शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ५

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
2 Jun 2017 - 4:03 pm

दिवस पाचवा ...
"पहाटे जर का मोबाईलच्या गजराने दोघांनाही जाग आली नाही तर परत फियास्को" हे स्वतः च्या मनाला व आमच्या मुलींच्या ममाला दोघानाही बजावले. आमची तिकिटे " नो चेंज -नो कॅन्सलेशन" अशी होती. आम्हाला फ्लॅरेन्सला नेणारी गाडी रोमवरून सुटणारी नव्हती. ही शामभट्टाची गाडी नेपल्स वरून येऊन मिलान ला जाणारी नाईट (नोट्टे) ट्रेन होती. पहाटे पाचला उठून मेट्रो स्टेशन गाठले.रोमची मेट्रो सेवा सकाळी ०५३० वाजता सुरू होते. पहिलीच ट्रेन मिळाली. व थेट रोमचे "टिबुर्टिना" हे स्थानक गाठले.
.
युरोपातील स्थानके " स्थानके कमी व मॉल जास्त याचा एक प्रत्यय - टिबुर्टिना -रोमा
हवा अगदी थंड. रोमा टर्मिनी या मध्यवर्ती स्थानकाला पूरक या स्वरूपात हे स्थानक विकसित करण्यात आले आहे. युरोपात बर्‍याच स्टेशनात जमीनीखाली बोगदा करण्यात येतो. व त्याचा उपयोग फलाटांवर जाण्यासाठी होतो. आपल्याकडील पूल आहेत तशी पद्धत कमीच. अत्याधुनिक चेहरा मोहरा असलेल्या स्टेशनात तो चेहरा पहात पहात शिरलो.
.
रोमा टिबुर्टेना चा आधुनिक मल्टीपल एस्कलेटर
आमची गाडी काहीशी उशीरा येत असल्याचे इन्डेकेटर सांगत होता. आमचा फलाट त्याचा एस्क्लेटर जिना सारे शोधत एकदाचे पोहोचलो फलाटावर. सुरूवातीला तर फलाटावर आम्हीच दोघे. आपले काही चुकत तर नाही ना अशी शंका आली. पुन्हा माहितीचा फलक पाहून खात्री करून घेतली. युरोपात जवळ जवळ सर्व गाड्या नीट॑ वेळेवर येत असतात त्यामुळे खूप अगोदर येणारे फक्त कनेक्टींग प्रवासी असतील तरच. सबब वेटिंग रूम , फलाटावर खूपशी बाके ही पद्धतच दिसत नाही. तसेच स्टेशन मास्तरच्या ऑफिसपेक्षा बाहेरची विक्रीआउटलेट्स इथे जास्त.
.
नेपल्स ते मिलान या मार्गावर धावणार्‍या नोट्टे ( नाईट ट्रेन) मधे मी. नाईट ट्रेन बंद झाल्या हा नेटवरचा अपप्रचार आहे हे लक्षात येईल.
थंडी वाजत असल्याने फलाटावर उन खात बसलो. गाडीचा उशीर वाढ होता. इतर फलाटांवर गाड्या येत जात होत्या . अखेर आमची ही गाडी आली. तिकडे आपला डबा ओळखण्याची पद्धत भारत देशाइतकी चांगली नाही.आपल्या इथे एस वन इंजिनापासून पाचवा इतके तेथील काम सोपे नाही. सबब गाडी कुठेही प्रथम शिरून घ्यावे मग डबा शोधत स्थानापन्न व्हावे असे करावे लागते व लागलेही. आमच्या जागांवर अगोदरच कुणीतरी बसून आडवे होऊन झोप काढीत होते. तो एक आपले आरक्षण नसताना त्या जागेवर बसलेला व आमचे आरक्षण आहे असे सांगताही न उठणारा एक मॅनरलेस " थर्ड क्लास " माणूस होता. त्याला तिकिट दाखविल्यावर बळेबळेच त्याने जागा करून दिली .

गाडी मात्र वेगाने इटाली च्या कन्ट्रीसाईट मनोवेधक दर्शन घडवीत पळू लागली. मधूनच लांबलचक शेते... कुरणे व राखीव जंगले यांची रांगोळी . काही वेळेस अतिरम्य अशी स्वच्व्छ खेडी तर काही वेळेस मधेच कारखाने. आमची मने अगदी उल्हसित अवस्थेत मजेत त्या सार्‍या सरकल्या पटाचा आनंद लुटत होती.

