एकट्याने करण्यायोग्य ट्रेकींग डेस्टीनेशन सूचवा!!!!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in भटकंती
7 Jun 2017 - 2:02 pm

ट्रेकिंग हा माझा एक आवडता प्रकार आहे.मी कॉलेजला असताना बरेच ट्रेक केले आहेत.नागेश्वर,भैरवगड(कोयना),जंगली जयगड बरेच..
कॉलेज संपल्यावर अर्थाजनाच्या उद्देशाने मी सातर्यातच राहीलो.माझे बहुतांश मित्र कामानिमित्ताने बाहेर गेल्याने ट्रेकची आवड मागे पडत गेली.ट्रेकींग सोडून मला आता दहा वर्ष झाली असतील.आता पुन्हा ट्रेकींग करावेसे वाटत आहे.पण ग्रुप नाही आहे आता.अनोळखी ग्रुपमध्ये जाणे पटत नाही.मला सिगारेटचे व्य्सन असल्याने कुणा ट्रेक ग्रुपमध्ये मला नीटसे सामावून घेता येणार नाही.
मला पावसाळ्यात जुलै ऑगस्टमध्ये एकट्याने पावसाळी ट्रेक करायचा आहे.आमच्या सातार्यापासून घाटमाथा जवळ आहे.त्यामुळे अडचण येणार नाही.रायगड ,रत्नागिरी,सातारा या जिल्ह्यात असलेले ट्रेक ,जे एकट्याने करण्यासारखे आहेत ते मला सूचवावेत ही विनंती.

प्रतिक्रिया

महाबळेश्वर जवळ राजापूर, पाचवड जवळचा विक्रमगड (नाव नक्की आठवत नाही आहे), कराडला आगाशिव, नाईकबा डोंगर, इकडे पुण्याकडे राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड, तिकोना, नाशिक बाजूला भीमाशंकर, शिवनेरी, अंजनेरी इत्यादी. खाली कोल्हापूरला पन्हाळा-विशाळगड, दाजीपूर (किमान दोघे जावा)

या सर्व ठिकाणावर माझे लेखन मिपावर आहे शोधावे लागेल :)

पुरंदर राहिला लिस्टमध्ये.

दुर्गविहारी's picture

7 Jun 2017 - 8:05 pm | दुर्गविहारी

पाचवडजवळ विराटगड आहे. विक्रमगड ठाणे जिल्ह्यात आहे, पण तेथे कोणताही गड, किल्ला नाही, तर राजवाडा आहे.

शलभ's picture

7 Jun 2017 - 10:10 pm | शलभ

विराटगड की वैराटगड..

धनावडे's picture

8 Jun 2017 - 4:32 pm | धनावडे

वैराटगड

दशानन's picture

8 Jun 2017 - 4:33 pm | दशानन

वैराटगड बरोबर!

पुंबा's picture

9 Jun 2017 - 9:28 am | पुंबा

कराडला आगाशिव

नक्की जा. अप्रतिम आहे. दोनदा पूर्ण ट्रेक केला आहे कॉलेजला असताना.

अमर विश्वास's picture

7 Jun 2017 - 3:24 pm | अमर विश्वास

ट्रेकिंग ला परत सुरुवात करताय .... शक्यतो एकट्याने ट्रेक करणे टाळा ...
तरीहि हौस असेल तर .... रायगड, नाणेघाट, तोरणा, लोहगड.... पावसाळी ट्रेक ची लिस्ट अनंत आहे ..

.

.

लोहगडावरच्या विंचू काट्याला असे रेलींग लावले आहेत का ?
तसे असेल तर सगले रौद्र सौंदर्य गेले त्याचे

प्रचेतस's picture

7 Jun 2017 - 6:36 pm | प्रचेतस

तो रेलिंग लावलेला फोटो रायगडाच्या टकमट टोकाचा दिसतोय. विंचूकाट्याला अजून तरी रेलिंग नाहीत, शिवाय रेलिंगची आवश्यकताही नाही, दोन्ही बाजूंना छानपैकी उंच तटबंदी आहे. त्यामुळे मार्ग मूळातच बंदिस्त आहे.

अमर विश्वास's picture

7 Jun 2017 - 6:46 pm | अमर विश्वास

प्रचेतसजी ..
तो फोटो टकमक टोकाचाच आहे ..
दुसरा फोटो ही रायगडाचाच आहे ... पहिल्या दरवाजाचे बुरुज वरच्या बाजूस दिसतात ...

