गाभा:
वा वा!
फारच सुरेख चाललय स्थळ.
मधे जरा बघता आलं नाही म्हणुन चुकल्या चुकल्या सारखच होतय.
पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ.
"खरवस घ्यायला जाणे","पाठिला साबण चोळणे " वगैरे कमी झालय कि काय?
हेच करायच होतं तर सवता सुभा कशाला मांदला देव जाणे.
आणखी काय मग?
ग्रामीण भाषेचा आव आणुन ग्राम्य बोलणं कसं सुरु आहे?
वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची.
बाकी, दसर्याच्या पुनश्च शुभेच्छा.
हाल हवाल कळवत रहा. स्वतः टपरीवरचे असलात तरी तुमचं आमच्यात स्वागतच आहे.
सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल.
प्रतिक्रिया
10 Oct 2008 - 9:42 pm | सखाराम_गटणे™
>>वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची.
ह्याचा अर्थ काय?
तुम्हाला वाईट वाटते की चांगले?
-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)
10 Oct 2008 - 10:01 pm | शैलेन्द्र
आयला!..
सरपंचांच्या पंचायती?
10 Oct 2008 - 10:28 pm | लंबूटांग
>>फारच सुरेख चाललय स्थळ.
धन्यवाद
तुम्ही मधे बघायला आला नाहीत म्हणून असेल कदाचित ;)
>>पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ.
तर मग जा दुसरीकडे जिथे तुम्हाला मजा येते. कोणी थांबवले आहे ?
नाहीतर तुम्ही पण मांडा आपला स्वत्:चा सुभा. खात्री आहे मिपाकर त्याला सवता सुभा न मानता आपलेच एक भावंड मानतील. ह्या टपरीवरची (बाकीची) माणसे मोठ्या मनाची आहेत हो.
वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची. वर्षभर तगलो त्यात आश्चर्य काय? तुम्हाला खात्री नव्हती :-o ?? अरेरे .. अंदाज चुकला वाटते.
हाल हवाल कळवत रहा. काळजी नको. इथे सगळे उत्तमच चालू होते आहे आणि राहील. तुम्हाला काळजी असेल तर करत जा विचारपूस अधून मधून..
स्वतः टपरीवरचे असलात तरी तुमचं आमच्यात स्वागतच आहे. हो आहोत आम्ही टपरीवरचे. त्या ५ स्टार हॉटेल मधल्या बेचव खाणे काटे चमच्या ने खाण्या च्या कसरती आणि टेबल मॅनर्स पेक्षा आमची मोकळी ढाकळी टपरी बरी. कधी कंटाळा आला तर तुम्ही पण या झणझणी तर्री चापायला तेवढाच चेंज हो तुम्हाला.. स्वागतच होईल तुमचे इतके नक्की..
सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल. ह्याच्या आधी स्वगत लिहायचे विसरलात की काय???
10 Oct 2008 - 10:33 pm | टारझन
=)) =)) =))
लै जोरात दणका दिलास लेका ... एकदम दात घशात अन् हाडं *डीत घातलीस .... =))
सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल.
ह्याच्या आधी स्वगत लिहायचे विसरलात की काय???
अचुक हेरलं =)) =)) =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
10 Oct 2008 - 10:44 pm | आनंदयात्री
आयला काय एकेक बेशरम लोकं असतात !!
आले स्वत:हुन जोडे खायला, आता बघा शोभा !
10 Oct 2008 - 10:49 pm | बिपिन कार्यकर्ते
काय पोष्टमन काका, कसे आहात? बर्याच दिवसांनी दिसलात? म्हणजे व्यक्त स्वरुपात हो... म्हणजे चोरून मारून येतच असणार तुम्ही इकडे. मिसळ सर्वांनाच आवडते, कोणी उघडपणे खातात कोणी उगाच तोंड लपवून. सगळेच थोडी प्रामाणिक आणि दुनियेला फाट्यावर मारायची हिंमत ठेवून असतात? काय, खरं की नाही? :)
पण आता आलाच आहात तर, या बसा, थोडा वेळ घालवा इथे. चांगलं ते बघा, वाईट (दिसलंच तर) सोडून द्या. कशाला ज्याच्या घरी जायचं तिथे भोकं शोधायचे उद्योग?
******
ओ तात्या.... काका आले वाटतं परत.... त्याना काय हवं नको ते बघ जरा... ;)
बिपिन.