साडेदहाच्या सुमारास फ्लॉरेन्स मधील तीन रेल्वे स्थानकांपैकी" कॅम्पो द मार्ट" स्थानकावर आम्ही उतरलो. इथूनच आम्ही रात्री पावणेदोन च्या गाडीने व्हेनिसला प्रस्थान करणार होतो. साहजिकच इथे क्लोकरूम मधे सामान ठेवावे व फ्लॉरेन्स गावात मनमुराद फिरावे या उद्देशाने चौकशी केली असता इथे अशी सोय नाही असे तेथील रेल्वे पोलिसाने सांगितल्यावर मी सुन्न झालो. युरोपात क्लोकरूम नसलेले स्थानक ते सुद्धा फ्लोरेन्स सारख्या युरोप च्या टॉप टेन मधे असलेल्या शहरात नसावे हे धक्कादायकच होते. पण स्थानकाचा नूर पाहिला तर हे फ्लोरेन्सचे " शिवाजीनगर " रेल्वे स्थानक असावे व फ्लोरेन्सचे मुख्य स्थानक गावात असावे असे वाटले तसा बाहेर आलो. पुलावरच एकाने " बहुतेक सान्ता मारिया नोव्हेला स्टेशनवर क्लोकरूम आहेच " असा स्थानिक सल्ल्ला दिला व हायसे वाटले. बाहेर आलो. सगळाच परिसर नवा . विचारत विचारत बरोबरच्या अवजड बॅगा ओढत असतानाच एक " टी" असा बोर्ड दिसला.ती खूण कशाची आहे हे नेटवर वाचलेले होते. ते टोबेकॉनिस्ट चे दुकान होते. आत जाउन दुकानदारणीकडून चार, दीड तास चालणारी कोरी तिकिटे घेतली. व तिला सान्ता मारिया ला जाणारी बस कोणती ते विचारले. ती १२ क्रमांकाची बस होती. तिचा थांबा शोधून एकदाचे बस मधे बसलो. मीना प्रभूंच्या पुस्तकात त्याही चुकीच्या स्थानकावर
उतरल्याचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे आमचे झाले होते. अर्थात आम्ही पुढील गाडीच्या कनेक्शन चा विचार करून " चुकीच्या" स्थानकावर सहेतुक उतरलो.
बराच वेळ फ्लोरेन्स चे अरूंद पण देखणे रस्ते पहात आम्ही बर्‍याच वेळाने एकदाचे, सान्ता मारिया नोव्हेला चर्च पाशी आलो. या चर्च समोरच फ्लॉरेन्स प्रमुख रेल्वे स्थानक आहे. तिथे क्लोकरूम गाठून पहिले " हलके" झालो. बाहेर आलो. स्टेशनच्या प्रांगणात लॉनवर बरीच मंडळी लोळत पडलेली दिसत होती. काही जवळचे पदार्थ खात होती.

आम्ही कोणत्यातरी रस्त्याने भरकटत पहिले नदीच्या किनारी आलो, ही आर्नो नदी. पुण्याच्या मुठा नदीपेक्षा पाण्याला बरी म्हणावी इतकेच.

.
पॉन्ट वेशियो च्या एका कठडयावरून दिसणारी आर्नो नदी. सहसा या नदीला पूर येत नाही. हडकुळी असली तरी मुठेपेक्षा किंवा मिठी पेक्षा तब्बेत बरी दिसतेय. पलिकडे दिसतो तो पूल -पॉन्ट सान्ता ट्रिनिटा. न जाणो किती लेखक कवि यानी इथे " कट्टा" केला असेल !

उजवीकडे पाहिले एक पूल दिसला हाच तो फ्लॉरेन्सचा प्रसिद्ध " पॉन्ट व्हेशिओ ". इथे मात्र पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली होती. एकूण पूल काही खास नव्हता. पण म्हणे या पुलाला फार मोठा इतिहास आहे. पुलावर सोन्याचांदीच्या दागिन्यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा व्यापार दिसतो. माझ्या सारख्या सोन्याच्या दागिन्याचे आकर्षण अजिबात नसणारा देखील इथे घटकाभर " विन्डो शॉपिंग" करता झाला.
.
पोन्ट व्हेशिओ फ्लोरेन्स एका बाजूसे असा .
.
पूलस्थित सराफ बाजारातील एक शोकेस. वांगड्या, अंगठ्या ,चेन्स ..
.
या पुलावर ऑगस्ट महिन्यात म्हणजे भर सीजन मधे किती गर्दी होत असेल ..... ?
.
ही डुकरे चांदीची आहेत. कोण असेल याचे गिर्हाईक. .... ?
.
आणखी एक चांदीच्या वस्तूचा नमूना
या पुलावर दुकाने आहेत सबब पुलावर दुकाने हा " टूरिस्ट स्पॉट" होउ शकतो का तर उत्तर होय असे स्वीकारावे लागत होते.

पुलावरील वर्दळ पाहून आम्ही नदीकाठाला लागून असलेल्या रस्त्याने चालू लागलो. जवळ फ्लॉरेन्सचा नकाशा नव्हता पण बघण्यासारखी ठिकाणे चालण्याच्या मर्यादेत आहेत इतके माहिती होते. नदीपलिकडे पित्ती पॅलेस नावाची एक देखणी वास्तू आहे इतकेच गुगल वरून माहीत होते. आपोआपच एक चौकात आलो. एक मोठा मनोरा पाहून लगेच ओळख पटली हाच पर्यटकांचा लाडला " पिआझ्झ सिग्नोरिया" .
.
पिआझा सिन्गोरियाचा पॅनोरामिक फोटो- सौजन्य आंतरजाल.
हा चौक जस जसा काळ बदलत गेला तसतशी वेगवेगळी नावे धारण करीत आज त्याचे हे नांव रूढ आहे. या प्रांगणात अनेक चीजा आपले लक्ष वेधून घेतात पैकी मुख्य आहेत १. प्लॅझो व्हेशिओ २. लॉजिया डेल लांझी ३. फाउंटन ऑफ नेप्चून या खेरीज इतरही इमारती.
.
प्लाझो व्हेशिओ- फ्लोरेन्स- टाउन हॉल कम गढी.
पैकी प्लॅझो व्हेशो ही इमारत बर्‍यापैकी उंच असून तिचे रूप काहीसे गढी या स्वरूपात दिसते. यात एक उंच मनोरा असून गच्ची भोवती किल्ल्याप्रमाणे तटबंदी बांधलेली दिसते. टस्कनी प्रांतातील एक प्रमुख असा हा टाउन हॉल ही आहे. शेजारीच असलेली लॉजिया डेल लान्झी हा एक चौथरा आहे. त्यात दर्शनी भागात तीन रकाने (बे) असून क्लस्टर्ड पिलर्स व कॉरिन्थिअन कॅपिटल ( खांबाचा शिरोभाग ) आहे . ही व या चौकातील सर्व इमारती या रोमनिस्क शैलीत. ( प्रामुख्याने अर्धवर्तुळाकार कमान ) बांधल्या गेल्यात. या कट्ट्यावर आपल्याला विश्राम करण्यासाठी संगमरवरी बाके आहेत. व आजूबाजूस असलेल्या दिव्य संगमरवरी कलाकृती निरखीत आम्ही काही काळ त्या बाकावर स्थानापन्न झालो.

