तर मंडळी .. हा पदार्थ संध्याकाळी 'काहीतरी खावंसं वाटतंय पण काय ते कळत नै' अशा वेळेला करायचा. आमच्या घरी 5-6 च्या दरम्यान नुसती आई म्हणून हाक मारली तरी मातोश्री विचारतात.. 'हं, मग काय करून देऊ?' 'ते नै माहीत. पण दे काहीतरी करून.' इति आम्ही.. आणि मग कच्च्या चिवड्याचा बेत ठरतो..
सर्वप्रथम पातळ पोहे आणि मुरमुरे एकत्र करून घ्यावे. त्यात बाजूने कांदा आणि कोथिंबीर टाकायची. मग त्यात मधोमध लाल तिखट टाकायचं.
त्यानंतर गरम तेलात जिरं टाकून ते तेल तिखटावर सोडायचं. असं केल्याने तिखट जळतं/शिजतं आणि पोटास बाधत नाही.
मग त्यात आणखी थोडी कोथिंबीर आणि मीठ, पिठीसाखर टाकून सगळं एकत्र करायचं..
सगळं नीट एकत्र केलं की त्यात लिंबू पिळायचं.
वरून थोडे शेव टाकून सर्व्ह करायचं.
अवांतर टिपा..
1. यात कच्चंच तेल टाकलं तरी मस्त लागतं.
2. साध्या शेवेऐवजी आलू भुजीया टाकला तर हा चिवडा भारी लागतो.
3. यात वरून टोमॅटो किंवा उकडलेला बटाटा (मिरपूड टाकून) झकास लागतो.
प्रतिक्रिया
2 Jun 2017 - 9:04 pm | प्रीत-मोहर
फोटो नाही तोवर धागा फाऊल!!!
हुह
2 Jun 2017 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
+११
फोटो नाही = इनोची गरज नाही = धागा फाऊल :)
2 Jun 2017 - 9:55 pm | सानझरी
आता घ्या इनो.. :D
2 Jun 2017 - 11:11 pm | प्रीत-मोहर
कातिल फोटो आहेत सान!!!स्लर्प झालं एक्दम. मी फाफॉ मधे बघतेय आणि मला फोटो दिसताहेत
3 Jun 2017 - 12:13 pm | किसन शिंदे
मी ही फाफॉमध्येच पाहतोय पण फोटो दिसत नाहीत आणि दिसत नाहीत म्हणून ही पाककृती फाऊल धरण्यात येतेय. :D
3 Jun 2017 - 12:30 pm | प्रीत-मोहर
ए यार आता मलाही दिसेना फाफॉमधेच बघितलय उघडुन तर. काल दिसले होते . शप्पथ!!!
2 Jun 2017 - 9:18 pm | सविता००१
खरच फाउल.
पण कच्चा चिवडा म्हणजे लैच भारी काम. खूप आवडतो,
आम्ही यात थोडा गोडा मसाला पण घालतो आणि पिठीसाखर नाहीच. तोही छान लागतो. बघ करून. मी तुझ्या पद्धतीने करते आणि तू माझ्या करून पहा. :)
आणि हो, तेल कच्चच!
2 Jun 2017 - 9:52 pm | पद्मावति
वाह, आता दिसताहेत फोटो. क्लास दिसतोय चिवडा.
2 Jun 2017 - 11:05 pm | रुपी
हाई हो सा.सं. बाई!
मला सफारी आणि क्रोममधूनसुद्धा दिसत नाहीयेत.
2 Jun 2017 - 11:06 pm | रुपी
नाही म्हणायचं होतं.. अमिताभसारखं 'हाई' काय झालं? =)
2 Jun 2017 - 11:43 pm | उल्का
पण मला देखील फोटो दिसले नाहीत. :(
3 Jun 2017 - 12:00 am | एस
अरे फोटो किधर हय? हाईं? ;-)
3 Jun 2017 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा
फोटूऊऊऊऊऊऊ ... :-/
3 Jun 2017 - 3:15 pm | एस
हुश्श्श...! दिसताहेत का आता?
3 Jun 2017 - 3:20 pm | प्रीत-मोहर
फोटो क्रं. १,३,५,७ आणि ९ दिसत नाहीयेत
3 Jun 2017 - 3:26 pm | एस
खी: खी: खी:! पाचच फोटू आहेत. जुन्या फोटोंच्या लिंका तशाच होत्या त्या आता काढल्या आहेत. (मोबाईलवर बॅकस्पेस दाबून माझी बोटे दुखायला लागलीत. या मेहनतीचे फळ म्हणून मला हा चिवडा मिळालाच पाहिजे!) ;-)
3 Jun 2017 - 3:31 pm | प्रीत-मोहर
ढुष्ट आहात एसदा!!!
3 Jun 2017 - 3:27 pm | पद्मावति
=))
3 Jun 2017 - 3:37 pm | मंजूताई
तेल कच्च्च्च्च्च! लाल तिखटाऐवजी बारीक चिहिमिच!