11 Oct 2008 - 4:34 am | सुक्या
ग्रामीण भाषेचा आव आणुन ग्राम्य बोलणं कसं सुरु आहे?
चामारी . . कहर झाला राव. पुचकाट भाज्या उकडुन खानारे तुमी , आमच्या गावकड्च्या मिसळीची चव तुमाला वो काय कळनार? असं बांधावर बसुन ढेकळं फोडण्यापरीस जरा मातीत उतरुन बगा . .काय मजा आसती त्ये समजल. मातीचा वास म्हंजी काय असंतं त्ये तवा कळंल तुमाला. ग्रामीण भाषेचा आव म्हनं ..
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
11 Oct 2008 - 6:47 am | विसोबा खेचर
हम्म! बाकी दिवा़ळी अंकाचं काम कसं सुरू आहे? इकडे येऊन 'दिवाळी अंकाकरता लेख/कविता द्या हो प्लीज..' असे तेथील काही लोकांचा बरेच दिस जोगवा मागणे चालले होते..! :)
हरकत नाही, वाचू आम्ही तो दिवाळी अंक..! शुभेच्छा..! :)
तात्या.
11 Oct 2008 - 8:56 am | अनिल हटेला
लंब्या ,सुक्या !!
+++१
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
11 Oct 2008 - 9:07 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
अग जरा बघ ग. तो पोस्ट्मन आलाय. दिवाळी देउन टाक त्याची. जरा दहा रुपये जास्त दे. प्रक्रुती अंमळ खास्तावलेली दिसते.
11 Oct 2008 - 9:07 am | सहज
वर्ष झालं ना. बरोबर आला पोस्टमन बक्षीशी मागायला. :-)
शिव्याची लाखोली पाहीजे बहुतेक त्याला.
11 Oct 2008 - 9:18 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
पोस्ट्मन भाउ तुम्हाला बहुतक रिक्षा मागवावी लागेल. हे लै भारी क्रिप्टीक आहे. एफ्.बी.आय ला पण नाय कळणार. तुमच्या घरच्या कोणाला सांगा ओळ्खायला. वर्षभर भांडी घासीन फुकट मध्ये तुमच्या घरची.(क्रिप्टी़क- मागील लेखाल उल्लेख आलेला आहे,)
11 Oct 2008 - 9:29 am | झकासराव
मला हे आंतरजालीय राजकारण कायबी माहित नाही आणि कळत नाही. कळुन घ्यायची इच्छा पण नाही. बाकीची महत्वाची बरीच काम आहेर. पण इथे येवुन तुमची जळजळ दिसली म्हणून हे पोस्ट. बाकी पोष्टमन ह्या नावाची खराबी एवढी आधी कोणीच केली नसेल.
लंबु टांग लयी भारी रे. =))
आंद्या बरोब्बर आहे तुझ.
खरच कस काय बघवत नसेल काहि लोकाना??
तात्या "इनो" द्या ह्याना.
.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
11 Oct 2008 - 9:37 am | मदनबाण
काय पोष्ट मन ? हल्ली बरीच शुभेच्छा पत्र वाटताय बरं,,काल सदस्य होऊन आज लगेच अपचन झालेल दिसतय..!!
अरे आहे का कोणाजवळ इनो जरा पाजा ह्यांना बरीच जळजळ वाढलेली दिसतेय..
तुमचे हाल फारच झालेले दिसतात..नाही म्हणजे आमचे हाल हवाला विचारताय म्हणुन !!!
तुम्ही टपरी देखील चालवतात वाटत ? काय साईड बिझनेस का ?का आज काल वाटायला पत्रेच उरली नाहीत ?
(मिपा प्रेमी)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
11 Oct 2008 - 12:41 pm | अभिजीत
>> वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची.
मराठी आंतरजालीय राजकारण, वक्रोक्ती वगैरे जरा बाजुला ठेवलं तरी हे निरिक्षण नक्कीच महत्वाचे आहे. सोशल नेटवर्कवर जो रिसर्च चालू आहे त्यानुसार -
- नेटवर्क सुरु करण्यासाठी कोणत्यातरी केंद्रीभूत प्रेरणेची गरज असते. सुरुवातीस अशा प्रेरणेने भारलेले समविचारी लोक त्यात सामिल होतात आणि चलन वलन सुरु होते.
- अशा समविचारी घोळक्यातले बहुआयामी (dynamic) लोक नवेनवे सभासद (ऍक्टिव/पॅसिव) गोळा करतात. यातले काही लोक ऍक्टिव सभासद बनत जातात.
