गीता नामक एक पंचिंग बॅग

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
14 Jun 2017 - 12:18 pm
गाभा: 

गीता तत्वज्ञान : काही प्रश्न
भाग -1

1

काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा...
शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले. त्यातील काही विचार ‘अध्यात्म विषयावर वेबसाईट निर्माणाधीन आहे’ हे वाचताना आठवले, म्हणून हा धागा...असो.
इथल्या अनेकांना अशा विषयांवर लिहायला सुरसुरी येते आणि हजारो नविन सदस्यांना विचार व्यक्त करायला मिळावेत म्हणून या लहानशा पण चविष्टपणे सादर केलेल्या पुस्तकातील काही प्रश्नांना हप्त्या हप्त्याने सादर करू इच्छितो.
श्री. शरद सोवनी त्यात म्हणतात, " ... गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात ( गीता महात्म्य सांगणाऱ्या पद्मपुराण वगैरेतील कथा मधील महापातकी व्यक्तींप्रमाणे) गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मींची सर्व पापे नष्ट होऊन तात्काळ मोक्ष पावणे तर सोडाच परंतु जाणीवपुर्वक गीतेचे नीट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे ‘मला मोक्ष प्राप्त लाभला’ असे छातीठोकपणे सांगणारा कुणी आहे का? नसेल तर गीतेचा आणि मोक्षाचा काही संबंध नाही असे म्हटले पाहिजे. (एखाद्या व्यक्तीस 'मोक्ष प्राप्त झाला आहे अथवा नाही' हे बाह्य लक्षणांवरून इतरांना ओळखणे कठीण वा अशक्य असले तरी स्वतः त्या व्यक्तिला तरी ते कळायला हवे. मात्र अशी घोषणा केल्यास मोक्ष मिळाला म्हणजे नेमके काय झाले? हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.)..."
त्यांच्या या निवेदनावरील आपली मते वाचायला आवडतील.
श्री. शरद सोवनी हे मिपाकर आहेत. त्यांना वाटले तर ते आपली तशी ओळख करून देतीलही...!

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

14 Jun 2017 - 12:28 pm | गॅरी ट्रुमन

इतरांना मोक्ष मिळाला किंवा नाही मिळाला तरी आपल्यात काय फरक पडतो? त्यामुळे असले प्रश्न विचारून उपयोग काय? या प्रश्नांमधून आणि त्यांच्या उत्तरांमधून काहीही साध्य होणे नाही. भगवद्गीता (किंवा अन्य काहीही) उपयुक्त वाटत असेल तर ते आचरावे नाहीतर सोडून द्यावे. हाकानाका

शशिकांत ओक's picture

14 Jun 2017 - 12:34 pm | शशिकांत ओक

खरे आहे की... काही साध्य व्हावे म्हणून नाही तर वैचारिक कुस्तीला हा पट मांडला आहे...

गामा पैलवान's picture

14 Jun 2017 - 7:22 pm | गामा पैलवान

शशिकांत ओक,

गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले ....

या दाव्यात तथ्य काय? श्रीकृष्णाने असं काही सांगितलं नव्हतं.

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

15 Jun 2017 - 4:52 pm | शशिकांत ओक

इतरांचे तसे दावे असतात. असे लेखक मानतात.

माहितगार's picture

15 Jun 2017 - 5:16 pm | माहितगार

आपण मूळ लेखकाच्या लेखनाचा काही भागच दिला आहे, तो प्रॉपरली काँटेक्स्टेद आहे की नाही हे इतर प्रतिसाद देणार्‍यांना पूर्ण पुस्तक न वाचता कसे उमगणार हा प्रश्न शिल्लक राहतो.

तरी पण प्रथम दर्शनी मरणोपरांतच्या दाव्यांबद्दल प्रश्न चिन्हे उपस्थित न करणारे अस्तिक (मरणो परांत स्थितीत काहीतरी असते यावर विश्वास ठेवणारे) एकमेकांना सहज पणे असे प्रश्न उपस्थित करु शकत नाहीत आस्तिकांनी असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे काचेच्या घरात राहून दुसर्‍याच्या घरावर दगड फेकण्यासारखे होईल. म्हणजे लेखक बहुधा नास्तिक असतील तर त्यांनी त्यांच्या पुस्तीकेत तसे कदाचित स्पष्ट केले असण्याची शक्यता अधिक कारण नास्तिक -प्रत्येक वेळी नाही- पण सहसा रॅशनल ठरवले जाण्याच्ता प्रयत्नात असतात.

