अख्खा मसूर

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
28 May 2017 - 11:42 pm

आज एक मस्त आणि झटपट होणारा प्रकार केलाय.सगळ्यांनाच आवडलाय खूप. मग तो इथे द्यायलाच हवा ना? तर घ्या आता ;)

वाढणी-३-४ व्यक्तींसाठी

साहित्यः

१ वाटी अख्खे मसूर, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १/४ वाटी सुके खोबरे किसून, १ टीस्पून तीळ, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर , १/२ टीस्पून गरम मसाला, १.५ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, सजावटीकरिता बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.

कृती:

अख्खे मसूर ५-६ वेळा स्वच्छ धुवून कुकरमधून ४ शिट्ट्या काढून मउ शिजवून घ्यावेत. मसूर चा गाळही होता कामा नये आणि ते कच्चटही रहाता कामा नयेत.
एका पातेल्यात तीळ खमंग भाजून घ्यावेत. त्यातच सुके खोबरेही भाजून घावे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

तीळ, खोबरे, आलं लसूण पेस्ट आणि चिरलेल्या कांद्यातला थोडासा कांदा मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.

नेहमीसारखी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद याची फोडणी करून वाटलेले मिश्रण घालून जरासे परता. त्यात उरलेला कांदा घालून सोनेरी रंग येइतो परता. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परत थोडेसे परता. तिखट, धने-जिरे पावडर घाला, शिजवलेले मसूर घाला.गोडा मसाला, गरम मसाला, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. ही उसळ अगदी कोरडी नसली तरी फार घट्टही नसते. वाढताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी/ मौसूत पोळ्या, कांदा, लिंबाची फोड याबरोवर द्या.

झालंसुद्धा..

.

.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

28 May 2017 - 11:48 pm | पद्मावति

ओहो...क्लास्स!

अभ्या..'s picture

29 May 2017 - 1:04 am | अभ्या..

अक्का मसूर
=))

=))

यावरून मला खूपच मार पडला आहे ;)

-------
पाककृती छानच जमलेली दिसत आहे, फोटो उत्तम आला आहे.
जर कधी पुढे असे नेटवरून फोटो पाहता पाहता हीच डिश चाखावयास मिळेल असे काही तंत्र आले की मज्जा येईल... :D

मस्तच.. मला फार आवडतो.. कधी तीळ, शोबरे घालून बनवला नाही पण.. आता पुढच्या वेळी तसा बनवून बघेन.

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2017 - 12:35 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा रे वाहव्वा!

जागु's picture

29 May 2017 - 12:53 pm | जागु

छान.

मी कांदा खोबर्‍याचे वाटण घालते. आता तिळ घालूनही करून बघेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2017 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

अख्ख्या मसूरची पातळ भाजी घरी नेहमीच बनते आणि आवडतीही आहे.

पाकृ हीच की वेगळी आहे ते माहित नाही. तुलना करायला देतो. :)

या पदार्थाची अनेक हॉटेलं कोल्हापूर, सांगली, सातारा पट्ट्यात निघाली आहेत. खरंच हा इतका टेस्टी प्रकार आहे का?

बिरड्या, चवळी, मटकी वगैरे हे आमचे जास्त आवडते प्रकार..

खरेतर स्वयंपाकघरात मी फारसा रमत नाही आणि फार काही बनविताही येत नाही, पण आख्खा मसुरची पाककृती बघून ईथे आलो. अस्सल आख्खा मसुर खायचा असेल तर आमच्या कराडला या. कराड - चिपळूण रोडवर "शिवराज ढाबा" म्हणून आख्खा मसुरसाठी फेमस असलेला ढाबा आहे. तिथला एकदा खा, परत दुसरीकडचा आवडणार नाही याची गॅरेंटी देतो. याच शिवराज ढाब्यात शिवाजी महाराजांचा जेवताना पुतळा केला आहे. सकाळी जेवण तयार केल्यानंतर आधी महाराजांना नैवेध्य दाखविला जातो, मग गिर्‍हाईकाला वाढले जाते.
याच्याच बरोबर समोर "खुशबु ढाबा" आहे, त्याठिकाणी अंडाकरी लई भारी मिळते, शिवाय चुलीवरचे मटण आणि कांदा भाकरी हे कॉम्बिनेशन ही मस्त असते म्हणे, कारण मी शाकाहारी असल्याने ते खाल्लेल नाही, पण योगायोगाने कोणी मिपाकर ईकडे आले तर त्यांच्या माहिती साठी टंकले.

सचिन७३८'s picture

29 May 2017 - 8:40 pm | सचिन७३८

कराडला २००९ साली मी ‘अख्खा मसूर स्पेशल’ अशी पाटी असलेल्या हॉटेलात जेवलो होतो. (हॉटेलचे नाव लक्षात नाही) ती अप्रतिम चव अजूनही विसरलेलो नाही.

Ranapratap's picture

29 May 2017 - 8:41 pm | Ranapratap

मी पण, शिवराज धाब्यावर जेवलो नाही, पण पुढच्या वेळी कराडला गेलो की नक्की भेट देईन.

माझ्या माहितीप्रमाणे आख्खा मसूरचा उगम इस्लांपूरचा (जि. सांगली.) चुभुदेघे

अरूण पाटील, माळी आणि एमके धाबा हे तीन यातले फेमस लोकं. धाबे स्वच्छतेच्या मानाने यथातथा आणि मसूर, दालफ्राय, रोटी, लोटक्यातले दही व जीरा राईस याशिवाय अन्य काहीही मिळणार नाही त्यामुळे नवीन पब्लीक थोडे बावचळून जाते.