कपिलमुनी's picture

7 Jun 2017 - 8:03 pm | कपिलमुनी

यावरून पुर्बी इथे फोटो ओळखा धागे यायचे ते आठवले !

स्वच्छंदी_मनोज's picture

8 Jun 2017 - 2:36 pm | स्वच्छंदी_मनोज

ते बहुदा मायबोलीवर यायचे. इथे आलेले मला आठवत नाहीत.

फुकायची सवय असेल तर घरीच बसलात तर उत्तम.

दशानन's picture

7 Jun 2017 - 7:13 pm | दशानन

सहमत!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Jun 2017 - 7:32 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

घाटमाथ्यावर तुफान पाऊस नुकताच झाला आहे,फेसाळते झरे ओहोळ नुकतेच अवखळ वाहत आहेत,वातावरण ढगाळ कुंद आहे.दाहीदिशांना एकांत पसरला आहे ,अश्या वेळी सिगरेटच्या पाकीटाचा वास घ्यावा,एक सिगरेट काढावी ,नुसतीच हातात धरुन थोडावेळ बसावे.मग अलगद ओठात धरावी, प्रेमाने शिलगवावी.एक खोल कश मारावा व धूर सोडताना वातावरणाशी तादाम्य पावावे.
(उपरोक्त प्रतिसाद वाचून कुणी सिगरेट प्यायचा विचार करु नये,सिगरेट आरोग्याला हानिकारक आहे.)

पिलीयन रायडर's picture

7 Jun 2017 - 8:02 pm | पिलीयन रायडर

आयडीया छान आहे. पण जगात तुम्ही एकटेच शिल्लक राहीलात की मग करा. कारण आजुबाजुला ट्रेकिंग करणारी इतर मंडळी आली असतील, त्यांनी शुद्ध हवा सोडुन सिगरेटचा धुर छातीत का भरुन घ्यावा ना?

तशी तर माझी फार फार इच्छा आहे की सिगरेट हे एक व्यसन जगात सगळी कडे सार्वजनिकरित्या करण्यास बंदी घालायला हवी. कारण हे फुकांडे एकटेच फुंकत नाहीत तर बळजबरी आजुबाजुच्यांच्या फुफ्फुसांनाही डॅमेज करतात. लहान मुल वगैरेही तमा बाळगत नाहीत. एखाद्या खोलीत कोंडुन घेऊन काय मरायचंय ते एकटे मरा ना सालेहो...

तेव्हा कृपया तुम्ही तरी चारचौघात सिगरेट फुंकु नका.

असेच एक एरवी सवळ्यात असणारे मिपाकार किल्ल्यावर गेले की फुकत असत ते आठवले.

घाटमाथ्यावर तुफान पाऊस नुकताच झाला आहे,फेसाळते झरे ओहोळ नुकतेच अवखळ वाहत आहेत,वातावरण ढगाळ कुंद आहे.दाहीदिशांना एकांत पसरला आहे ,अश्या वेळी सिगरेटच्या पाकीटाचा वास घ्यावा,एक सिगरेट काढावी ,नुसतीच हातात धरुन थोडावेळ बसावे.मग अलगद ओठात धरावी, प्रेमाने शिलगवावी.एक खोल कश मारावा व धूर सोडताना वातावरणाशी तादाम्य पावावे.

हा प्रकार केलेला आहे. त्या आनंदाशी सहमत आहे. फक्त पावसाळी ट्रेकला सिगारेटी फार सांभाळाव्या लागतात. भिजायची शक्यता खूप. माचिस नेऊ नये. लायटर न्यावा.

झिपलॉकच्या ब्यागेत घालून न्याव्यात.

अप्पा जोगळेकर's picture

8 Jun 2017 - 3:46 pm | अप्पा जोगळेकर

भिजल्या तरी चुलीच्या किंवा क्लिक्सच्या बाजूला ठेवून वाळवता येतात. फक्त नंतर विडी प्यायल्या सारखे वाटते.

स्वच्छंदी_मनोज's picture

8 Jun 2017 - 2:44 pm | स्वच्छंदी_मनोज

घाटमाथ्यावर तुफान पाऊस नुकताच झाला आहे,फेसाळते झरे ओहोळ नुकतेच अवखळ वाहत आहेत,वातावरण ढगाळ कुंद आहे >>>

हे असे भन्नाट वातावरण असताना दुसरी नशा कशासाठी? ह्या अश्या वातावरणाचीच नशा झिंग चढायला पुरेशी नाही काय?

