सोप्पा रवा मँगो केक

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
17 May 2017 - 10:59 am

आता तुम्ही म्हणाल किती सारखं आंबा आंबा, पण काय करू आंब्याचं पीक यावर्षी एवढं आलय की जे करायचं त्यात आंबा हवाच! सकाळी मिल्कशेक, दुपारी पायरीचा रस पोळी, जोडीला रायतं घ्या, लोणचं घ्या जे आवडेल ते, अधे मधे खायला आंबा नुसता कापून आणि रात्री आंबा शिकरण!! मग काय आज केक केला.

साहित्यः एक वाटी हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दही, मीठ, अर्धा चामचा खाण्याचा सोडा, एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप.

कृती: आंब्याचा रस काढून घ्या. तो मिक्सरला फिरवू नका. मधेच एखादा तुकडा छान वाटतो. दही, साखर, तूप आणि आमरस एकत्र करून फेटून घ्या. त्यात रवा मिसळा , आणि दोन तास तसेच ठेवा. दोन तासांनी फ्रायपॅनला तूप लावा. तयार मिश्रणात अर्धा चमचा सोडा, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळून घ्या. फ्रायपॅनमध्ये मिश्रण ओता. आणि सारखे करून २० मिनिटे मंद गॅसवर झाकणासहित ठेवा. वीस मिनिटांनी सुरीचे टोक घालून बघा, मिश्रण चिकटत नसेल तर केक झाला. गॅस बन्द करा. केक थोडा गार झाला की उलटा टाका ताटात! आवडीप्रमाणे कापा, मनसोक्त खा. आंब्याचा स्वाद काय भारी येतो, आणि रंग तुम्हीच सांगा!!
aamba

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

17 May 2017 - 11:22 am | नूतन सावंत

मस्त,मस्त.रच्याकने,ते जास्त झालेले आंब्याचे पीक इकडे का पाठवून देत नाही?

अनन्न्या's picture

17 May 2017 - 11:43 am | अनन्न्या

बाजार फुललाय केशरी रंगाने!

मंजूताई's picture

17 May 2017 - 11:23 am | मंजूताई

मस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2017 - 12:23 pm | अत्रुप्त आत्मा

https://scontent-hkg3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/18446809_1274374289327654_4016422146327489164_n.jpg?oh=3368b01ce33601aea2995b97a6f7d38c&oe=59A59A96
http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif .. http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.png .. http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

सविता००१'s picture

17 May 2017 - 1:21 pm | सविता००१

आईग्ग... कसला भारी कलर आहे. .. सुरेख. ते आम्ब्याच फूल तर भन्नाट

विशाखा राऊत's picture

17 May 2017 - 5:01 pm | विशाखा राऊत

मी काहीही लिहिणार नाहिये आता.. कसला भारी रंग. एक नंबर

सूड's picture

17 May 2017 - 5:14 pm | सूड

एकच नंबर.

गवि's picture

17 May 2017 - 5:22 pm | गवि

अतिमस्त..

अनेक दुर्दैवी गृहिणींचा हा केक बिघडतो आणि चक्क शिरा बनतो. आंबा फ्लेवर शिरा. आणि शेजारच्या पोरासोरांना खावा लागतो.

-(कोंकणात बालपण गेलेला पोरसोर) गवि

अनन्न्या's picture

17 May 2017 - 7:53 pm | अनन्न्या

पण शिराही छान लागतो आंब्याचा!

सूड's picture

17 May 2017 - 10:25 pm | सूड

हो, मागच्या वीकांती हापिसातल्या लोकांना खाऊ घातला. लोकांना आंब्याचं असंही काही होऊ शकतं हे माहीतच नव्हतं.

पद्मावति's picture

17 May 2017 - 7:59 pm | पद्मावति

अनेक दुर्दैवी गृहिणींचा हा केक बिघडतो आणि चक्क शिरा बनतो. आंबा फ्लेवर शिरा. आणि शेजारच्या पोरासोरांना खावा लागतो.

-(कोंकणात बालपण गेलेला पोरसोर) गवि

गुड प्रॉब्लेम टू हॅव :)

प्रचेतस's picture

17 May 2017 - 5:44 pm | प्रचेतस

जबरी

किसन शिंदे's picture

17 May 2017 - 5:57 pm | किसन शिंदे

जबराट रंग दिसतोय केकचा.

स्रुजा's picture

17 May 2017 - 9:28 pm | स्रुजा

सुरेख !! वाह, मजा आली.

पैसा's picture

17 May 2017 - 9:31 pm | पैसा

सांदणाचा भाऊ आहे.

रुपी's picture

17 May 2017 - 10:15 pm | रुपी

काय सुंदर रंग आलाय. ते आंब्याचं फूलही फार सुरेख जमलंय!

पिलीयन रायडर's picture

18 May 2017 - 2:55 am | पिलीयन रायडर

काय रंग! वा!

रेवती's picture

18 May 2017 - 6:43 am | रेवती

सुरेख दिसतोय केक.

हा आज मी करुन पाह्यला. फक्त सोड्याऐवजी फ्रूट सॉल्ट घातलं. मस्त जाळीदार आणि हलका झाला.

cake

अनन्न्या's picture

20 May 2017 - 8:35 pm | अनन्न्या

का बरं?

मला दिसतोय. इमेज पण शेअर्ड इमेजेस मध्ये आहे.

माझाही गणेशा झालाय. सेटिंग्ज कृपया पुन्हा चेकवणे.

कंजूस's picture

20 May 2017 - 7:50 pm | कंजूस

भारी झाला आहे केक.
सूडचाही मस्त.
केळ्याचाही मस्त होतो.

हर्मायनी's picture

23 May 2017 - 9:12 am | हर्मायनी

मीही करून बघितला . छान झाला होता . लग्नानंतर घरात केलेली पहिली वेगळी रेसिपी .. धन्यवाद !

आमच्याकडेही झाला आज आंबा रवा केक

वा! मस्तच हो कंजूस काका.

सूड's picture

29 May 2017 - 11:45 am | सूड

भारीच!!

अगदी आकर्षक रंग... मस्त..

अनन्न्या's picture

3 Jun 2017 - 1:58 pm | अनन्न्या

रंग पण झकास

मस्त. पुढच्या आठवड्यात करतेच.