- असे नवे सभासद त्या केंद्रीभूत प्रेरणेने प्रभावित होतील असे काही गरजेचे नाही. त्यामुळे जेंव्हा असे नवे सभासद विविक्षित संख्येपेक्षा (critical mass) जास्त होउ लागतात तेंव्हा नेटवर्कचा फॉर्मॅट हा किती सोपा/आकर्षक/चांगला आहे यावर पुढची वाटचाल ठरते.
यशस्वी सोशल नेटवर्कची काही लक्षणे -
१. ऍक्टिव सभासदांची संख्यावाढ होणे,
२. ऍक्टिव सभासदांमधे मालकी हक्कांची भावना निर्माण होणे - हा मुद्दा जरा वादग्रस्त होउ शकतो. इथे मालकी हक्क म्हणजे आर्थिक व वैधानिक असा नाही तर हे सभासद नेटवर्कच्या काही जबाबदार्या उचलतात, प्राथमिक स्वरुपाचे का होइना पण काही नियम वगैरे बनवतात/पाळू लागतात आणि हळुहळु एक 'कल्चर' निर्माण होउ लागते.
३. केंद्रीभूत प्रेरणेचा विस्तार होणे/क्षय होणे, वेगवेगळ्या दिशांनी नेटवर्क वाढत जाणे आणि एक 'ब्रँड' निर्माण होणे - हे पुन्हा त्या फॉर्मॅटवर आणि ऍक्टिव सभासदांवर अवलंबून असते.
मिसळपावच्या संदर्भात -
या 'तग' धरण्यात आणि वाढण्यात मिसळपावच्या चालकांची वैयक्तिक जिद्द (येणारा आर्थिक खर्च, वेळ, इतर वैधानिक जबाबदार्या वगैरे) तर आहेच पण मिसळपाव फॉर्मॅटही यात महत्त्वाचा आहे. सोशल नेटवर्क ज्या वेब २.० च्या तत्त्वांवर उभी आहेत त्यांचे एक चांगले उदाहरण म्हणूनही याकडे पाहता येइल.
इतके पाल्हाळ 'लोक मिलते गये और कारवां जुडता गया' असेही करता आले असते. असो. या प्रतिक्रियेचे प्रयोजन मराठीतील या महत्वाच्या संस्थळाचे वेब २.० नुसार असलेले निरिक्षण नोंदवणे असे आहे.
11 Oct 2008 - 1:49 pm | जैनाचं कार्ट (not verified)
टाळ्या अभीजीत तुझ्या साठी !
छान व मुद्देसुद प्रतिसाद !
आवडल ऑ आम्हाला !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
13 Oct 2008 - 7:57 pm | ऍडीजोशी (not verified)
त्याचं असं झालंय की आज काल लोकांना आपला पसारा कुठवर पसरायचा हे कळेनासं झालंय. आता 'मी लय भारी' हे तर सगळीकडे ठणकावून मांडायलाच हवं. पण त्यासाठी बर्याच विषयात गती असावी लागते. पण स्वतःला प्रत्येक विषयात गती असतेच असं नाही. आणि आहे असं वाटलं तरी वाटणं आणि असणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच आमच्या गिरगावात असा कुणी नग फिरताना दिसला की त्याला 'चड्डीत र्हा नं भौ' असं म्हणायची पद्धत आहे.
हे असं चड्डीत न रहाणं सुरु झालं की लय प्रॉब्लेम्स सुरू व्हतात. आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे विसरून जे करतोय ते करत रहायचं नी मधे बोलणार्यांना शिव्या देत रहायचं. शिव्यांना काही लोकांच्या भाषेत अपशब्द सुद्धा म्हणतात. असो. कातळ लागला तरी ह्यांची कुदळ चालतेच आहे असं होतं मग.
ह्याच प्रकारातला एक किस्सा पु.लं.च्या बिगरी मधे आहे. त्या मुलांच्या मुख्याध्यापकांनी फुटबॉल शाळेच्या कपाटात बंद करून ठेवला. कारण - 'मुलांनी पाय मारून मारून फुटबॉल मधली हवा काढली'. पण प्रश्न हा आहे की शुद्धलेखन गिरवायला लावायचं सोडून मुख्याध्यापकांनी मुलांना फुटबॉल खेळूच कसा दिला?