समोर पसरलेल्या अंगणात आपल्याला मायकेल एण्जेलो याच्या' डेव्हिड ' या पुतळ्याची प्रतिकृति पहायला मिळते. मूळ कलाकृति ही फ्लॉरेन्स मधील एका संग्रहालयात आहे असे म्हणतात. हा डेव्हीड मात्र उन्हा पावसात उभा असल्याने काहीस मळकट दिसतो.

चौकात एका बाजूला ओपन एअर रेस्त्रो आहे. बहुतेक टेबलांवर काचेचे प्याले दोन चार वाईन च्या अर्थात बूच काढलेल्या बाटल्या. नावाला एखादा हडकुळा खाद्यपदार्थ असे दृष्य. प्लॅझो व्हेशोच्या संन्निध नेपच्यूनचे कारंजे आहे.त्या कारंजाची काही दुरूस्ती चालू असावी कारण त्यावर एक तात्पुरते छत उभारून कारंजाभोवती पत्रे उभे केले होते. हे कारंजे १५६३ ते १५७५ याकाळात तयार झाले. मधोमध सागर देवता नेपच्यून हा उभा असून भोवताली सागर कन्या असे हे शिल्प आहे. एकुणात हा चौक इटाली मधील इतर चौकांच्या मानाने लहान असला तरी अनेक सार्वजनिक सभा , राजकीय व सामाजिक उलथापालथींचा हा चौक साक्षीदार आहे. इथे हर्क्युलस चा ही के पुतळा असून बसीओ बांदिनेल्ली या शिल्पकाराने तो साकारला आहे.
.
कॉस्मिओ मेडिसी - चिलखत परिधान अवस्थेत अश्वारूढ
उंच चौथर्‍यावर स्थापित केलेला अश्वारूढ पुतळा " कॉस्मिओ डि मेडीसी" चा असून त्यातील बारकावे अगदी टक लावून पहाण्यासारखे आहेत. कॉस्मिओ या राजाच्या॑ मुलाने -फर्डोनान्डोने गिम्बोलोग्ना या कलाकाराकडून हा पुतळा करवून घेऊन इथे स्थापित केला. त्याचे वजन सुमारे १२००० किलो आहे अशी नोंद आहे. या पुतळ्याच्या तळाशी उभ्या असलेल्या घोडागाडीत बसून आपल्याला या परिसराची सैर करता येते.