बाकी काही नाही. ते कुंद वातावरण, खोल कश मारणे वगैरे बाता करुन आपण कसे कूल आहोत आणि इतर सिगरेट न पिणारे कोणत्यातरी विशेष आनंदाला मुकत आहेत असे अप्रत्यक्षपणे सांगायचे असते.

कलंत्री's picture

10 Jun 2017 - 11:05 am | कलंत्री

९० % लोक सिगारेटी पिणे हे शोर्याचे कृत्य आहे असे समजूनच या व्यसनाच्या विळख्यात अडकतात.

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2017 - 7:14 pm | संजय क्षीरसागर

पहिला सरळ धागा ! :)

अभिजीत अवलिया's picture

8 Jun 2017 - 8:47 am | अभिजीत अवलिया

टफिंचे बरचसे धागे विचार करायला लावणारे असतात. पण केवळ धागालेखक टफि आहेत ह्या कारणाने जनता काहीही प्रतिक्रिया देते.

मी जवळपास सव्वाशे किल्ले तरी एकट्याने पाहिले असतील. तरी तुम्ही सोलो ट्रेकिंग करा असा सल्ला मी तरी देणार नाही. मी केवळ नाईलाजाने असे ट्रेक केले आहेत. एकतर आपल्याला जिथे जायचे आहे तिथे यायला बर्‍याचदा कोणी तयार नसतो किंवा आधी ग्रुप तयार होउन एनवेळी मंडळी गळतात. काही वेळा आपल्या सुट्ट्याशीं बाकिच्यांचा वेळा जमत नाही किंवा आपल्या स्टॅमिन्याबरोबर जुळत नाही यासारख्या कारणाने सोलो ट्रेक केले असले तरी हा धोकादायक प्रकार आहे. अशावेळी पायथ्याच्या गावातून एखादा माणूस बरोबर घ्यावा. काही वेळा तेही अवघड होते हे मी गुमतारा किल्ल्याच्या धाग्यात लिहीलेले आहे. पावसाळ्यात तर असे एकटे विशेषत: अनोळखी ठिकाणी बिलकुल जाउ नका. एकतर या काळात गवत प्रंचड वाढते, सापांचाही धोका, शिवाय डोंगरावर ढग उतरले तर दिशा कळेनाशा होऊन अडकून पडण्याची शक्यता जास्त. वैयक्तित मी नियमीत ट्रेकर असूनही पावसाळ्यात कुठेही जाण्याचे टाळतो. संबध जुन, जुलै महिना घरीच आराम करुन १५ ऑगस्टपासून ट्रेकला सुरवात करतो. खरे तर पावसाळी भटकंतीसंदर्भात एक चर्चेचा धागा काढायला हवा. बघू जमल्यास.
मलाही ट्रेकला यायला आवडलं असतं, पण थोड स्पष्ट लिहीतो, गडावर दारू पिणे, मास मच्छी खाणे, सिगारेटी फुंकणे, जे बघायला आलोय ते सोडून नुसत्या प्रत्येक कोपर्‍यात सेल्फी घेत फिरणे या सर्व गोष्टीची तीव्र नफरत आहे. माझ्याबरोबर आलेल्या कोणालाही मी हे करु देत नाही. एकाने सांगुनही हा प्रयत्न केल्याबरोबर त्याठिकाणाहून घरी पाठविले होते. तस्मात आपले जमणे नाही.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Jun 2017 - 8:58 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

हम्म्म! मुरलेल्या ट्रेकर्सना असले प्रकार आवडत नाहीत हे माहीत होते म्हणून धाग्यात तसे लिहले आहे.त्यासाठीच एकटे जायचे आहे,जाताना थोडं पोटभरीच काहीतरी,माझ्या क्लासिक माईल्ड्स ,टोर्च वगैरे सामान .बास!! मै और कुदरत ,और कोई नही.

