मान सन्मान, आदर, माणूस म्हणून वागवलं जाणं, लाचार न होता आयुष्य जगता येणं हे कोणत्या आर्थिक मोबदल्यात मोजता येईल??

आपल्या देशात गरीब, अशिक्षित यांच्या आयुष्यात डोकावलं की आपल्याला शिक्षणाने काय दिलं हे अगदी व्यवस्थित कळतं.

शिक्षणाने आमच्या सारख्याना पैसे आणि रोजगार दिला त्याची किंमत फार कमी आहे. पण शिक्षणाने बाकी जे काही दिलं ते खूप काही आहे.....+११११११

मुक्त विहारि's picture

19 Jun 2017 - 4:05 am | मुक्त विहारि

मित्रा,

त्यासाठी शाळेत जायलाच पाहिजे असे नाही.

आमच्या ओळखीतले एक सदगृस्थ आहेत. त्यांचे नांव मगनलाल पांचाळ.

टोटली अंगूठा छाप.

पण कोणे एकेकाळी डोंबोलीत स्वतःचा फ्लॅट, स्वतःची अंबॅसॅडर, स्वतःचा फोन फोता. (१९६० साली ह्या सर्व गोष्टी घरात असलेला मनुष्य म्हणजे गर्भ श्रीमंत. फ्रीज आणि टी.व्ही. घरात न्हवता कारण लाईत बील जास्त येईल म्हणून.)

त्याची स्वतःची कपनी होती. प्रिमियरला (पद्मिनी आणि फियाट) लागणारे पार्टस बनवायचा.

उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नौकरी. ह्यावर ह्या व्यक्तीचा प्रचंड विश्र्वास.

मारूती आली आणि ह्याने शेती करायला घेतली. मारूती पुढे प्रिमियर आणि अँबॅसॅडर टिकणार नाही. असा ह्याचा होरा होता. व्यवहारज्ञान आणि शिक्षण ह्याचा काहीच संबंध नसतो, असे दर्शवून देणारे पहिले उदाहरण.... (पुढे मग बरेच जण आले, गुलाब शेठ, फारूख भाई, अजित सिंग आणि कंपनी, विटल्या, मघा दादा, अंद्या आणि एस.बी.) यार प्रत्येकाने शिक्षण दहावीनंतर सोडले पण आज प्रत्येक जण वयाच्या ५० नंतर कुठलाचह कामधंदा करत नाहीत.

पुढे प्रिमियर बंद झाली आणि इतर लोकांना बराच प्रॉब्लेम झाले... हा मात्र अद्याप सुखात आहे.

असो,

मगनलाल पांचाळ, ह्या व्यक्ती बाबत बरेच लिहिता येईल पण . ती व्यक्ती हा धाग्याचा विषय नाही.

.

सुबोध खरे's picture

19 Jun 2017 - 9:44 am | सुबोध खरे

मुवि
शाळेत बऱयाच गोष्टी शिकवल्या जातात तशाच "बऱयाच शिकवल्या जात नाहीत" हि वस्तुस्थिती.
व्यवहार ज्ञान शाळेत शिकवले जात नाही हि वस्तुस्थिती. पण यात बराचसा माणसाच्या उपजत गुणांचा भाग आहे. यात स्त्रिया चार पावले पुढे असतात हि हि वस्तुस्थिती.
व्यवहार ज्ञानाबरॊबर व्यावहारिक चातुर्य ( street smartness) हेही शिकवले जात नाही. या दोन्ही गोष्टी "अनुभवांच्याच" शाळेत शिकता येतात.
याशिवाय आर्थिक आणि वित्तीय शहाणपण सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. पैसे मिळवावे कसे हे शिकवले जाते पण पैशाची बचत कशी करावी आणि पैशाची गुंतवणूक कशी करावी हे कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. अगदी B Com च्या अभ्यासक्रमातही नीटसे शिकवले जात नाही.
सुविनियोगात समृद्धी हा मूलमंत्र आपल्या मुलांना शाळेपासून शिकवणे आवश्यक आहे.
पैशाची आणि कालावधीची किंमत काय हे न शिकवल्याने "धंद्याचे गणित" कसे जमवायचे, यात पुस्तकी ज्ञान असलेली मुले मागे पडतात.
या उलट लहानपणापासून आपल्याला धंदा करायचा आहे हि धारणा असलेला आणि त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञानाला महत्त्व देणारा गुजराती समाज आज आर्थिक दृष्ट्या जास्त सुस्थापित आहे.

.........आणि त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञानाला महत्त्व देणारा गुजराती समाज आज आर्थिक दृष्ट्या जास्त सुस्थापित आहे."