.
रेप ऑफ द सॅबिन -
लोजिया डेल लांझी या चौथर्‍याच्या पायर्‍याना लागून सिंहाच्या मूर्ती आहेत तर खुद्द चौथर्‍यावर एकसे बढकर एक अशा संगमरवरी शिल्पकृति काहीही तिकिट न काढता मनसोक्त पहाण्याची सोय आहे. भारतीय शिल्पकलेत अभाव असलेले अनॉटोमीचे ज्ञान इथे ठायीठायी पहावयास मिळते. याच इथे " रेप ऑफ डा सॅबिन वूमन " हे अजोड शिल्प पहावयास ठेवले आहे. रोमन आख्यायिका मधे रोमन पुरूषानी इतरत्र केलेली स्त्रीयांची पळवापळवी असा हा शिल्प काराने निवडलेला विषय.
.
सिग्नोरिया ते ड्योमो मार्ग
आता सिग्नोरियाला निरोप देऊन कोपर्‍यातील विया दि कल्झाईओली या अरूंद दगडी रस्त्याने आम्ही निघालो. वाटेत पिझ्झाची दुकाने, स्मरणवस्तूंची दुकाने पहात पहात अचानक एक भव्य चर्च दिसू लागले. हेच ते जगप्रसिद्ध" फ्लोरेन्स कथिड्रल." . मला वाटते इतक्या दिव्य वास्तूला इतका अडचणीचा परिसर हे जगात एक उदाहरणच ठरावे. सबब आळंदीला जशी समाधिमंदिराबाहेर ही गर्दी होते तसेच इथेही. त्यात घोडागाडी वालेही थोडीफार जागा खाउन टाकतात. संपूर्ण बाह्य भागावर हिरवा. तपकिरी व पांढरा इटालियन मार्बल वापरून अति किचकट असे पण सुरेख काम करण्यात आले आहे. प्रचंड मोठा घुमट हे या कथिड्रलचे खास वैशिष्ट्य. बाजूला उभा असलेला बेल टावर ही देखणा आहे.
.
फिओर चर्च चे प्रवेशद्वार
.
चर्च चा दर्शनी भागातील वरचा भाग. यात दोन्ही बाजूस व वर मधोमध दिसणारी " रोझ विन्डो" युरोपातील चर्चेस चा अविभाज्य घटक. आतून या खिडक्या रंगीत काचानी तयार केलेली " कथानके बायबलमधील " दाखवितात. यामधून सूर्यकिरण आले की या कथा जमीनीवर विखरतात ते पहाणे मस्त .
फ्लोरेन्स हे शहर पर्यटन विश्वात फार नावाजलेले आहे . याचे मुख्य कारण अर्थात हे कथिड्रल आहे. सदर कथिड्रल फ्लोरेन्सच्या सान्ता मारिया नोव्हेला या मुख्य रेल्वे स्थानकापासून जवळ आहे. याचे नाव " सान्ता मारिया फिओर उर्फ द्युओमो उर्फ फ्लोरेन्स कथिड्रल आहे. याची बांधणी " ब्रूनले " या वास्तुकाराच्या देखेरेखीखाली १३ व्या शतकाच्या सुरूवातीला सुरू झाली. फ्लोरेन्स ही भरभराट झालेली नगरी असली तरी भव्य अशा वास्तूची वानवा भरून काढण्यासाठी हे चर्च बांधले गेले असा इतिहास आहे. आतमधून मात्र हे चर्च तितकेसे आकर्षक नाही. शेजारी सुमारे २९० फूट उंचीचा बेल टावर आहे. त्याच्या बाह्य भागावर देखील संगमरवरी दगड वापरून मनसोक्त नक्षीकाम कारागिरांनी करून ठेवले आहे. फ्लोरेन्सच्या चर्च चा मुख्य दरवाजा बंदच असतो . हिरव्या रंगाच्या या दरवाज्यावर एकेका पॅनेल मधे काही प्रसंग कोरलेले आहेत. दरवाजावर एक पेंन्टिग देखील दिसते.

.
बायबलमधील कथेचा एक नमूना - केवळ अप्रतिम. ब्रॉन्झ मधील कारीगरी.
.
असेच आणखी एक पॅनेल.
चर्चच्या समोरच अष्टकोनी आकाराची बॅप्टीस्ट्रीची इमारत आहे. त्याचा ब्रॉंझमधील दरवाजा ही एक अचाट कलाकृति आहे. मुळात सफेद व हिरवा मार्बल यांचा सुरेख संगम या इमारतीत आहेच पण कळस म्हणजे हा दरवाजा. मी हा अगदी जवळून म्हणजे दोन फुटावरून निरखून पाहिला. जीझस च्या जीवनातील काही प्रसंग त्यात प्रकट केलेले दिसतात.
.
बॅप्टीस्ट्रीचा हा अजोड दरवाजा याला मायकेलेन्जेलो या खुद्द कलाकार असलेल्या महान विभूतीने " स्वर्गाचे द्वार" म्हटले.
सदर दरवाजा हा "गिबर्टी " या शिल्पकाराने साकारला असून दवाज्याचा निर्मिती काळ इ. स. १४२५ ते १४५२ हा आहे. त्यात कलाकाराने २७ वर्षे टिकवून धरलेली चिकाटी वंदनीय आहे.

चौदावे व पंधरावे शतक हा फ्लोरेन्सच्या आयुष्यातील सुवर्णकाळ. आपल्याकडे पुणे व कलकत्ता या नगराना भारतातील कलावंतांची नगरी , सांस्कृतिक राजधानी असे समजतो त्याचप्रमाणे या दोन शतकात फ्लॉरेन्सची व्याख्या होत असे. मायेकेल एंजेलो, लिओनार्दो दा विन्सी, बोटीचेली, महाकवि डान्टे लेखक बोकाशिओ हे सर्व फ्लोरेन्सकर मूळचे. अनेक लेखक व कवि यानी एकमेकाना भेटायचे संकेतस्तळ म्हणजे फ्लोरेन्स असे जणू ठरलेलाच संकेत. आज जरी आपल्यापैकी कोणी फ्लोरेन्सला जायचे ठरवले तरी आठ दहा दिवस रहायला कुणालाही खरोखरच आवडेल असे. ऐतिहासिक असे हे शहर आर्नो नदीच्या दोनही तीराना सामावून घेत पसरलेय. एका बाजूस इमारती काहीसे अरूंद रस्ते तर दुसर्‍या बाजूस पित्ती पॅलेस, टेकडीवरील मायकेल एंजेलो पिआझेल यांचे अस्तित्व. सर्व बाजूनी हिरव्यागार टेकड्यांची स्कायलाईन असे मस्त फ्लोरेन्स.

चर्च पाहून्न झाल्यावर चालत चालत सान्ता मारिया नोवेला रेल्वे स्थानकावर आलो. बसेस मिळतील न मिळतील. या धाकधुगीने लवकरात लवकर लगेच ताब्यात घेऊन' कॅम्पो द मार्ट' हे फ्लोरेन्सचे दुसरे स्थानक गाठावे अशा हिशेबाने लगेज ताब्यात घेतले. आमच्या गन्तव्यासाठी १२ क्रमांकाची बस हे आम्हाला माहीत झाले होते. त्याच १२ नंबरने आम्ही सकाळी येथवर आलो होतो ना? म्हणून बसमधे चढलो.