3 Jun 2017 - 5:31 pm | सानझरी
प्रिमो, किसन, म्हात्रे सर, अआ, उल्का.. सासंच्या कृपेने दिसताहेत फोटो आता..
सविता001-गोडा मसाला घालून नक्की करून बघेन.
मंजूतै- कच्चं तेल घालून पण हे फेवरेट्ट आहे माझं. बाचिहीमी घालून करून बघेन.
पद्मावथी नि एसभौ- तुमाला पेश्शल कच्चा चिवडा देईन. कच्चंपक्कं तेल सोडा, लोणच्याचं तेल घालून करून देईन. :D फोटोंसाठी खूप धन्यवाद!
3 Jun 2017 - 8:38 pm | एस
ते बाचिहीमी म्हणजे काय?
3 Jun 2017 - 9:18 pm | सानझरी
बारीक चिरलेली हिरवी मिर्ची =))
3 Jun 2017 - 11:06 pm | रुपी
माझं नाव का नाही? मी तर तीन तीन ब्राउजर मध्ये पुन्हा पुन्हा चेक केले :(
आता भरपाईसाठी मला भरपूर चिवडा हवा!
3 Jun 2017 - 11:35 pm | सानझरी
अब्बोss.. चुकलंच.. sorry.. :(
3 Jun 2017 - 5:35 pm | सपे-पुणे-३०
करायला सोपा आणि सुटसुटीत पदार्थ. मला सगळ्या प्रकारचे चिवडे आवडतात त्यामुळे नक्की करून बघणार.
3 Jun 2017 - 5:35 pm | यशोधरा
मला सगळे फोटो दिसताहेत.
आता चिवडा दे.
3 Jun 2017 - 5:54 pm | स्रुजा
भारी !! फारच सुरेख दिसतोय चिवडा :)
3 Jun 2017 - 7:29 pm | उपेक्षित
आम्ही यात वरून थोडी धन्याची पावडर मारतो आणि तेल कच्चच पाहिजे
3 Jun 2017 - 8:53 pm | दशानन
कोल्हापुरी भेळ सारखी दिसत आहे :)
4 Jun 2017 - 12:01 am | पैसा
मस्त प्रकार!
4 Jun 2017 - 1:04 am | पिंगू
झटपट न्याहरी करायला हे भारी आहे. लय आवडलं...
4 Jun 2017 - 4:19 am | पिलीयन रायडर
अहाहा!! ह्यात कैरीच्या बारिक चिरलेल्या फोडी पण मस्त लागतील!
4 Jun 2017 - 7:03 pm | राघवेंद्र
यालाच गरडेल असे पण म्हणतात का ?
8 Jun 2017 - 7:06 pm | अभ्या..
गर्डेल म्हणजे पंढरपूरच्या भाषेत भत्ता.
पंढरपूर बार्शी आणि तुळजापूर साईडचे चुरमुरे वेगळे असतात. सांगलीच्या भडंगाच्या चुरमुर्याप्रमाणे बारिक अन चिवट नसतात. क्रीस्पी अन जाळीदार असतात.
तर भत्ता म्हनजे चार टाळकी एकत्र बसली की करायचा प्रकार. सकाळी वाचून संपवलेला दै. सकाळ खाली अंथरायचा. जोडून ४ पाने दिसली पाहिजेत. साधारण १ ते दिड किलो चुरमुरे त्यावर ओतणे, मध्ये शिमेट कालवायसारखा खड्डा करुन त्यात कच्चे गोडे तेल( बार्शीला अजून बरेच जण खाण्यासाठी करडी तेल वापरतात) काळा मसाला, तिखट, मीठ, भाजलेले शेंगादाणे एक्स्ट्रा म्हणून दाळे आणि कधीकधी चैन म्हनून फरसाण (फरसाण हवाच असे काही नाही) मुख्य म्हणजे प्रत्येक चुरमुर्याला तेलमसाला लागला पाहिजे. शेजारी बुक्कीफोड कांदे अन कधी कधी चवीला लोणचेखार. एकदा असा बेत जमला की मग सगळ्या गावाची मापे काढत (स्पेशली पंढरपूरात) बकाणे भरत भरत कधी ग्रुप आक्खा कागद एका चुरमुर्यासाठी धुंडाळायला लागेल ते कळत नाही. ह्यालाच भत्ता, गर्डेल किंवा सध्या सुक्की भेळ म्हणले जाते.
8 Jun 2017 - 7:09 pm | अभ्या..
गर्डेल म्हणजे पंढरपूरच्या भाषेत भत्ता.
पंढरपूर बार्शी आणि तुळजापूर साईडचे चुरमुरे वेगळे असतात. सांगलीच्या भडंगाच्या चुरमुर्याप्रमाणे बारिक अन चिवट नसतात. क्रीस्पी अन जाळीदार असतात.