तुम्हाला हा आयडी खरा वाटलाय का? तसं असेल तर फार शिर्यसली घेऊ नका यांचे धागे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2017 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

या धाग्यात सुचविलेल्या सगळ्या ठिकाणांचा एकामागोमाग सलग ट्रेक केल्यास, मिपावरची प्रश्नहल्ला-मालिका कमी झाल्यामुळे अनेक मिपाकरांचे धन्यवाद मिळतील, असा साधार अंदाज आहे ! जरूर विचार करावा ;) :D

सतिश गावडे's picture

7 Jun 2017 - 10:03 pm | सतिश गावडे

असे झाल्यास टफिंच्या धाग्याच्या निमित्ताने ज्ञानमौक्तिकें चौफेर उधळणाऱ्या काही ज्ञानमहर्षी यांची गोची होईल.

अभ्या..'s picture

7 Jun 2017 - 10:16 pm | अभ्या..

काशी

संजय क्षीरसागर's picture

8 Jun 2017 - 2:04 am | संजय क्षीरसागर

टफि तुम्हाला सिग्रेट कमी करायचीये का ?

(जळणारे तरी किती जळणार? यानिमित्तानं तुमच्या धाग्याला चार चांद लावून टाकू ! :) )

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

8 Jun 2017 - 10:29 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

दिवसाला चार पाचच ओढतो,आणखी कीती कमी करणार?

संजय क्षीरसागर's picture

8 Jun 2017 - 2:10 pm | संजय क्षीरसागर

:)

अभिजीत अवलिया's picture

8 Jun 2017 - 11:56 am | अभिजीत अवलिया

पन्हाळगडाला नक्की जा आणि एक दिवस मुक्काम पण करा..

सूड's picture

8 Jun 2017 - 11:59 am | सूड

नर्मदा परिक्रमा??

कंजूस's picture

8 Jun 2017 - 1:11 pm | कंजूस

:)
:)

स्वच्छंदी_मनोज's picture

8 Jun 2017 - 2:42 pm | स्वच्छंदी_मनोज

टफी,
पावसाळ्यात भटकायचा तुमचा विचार नक्की चांगला आहे. आता सिगरेट पित पित फिरायचे कि कसे ते तुमचे तुम्हीच ठरवा पण....
सोलो ट्रेक अजिबात करू नका. सध्या ट्रेकींगच्या बर्‍याच संस्था आहेत ज्या "पावसाळा स्पेशल" ट्रेक करतात त्यांच्या तर्फे जा पण एकट्याने नको. ग्रुप बरोबर जाऊनही आपला आनंद कमी होतो असे बिल्कुल नाही.
या उप्पर कोणीच साथीला मिळाले नाही तर जाऊ नका पण सोलो नको.

सोलो ट्रेकमध्ये झालेले अनेक अपघात माहीतीआहेत ज्यातले बहुसंख्य अपघात सोलो ट्रेक नसता तर टाळता आले असते.

अद्द्या's picture

9 Jun 2017 - 10:58 am | अद्द्या

आयला .. प्रतिसाद गेला कुठे?

परत टैपतो .. संपादक कोणी असतील तर वरचा अर्धवट प्रतिसाद उडवा प्लिज .

तर मग.. पावसाळ्यात ट्रेक करणार.. धुकं पडलेलं आहे सारखी रीप रीप चाललीये पावसाची.. कुठल्या तरी गडावर / जंगलात आहात. अश्या वेळी शुद्ध हवा छातीत भरून घेणार कि सिगरेट फुंकणार ? तेच करायचं आहे तर घरीच बसा. वाटल्यास डिस्कव्हरी वगैरे लावा म्हणजे ट्रेक केल्याचा फील येईल

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

10 Jun 2017 - 1:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मिपावर अनेक ट्र्कर्स आहेत पण मी सिगरेट मुळे त्यांच्याबरोबर जॉईन होऊ शकत नाही हे नमुद केले आहे.
विषय सिगरेट ,शुद्ध हवा नसून ट्रेकींग डेस्टीनेशन सूचवण्याचा आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

10 Jun 2017 - 1:05 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ट्रेकर्स असे वाचावे

स्थितप्रज्ञ's picture

12 Jun 2017 - 11:43 am | स्थितप्रज्ञ

भरपूर गर्दी असलेले कुठलेही ट्रेक्स करा. यदाकदाचित काही मदत लागलीच तर मिळायची शक्यता असते. अनवट किंवा रिमोट ट्रेक्स शक्यतो एकट्याने करू नका.

दशानन's picture

12 Jun 2017 - 3:00 pm | दशानन

म्हणजे "वैकुंठ"?

=))