माथाडी कामगार - काही प्रश्न

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
10 Jun 2017 - 8:34 pm
गाभा: 

"माथाडी कामगार" हा शब्दप्रयोग काहीवेळा पेपरात वाचला होता, पण कधी यावर विचार नव्हता केला.

आज " स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून खंडणी वसूल "
http://www.esakal.com/pune/pune-news-marathi-news-maharashtra-news-pimpr...

ही बातमी वाचून हे "माथाडी कामगार" प्रकरण काय आहे , हे जाणून घेण्याची उत्सुकता वाटली.

https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-mathadi-boards-mr.htm
या सरकारच्या साइटनुसार

"माथा" म्हणजे डोके. ओझे वाहून नेण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे माथाडी.माथाडी कामगार ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे. अशासारखी अन्य कामे करतात. डोक्यावरून ओझे वाहून नेणा-या कामगारास माथाडी कामगार म्हणतात.

हमाल व माथाडी कामगार यांना योग्य वेतन आणि अटीनुसार कामाच्या अन्य सुविधा मिळत नव्हत्या. मालकांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत.१९६६ मध्ये कै.माननीय आण्णा साहेब पाटील यांनी माथाडी कामगार व मुंबई मधील इतर बाजारातील त्याच्या नेत्यांना एकत्र केले. माथाडी कामगार यांनी कायद्याच्या एका भागात यावे अशी मागणी केली.खूप दिवसाच्या संघर्षानंतर आणि समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करता,महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील यासाठी कायदा बनविला तो नियम म्हणजेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

..

माथाडी कामगारांनी प्रत्येक महिन्याला मंडळाकडून मासिक वेतन मिळायला लागली.्याबरोबर भविष्य निर्वाह निधी, उपदान, व वैदकीय लाभ, बोनस, सुट्टी वेतन इ. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात बदल झाला

ही माहिती वाचून मला काही प्रश्न पडले. कोणाला यासंबंधी अधिक माहिती असल्यास द्यावी.

1. फक्त हमाल/माथाडी कामगारांसाठी सरकारने वेगळे नियम का केले? घरोघरी फरशी पुसणे, स्वयंपाक करणे हे काम करणाऱ्याना (बहुतांश महिला) यांना माथाडी कामगारांसोबत का नाही जोडले?

2. प्रायव्हेट बांधकामाच्या वेळी काम करणारे मजूर "माथाडी कामगार" असतात का? त्यांना पण सरकारकडून वेगळे मासिक वेतन मिळते का?

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

11 Jun 2017 - 12:52 pm | Ranapratap

याना असंघटित कामगार असे संबोधले जाते. या साठी वेगळे कायदे व सुविधा केंद्र सरकारने केल्या आहेत. पण यांची कोणतीही शिखर संघटना व कोणत्याही नेत्या कडून सरकार मान्यता प्राप्त मंडळ नाही, त्यामुळे सरकारी योजना यांच्या पर्यंत पोहचत नाहीत.

अत्रे's picture

11 Jun 2017 - 5:21 pm | अत्रे

माहितीसाठी धन्यवाद.

माथाडी कायद्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्या खालीलप्रमाणे,

१. कोणीही उठसूट माथाडी मंडळाकडे टोळीची नोंदणी करतो आणि टोळीमध्ये स्थानिकांएवजी परप्रांतीय कामगार भरती करतो. त्यामुळे मूळ माथाडी कायद्यालाच हरताळ फासला गेला आहे.
२. माथाडी टोळ्या संघटित दादागिरी करुन कामाची वाराई वसूल करतात. वाराई माथाडी कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे कुठेही तक्रार करता येत नाही.
३. एखाद्या विभागात माथाडी टोळी कार्यरत असेल, तर त्यांच्याकडूनच सामान ट्रकमध्ये लोड करणे अथवा उतरवणे ही कामे अव्वाच्या सव्वा किंमत देऊन करुन घ्यावी लागतात. नाहीतर वाराई द्या आणि दुसर्‍या मजुरांकरवी काम करुन घ्या, असा प्रकार होतो.

दशानन's picture

11 Jun 2017 - 9:31 pm | दशानन

वाराई म्हणजे हप्ता??

रघुनाथ.केरकर's picture

12 Jun 2017 - 11:49 am | रघुनाथ.केरकर

माझा वाशी मार्केटचा आनुभव सांगतो,

मी दर शनीवारी ३० किलोचे २० ते २५ बॉक्स माझ्या गाडीतुन वाशी एपीएमसी मार्केट ला घेउन जातो, गेट वर एंट्रीकरुन आत गेल्यावर, एफ गल्ली ला आपल्या व्यापार्‍याकडे गाडी लावली की. व्यापार्‍याचा हमाल (ह्या हमालाला व्यापारी पगार देत असतो) वारणर अब्दुल माझ्या मोबाइल वरुन कॉल करतो. मग १५-२० मिनिटान५०पन्नाशिचा अब्दुल भाइ एक तीशीतला हमाल घेउन हजर होतो. मग अब्दुल भाइ एकदा आमच्या टेंपोच्या आत झाकुन बघतात, आणी तीशीतल्या हमालाला इशारा करतात. मग तो हमाल काही गाडीत चढत नाही त्याला मी आतुन बॉक्स काढुन द्यायचे, पुढे ते बॉक्स उचलुन व्यापार्‍याच्या हमालाच्या डोक्यावर उचलुन देतो. अब्दुल भाइ तीथेच धक्क्यावर बसुन बॉक्स मोजत असतो. मोजता मोजता एखादी बिडी शिलगवणार. सगळे बॉक्स संपले की उचलले गेलेले बॉक्स गुणीले साडेसात रुपये हिशोब मांडतो आणी अधिकची राउंड फिगर करुन सांगतो. मग मी उगचच " बस क्या" पैचाने नही क्या, अपना रोज का तो हय" वैगरे टिन पाट निगोशीएशन्स चे पैतरे वापरतो. पन ते बेन बिल्कुल बधत नाही. पण मी एक्झॅक्ट अमाऊंट हातावर टेकवतो.

ह्या वरच्या प्रकारात जे साडे सात रुपये मी त्याला एक बॉक्स उचलायला दीले होते ती त्याची वाराई. जर त्यानी ते बॉक्स गाडीतुन काढुन आतल्या व्यापार्‍याच्या हमालाला दीले अस्ते तर त्याने मला पर बॉक्स १५ रुपये चार्ज केले असते. वरुन त्या दोघाना चहा पाजायला लागला अस्ता तो वेगळा. आणी हे एवढे देउन सुधा व्यापार्‍याच्या हमालाला चा पान्याला धा इस रुपये टेकवावे लागतात. नाहीतर साहेब गाडी लावायल दोन तीन तास लावतात.

विजुभाऊ's picture

13 Jun 2017 - 12:03 am | विजुभाऊ

हा हा हा.....
त्याला फक्त तीच एक वेल मिळते तुम्हाला नडायला.
ईतर वेळेस त्याची फरफटच होत असते. त्याने फायदा का घेऊ नये.

तसेही ही खास भारतीय वृत्ती आहे. याचा आदर्श कोर्टात वकीलच देत असतात.
असो.