मिसळपाव चे मालक, संचालक मंडळ कोण?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
11 Oct 2008 - 11:39 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मी तसा मिसळपाव वरचा एक नवा सदस्य आहे. एकंदरीत हे उपहारगृह मला मनापासुन आवडते. पण माझे काही प्रश्न जे अजुनही अनुत्तरीत आहेत ते असे

१) मिसळपाव ह्या वेबसाईटचे मालक (ओनर) कोण आहेत?

२) संचालक मंडळ( मॉडरेटर्स) आहेत का?

३) ह्या वेबसाईटची अर्थव्यवस्था कशी आहे? ( जाहीरातीमधुन वगैरे उत्पन्न आहे का?)

प्रतिक्रिया

झकासराव's picture

11 Oct 2008 - 11:52 am | झकासराव

तात्या अभ्यंकर ह्या प्रश्नांची उत्तर देतील.
त्याना विचारा.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

टारझन's picture

11 Oct 2008 - 11:54 am | टारझन

आहो खवीस राव .. तात्या उर्फ विसोबा खेचर यांना खरडा ... फोरम काय काढता :)

(स्वगत : या गोष्टी नाडी भविष्य किंवा जंतर मंतर करून कळू शकतील काय ?)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

येडा खवीस's picture

11 Oct 2008 - 12:19 pm | येडा खवीस

टारझना,

आता तु बोलतोस तेव्हा मला कळलं की कोणाला खरडायचय ते....मला काय माहीत? मी आपला काढला फोरम....

मला वाटलं भुतं काढतात तितक्या सहजपणे फोरम काढता येतो

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

विसोबा खेचर's picture

11 Oct 2008 - 5:47 pm | विसोबा खेचर

१) मिसळपाव ह्या वेबसाईटचे मालक (ओनर) कोण आहेत?

मी. तात्या अभ्यंकर.

२) संचालक मंडळ( मॉडरेटर्स) आहेत का?

हो, आहेत... चतुरंग, केशवसुमार, विकास, नीलकांत, प्रियाली, डॉ बिरुटे, आणि धोंडोपंत.

संभाव्य संपादक : मुक्तसुनीत, चित्रा.

मिसळपाव शाळा तपासनीस (संभाव्य) : नंदन.

खरडफळा संचालक - १_६ चमत्कारिक अदिती, आनंदयात्री, जैनांचं कार्ट.

३) ह्या वेबसाईटची अर्थव्यवस्था कशी आहे?

उत्तम आहे! सगळी व्यवस्था मीच करतो... :)

( जाहीरातीमधुन वगैरे उत्पन्न आहे का?)

जाहिरातीच नाहीत, त्यामुळे एक फद्या पैसाही उत्पन्न नाही..! :)

केवळ हौस म्हणून हे संस्थळ चालवत आहे. जोवर आर्थिकदृष्ट्या परवडत आहे तोवर चालवीन, नाय परवडलं तर नाईलाजाने, मन मारून बंद करावं लागेल. सगळ्याच हौशीमौजी काही कायमस्वरुपी पुरवता येतातच असं नव्हे..! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2008 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा चालवतांना आर्थिकबोजा जेव्हा फारच पडेल तेव्हा फूल ना फूलाची पाकळी मदत आमच्यासारख्या मित्रांकडून नक्कीच होईल, अनेक मित्र मदत करतील. तेव्हढं ते 'मन मारुन बंद करुन टाकू' हे वाक्य वापरत नका जाऊ, या वाक्याचा लै त्रास होतो. :)

-दिलीप बिरुटे
(मिपाप्रेमी)

स्वाती दिनेश's picture

11 Oct 2008 - 10:09 pm | स्वाती दिनेश

बिरुट्यांशी १००% सहमत.
स्वाती व दिनेश

शैलेन्द्र's picture

11 Oct 2008 - 10:36 pm | शैलेन्द्र

तात्या, इथे आम्ही सगळेच मिसळ खायला येतो.. सध्या तुम्हि लंगर चालवलाय, पण देव न करो, कधि तुम्हाला वाटलच, तर खानावळ बंद नका करु हि विनंती. आम्ही सगळे "थाली" फिरवून मिसळ्पाव चालवू..

सखाराम_गटणे™'s picture

11 Oct 2008 - 6:53 pm | सखाराम_गटणे™

केवळ हौस म्हणून हे संस्थळ चालवत आहे. जोवर आर्थिकदृष्ट्या परवडत आहे तोवर चालवीन, नाय परवडलं तर नाईलाजाने, मन मारून बंद करावं लागेल. सगळ्याच हौशीमौजी काही कायमस्वरुपी पुरवता येतातच असं नव्हे..!
तुम्हाला जेव्हा कंटाळा येयील तेव्हा आम्ही चालवु मिपा प्रेमापोटी.

-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)

येडा खवीस's picture

11 Oct 2008 - 7:04 pm | येडा खवीस

तात्या,

अहो जाहिराती वगैरे सुरु करा....बक्कळ :D पैसा मिळेल की , मग बघु त्या पैशाचे काय करायचे ते =))

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 11:48 am | विसोबा खेचर

अहो जाहिराती वगैरे सुरु करा....बक्कळ पैसा मिळेल की , मग बघु त्या पैशाचे काय करायचे ते

मौल्यवान सूचनेबद्दल आभार.. परंतु मला उत्पन्नाची अन्य साधनं आहेत आणि त्यात माझं बरं चाललं आहे! :)

तात्या.

बन्ड्या's picture

11 Oct 2008 - 9:14 pm | बन्ड्या

मिपा चालवतांना आर्थिकबोजा जेव्हा फारच पडेल तेव्हा फूल ना फूलाची पाकळी मदत आमच्यासारख्या मित्रांकडून नक्कीच होईल,

तुम्हाला जेव्हा मिपा चालवतांना आर्थिकबोजा पडेल तेंव्हा आम्ही नक्की मदत करु. मिपा परिवार तुमच्या सदैव पाठीशी असेल. आता तुम्ही एकटे नाहीत.

मिपाप्रेमी ..बन्ड्या

आवशीचो घोव्'s picture

12 Oct 2008 - 12:07 am | आवशीचो घोव्

मिपावर गूगल ऍडसेन्स वापरून पाहण्यास हरकत नसावी.
Paypal Donation च्या links टाकल्या तरी चालतील.

देवदत्त's picture

12 Oct 2008 - 12:58 am | देवदत्त

मिसळपाव वर जाहिरातींचे प्रदर्शन करण्यास मी असहमत आहे.

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 1:05 am | विसोबा खेचर

मिपावर गूगल ऍडसेन्स वापरून पाहण्यास हरकत नसावी.

मिपावर कुठल्याही जाहिराती देण्याची इच्छा नाही...

असो,

मिपाकरता मदत लागल्यास एका हाकेसरशी अनेक मदतीचे हात आपणहून पुढे येणार असल्याचे वरील सर्व प्रतिसादांतून कळले.

खरंच भारावून गेलो आहे...!

काही गरज वाटल्यास नक्की सांगेन.. :)

आपला,
(सर्व मायबाप मिपा सभासदांचा ऋणी) तात्या.

शशिकांत ओक's picture

12 Oct 2008 - 11:42 am | शशिकांत ओक

(स्वगत : या गोष्टी नाडी भविष्य किंवा जंतर मंतर करून कळू शकतील काय ?)

या कामासाठी नाडीला का हात घालता? आपापसातच गाठ सुटली तर नाही का बरे?