.
हिरवे फ्लोरेन्स
बराच वेळ बस गर्द झाडीतून जात जात हिरव्याकंच फ्लोरेन्सचे दर्शन घडवीत होती पण स्टेशन काही येण्याचे चिन्ह दिसेना. म्हणून मधेच एका जागी घाबरून उतरलो . वे तिथे चौकशी केली तर आम्ही योग्य बसमधेच बसलो होतो. पण हा मार्ग बहुदा सर्क्युलर असावा त्यामुळे सकाळी येताना जो परिसर आम्हाला दिसला तो यावेळी नव्हता . याचा फायदा आम्हाला एक झाला तो असा की
.
मायकेलएंजेलो निरिक्षण चौक . इथून नदीपल्याडचे फ्लोरेन्स दिसते आहे. मधे घुमट व मनोरा असलेली वास्तू म्हणजे च फ्लोरेन्स कथिड्रल.
आम्ही आयतेचळो फ्लॉरेन्सच्या एक महत्वाच्या 'टूरिस्ट स्पॉट' पाशी आलो होतो. नाव होते " पिझाले मायकेल एंजेलो. " एक उंच भागी हे एक मोकळे पटांगण आहे. अर्थात इथेही मध्यभागी शिल्प आहेच. एका बाजूने रस्ता तर दुसर्‍या बाजूने फ्लोरेन्सचे विहंगम दर्शन डोळ्यात साठविण्यासाठी रेलिंगने युक्त गॅलरी. येथून फ्लोरेन्स ची नदी तीवरचे पूल पलिकडे पसरलेले जुने फ्लोरेन्स शहर व त्यामधून आपले लक्ष वेधून घेणारे फ्लोरेन्स चे चर्च व त्यांचा तो महाकाय डोम. प्रांगणात अनेकविक्रेत्यानी स्टॉल्स लावलेले. त्यात काही चित्रकारांचे देखील. एकूण वातावरण टूरिस्टी. साडेसात वाजूनही सूर्य आकाशातच.आता इथे रमायचा मोह आवरून बसने रेल्वे स्टेशन गाठायचे होते. एकेकाळी व्यापारी केंद्र म्हणून सामर्थ्याशाली असलेले व्हेनिस आम्हाला खुणावत होतेच ना ?

प्रतिक्रिया

फ्लोरेन्सला केवळ एकच दिवस?? मजा नाय काका.

किमान २ दिवस तरी द्यायला हवे होतेच. लेख मस्तच. नुकतेच इन्फर्नो वाचलेले असल्याने परत उजळणी झाली.

चौकटराजा's picture

2 Jun 2017 - 7:44 pm | चौकटराजा

मी एकतर जायचे यायचे विमानाचे तिकिट अगोदरच काढून ठेवले होते.यामुळे काही काटछाट . दुसरे असे की फ्लॉरेन्सपेक्षा वास्तू विद्या रोम व पॅरिस इथे अधिक खुललेली आहे. पण एक काल या शहराचा ही होता हे खरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2017 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

खास भन्नाट चौरास्टाईलमध्ये चालली आहे सफर ! वर्णनाची खुसखुशीत शैली आणि मस्त चित्रे यामुळे मजा येत आहे.

नेपल्स ते मिलान या मार्गावर धावणार्‍या नोट्टे ( नाईट ट्रेन) या चित्रातला रॉकस्टार लै आवडला ! ;) :)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2017 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

खास भन्नाट चौरास्टाईलमध्ये चालली आहे सफर ! वर्णनाची खुसखुशीत शैली आणि मस्त चित्रे यामुळे मजा येत आहे.

+१

अभिदेश's picture

2 Jun 2017 - 10:50 pm | अभिदेश

" थर्ड(क्लास) वर्ल्ड मधील म्हण्जे एक निग्रो होता" ----- हे नाही आवडलं. आपण भारतीय खूप रेसिस्ट आहोत , हे सिद्ध करणारा.... बाकी चालू द्या.

निशाचर's picture

3 Jun 2017 - 3:17 am | निशाचर

ते वाक्य मलाही खटकलं.
आपण इतरांकडे ज्या दृष्टीने पाहतो तसं इतरांनी आपल्याकडे पाहिलं तर चालेल का?

पिलीयन रायडर's picture

3 Jun 2017 - 3:33 am | पिलीयन रायडर

सहमत

चांगल्या लेखमालेला गालबोट लागेल असं वाक्य. निग्रो हा शब्द वापरत नाहीत. हे वाक्य संपादित करुन घेता आले तर बरे.

