झटपट ढोकळा

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
12 May 2017 - 8:20 am

.

साहित्य: १ कप बेसन, २ टीस्पून रवा, १ टीस्पून तेल, ४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ, १/४ जरूरेनुसार पाणी.टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड, १ रेग्युलर इनो सॅशे, आवश्यकतेनुसार पाणी.

फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि नंतर वरून घालण्यासाठी १ चमचा साखर ३ चमचे पाण्यात विरघळवून.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.

कृती: सगळ्यात आधी कुकर पाणी घालून गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा. कुकरच्या एका भांड्याला थोडसं तेल लावून घ्या. इनो सोडून सगळे पदार्थ एका मोठ्या बोल मध्ये एकत्र करून पाणी घालून भज्यांच्या पिठाइतपत भिजवून घ्या. चव घेउन आंबट वाटलं तर किंचित साखर घाला. (जर वाटलं तरच)

आता सगळी एनर्जी एकवटून भराभर काम सुरु करायचं बरं का. या पिठात इनो घालून खूप फेटायच. २ मिनिटात हे मिश्रण अगदी हलकं होतं. आता हे मिश्रण ताबडतोब तेल लावलेल्या भांड्यात ओता. अर्ध पातेलं भरेल इतपतच घाला. कारण ढोकळा फुगून ते पूर्ण भरेलच;०:)

हे भांडं ताबडतोब कुकरमध्ये ठेवा. याला उशीर झाला तर ढोकळ्याच्या पिठाचा मूड जातो आणि तो म्हणतो आता नाही फुगणार मी ;) कुकरची शिट्टी न लावता १० मिनिटे वाफवा आणि भांडं बाहेर काढून ढोकळा गार करत ठेवा.

आता एका कढल्यात नेहमीप्रमाणे फोडणी करा. फक्त त्यात हळद घालायची नाहीच्च.. गॅस बंद करून त्यात साखरेचं पाणी घाला. हे मिश्रण ताबडतोब ढोकळ्यावर ओता आणि १० मिनिटेढोकळा झाकून ठेवा.

नंतर हव्या त्या आकारात वड्या पाडा आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून तळलेल्या मिरच्यांबरोबर खायला द्या.

ही रेसिपी आपण माझ्या https://savitadeshpande.blogspot.com या ब्लॉग वरही वाचू शकता.

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 May 2017 - 8:46 am | पैसा

कालच नव्या मायक्रोवेव्ह मध्ये प्रयोग केला त्यामुळे आणखी इनो नको. ;) फक्त बदल म्हणजे मला मिळालेल्या पाकृ मध्ये लिहिल्यानुसार दही आणि भरपूर आले कीस आणि थोड्या मिरच्या घातल्या.

तुषार काळभोर's picture

12 May 2017 - 11:17 am | तुषार काळभोर

मावे मोड मध्ये केलं की कन्व्हेन्शन मोड मध्ये?

मावे असेल तर कसं?

पैसा's picture

12 May 2017 - 12:15 pm | पैसा

मायक्रोवेव्ह मोडवर 5 मिनिटात ढोकळा तयार झाला. युट्युबवर 2 3 इन्स्टंट ढोकळा रेसिपी आहेत बघ

सविता००१'s picture

12 May 2017 - 9:03 am | सविता००१

तस बघते करुन

सतिश गावडे's picture

12 May 2017 - 9:30 am | सतिश गावडे

तै, ते वॉटरमार्क मध्येच नका हो टाकत जाऊ. फोटोचा नक्षा बदलतो त्याने. तुमच्या ब्लॉगवरील पाककृतींच्या फोटोंमध्येही असेच आहे. एखादा कोपरा पकडा आणि सेमी ट्रान्सपरंट वॉटरमार्क टाकून द्या. :)

सविता००१'s picture

12 May 2017 - 12:08 pm | सविता००१

Mala ajun itka Mahit nahi ho. Tumchya suchanebaddal shatash: Dhanyavad. Mi karen ata tumhi mhanta rasa.

त्रिवेणी's picture

12 May 2017 - 12:12 pm | त्रिवेणी

दिसतोय छान पण मला डाळ+तांदुळचाच आवडतो.

मंजूताई's picture

12 May 2017 - 1:11 pm | मंजूताई

मस्त!

मस्त आहे रेसिपी. सुंदर दिसतोय !!!
माझा ढोकळा नेहमी पिठल्याच्या वड्या होतो! बहुतेक इनो कमी पडत असावं. किंवा कुकरचे तापमान !
आता पुन्हा करून बघते.

पद्मावति's picture

13 May 2017 - 1:00 pm | पद्मावति

ढोकळा मस्तच दिसतोय.

अनन्न्या's picture

14 May 2017 - 10:25 am | अनन्न्या

मोबाइलवर वाचला पण प्रतिक्रिया देता येत नव्हती

दिपक.कुवेत's picture

14 May 2017 - 12:46 pm | दिपक.कुवेत

आवडत नसल्याने आपला पास पण सविताच्या ईतर पाकृ खासच.

सविता००१'s picture

14 May 2017 - 12:57 pm | सविता००१

दिपक, तुझी प्रतिक्रिया म्हणजे खरच मी सुगरण झाले असं वाटायला लागलंय..

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2017 - 8:31 pm | अत्रुप्त आत्मा

लै झ्याक!

विशाखा राऊत's picture

17 May 2017 - 4:53 pm | विशाखा राऊत

वाह ऑल टाईम फेवरेट :)

पियुशा's picture

19 May 2017 - 10:12 am | पियुशा

सही दिसतोय ढोकला :)