मरणोपरांत अमुक एक स्थिती प्राप्त होते यावर अस्तिक केवळ त्यांच्या विश्वास आणि श्रद्धेवर अवलंबून असतात.

माहितगार's picture

15 Jun 2017 - 5:57 pm | माहितगार

नास्तिक व्यक्ति सहसा तर्क प्रधान असतात. पण प्रस्तुत लेखकाच्या अनवधानाने त्यांच्या विधानात बर्‍याच तार्कीक उणीवा शिल्लक असाव्यात त्यांनी मांडणी काहीशी वेगळी करावयास हवी होती असे वाटते. विधान पुन्हा वाचून पहावे.

" ... गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात ( गीता महात्म्य सांगणाऱ्या पद्मपुराण वगैरेतील कथा मधील महापातकी व्यक्तींप्रमाणे) गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मींची सर्व पापे नष्ट होऊन तात्काळ मोक्ष पावणे तर सोडाच परंतु जाणीवपुर्वक गीतेचे नीट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे ‘मला मोक्ष प्राप्त लाभला’ असे छातीठोकपणे सांगणारा कुणी आहे का? नसेल तर गीतेचा आणि मोक्षाचा काही संबंध नाही असे म्हटले पाहिजे. (एखाद्या व्यक्तीस 'मोक्ष प्राप्त झाला आहे अथवा नाही' हे बाह्य लक्षणांवरून इतरांना ओळखणे कठीण वा अशक्य असले तरी स्वतः त्या व्यक्तिला तरी ते कळायला हवे. मात्र अशी घोषणा केल्यास मोक्ष मिळाला म्हणजे नेमके काय झाले? हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.)..."

खालील श्लोकासोबत गंमत बघा

मूळ श्लोक

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, मे = माझा, जन्म = जन्म, च = आणि, कर्म = कर्म, दिव्यम्‌ = दिव्य अर्थात निर्मल व अलौकिक आहेत, एवम्‌ = अशाप्रकारे, यः = जो मनुष्य, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणून घेतो, सः = तो, देहम्‌ = शरीराचा, त्यक्त्वा = त्याग केल्यावर, पुनः जन्म = पुनर्जन्माला, न एति = येत नाही, (सः) = तो, माम्‌ = मलाच, एति = प्राप्त करून घेतो ॥ ४-९ ॥

अर्थ

हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. ॥ ४-९ ॥

एखादा (तथाकथीत) अवतारी पुरुष सहज म्हणू शकेल की मागच्या जन्मीच्या अ, ब, क, ड या व्यक्ति मोक्ष प्राप्त करुन माझ्यात विलीन झालेल्या आहेत. माझा हा नवा अवतार झाला आहे. मोक्ष म्हणजे 'शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो.'

आता अवतारी पुरुष अवतारी नाही आणि अ,ब,क, ड व्यक्ती येऊन विलीन झाल्या नाहीत हे दाखवण्याची जबाबदारी नास्तिकाची असते. प्रत्यक्ष जिवंत व्यक्तिस चमत्कार करणे तसे बर्‍याचदा अवघड असते म्हणून नास्तिकांना शंका घेण्यास जागा रहाते. पण जी व्यक्ति आता जिवंतच नाही तिच्या नावाने कुणी/ पुस्तकाने दावा केला तर तुम्ही तो खोडणार कसा ? कृष्ण आणि गीता कथासूत्राची (नरेटीव्हची) आणि अशा बर्‍याच धार्मीक नरेटीव्हची ही स्ट्राँग बाजू असते.

ओके....

मान्यवरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

दुसरी बाजू तेल लावून तयार होत असेल ;)

मुक्त विहारि's picture

14 Jun 2017 - 8:20 pm | मुक्त विहारि

अहं ब्रह्नास्मी म्हणायचे आणि कळफलक बडवत सुटायचे....

हा का ना का...

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2017 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

"अहं ब्रह्नास्मी" आता जुनं झालं; हल्ली "अहं ब्रम्हालापण शिकवास्मी" इतपर्यंत मजल पोचलेली आहे. =))

मुक्त विहारि's picture

14 Jun 2017 - 8:32 pm | मुक्त विहारि

ठ्ठो

गडबडा लोळणारी स्मायली कल्पावी....

