एक पटकन बनणारं , कमी साहित्य लागणारं आणि फार पसारा न करता मस्त इम्प्रेसिव होणारं एक डेजर्ट – कॉफी मूस.
साहित्य ( ४ जणांसाठी)
• २ अंडी
• दुध २०० मिली (कोमट)
• साखर ३० ग्राम
• कॉफी पावडर १ चमचा (Decoction साठी )
• जिलेटीन १ चमचा (अंदाजे १० ग्राम)
• विप्ड क्रीम १०० ग्राम
• ४ छोट्या वाट्या अथवा सिलिकॉन साचे
• एक भांडे व त्यावर ठेवता येईल इतपत आकाराचे भांडे .
वेळ :
• तयारीसाठी १५-२० मिनिटे
• तयार करायला साधारण २५-३० मिनिट
• फ्रीजिंग – २ तास (किंवा जास्त , गरजे प्रमाणे )
• १० मिनटे प्लेटिंग व प्रेजेन्टेशन
कृती :
सगळ्यात आधी जिलेटीन साध्या पाण्यात (एकास दोन प्रमाणात पाणी) घालून कल्चर तयार करायला ठेऊन द्या.
नंतर एग योक व एग व्हाईट वेगळे करून घ्या . त्यानंतर एग योक व साखर एकत्र करून घ्या . आता हे भांडे Gas वर ठेवलेल्या व गरम पाण्याने भरलेल्या भांड्यावर ठेवा व साखर विरघळून मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे (याला डबल बॉईल पद्धत म्हणतात , यात पदार्थ खालील भांड्यातल्या पाण्याच्या वाफेवरच शिजवतात हे करत असताना अधून मधून वरचे भांडे उचलून परत ठेवावे जेणेकरून तापमान खूप वाढत नाही व पदार्थ जळत नाही ). साखर विरघळल्या नंतर हळू हळू दुध (कोमट) टाकत मिश्रण ढवळत राहायचं. ही कृती मूस चांगले होण्यासाठी अत्यंत निट होणे गरजेचे आहे. कारण हे मिश्रण निट ढवळलं नाही तर त्यात छोटे छोटे गोळे तयार होतात व मूस गाठीदार होतं. आता साधारण ५-१० मिनिट ढवळून झाल्यानंतर हे मिश्रण साधारण कस्टर्ड/लस्सी सारख्या कंसीस्टन्सी ईतपत घट्ट होतं. हे झाल्यावर भांडं खालच्या भांडया वरून खाली उतरवून ठेऊन द्या. आता या मिश्रणात आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे कॉफी Decoction टाका. नंतर आपण केलेलं जिलेटीन कल्चर (जे आता पर्यंत थोडं घट्ट झालेलं असतं, ती कल्चर ची वाटी, जिलेटीन जरा पातळ होईपर्यंत थोड्या गरम पाण्यात धरायची ) Decoction मिक्स केलेल्या मिश्रणात टाकून थोडं ढवळून परत मिक्स करा.
यानंतर विप्ड क्रीम Hand मिक्सी ने बीट करायचं. आपल्याला एग व्हाईट व क्रीम दोन्हीही भांडं उलटं केलं तरी सांडायला नको ईतपत घट्ट करायचंय. क्रीम व व्हाईट दोन्ही वेगवेगळ्या भांड्यात बीट करायचं.
योक ,कॉफी Decoction, विप्ड क्रीम व जिलेटीन च मिश्रण
आता एग योक व क्रीम मिश्रण केली आहेत ती एकमेकात “कट फोल्ड” पद्धतीने मिसळून घ्या. हे नीट मिक्स झाल्यावरच जे एग व्हाईट आपण बाजूला करून ठेवलं होतं त्याला सुद्धा Hand मिक्सीने घट्ट होईपर्यंत फिरवावे (Beating). आणि बीटन एग व्हाईट या आधी तयार केलेल्या मिश्रणात मिक्स करायचे. हे सुद्धा क्रीम प्रमाणेच “कट फोल्ड” पद्धतीने मिक्स करा.