एमके धाब्यावर मागच्याच आठवड्यात जाणे झाले. चव आजीबात बदललेली नाही. दर मात्र कालानुरूप बदललेला आहे. २००२ साली ३० रूपयांना मिळणारी मसूर प्लेट आता ८० ला मिळते. एमकेला जाणार असलात तर जेवणारे पब्लीक भागीले दोन अशा रोट्या मागवा. त्यांची एक रोटी ही सर्वसाधारणपणे ३ रोट्यांच्या आकाराची येते. त्यामुळे निम्मी रोटी संपली की उरलेली कडक आणि वातड झालेली निम्मी रोटी संपता संपवत नाही.

गुगलबाबा कराड चिपळूण रोडवर चिपळूणच्या दिशेने पुल उतरल्या उतरल्या लगेच उजवीकडे शिवराज धाबा दाखवत आहे. हाच धाबा का..?

दशानन's picture

30 May 2017 - 10:34 pm | दशानन

आताच जेवण करून उठलो आहे, ढाबा खरोखरच आवडला, स्वच्छता, टापटीपपणा आणि उत्तम सेवा!
अख्खा मसूर टेस्टी आहेच, पण बेंगन मसाला देखील जबरा!

*शिवाजी महाराजांची मूर्ती खूपच आवडली!

मस्त ग...एकदा करून बघतो...बाकी ते NH4 ला ह्याच नावाच्या हाटिलात हे खाल्लाय. मध्यंतरी ह्याचे फार फॅड आलेले highway ला. पण घरी केलेले हे मात्र चवीला उत्तम असणार ह्यात शंकाच नाही!

नँक्स's picture

29 May 2017 - 1:41 pm | नँक्स

मस्तच..

प्रसन्न३००१'s picture

29 May 2017 - 2:49 pm | प्रसन्न३००१

पुणे - कोल्हापूर मार्गावर जागो-जागी अक्खा मसूरच्या पाट्या दिसतात... कुतूहल म्हणून एके ठिकाणी मी हा प्रकार खाऊन पण बघितला... जाम आवडला मला... पण नंतर ट्यूब पेटली कि घरी बायको मसुराची उसळ करते ती पण डिट्टो लागते :-D

मस्त मला आवडते पण ही तर नेहमीची उसळ आहे . आणी वाटण घाट्ण केल्यावर कसली झटपट

सविता००१'s picture

29 May 2017 - 10:35 pm | सविता००१

नेहमीचीच उसळ आहे. आणि अति वाटण घाटण नाहीये हो. लवकरच तर होते. अर्थात तुमच्या मताचा आदर आहे.

मसूर आधी शिजवून न घेता थोडं थोडं पाणी घालत वाफेवर शिजवून बघा.

आदूबाळ's picture

29 May 2017 - 8:33 pm | आदूबाळ

ही काय पद्धत आहे? म्हणजे उकळत्या पाण्यावर रोवळी / चाळणी ठेवून त्यात मसूर शिजवायचे असं का?

---
मूळ पाकृ मस्तच आहे.

सविता००१'s picture

29 May 2017 - 10:38 pm | सविता००१

पण मग तेव्हा मसूर आधी भिजत घालायला लागत असतील ना? शिजतात का थोडं थोडं पाणी घालून वाफेवर?
हे विचारायचं दुसरं कारण असं की वैद्यकीय कारणांमुळे मला माझ्या बाबांना पूर्ण शिजलेलीच कडधान्ये द्यावी लागतात. थोडीही कडक राहिलेली नाही चालत. म्हणून मी कुकरला लावली सरळ.

पण मग तेव्हा मसूर आधी भिजत घालायला लागत असतील ना?

हो आधी भिजत घालायचे. एकीकडे फोडणी करायला घेताना दुसरीकडे अंदाजे पाणी उकळायला ठेवायचं. फोडणीतले कांदा टॉमेटो वैगरे शिजले की त्यात भिजलेले त्यात भिजलेले मसूर घालायचे आणि परतून घ्यायचे. नीट परतले की पातेलीतल्या मिश्रणाच्या पेरभर वर राहील इतकं उकळत ठेवलेलं पाणी ओतायचं आणि पातेलीवर बसेल अशी झाकणी ठेवायची आणि त्या झाकणीत पाणी ओतायचंं म्हणजे भाजी लागत नाही. उकळलेलं पाणी अशासाठी की पातेलीचं आणि पदार्थांचं वाढलेलं तापमान खाली जावून पदार्थ किरवजत (शिजायला वेळ घेत) नाही.

आदूबाळ's picture

30 May 2017 - 10:24 am | आदूबाळ

धन्यवाद!

सचिन७३८'s picture

29 May 2017 - 8:46 pm | सचिन७३८

जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आता येत्या रविवारी अख्खा मसूरा करून खाईन.

समाधान राऊत's picture

30 May 2017 - 10:26 pm | समाधान राऊत

धाब्यावर आलेली माणसं *LOL*

पैसा's picture

31 May 2017 - 5:53 pm | पैसा

सोपी आणि छान पाकृ. मसूर चवदार मुळातच असतो.

पुंबा's picture

1 Jun 2017 - 10:35 am | पुंबा

मस्त!! कराडची आठवण आली..

मसूर,राजमा फक्त थंड हवेतच पिकतात. किनारपट्टीच्या उष्ण दमट हवामानात येत नाहीत. गोडा मसाला ,गरम मसाला एकाच पदार्थात ?

सविता००१'s picture

2 Jun 2017 - 11:18 am | सविता००१

हो. छान लागत

अनन्न्या's picture

3 Jun 2017 - 2:00 pm | अनन्न्या

मला मसूर उसळ नाही आवडत, कुळीथ चवळी कडवे जास्त प्रिय, पण तीळ सोडून बाकी अशीच करते