आता 'चड्डीत रहाणे' ह्या वाक्प्रचाराचा दुसरा उपयोग पाहू. ह्या लोकांनाही आपण लय भारी असा उगाच गैरसमज असतो. त्यामुळे अशी लोकं जिथे तिथे नाक खुपसत असतात. आपलं काम असो वा नसो, सल्ले देत रहायचं. लोकांची अक्कल काढत बसायची. निष्कारण लोकांना टोमणे मारत बसायचं. कारण - मी लय भारी. ह्यात गोची अशी होते की आपल्याला वाटतं आपण बोलतोय ते बरोबर आहे. लोकांना आपल्या सल्ल्याची गरज आहे. आपल्याहून कर्तूत्ववान व्यक्ती ह्या जगात झाली नाही. अमेरिकेची आर्थीक स्थिती सुधारण्याचा उपाय आपल्याच कडे आहे. पण च्यामारी, असं नसतं.
ह्या प्रकारातला एक किस्सा पु.लं.च्या असामी मधे आहे. त्यांचा एक मित्र, नानू सरंजामे, त्यांना एक कवीता वाचून दाखवतो 'मी झोपतो करून हिमालयाची उशी'. अरे... ह्या नानूला बुटाच्या तळव्या पासून मोजला तरी उंची पाच फुटाहून जास्त भरत नाही. ह्याला झोपायला ट्राम मधला बाक पण मोठा होतो. नी निघालाय हिमालयाची उशी करायला.
असे चड्डीत न रहाणारे, गरज नसताना बोलणारे आणि बोलावलं नसताना येणारे पाव्हणे बरेच असतात. त्यामुळेच आमच्या गिरगावात असा कुणी नग फिरताना दिसला की त्याला 'चड्डीत र्हा नं भौ' असं म्हणायची पद्धत आहे.
आता 'चड्डीत रहाणे' ह्या वाक्प्रचाराचा तिसरा उपयोग पाहू. आमचा शेजारचा बाब्या चित्र काढत होता. बराच वेळ खाडाखोड सुरू होती. चित्र काही मनासारखं जमत नव्हतं. तेव्हढ्यात दुसरा मित्रा आला. त्यानी बराच वेळ बघितलं आणि म्हणाला 'व्वा, प्रयत्न सुत्य आहे, पण नारळाचं झाड असं काढत नाहीत.' असं म्हणून त्याने ३-४ तास कष्ट घेऊन एक नारळाचं झाड काढून दिलं. नी मोठ्या अभिमानाने ह्याच्याकडे बघितलं. ह्यावर बाब्या म्हणाला 'मी झाड काढत होतो हा दिव्य शोध कुणी लावला?' आता दुसरा गडबडला 'अरे पण तू हे नळी सारखं उंच काय काढत होतास?' ह्यावर बाब्या म्हणाला 'चड्डीत र्हा नं भौ. मी नारळाचं झाड नाही, जिराफाची मान काढत होतो.'
आता 'चड्डीत रहाणे' ह्या वाक्प्रचाराचा चौथा उपयोग पाहू. ह्या लोकांचा सुद्धा मी लय भारी असा गैरसमज असतो. त्याचा अनुभव आमच्या एका मित्राला आला. तो दापोली खुद्द हून सावंतवाडीला जायला निघाला होता. मधेच दुचाकी पंक्चर झाली. जवळच्या गावातल्या एका मित्राच्या घरी गाडी लावली नी लागला चालायला. थोड्यावेळानी एक सर्वीस गाडी आली. गाडीवाला ओरडायला लागला 'सांताडी... सांताडी...' मित्र गडबडला 'हे कोणतं गाव?' डायवरला विचारलं 'सावंवाडीला जाणार का?' डायवर फिस्कटला 'ह्ये कोंत गाव काडलंत? गाडी सांताडीला जातीया, येताय तर चला. उगाचा टायमाची खोटी नका करू.' नशीबाने त्या गाडीत मी बसलो होतो. मित्राला म्हणालो 'अरे सांताडी म्हणजेच सावंतवाडी, बस चटकन'.
ह्यावर माझा मित्र सरकलाच. 'जोश्या, अरे काय हे. गावाचं नाव सावंतवाडी आणि हा म्हणतोय सांताडी. तू चक्क मला त्याचं बरोबर आहे म्हणून सांगतोयस.' मग तो डायवर कडे वळला 'अहो मिस्टर, सांताडी काय म्हणताय. सावंतवाडी म्हणा की.' आता डायवर उचकटला 'चड्डीत र्हा नं भौ. सावंतवाडी म्हटल्याने गाडी दोन तास आधी पोचणार आहे का?'