तिकडे वापरत नसावेत इथे चालतय

पिलीयन रायडर's picture

4 Jun 2017 - 1:38 am | पिलीयन रायडर

स्थलसापेक्ष असेलही, पण महत्वाची गोष्ट ही आहे की "थर्ड क्लास" हे विशेषण लावणे चूक आहे. एक माणुस तिथे तिकिट नसताना झोपला होता किंवा त्यांच्याबद्दल काही वाईट किस्से तुम्ही ऐकले होते म्हणुन तुम्ही त्यांना "थर्ड क्लास" म्हणणं चुकच आहे. माझाही आक्षेप त्याला आहे. नुसता निग्रो हा शब्द प्रयोग असता तर खटकलाही नसता. पण इथे सरळ सरळ हिणवण्याच्या टोन मध्ये लिहीलेला आहे. महारांना म्हारडे किंवा ब्राह्मणांना बामण म्हणण्यामध्ये जे मुद्दाम हिणवणं असतं, तेच.. टेक्निकली ते महार किंवा ब्राह्मण आहेतच की. पण तरी ते शब्दप्रयोग टाळावेत असं म्हणतातच ना.

बाकी ह्यावरही जोरदार प्रतिवाद होईलच. पण ज्याच्या त्याच्या जाणीवांवर आणि समजुतींवर सोडुन देते.

मला आक्षेपार्ह वाटलं, मी कळवलं.

चौकटराजा's picture

3 Jun 2017 - 7:22 am | चौकटराजा

मला त्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व माहीत असण्याचे कारण नाही.बाहीतर मी त्याच्या उल्लेख हा " असा " केलाच नसता. पण बिगर युरोपियन कसे वागतात इथे याचा नमूना इथेच सांगतो. मी रोम मधे ज्या ठिकाणी रहात होतो. इथे आलेल्या एका भारतीय नागरिकाने सांगितलेली हकिकत. तो व ची पत्नी पॅरिस येथील टेकडीवर फिरत असताना एक निगर तरूणांचे टोळके त्यांच्या पाशी आले व त्यातील एकाने त्या बाईचे मनगट घट्ट पकडले व ते सोडण्यासाठी ५० युरोची मागणी केली. या भारतीय माणसाने गयावया करीत तिला सोडण्याची विनंति केली .शेवटी हो नाही करता " सौदा" ५ युरोवर सुटला. मला स्वीस च्या सहलीत भारताच्या पॅरिस मधील वकीलातीतील एक उच्च पदस्थ भेटले त्यांच्या बरोबर गप्पा रंगल्या असताना त्यानीही पॅरिस हे कसे धोकादायक बनले आहे त्यात " या" लोकांचा व इसिस मुळे घुसलेल्या निर्वासितांचा कसा वाटा आहे हे विशद केले. आता बोला !

निशाचर's picture

3 Jun 2017 - 1:10 pm | निशाचर

मला त्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व माहीत असण्याचे कारण नाही.

तो माणूस इटलीचा, अमेरिकेचा नागरिक आहे की कांगोचा याने तुमच्या त्याच्याशी आलेल्या संबंधात काय फरक पडतो? एखाद्या व्यक्तीच्या रंगामुळे (किंवा नागरिकत्वामुळेही) असा उल्लेख करणं चूक नाही का?

बिगर युरोपियन म्हणजे नक्की कोण? मूळचे युरोपियन नसलेले असं म्हणत असाल तर त्यात भारतीयही मोडतात. भारतसुद्धा so called first world मध्ये मोडत नाही आणि भारतीयांच्या सुरस कहाण्याही कमी नाहीत.

माझा प्रश्न पुन्हा एकदा विचारते. आपण इतरांकडे ज्या दृष्टीने पाहतो तसं कुणी आपल्याकडे पाहिलं तर चालेल का?

चौकटराजा's picture

3 Jun 2017 - 2:34 pm | चौकटराजा

भारतीयांकडे अशा तर्‍हेने पाहिले जातेही व ते युक्त आहे. आमच्याकडेही तसे पाहिले गेले .आमच्या भारतातील संवयी तिथे नडल्या. काहीनी मदत केली तर काहीनी कुत्सितपणे पाहिले. पण त्याला इलाज नाही. स्वीसमधे अतिशय सभ्यपणे ओळख नसलेल्यालाही नजर भेट झाली तरी " हॅलो" म्हणण्याची प्रथा आहे.यात महिलाही आल्या . सुरूवातीस मला हे माहीतच नसल्याने मी ही त्यांच्या हिशेबात उणाच होतो. पण हा शिष्टाचार कळल्यावर मी व स्वीस माणूस दोघेही " कंफर्टेबल" झालो.

वाह मस्त सुरुये सफरनामा

झोकात चाललेला प्रवास आणि झकास प्रवासवर्णन.
अवांतरः...... हल्ली निग्रो, मुसलमान, ज्यू, हिंदू वगैरे शतकानुशतके वापरात असलेले आणि तात्काळ अर्थबोध करवणारे शब्द वापरायचे नाहीत, अशी टूम निघाली आहे. अमेरिका वगैरे देशात ती तिथल्या राजकारणाच्या संदर्भात कदाचित आवश्यक असेल (वा नसेलही), म्हणून आपण मिपावर मराठी लोकांनी देखील त्याची री ओढत या शब्दांचा विटाळ मानावा, हे निरर्थक वाटते. चौरांना त्या माणसाकडे बघितल्यावर 'हा निग्रो आहे' असे वाटले, आणि त्यांनी तसे इथे लिहिले, यावर आक्षेप घेण्याचे काहीही कारण दिसत नाही. मुळात निग्रो या शब्दाचा उपयोग १६ व्या शतकात स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेत 'काळा' या अर्थाने केला गेला. आजही 'ब्लॅक' हा शब्द आक्षेपार्ह मानला जात नाही. निग्रो वा काळा या शब्दात नेमके आक्षेपार्ह असे काय आहे ? किंवा मुसलमान या शब्दात काय आक्षेपार्ह आहे ? मग 'गोरा' 'गोरी' 'गहूवर्ण' 'पीतवर्णी' या शब्दांनाही आक्षेपार्ह मानायला हवे, आणि पार्शी, सिख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन वगैरे शब्दांचाही विटाळ मानायला हवा.