स्वगत : आजकाल हे स्मायली बाबा, कुठे गेले?

शशिकांत ओक's picture

15 Jun 2017 - 4:55 pm | शशिकांत ओक

ठ्ठो... स्मायली बाबा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2017 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोक्ष म्हणजे "पृथ्वीवरील जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका" असे आहे ना ?

मग, मोक्ष मिळालेली व्यक्ती इथे पृथ्वीवर ते सांगायला आस्तित्वात कशी राहील* ???!!! :D

* : याची करॉलरी अशी : मोक्ष मिळतो की नाही, याची खात्री करण्यासाठी, स्वतः मोक्ष प्राप्त करून, मोक्ष प्राप्त झालेल्यांना 'भेटणे / न भेटणे' जरूर आहे. लेखातल्या प्रश्नाचे उत्तर हवे असलेल्या इच्छुकांनी तसा प्रयत्न करून पहावा :)

शशिकांत ओक's picture

15 Jun 2017 - 5:00 pm | शशिकांत ओक

आधी मरा आणि स्वर्गातील हूर शी मजा मारा. मोक्षाची कशाला चिंता.?

संदीप डांगे's picture

14 Jun 2017 - 9:27 pm | संदीप डांगे

गीता हे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आहे. प्रिस्क्रिप्शननुसार औषधोपचार पथ्यापथ्य पाळून केला तर गुण येतो. प्रिस्क्रिप्शनची गुळगुळीत कागदावर छापून दिवसंरात्र पारायणे फकस्त केल्याने गुण येत नाही.

-कठीण समयी गीतेने गुंता सोडवलेला एक मोक्षगामी जीव.

(यापेक्षा अधिक बोलणार नाही. इत्ता बस है.)

प्रचेतस's picture

14 Jun 2017 - 10:42 pm | प्रचेतस

गीता कर्मयोगपर ग्रंथ आहे.

रामपुरी's picture

15 Jun 2017 - 2:58 am | रामपुरी

चला, दुसरे स्वामीजीपण अवतरले. आता आम्हाला नक्कीच मोक्ष मिळेल.

रच्याकने , नाडीमध्ये मोक्षाबद्दल काही लिहिलेले असते का? म्हणजे बघा, नाडीमध्ये सगळ्या आयुष्याचा लेखाजोखा असतो (असे काही लोक मानतात). तर अमुक एवढी पुण्ये नाडीत असतिल तर मोक्ष नाहीतर येणार परत पृथ्वीवर असा एक प्रोग्रामच लिहिता येईल. काय म्हणता

शशिकांत ओक's picture

15 Jun 2017 - 5:26 pm | शशिकांत ओक

अन मग नाडीग्रंथातील कथनांबद्दल बोला. ही विनंती.

शशिकांत ओक's picture

15 Jun 2017 - 5:27 pm | शशिकांत ओक

अन मग नाडीग्रंथातील कथनांबद्दल बोला. ही विनंती.

माहितगार's picture

15 Jun 2017 - 9:38 am | माहितगार

आमाची धागा जाहीरात लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

मी मराठी आणि संस्कृत दोन्ही विकिस्रोत प्रकल्पातील श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या अध्यायांवर मोक्ष शब्दाने शोध घेतला तर मलातरी केवळ चार श्लोक आढळले. मराठी विकिस्रोतात संबंधीत श्लोकांचे सुलभ मराठी गद्य अनुवाद दिसतात ते इथे खाली उधृत करत आहे. डायरेक्ट स्पेसिफीक श्लोक वाचन बर्‍या पैकी आऊट ऑफ काँटेक्स्ट होऊ शकते. त्यासाठी जिज्ञासूंनी श्लोकाच्या मागचे पुढचे बर्‍यापैकी श्लोक वाचण्याची गरज असू शकते. खास करुन कर्म आणि यज्ञ या शब्दाच्या प्रत्यक्ष व्याख्या अधिक व्यापक स्वरुपाच्या असाव्यात असे वाटते. दिलेले अनुवाद केवळ प्राथमीक स्वरुपाची मदत समजावेत. अनुवाद मी केलेले नाहीत त्यात चुकाही किंवा त्याबद्दल मतभेदांची शक्यता असली तर असू शकते.