ह्यात अजून थोडी भर.

शालेय शिक्षण घेऊन पुढे योग्य ते व्यावसायिक शिक्षण घेव्वुन (जसे इंजिनियरिंग, फार्मसी,एम.बी,ए., ) पुढे धंदा उभा करणारे पण गुजराथी-बनियेच जास्त.

सध्या माझा धाकटा मुलगा कॉलेज मध्ये न जाता फक्त फ्रेंच भाषाच शिकतोय. उगाच ३ वर्षे बी.कॉम. साठी खर्च करण्या पेक्षा त्याच ३ वर्षांत फ्रेंच भाषा शिकून,आणि मग स्वतःचे फ्रेंच भाषेचे क्लास घेवून जास्त आरामात जगेल. मुंबईला जावून २०-२२ हजार रुपये कमावणे आणि घरी क्लास घेवून २० हजार कमावणे , ह्यात घरची कमाईच जास्त फायदेशीर ठरते.

अतरंगी's picture

19 Jun 2017 - 11:20 pm | अतरंगी

सामान्य मुलांमध्ये किती जणांमध्ये इतकं यशस्वी होण्याचे गुण असू शकतात. समाजात असतील 10 ते 15 टक्के असामान्य/ हुशार/ कर्तबगार लोक. पण बाकीचे ?

काही विशेष कला/ गुण/ प्राविण्य नसलेल्या, घरचे भरभक्कम पाठबळ/पैसे/ शेती/ व्यवसाय नसलेल्या लोकांना शिक्षण खूप महत्त्वाचा आधार आहे.

काही असामान्य लोकांच्या ड्रॉप आउट होऊन यशस्वी होण्यामुळे शिक्षणाचे महत्त्व कमी होत नाही.

जर समाजातली 100 टक्के लोकं घेतली जी काही न काही करून हातपाय मारून जगतात तर त्यातील अशी असामान्य उदाहरणे किती असतील ?

पण त्या-त्या व्यक्तीतले असामान्य गूण हेरावे लागतात.

आणि दुर्दैवाने, आज आपल्या पाल्यातील गूण हेरण्यात पालक पण कमी पडतात आणि शाळेतील शिक्षक पण.....

शिवाय ह्या मार्कांच्या शर्यतीत, अंगभूत गूणांकडे दुर्लक्षच केल्या जाते.

देवाची मुले सोडल्यास, (शारिरीक आणि मानसीक दृष्ट्याचे अपंग अपत्यांना, मी तरी "देवाची मुले" असेच म्हणतो.) इतर कुठलाही मुलगा अथवा मुलगी, असामान्यच असतात.

विजुभाऊ's picture

18 Jun 2017 - 12:50 pm | विजुभाऊ

डेरीवेटीव्ह , ईंटीग्रेशन , लिमिट , साईन कॉस वगैरे प्रकरण .००१ टक्के लोक तरी पुढील आयुश्यात वापरतात का हा सम्शोधनाचाच विषय आहे.
तीच गोष्ट इंग्रजी भाषेच्या उच्चारांची हमखास चुकीचे उच्चार शाळेत का शिकवतात कोण जाणे. शाळेतील कितीजणाना डब्ल्यू आणि व्ही यातील उच्चाराचा फरक माहीत असतो? मराठी शाळेत निदान उच्चार थोडेतरी बरे असतात पण गुजराथी उच्चारांबद्दल तर काय सांगावे. उदा: मॅच ला ते मेच म्हणतील बॉल ला बोल म्हणतील होट ला होट म्हणतील पण आवर्जून जोग फॉल्स ला जॉग फोल म्हणतील. स्नॅक ला स्नेक म्हणतील. आणि हॉल ला होल.

शाळा ही केवळ शाळा नसते तर ती आपल्या जीवनाचा पाया असतो. मी बिल्डिंग मध्ये पाचव्या मजल्यावर रहाते त्यामुळे फक्त 1ते 5 मजले महत्वाचे व पायामध्ये रहात नाही त्यामुळे तो कमी महत्वाचा हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेच शाळेत जाऊन काही आर्थिक फायदा मिळतो का हा विचार करणे आहे.
भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही.
मान्य आहे की इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे. त्यामुळे बेस हा असलाच पाहिजे.

मुक्त विहारि's picture

19 Jun 2017 - 3:46 am | मुक्त विहारि

ओके,,,,

पॉइंट नोटेड मिलॉर्ड...

पण मला तरी वैयक्तिक त्याचा काहीच फायदा झाला नाही... पण समाजाचा विचार करता, तुमचा मूद्दा एकदम बरोबर वाटत आहे,

व्यक्ती पेक्षा समाज मोठा असल्याने, तुमचा मुद्दा मान्य करावा लागतोय.