आता मी रागावलो 'च्यामारी माझं आडनाव जोशी असून तू बोलता यायल्या लागल्या पासून एकदा तरी मला जोशी म्हणालायस का? जोशी चा जोश्या तू स्वतःच करतोस, मग सावंतवाडीचं सांताडी झालं तर तुझ्या तातांच काय जातं?
हे ऐकून माझ्या मित्रानी मान डोलावली, चड्डीत गेला नी गप गुमान गाडीत बसला.
विषेश सूचना - ह्या लेखात कुणाला शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका आढळल्या तर त्या मुद्धाम केल्या आहेत. चुका सांगायचे कष्ट घेऊ नये. चड्डीत रहावे.
13 Oct 2008 - 8:12 pm | baba
काय ठोकलाय...शालजोडीचे.. सॉरी.. चड्डीजोडीचे दिलेत मस्तच, अगदी उदाहरणासकट...
लगे रहो..
....बाबा
13 Oct 2008 - 8:19 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रतिसाद ऑफ द इयर..... _||_
बिपिन.
13 Oct 2008 - 9:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऍडी, हे तर लय भारीच!
अगदी खास धरून हाणलास!
अदिती
13 Oct 2008 - 11:41 pm | विसोबा खेचर
असे चड्डीत न रहाणारे, गरज नसताना बोलणारे आणि बोलावलं नसताना येणारे पाव्हणे बरेच असतात.
खरं आहे! पोस्टमन हा त्यापैकीच एक असावा..
असो,
ऍडी, चड्डीत राहण्याच्या सगळ्या ष्टोर्या मस्त रे! :)
तात्या.
स्वगत : तरी दहादा बजावून सांगत होतो वेलणकराला की बाबारे नवनवे आयडी घेऊन मिपाची अन् मिपाकरांची खोड काढायला कुणाला पाठवत जाऊ नकोस.. तोंडावर पडशील फुकटचा! पण साला तात्याचं ऐकेल तर तो वेलणकर कसला? :)
हम्म! दिवाळी अंकाकरता लेख/कविता देता का? हे विचारायला चांदीमयीला रोज इथ पाठवत होतास हे एक वेळ मी समजून घेतलं! ती बिचारी रोज इथे जोगवा मागायला यायची हो! ;)
14 Oct 2008 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवाळी अंकाकरता लेख/कविता देता का? हे विचारायला चांदीमयीला रोज इथ पाठवत होतास हे एक वेळ मी समजून घेतलं! ती बिचारी रोज इथे जोगवा मागायला यायची हो!
दिवाळी अंकाला पाहिजे तसे साहित्य न मिळाल्यामुळे त्याचा बदला म्हणून चांदीमाय ;उपक्रमवर संस्कृतविषयावर पीडत आहे.
पण, आम्ही तिथेही त्यांना पुरुन उरलो. ;)
13 Oct 2008 - 10:19 pm | एक
जोकच्या शेवटी अस्वल त्या शिकार्याला विचारतं "तू खरंच माझी शिकार करायला येतोस का माझ्याकडून ** मारून घ्यायला येतोस?"...
या "पोष्ट" वरून मला त्या शिकार्याची आठवण झाली.. कोणाच्या काय काय फेटिशेस असतील सांगता येत नाही?.. :?
काय "पोष्ट्मन" मजा आली का? ;)
13 Oct 2008 - 10:35 pm | ऍडीजोशी (not verified)
जोकच्या शेवटी अस्वल त्या शिकार्याला विचारतं "तू खरंच माझी शिकार करायला येतोस का माझ्याकडून ** मारून घ्यायला येतोस?"...
अरे त्यांची शहरातून जंगलात अधोगती झाली वाटतं... अरेरे अरेरे. आत तिथे गुहेच्या भिंतींवर खडूनी खरवडून शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे क्लासेस चालणार. शेक्स्पीयरच्या साहित्याची ची व्याकरणशुद्धी ह्यावर परिसंवाद झडणार, वाघ जंगल सोडणार आणि मधे मधे करणारे लांडगे सोकावणार.
या "पोष्ट" वरून मला त्या शिकार्याची आठवण झाली.. कोणाच्या काय काय फेटिशेस असतील सांगता येत नाही?..