सोबत संस्कृत जाणकारांच्या सोईसाठी ज्ञानकर्मसंन्यासयोगः या संस्कृत विकिस्रोतातील अध्यायाचा दुवा देत आहे कारण संस्कृत विकिस्रोतातील प्रस्तुत पानावर डझनभर संस्कृत पंडीतांची भाष्ये एका खाली एक दिलेली आहेत.

श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)

मूळ श्लोक

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥

अर्थ

कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥

मूळ श्लोक

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एवम्‌ = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान्‌ = ते, सर्वान्‌ = सर्व, कर्मजान्‌ = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील ॥ ४-३२ ॥

अर्थ

अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. ॥ ४-३२ ॥
श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)

मूळ श्लोक

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), प्रवृत्तिम्‌ = प्रवृत्तिमार्ग, च = आणि, निवृत्तिम्‌ = निवृत्तिमार्ग, कार्याकार्ये = कर्तव्य आणि अकर्तव्य, भयाभये = भय व अभय, च = तसेच, बन्धम्‌ = बंधन, च = आणि, मोक्षम्‌ = मोक्ष हे सर्व, या = जी बुद्धी, वेत्ति = यथार्थपणे जाणते, सा = ती, बुद्धिः = बुद्धी, सात्त्विकी = सात्त्विक आहे ॥ १८-३० ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. ॥ १८-३० ॥

मूळ श्लोक

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्वधर्मान्‌ = सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे यांचा, (मयि) = माझ्या ठायी, परित्यज्य = त्याग करून, एकम्‌ माम्‌ = सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मज एका परमेश्वरालाच, शरणम्‌ = शरण, व्रज = ये, सर्वपापेभ्यः = सर्व पापांतून, अहम्‌ = मी, त्वा = तुला, मोक्षयिष्यामि = मुक्त करून टाकीन, मा शुचः = तू शोक करू नकोस ॥ १८-६६ ॥

अर्थ

सर्व धर्म म्हणजे सर्व कर्त

व्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. ॥ १८-६६ ॥
दिक्चालन यादी

* मराठी विकिस्रोतात सुलभ मराठी अनुवादासहश्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)

** संस्कृत विकिस्रोतात संस्कृत पंडीतांच्या संस्कृत भाष्यांसहीतभगवद्गीता/ज्ञानकर्मसंन्यासयोगः

*मराठी विकिस्रोतात सुलभ मराठी अनुवादासह श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)

: मी या क्षेत्रातला जाणता नाही चुभूदेघे. उत्तरदायीत्वास नकारलागू . मी प्रतिसादात वापरलेल्या मराठी इंग्रजी शब्द बद्दल तसेच शुद्धलेखन विषयक सूचना देण्याचे टाळण्यासाठी आभार

शशिकांत ओक's picture

15 Jun 2017 - 5:58 pm | शशिकांत ओक

सविस्तर माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ..

माहितगार's picture

15 Jun 2017 - 7:37 pm | माहितगार

हम्म मी वरच्या एका प्रतिसादात माहित नसलेली कल्पना खोडणे कसे अवघड जाते याची मांडणी केली, तरीही अज्ञेय आणि नास्तिकांसाठी आणि (खरेतर अगदी आस्तीकांसाठीही) शेवटी तुम्ही जिवन कसे जगला हे मॅटर करते, हे लक्षात आणून देऊन स्वर्ग, मोक्षादी कल्पना खरेच किती महत्वाच्या आहेत ?" एवढा प्रश्न विचारणे पुरेसे ठरते, गरजे नुसार शब्दप्रामाण्याला इतर सबळ आव्हाने देता येतात. पण तुम्ही धागा लेखात दिलेल्या विधानातून ते लेखक महोदय प्रत्यक्ष प्रमाण मागण्याच्या प्रयत्नातून निष्कारण गुरफटले जातात आणि त्यांचा हेतुही साध्य होताना दिसत नाही. असो.

माहितगार's picture

15 Jun 2017 - 7:43 pm | माहितगार

ओ ! माझ्या लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या कवितेच्या धाग्याची जाहीरात करावयाची राहीली की,

....
जायचे इथे तिथे, कुठे कुठे कोरड्या कल्पना
मिथकात मिथक होऊनी फुकाच्या वल्गना

व्यर्थवेळ मोक्षाचे भोक मोजतो कुठे ?
आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला

लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या
आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला

- लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या