मत्सर

सन्घमित्रा's picture
सन्घमित्रा in काथ्याकूट
7 Jun 2017 - 7:04 pm
गाभा: 

माणूस हा सामाजिक प्राणी आहे . काही नाते संबंध त्याला जन्मतः मिळतात तर काही तो निर्माण करतो .काही नाते संबंध टाळता येतात तर काही नाही . काही नाते संबंधाना इच्छा नसताना हि तोंड द्यावे लागते . मानवी मन हे अजब आहे त्यात अनेक भाव भावनांचे मिश्रण आहे. एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात. काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो . अश्या ना टाळता येणाऱ्या लोकांना कसे सामोरे जावे .कधी कधी आपल्यालाही त्या व्यक्तीं बद्दल द्वेष वाटू लागतो . ह्या मानसिक त्रास पासून कसे मुक्त व्हावे

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Jun 2017 - 8:01 pm | प्रचेतस

तुमच्या सदस्यनामातूनच तुम्हाला बोध घेता येण्यासारखा आहे.

एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात. काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो .

हे सगळं तुम्हाला कसं काय कळतं?

पुंबा's picture

8 Jun 2017 - 12:20 pm | पुंबा

+++१११

सतिश गावडे's picture

7 Jun 2017 - 9:36 pm | सतिश गावडे

एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात. काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो . अश्या ना टाळता येणाऱ्या लोकांना कसे सामोरे जावे .कधी कधी आपल्यालाही त्या व्यक्तीं बद्दल द्वेष वाटू लागतो . ह्या मानसिक त्रास पासून कसे मुक्त व्हावे

अशा वेळी आपणही "गोबोगामा" म्हणजेच "गोड बोलून गालावर मारा" तत्व आचरणात आणावे.

जे लोकं आपल्याबद्दल इर्षा / मत्सर / द्वेष असले गुण बाळगून असतात त्यांना फाट्यावर मारा आणि पुढे चालू लागा. जितक्या लवकर पुढे चालू लागाल तितके आयुष्य सुखकर होईल.

आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगा.

.

अजित खोडके's picture

8 Jun 2017 - 12:27 am | अजित खोडके

अश्या लोकांसाठी नंगटपणा अंगी बाळगण्याने सुंठीवाचून खोकला जातो असा प्रत्यक्ष अनुभव आहे..

संजय क्षीरसागर's picture

8 Jun 2017 - 1:52 am | संजय क्षीरसागर

काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो . अश्या ना टाळता येणाऱ्या लोकांना कसे सामोरे जावे .कधी कधी आपल्यालाही त्या व्यक्तीं बद्दल द्वेष वाटू लागतो . ह्या मानसिक त्रास पासून कसे मुक्त व्हावे

असे लोक इथे सुद्धा भेटतील ! :) इन फॅक्ट असे लोक नाहीत असं ठिकाणंच नाही कारण जोपर्यंत मनात `दुसरा' आहे तोपर्यंत कंपॅरिजन अटळ आहे. कंपॅरिजन हे द्वैताचं फलित आहे आणि मत्सर हा कंपॅरिजनचा परिणाम आहे .

वरचा मुद्दा कळून सुद्धा डोक्यावरुन गेला असेल ना ? जाऊं द्या ! कारण तो अध्यात्मिक आहे.

आता साधं लिहीतो :

तुम्ही दुसरा टाळू शकत नाही. थोडक्यात, अशा व्यक्ती जीवनात येणारच. किंबहुना तुमची एकदम नेत्रदिपक प्रगती झाली तर जे आतापर्यंत हितचिंतक वाटत होते ते पण रंग बदलतील. कारण जोपर्यंत तुम्ही वरचढ होत नाही तोपर्यंत तुमचं हितचिंतन करायला, तुमच्यापेक्षा वरच्या स्तरातल्या लोकांना काही प्रॉब्लम नसतो. इन फॅक्ट, तुम्हाला सहानुभूती दाखवून त्यांचा इगो सुखावत असतो.

त्यामुळे दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतो हा विचार करत बसणं इमॅच्युरिटी आहे. दुसरा आपल्याबद्दल काहीही विचार करु दे जोपर्यंत आपण कुणाबद्दल आसूया बाळगत नाही तोपर्यंत आपल्याला त्रासाची सुतराम शक्यता नाही.

आणि आपल्या या खुल्या विचारसरणीमुळे आपला मत्सर करणारे ट्रान्सफॉर्म होण्याची शक्यता जास्त.

काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे .

कित्येकदा असं काही नसतं. उगाचच मन अशी समजूत करून देत असतं. त्याचा उपयोग त्याला पंचींग बॅग म्हणून होतो.

स्पेसिफिक प्रॉब्लेम सांगितलं तर स्पेसिफिक सल्ले मिळतील.

मला वाटतं स्पेसिफिक काहीच नसावं. ही माझ्यावर जळते, अमका तमका माझ्यावर खार खातो, अमुकतमुक मुद्दाम खोचकच बोललं असा स्वतःचा समज करुन घेऊन खयाली इमले बांधणारा एक वर्ग असतो. बरं ते इमले बांधून थांबत नाहीत, सतत त्याची पारायणं करत, उगाळत बसतात. हे प्रकर्ण त्यातलं दिसतंय.

दुसर्‍याला काय वाटतंय त्याच्यावर माझा ताबा नाही, हे त्यांना कोणी शिकवलेलं नसतं किंवा शिकायचं नसतं.

दुसर्‍याला काय वाटतंय त्याच्यावर कुणाचाच ताबा नाही..

+ १

थोडी भर....

कुठलेही काम करण्यापुर्वी ३ गोष्टींचा विचार करा.

१. ह्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे का? (मग भले ते रोजचा स्वैपाक का असेना.घाई गडबडीत किंवा दडपणाखाली कुठलेच काम योग्य तर्‍हेने होत नाही.)

२. ह्या कामामुळे तुम्हाला आर्थिक तोशीश पडणार आहे का? (शैक्षणिक किंवा पुस्तके विकत घेणे)

आणि

३. ह्या कामामुळे तुम्हाला वैयक्तिक किंवा कौटुंबिक फायदा , इतर कुणालाही त्रास न देता होणार आहे का?

तुम्ही जर ह्या त्रिसुत्रीच्या आधारे रोजची कामे करत असाल तर, बाकी दुनिया गयी भाड़ में......

मार्मिक गोडसे's picture

8 Jun 2017 - 5:10 pm | मार्मिक गोडसे

त्यामुळे दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतो हा विचार करत बसणं इमॅच्युरिटी आहे. दुसरा आपल्याबद्दल काहीही विचार करु दे जोपर्यंत आपण कुणाबद्दल आसूया बाळगत नाही तोपर्यंत आपल्याला त्रासाची सुतराम शक्यता नाही.

+१११

काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे

ते तोंडावर गॉड गॉड बोलतात तर मग त्यांची आंतरिक इच्छा कशी कळते ?

प्रमोद देर्देकर's picture

9 Jun 2017 - 5:29 am | प्रमोद देर्देकर

सूप्रभात