बिटन एग वाईट
हे पूर्ण तयार मिश्रण (एग योक + क्रीम + व्हाईट) छोट्या वाट्यांमध्ये ओतून फ्रीजर मध्ये साधारण २ तासासाठी ठेऊन द्या.दोन तासानंतर या वाट्या बाहेर काढून मूस प्लेट्स मध्ये काढून गार्निशिंग व प्लेटिंग करावे. प्लेटिंग साठी बोर्नविटा , cofee , कन्फेटी वापरू शकता. आवडी नुसार मेल्ट चॉकलेट सुद्धा वापरू शकता.
वाट्यांमध्ये ओतलेलं मिश्रण
फायनल प्रोडक्ट
ईतर वेरिएशन्स :
कॉफी ऐवजी फ्लेवरिंग म्हणून चॉकलेट सुद्धा वापरू शकता. कंपाऊंड चोकलेट वापरल्यास जिलेटीन ची गरज नाही. इतकेच नाही तर संत्रे वगैरे ही वापरू शकता. मात्र संत्रे असेडीक असल्याने दुध ऐवजी एग योक मध्ये संत्रा जूस घालून पहिले मिश्रण करावे.फ्लेवरिंग बदलण्यासाठी वेग वेगळे पदार्थ वापरताना त्यांचे असेडीक किंवा अल्कली गुणधर्म माहित करून घ्यावे.
टीप : या सर्व कृती करताना मिक्सिंग वगैरे साठी लाकडी चमचाच वापरावा.
कट फोल्ड पद्धत इथे पहा :
एन्जॉय कूकिंग .....
- आपलाच
खादाडखाऊ ज्याक ऑफ ऑल .
प्रतिक्रिया
28 May 2017 - 3:48 pm | मोदक
झक्कास रे... लिस्ट बनवतो आहे. ;)
1 Jun 2017 - 1:41 pm | ज्याक ऑफ ऑल
मला पण सांग ...
28 May 2017 - 5:53 pm | आदूबाळ
भारी!
हे जिलेटीन कशासाठी घालायचं असतं?
1 Jun 2017 - 1:42 pm | ज्याक ऑफ ऑल
आपण हॉटेल मध्ये जेली वगैरे खातो ... टी कशी डुलु डुलु हलते ? तसं होण्यास मदत होते जिलेटीन ने ..
28 May 2017 - 6:13 pm | राघवेंद्र
मस्त पाककृती. हे 'अगर अगर' वापरुन करता येईल काय?
जिलेटीन किंवा 'अगर अगर' वापरल्यास पदार्थ जेली टाईप बनतो.
28 May 2017 - 8:05 pm | आदूबाळ
पण मूस जेलीसारखं कुठे असतं? श्रीखंडासारखं असतं. व्हिप्ड क्रीमने तोच परिणाम साध्य होईल.
28 May 2017 - 9:24 pm | राघवेंद्र
मूस हे केकच्या तुकड्या केलेल्या क्युब सारखे होईल. जे श्रीखंड आणि केक यांच्या मधील state असेल.
1 Jun 2017 - 1:46 pm | ज्याक ऑफ ऑल
पण त्यासारखं "सेट" तर करावं लागतं .. म्हणून टाकायचं
1 Jun 2017 - 1:43 pm | ज्याक ऑफ ऑल
बाकी जेली सारखा बनतो हे बर्बर
29 May 2017 - 11:54 am | अरिंजय
माझ्या सर्व बल्लवाचार्य मित्रांना एक नम्र विनंती, भेटल्यावर असलं काही काही खाऊ घाला.
1 Jun 2017 - 1:44 pm | ज्याक ऑफ ऑल
मग आमच्या बाबतीत हा दुजाभाव का ?
29 May 2017 - 1:23 pm | केडी
मस्त रे!
1 Jun 2017 - 1:45 pm | ज्याक ऑफ ऑल
तुमच्याच राज्यात आहोत अन काय ...