सतिश गावडे's picture

19 Jun 2017 - 11:47 am | सतिश गावडे

इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे.

इंटिग्रेशन, डेंरिव्हेटिव्ह आणि ट्रिगोनोमेट्री हे प्रत्यक्ष जीवनात कुठे वापरत असावेत हे इंजिनियरिंगला असताना कधीच कळले नाही. शिक्षण संपल्यावर इअडी (इन्सर्ट अपडेट डिलीट) डेव्हलपर झाल्यावर कधी यांची गरज भासली नाही.

जेम्स वांड's picture

19 Jun 2017 - 7:32 pm | जेम्स वांड

भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही.

ह्या उदाहरणाचे जिवंत 'रियलायझेशन' अनुभवायाचं असलं तर मायबोलीवर डॉक्टर शिंदेंच्या 'निदानचातुर्य कथा' आहेत त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा. एखादी विषबाधेची केस, तशीच दुसरी तिसरी आल्यावर सगळे रोगी एकाच भागातले असण्याचे केलेलं प्राथमिक निदान नंतर त्या भौगिलीक भागात मिळणाऱ्या विषारी वनस्पती, त्यातल्या कुठल्या वनस्पतीच्या सेवनाची लक्षणं रोगी दाखवत आहेत हे ठरवून रुग्णांचा जीव वाचवणे ह्यात 'भूगोल' 'वनस्पतीशास्त्र' वगैरे कितीतरी विषय येतील शाळेत शिकलेले.

*इतर संस्थळांवरच्या लेखनाचा उल्लेख धोरणात बसत नसल्यास संपादक सादर प्रतिसाद उडवायला मुखत्यार असतील.

माहितगार's picture

19 Jun 2017 - 9:51 am | माहितगार

धागा लेखातील उपहास, शैक्षणिक क्षेत्रातील कमतरतांवर बोट ठेवतो हे खरे पण शालेय शिक्षणाचा उपयोगच काय म्हणणे म्हणजे, बाळाला न्हाऊ घातलेले अस्वच्छ पाण्यासोबत बाळाला पण टाकून देण्याचा विचार आहे. धागा लेखक शेती करतात, शेती संबंधीत आर्थीक व्यवहार, परागी करण, संकरीत वाणे ते जेनेटी मॉडीफाईड उत्पादने, खते आणि किटक नाशकातील रासायनिक पदार्थांचे नियोजन, शेती मालाची विपणन आणि निर्यात, नवे तंत्रज्ञान, सहकार ते शासन यंत्रणांशी सहसंबंध अशा अनेक क्षेत्रांची माहिती घेताना सहसंबंध प्रस्थापीत करुन उपभोग घेताना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शालेय शिक्षणातील ज्ञान उपयूक्त ठरते. लेखातील मुद्दे खोडण्यासाठी या मुद्यांवर अधिक विस्तारपूर्वक लिहिता येईल.

एका देशातून दुसर्‍या देशात तयार कपडे निर्यात करावयाचे असतील तर दुसर्‍या देशाती हवामान ते संस्कृती इत्यादी गोष्टींची माहिती असावी लागते. डॉक्टरांशी संवाद साधताना शरीरशास्त्र महत्वाचे असते. ग्रहणासारख्या गोष्टीं बद्दलच्या अंधश्रद्धा शिक्षणामुळेच दूर झालेल्या आहेत.

किंबहूना धाग्याचा मूळ उद्देश पण तोच आहे....

"बाळाला न्हाऊ घातलेले अस्वच्छ पाण्यासोबत बाळाला पण टाकून देण्याचा विचार आहे. "

हा असा समज झाल्या असल्यास क्षमस्व. पण बाळा अंघोळ घालायची असेल तर अस्वच्छ पाणी वापरू नका, असेच मला सांगायचे होते, पण कदाचित मलाचह ते सांगायला जमले नसेल.

आणि

शेती संदर्भात कुठलेही सालेय शिक्षण मला तरी व्यवहारात उपयोगी पडले नाही, इतर शेतकर्‍यांच्या बाबतीतले मला माहीत नाही. शिवाय शेती हे मी माझे उदाहरण म्हणून दिले. शेती शिवाय ही इतर अबेक उद्योग करणारे पण इथे बरेच जण असतीलही, उदा. सोनारकाम, शिवणकाम. सुतारकाम इत्यादी.