तर भत्ता म्हनजे चार टाळकी एकत्र बसली की करायचा प्रकार. सकाळी वाचून संपवलेला दै. सकाळ खाली अंथरायचा. जोडून ४ पाने दिसली पाहिजेत. साधारण १ ते दिड किलो चुरमुरे त्यावर ओतणे, मध्ये शिमेट कालवायसारखा खड्डा करुन त्यात कच्चे गोडे तेल( बार्शीला अजून बरेच जण खाण्यासाठी करडी तेल वापरतात) काळा मसाला, तिखट, मीठ, भाजलेले शेंगादाणे एक्स्ट्रा म्हणून दाळे आणि कधीकधी चैन म्हनून फरसाण (फरसाण हवाच असे काही नाही) मुख्य म्हणजे प्रत्येक चुरमुर्याला तेलमसाला लागला पाहिजे. शेजारी बुक्कीफोड कांदे अन कधी कधी चवीला लोणचेखार. एकदा असा बेत जमला की मग सगळ्या गावाची मापे काढत (स्पेशली पंढरपूरात) बकाणे भरत भरत कधी ग्रुप आक्खा कागद एका चुरमुर्यासाठी धुंडाळायला लागेल ते कळत नाही. ह्यालाच भत्ता, गर्डेल किंवा सध्या सुक्की भेळ म्हणले जाते.
14 Jun 2017 - 8:00 pm | पिलीयन रायडर
हे वर्णन जरा मला जवळचं वाटतंय. इडोने खाली छान बाऊल मध्ये चमचा वगैरे ठेवुन फोटो दिलाय तो पाहुन मला कॉम्लेक्ष आला. पण तुझ्या प्रतिसादाने जीवात जीव आलाय.
चिवडा, भुंगडा, भडंग, भेळ वगैरे गोष्टी चमच्या बिमच्याने खात नाहीत आमच्यात. मोठ्ठ्या पातील्यात किंवा परातीत घेऊन बकाणे भरायचे. कोथिंबीर वगैरे तर चैन आहे. आमच्यात फक्त तेल तिखट मीठ आणि शेंगदाणे मस्ट. कांदा बुक्कीने फोडुन. बास झालं. शेव आणि तत्सम डेकोरेशन घरात असेलच हाताशी आणि आई असेल जवळपास तर धुवुन, चिरुन वगैरे देते.
4 Jun 2017 - 9:01 pm | सानझरी
सगळ्यांना धन्यवाद..
@यशोधरा - पत्ता माहितीच्चे तुम्हाला. या कधीपण
कधीपण.. :)
@उपेक्षित - धन्याची पावडर? try करून बघणेत येईल..
@दशानन - कोल्हापूरी भेळ खाल्ली नाही कधी :(
@पिरा - हो कैरी असली कि घालतो आम्ही. (हे आठवून तोंपासू आहे)
@राघवेंद्र - नाही माहीत..
5 Jun 2017 - 11:44 am | सप्तरंगी
अश्या पुर्वापार चालत आलेल्या पाककृती नव्याने करायला खरच मजा येते. मस्तच.
6 Jun 2017 - 11:51 am | II श्रीमंत पेशवे II
याला दडपे पोहे असे म्हणतात माझ्या गावी
लाल तिखटाच्या ऐवजी भरलेली मिरची हि घेवू शकतो
खाताना त्यात थोड दही घेतलं तर अजूनच भर येते
8 Jun 2017 - 6:16 pm | सप्तरंगी
दडप्या पोह्यांमधे ओले नारळ, काकडी वगैरे असते, त्या सुटणाऱ्या पाण्यात ते दडपून ठेवायचे म्हणून दडपे पोहे, ते हे नाहीत.
8 Jun 2017 - 6:23 pm | दशानन
बरोबर!
हे दडपे पोहे नाहीत.
12 Jun 2017 - 4:41 pm | स्मिता चौगुले
दिसले एकदाचे फोटो मला..
मस्त प्रकार दिसतोय , करुन बघण्यात येइल
12 Jun 2017 - 10:38 pm | सानझरी
यस..
12 Jun 2017 - 11:59 pm | रातराणी
नछा नछा हेआ. लाम जेयपा जेणम्ह चजेयपा :(
14 Jun 2017 - 6:05 pm | सानझरी
नरूक घाब.. स्तंम तोगले डावची.. :)
13 Jun 2017 - 7:33 am | इडली डोसा
हे घ्या आमचा डावचिच्चाक
14 Jun 2017 - 6:06 pm | सानझरी
तोंपासूsssss
13 Jun 2017 - 11:01 am | सस्नेह
बादवे, हे नायलॉन पोहे की पातळ पोहे ?
आम्ही नायलॉन पोहे, चुरमुरे, शेव घालून आणि वरून बाचिहिमि घालून करतो. कांदा डायरेक्ट न मिसळता वरून पसरायचा. आणि त्यावर शेव ! झक्कास लागतो !
14 Jun 2017 - 6:07 pm | सानझरी
पातळ पोहे..
तुम्ही म्हणताय तसा पण करून बघेन..
13 Jun 2017 - 11:26 am | जागु
तोंडाला पाणी सुटल. छान.
14 Jun 2017 - 2:32 am | जुइ
नक्कीच करून बघेन.
14 Jun 2017 - 6:09 pm | सानझरी
धन्सं जागु नि जुइ.. :)