...
.

स्पा's picture

3 Jun 2017 - 11:09 pm | स्पा

कडक प्रतिसाद काका
चायला उगाच त्या अमरिकनांची री ओढणारे दिसले की डोके फिरते

निशाचर's picture

4 Jun 2017 - 1:55 am | निशाचर

निव्वळ अमेरिकेत चालत नाही म्हणून मिपावर किंवा दुसरीकडे कुठे एखादी गोष्ट चालू नये असं मला अजिबात वाटत नाही. त्याशिवाय सगळ्याच ठिकाणचे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय संदर्भ सामान्य माणसांना माहित असतील आणि ती त्याप्रमाणे वागतील असंही नाही.

निग्रो शब्दाचा अर्थ स्पॅनिशमध्ये काळाच होतो. काळ्या कॉफीला काफे नेग्रो म्हणणं तिथे कुणाला गैर वाटत नाही. मराठीतही निग्रो, काळा आणि कृष्णवर्णीय या शब्दांत मला स्वतःला कोणताही शब्द चूक वा बरोबर वाटत नाही. तुम्ही लिहिलंय तसं

चौरांना त्या माणसाकडे बघितल्यावर 'हा निग्रो आहे' असे वाटले, आणि त्यांनी तसे इथे लिहिले

एवढंच असतं तर माझाही आक्षेप नसता. परंतु

असे करणारा माणूस अर्थातच " थर्ड(क्लास) वर्ल्ड मधील म्हण्जे एक निग्रो होता.

या वाक्यातून 'असं काही केलं म्हणजे ती व्यक्ती काळीच असणार, काळी माणसं सोडून असं कुणी करत नाही', 'निग्रो म्हणजे थर्ड क्लास' हे जे अर्थ निघतात त्यांना माझा आक्षेप आहे.

तुम्ही टाकलेले फोटो मलातरी लेखातील त्या वाक्याशी विसंगत वाटतात.

दशानन's picture

4 Jun 2017 - 4:53 am | दशानन

+1
अगदी अगदी शब्दशः सहमत.

या वाक्यातून 'असं काही केलं म्हणजे ती व्यक्ती काळीच असणार, काळी माणसं सोडून असं कुणी करत नाही', 'निग्रो म्हणजे थर्ड क्लास' हे जे अर्थ निघतात त्यांना माझा आक्षेप आहे.

....... हा आक्षेप योग्य आहे, आणि त्याबद्दल चौरा यांना 'मिपा की अदालत' मधील 'कटघर्‍या'मधे एक मुजरिम म्हणून खडा करून, तमाम सबूत और दलीलों को मद्देनजर रखते हुए और उनपर लगे हुए इल्जामों पर गौर फर्माते हुए ये अदालत उनको कसूरवार ठहराती है और चौरा को सजा ए लेखन फर्माती हय. लिहाजा वे जल्द से जल्द अपनी मलिका-ए लेख का पुढला भाग लिहीणे का काम हाथ मे ले ले.

चित्रगुप्त's picture

4 Jun 2017 - 7:25 am | चित्रगुप्त

तुम्ही टाकलेले फोटो मलातरी लेखातील त्या वाक्याशी विसंगत वाटतात.

याचेशी काहीसा सहमत आहे. बरेचदा मी आपल्या लेखात आणि प्रतिसादात ज्या प्रतिमा टाकत असतो, त्या पूर्णपणे त्या त्या विषयाशी सुसंगत असतातच असे नाही, तरी मी त्या टाकत असतो, कारण या निमित्ताने माझे स्वतःचे आणि वाचकांचेही एकंदरित चित्रे, फोटो वगैरे दृष्य प्रतिमांविषयीचे आणि तत्संबंधित माहितीचे आकलन विस्तृत होत जाते, असे मला वाटते.
'निग्रो' या शब्दाविषयी हल्ली निर्माण झालेला आहे तसा आकस वा तो शब्द त्याज्य ठरवणे हे पूर्वी नव्हते, हे मी दिलेल्या चित्रातून समजते. या संदर्भात एक विचारणा: निग्रो या शब्दाचा विटाळ मानणे नेमके केंव्हापासून सुरू झाले, आणि त्यामागे कोणती राजकिय्/सामाजिक वा अन्य कारणे होती?

अमेरिकनांची आपण करत असलेली नक्कल नुस्ती " पटकन थालिपीठ लावत्ये" च्या ऐवजी 'पटकन पिझ्झा मागवूया' एवढीच नसून पूर्वीच्या 'अपंग' वा 'अपाहिज' च्या जागी "अलग तरह से काबिल" वगैरे वाचून हसावे की रडावे, हेच कळेनासे झालेले आहे. काही काळानंतर 'हिंदू' च्या ऐवजी 'नापाक' म्हणावे लागणार की काय ?
.