धागा वाचून माझ्या शाळेची आठवण झाली. शाळेने आम्हाला सगळं उपलब्ध करून दिलं. ज्याला खेळायची आवड आहे त्याच्यासाठी अवाढव्य ग्राऊंड, ज्याला नाटकाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम बालनाट्य करणारे शिक्षक, वाचायची आवड असणार्‍यासाठी ग्रंथालय, बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेल्यासाठी बॅडमिंटन हॉल कोचिंगसह, यादी अमर्याद आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमुक कर किंवा तमुक करू नकोस याची सक्ती बिलकुल केली नाही. एखाद्याने एखाद्या गोष्टीत रस दाखवला आणि शाळेने दोन पावलं पुढे जाऊन त्याला सर्वतोपरी मदत केली अशी कैक उदाहरणं आहेत. पण त्या पोरट्याने विविध गोष्टी किमान एकदा तरी करून आपल्याला काय आवडतंय याचा अदमास घेणं आणि तसं तोंड उघडणं महत्त्वाचं.

त्यामुळे शाळेत जाऊन एक गोष्ट शिकलो - एखादी गोष्ट हवी असेल तर तोंड उघडून विचारणे. भिडस्त राहून काहीही होत नसतं. या सवयीने आर्थिक आणि अन्यही फायदा झाला आहे.

मुक्त विहारि's picture

19 Jun 2017 - 7:02 pm | मुक्त विहारि

"ज्याला खेळायची आवड आहे त्याच्यासाठी अवाढव्य ग्राऊंड, ज्याला नाटकाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम बालनाट्य करणारे शिक्षक, वाचायची आवड असणार्‍यासाठी ग्रंथालय, बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेल्यासाठी बॅडमिंटन हॉल कोचिंगसह, यादी अमर्याद आहे."

पुढील भारतीय पिढी घडवायची असेल तर प्रत्येक शाळेत ह्या गोष्टी तरी हव्यातच. पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का?

आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का?

केवळ शिक्षण सक्तीचे केल्याने माणसे सुशिक्षित होतीलही, पण त्यांची सामाजिक जडणघडण आणि त्यांची मानसीक सक्षमता जर विकसीत होत नसेल तर नुसतेच लिहायला=वाचायला येवून काय फायदा?

मध्यंतरी "संस्कृतीरंग" नावाचे एक पुस्तक वाचले होते, त्यात त्यांनी जर्मनीतल्या प्राथमिक शिक्षणात, रहदारीचे नियम, सार्वजनिक ठिकाणी वावरायचे नियम, घरातील स्वच्छता, शाळेत शिवली जाते, असे लिहिले आहे. आज तरी जर्मनीत तिथले स्थानिक लोक रहदारीचे नियम कटाक्षाने पाळतात. (स्त्रोत जर्मनी मध्ये राहणारा मित्र.)

तुम्ही खरंच नशीब वान आहात....

अगदी अगदी. कुठल्या सुमुहूर्तावर मला त्या शाळेत घालायचं माझ्या आईबापांच्या डोक्यात आलं काय माहीत. एका ज्येष्ठ मिपाकराची आई आम्हाला शिकवायला होती.

पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का?

आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का?

आपल्याला प्रत्येक शाळेशी काय देणंघेणं आहे? तशी शाळा शोधायची आणि आपल्या पोराबाळांना त्यात घालायचं. विषय कट.

(असा विचार प्रत्येकाने केला तर आपोआप सगळ्या शाळा लायनीवर येतील.)

जेम्स वांड's picture

19 Jun 2017 - 7:35 pm | जेम्स वांड

त्यामुळे शाळेत जाऊन एक गोष्ट शिकलो - एखादी गोष्ट हवी असेल तर तोंड उघडून विचारणे. भिडस्त राहून काहीही होत नसतं. या सवयीने आर्थिक आणि अन्यही फायदा झाला आहे.

भुकेपोटी टाहो फोडला नाही तर साक्षात जन्मदात्रीसुद्धा पदराखाली घेत नाही, ही हल्लीच ऐकलेली अस्सल जहाल म्हण आठवली बघा...!!

सतिश पाटील's picture

19 Jun 2017 - 2:48 pm | सतिश पाटील

http://www.misalpav.com/node/40012
आमच्या ह्या वरील धाग्यावरून तुम्हाला नविन धाग्याची प्रेरणा मिळाली , हे वाचून डोळे पाणावले माझे....

मुक्त विहारि's picture

19 Jun 2017 - 7:04 pm | मुक्त विहारि

तुम्ही धागा काढल्याने मनांतले विचार लिहायला कारण मिळाले...

तुम्हाला राग आला असल्यास क्षमस्व.

सतिश पाटील's picture

20 Jun 2017 - 11:15 am | सतिश पाटील

नाही हो राग येण्याचे काही कारणच नाही..
गंमत केली जराशी...