काही धाग्यांचा नक्की उद्देश काय!!!! टाईमपासची सोय? विचारमंथन ? की आणखी काय??????

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
6 Jun 2017 - 3:34 pm
गाभा: 

आमची प्रेरणा =====> http://www.misalpav.com/node/39799

गाभा:
संकेतस्थळे कशी अस्तित्वात आली? यावर समाजशास्त्रज्ञां(?)चं एकमत आहे.पुर्वापार सकल मानव-जात, हे अहंला पोसत असल्याने, मी म्हणतो तेच सत्य, हा रोख होता-आहे आणि असणार.त्यातूनही बुद्धीला गहाण ठेवले की, आपल्या मेंदूतून निघालेला प्रत्येक विचार हा परीपुर्णच असणार ह्याची १००% स्वखात्री.

मराठी संकेतस्थळांचे उगम, अस्तित्व आणि त्यांची विचारसरणी, ह्यावर आमचा अभ्यास सुरु आहे. पण पुर्वी पारावरच्या गप्पा किंवा चाळीतल्या नळावरची भांडणे होत असत, असा उल्लेख काही साहित्य कृतीत वाचलेला आठवतो. पुढे गावातले पार कमी नाही झाले पण संध्याकाळी भावजी पैठणी घेवून घरी यायला लागले आणि चाळी पण पाडल्या गेल्या. त्यामुळे गप्पा-टप्पा मारायला किंवा कुचाळक्या करायला संकेतस्थळे कामाला यायला लागली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाजाची उन्नती होते, असे कुणीसे म्हटले आहे.पण घरात बर्‍याचदा जोडीदाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायचे की स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची? ह्या द्विधा मनस्थितीत सापडणार्‍या व्यक्तींची मने कोमेजायला लागली.मग ते बिचारे संकेतस्थळे या एका(च) गोष्टीकडे "वैचारीक भावनेचा निचरा" म्हणून पाहू लागले.

मेंदूला गहाण ठेवण्याचे धोरण, काही धाग्यात दिसून येते आणि अशा धाग्यांचा खफ होणे पण साहजिकच असते.

आजकाल धाग्यांचा मूळ उद्देश काय? हे मी कुणालाही विचारायला जात नाही. कारण अहं ब्रह्मास्मी हेच त्रिवार सत्य.कुणी तरी दोन्ही संकेतस्थळांवर मी-मी करणारा असे म्हणतात. (पण मी माझ्या वैचारिक स्वातंत्र्यावर गदा येवू देत नाही.) प्रत्यक्षात, एकाच विचाराशी ठाम न राहता, तरलता दाखवणारे दांभिकच. "काळाप्रमाणे बदला किंवा तुम्ही विचारसरणीत बदल घडवा." असे म्हणणारे वेगळेच.त्यात मी येत नाही.

प्रत्यक्षात धागा हा माझ्यामते, व्यक्तींच्या अनावर विचारांना मोकळी वाट करुन देण्याची एक वाट आहे ,बाकी काही नाही."अहं ब्रह्मास्मी" हाच माझा दृष्टीकोण आहे कारण तेच वास्तव आहे, तेच सत्य आणि तेच ....तेच.....तेच......

तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायची फाजील उत्सूकता आहे. कारण एकच माझा वेळ जात नाही म्हणून.

१ . संकेतस्थळे ही व्यवस्था "टाइमपासची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?"
२. एकच संकेतस्थळ ह्याला तुम्ही आदर्श मानता का? आणि त्याला तुम्ही जरी आदर्श मानत असलात तरी, बहुतांश व्यक्ती इतर संकेतस्थळांवर का जातात?
३. "मेरे मनको भाया, मैं कूत्ता काट के खाया," हे असे म्हणणारे आणि वागणारे, ह्यांचे कुठल्याच संकेतस्थळांवर का पटत नाही?

चर्चेदरम्यान येणारे मुद्दे (आणि काल्पनिक गूद्दे) मूळ धाग्यात अजिबात समाविष्ट केल्या जाणार नाहीत....

प्रतिक्रिया

खेडूत's picture

6 Jun 2017 - 4:32 pm | खेडूत

हे हे..चुकलात की राव!
मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. हे र्‍हायलंय!

{"माबो-कर" ही एक वेगळीच मंडळी आहेत. आम्ही त्यांना मानवजातीत गणत नाही. ते वाट चुकलेले यक्ष आहेत, असे माझे मत.}

आमच्या आगामी "को ह ण ह क ह र" ह्या लेखातून साभार......

सांजसंध्या's picture

6 Jun 2017 - 7:03 pm | सांजसंध्या

गवि, अतृप्त आत्मा, सोत्रि (चावडीवाले तेच ना ?) आणि असे बरेच रथी महारथी दिसत नाहीत. त्यांना कुणी लिहीते करू शकेल का ?
चावडी लक्षात आहे अद्याप.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 7:14 pm | मुक्त विहारि

हेच खरे...

पूर्वीचे तुम्ही पण राहिला नाहीत मुवि... ;)

आदूबाळजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.....

(वरील प्रतिसाद हा माबोला डोळ्यासमोर ठेवून लिहिला आहे, हे जाणकारांच्या लक्षांत आले असेलच.)

खटासि खट's picture

7 Jun 2017 - 1:06 pm | खटासि खट

अनुल्लेखाबद्दल निषेध !

सांजसंध्या's picture

7 Jun 2017 - 4:43 pm | सांजसंध्या

असं कुणीतरी म्हटल्याचं आठवतंय. शेक्सपिअर तर नाही ?

प्रतिसाद देताना धाग्याचं मन वाचून दिला जातो कि खुसपट शोधून यावर बरंच अवलंबून आहे. अनेकदा धागा कशावर आहे, उद्देश काय आहे यापेक्षा आपल्या (भरकट्या) बुद्धीचे प्रदर्शन करायची दांडगी हौस अनुभवास येते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2017 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे

"अहं ब्रह्मास्मी" हाच माझा दृष्टीकोण आहे कारण तेच वास्तव आहे, तेच सत्य आणि तेच ....तेच.....तेच......

धाग्याचा विषय काहीही असो, तुम्हाला या तत्वावर आधारीत सज्जड प्रतिस्पर्धी आहेत, इतका धोक्याचा इशारा देऊन, मी माझे हे एक वाक्य संपवतो. ;) :)