रॉजरमूर's picture

13 Jun 2017 - 9:27 pm | रॉजरमूर

हे फ्याड
आपल्याकडे अपंगांना "दिव्यांग" म्हणायचे असे कोणीतरी फर्मान काढून आणले आहेच की...
काय मूर्खपणा आहे , यातनं दिव्य या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थच काढून घेतला पार वाट लावलीय या शब्दाची ....
"दिव्य" हा शब्द विशेष , असामान्य , विलक्षण प्रतिभा असलेल्यांसाठी वापरला जातो तर हा शब्द एखाद्या शारीरिक अवयवाची त्रुटी (disable )असणाऱ्यांसाठी कसा काय वापरला जाऊ शकतो .
अपंग आहे तर आहे अपंग या शब्दाने कोण दुखावले गेल्याचे निदान माझ्या तरी बघण्यात नाही बरं या गोष्टीला त्या लोकांनी स्वीकारलेले असतेच की .

चौरा काका लेखमाला छान चाललीय ..
अजून विस्तृतपणे येऊ द्या .

संजय क्षीरसागर's picture

3 Jun 2017 - 4:56 pm | संजय क्षीरसागर

निग्रो हा तिकडे आक्षेपार्ह शब्द असेल आपल्याकडे तो साधा व्यक्ती निर्देश आहे. तुम्ही लिहा तुमच्या उत्सफूर्त स्टाईलमधे.

चौकटराजा's picture

3 Jun 2017 - 5:23 pm | चौकटराजा

आता स्लॉव्ह, सॅक्सन, मंगोलियन, द्राविडियन, लॅटिन या ही शिव्या मानायचा का हो मिपाकर ?

तुमच्या धाडसाचे कौतुक. शिवाय अभ्यासही बराच केला आहे. मराठी शब्द वापरलेले आवडले.

चौकटराजा's picture

4 Jun 2017 - 6:17 am | चौकटराजा

ते वाक्य थर्ड( क्लास) वर्ल्ड मधील बहुदा आफ्रिकन असे बद्लू शकतो का ? कारण थर्ड वर्ल्ड हे थर्ड क्लास आहे यावर मी ठाम आहे. परंतू ते निग्रो लोकांमुळेच " तसे" आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही. भारतीय माणूस महात्मा गांधीपासून जरा स्वतः च रेसीझम ची शिकार आहे तर तो स्वतःचा रेसिस्ट असेलच कसा ..? बाकी खूप वंदनीय व्यक्ती या वंशात झाल्या आहेत यात कुणाला संदेह असायचे कारण काय ?

सप्तरंगी's picture

5 Jun 2017 - 11:39 am | सप्तरंगी

' अर्थातच' हा शब्द पण काढायला हवा, कारण त्याचा अर्थ: असे करणारा दुसरा कुणी नाही तर आफ्रिकनच असणार असा होतो.
आणि third क्लास वर्ल्ड असे तरी का म्हणावे कोणाला, मग भारताला सेकंड क्लास म्हणावे का, असे कोणी म्हणले तर आपल्याला आवडेल का?
भारतीयांना पुर्वी रेसिझम ला तोंड द्यावे लागले तरीही आपण अजुनही विचारांमध्ये बदल का करत नाहीत हे एक कोडेच आहे. पूर्वापार सवयींमुळे आपल्याला ते तितकेसे शक्य होत नसावे पण आपण हे ठरवुन बदलायला हवे.
आपल्या पुढची पिढी prejudice, discrimination, beliefs समजुन घेऊन humanion ग्रॉउंड्सवर विचार करताना दिसते आहे यात समाधान आहे.
पुढच्या ट्रिप ला शुभेच्छा !

चौकटराजा's picture

5 Jun 2017 - 12:00 pm | चौकटराजा

तो एक आपले आरक्षण नसताना त्या जागेवर बसलेला व आमचे आरक्षण आहे असे सांगताही न उठणारा एक मॅनरलेस " थर्ड क्लास " माणूस होता . असे टाकून ते सर्व वाक्य मी मागे घेत आहे. संपादक तेवढेच ते दुरूस्त करा. बाकी पॅरिसमधे जिचा हात पकडून पैसे मागितले गेले त्या हात धरणार्‍याचा इथे कोणी निषेध केला नाही .
बरोबरच आहे. तो धरणारा व जिचा धरला तो हे एकाच " गटातले" आहेत म्हणून तर नव्हे ? तिथे वंशभेदाचा प्रश्नच नव्हता नाही का ?

सप्तरंगी's picture

5 Jun 2017 - 12:14 pm | सप्तरंगी

तुम्ही प्लिज आमच्या कोणाच्याही म्हणण्याचा विपर्यास करून कोणताही निष्कर्ष काढु नका. तुमची ट्रिप चांगली होऊ द्या:). सगळ्या प्रकारची माणसे सगळ्या वंशात असतात. काही वंशात जास्त वाईट वागणारी असतीलही. त्याचे जस्टिफिकेशन पण नाही करत नाही. तो पॅरिस मधील माणूस अर्थातच चुकीचंच वागला.
यातही गमतीचा वाटलेला भाग हा कि तिचा नवरा ५० युरो पासुन ५ युरो पर्यंत negotiate कसा करत राहिला, पण तो वेगळा मुद्दा आहे. असो. शुभेच्छा !