कुणाचं काय तर कुणाचं काय. त्या अस्वलाने घेतली मजा मारून आधी नी नंतर कंटाळा आल्यावर त्यो ड्वायलॉग शिकार्याला मारला असा मल संशय आहे. की शंषय आहे? की षंसय आहे? जाऊ दे.
काय "पोष्ट्मन" मजा आली का?
मजा???? आत बघ तुझ्य पोस्ट मधल्या शुद्ध लेखनाच्या किमान ३० चुका दाखवण्यात येतील. व्याकरणाच्या किमान ५० तरी. मी वेडा म्हणून ती वि.सू. टाकली का??? भोग आता कर्माची फळं.
14 Oct 2008 - 3:37 am | भास्कर केन्डे
च्यायला, हे कोण बांडगुळ वळवळलं इथं?
लंबू, अभिजित, ऍडी सह मिपा करांनी प्रत्युत्तरे दिली आहेतच. मला आलेला एक अनुभवः
२००५ साली मी मनोगतवर भरभरुन लिहिले. खूप प्रेम केले. भरपूर मित्रही मिळाले. पण तिथल्या प्रशासकांच्या हेकटपणाच्या अनुभवामुळे ते सोडले ते कायमचेच. त्यानंतर सुभाषचंद्र, तात्या यांनी मनोगत सोडल्याचे एक मनोगती स्नेह्याने फोनवर बोलताना सांगितले. मराठी भाषेच्या सेवेत असलेल्या चांगल्या संकेतस्थळाचा बाजा वाजत असल्याचे ऐकून वाईट वाटले. कारण मनात द्वेष नव्हताच.
अशात मी पुन्हा लिहीता झालो (तात्यांचे उपकार). तर येथेही त्या व्यक्तिचा वावर दिसला. आमच्या आनंदाला भरते आले. पुन्हा आता वर्षा-दिड वर्षांनी फोनवर बोलणे झाले. मी विचारले "इथे जास्त लिहीत नाहीत आपण?"
उत्तर ऐकून वाईट वाटले... "अहो, मिपा म्हणजे असंतुष्टांचा गट. तिथे कोण दर्जेदार लेखक आहे का? आम्ही तिकडे दुसरा दिवाळी अंक काढत आहोत"...
अरेच्चा! हिमालय उंचा झाला म्हणून सह्याद्री खुजा ठरत नाही. अर्थात हिमालय कोण व सह्याद्री कोण हे आपल्या व आमच्या मनाच्या उंचीवरुन दिसते आहेच.
मिपावर कोणीही त्यांच्याबद्दल वाईट लिहिलेले दिसले नाही. मग पोष्टमनासारख्यांना ही जळजळ का? मराठी माणूस येवढा खुजा व्हावा???
14 Oct 2008 - 9:40 am | ऋचा
लय भारीच!
अगदी धरून हाणलाय सर्वांनी ! :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
14 Oct 2008 - 4:12 pm | विजुभाऊ
अस्सल मिपाकराना इतर संकेत स्थळात इन्ट्रेस्ट नाही. ती किती उंच आहेत वा खुजी आहेत त्याची तमा नाही
मी मिपावर आल्यापासून इथेच लिहीत आहे.
एका वर्षात इथे बरेच काही घडून गेले आहे.
पुष्कळ प्रकारचे लोक पुष्कळ विषयांवर लिहितात. त्यांची दोस्ती होते
डॉन्यासारख्या सदस्याला परदेशात अनोळखी वातावरणात घरची पुरणपोळी खायला ये असे हक्कचे निमन्त्रण देणारे स्नेही मिळतात.
हे सर्व घडते मिपा संस्कृती मुळेच.
बाकी अभिजीत ने योग्य मुद्दे मांडले आहेत.
14 Oct 2008 - 4:18 pm | मनस्वी
तुम्हाला म्हणायचेय काय नक्की विजुभाऊ?
बरोबर आहे विजुभाऊ तुमचं!
मनस्वी
14 Oct 2008 - 4:20 pm | आनंदयात्री
बघ रे भो डान्या ते भाउ काय म्हणतात ते !!
14 Oct 2008 - 4:23 pm | छोटा डॉन
असेच म्हणतो .... :( :( :(
असा तसा सदस्य - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Oct 2008 - 4:32 pm | ऍडीजोशी (not verified)
डॉन्या सारख्या सदस्याला चक्क बँगलोर मधेही आपलं म्हणणारी लोकं इथेच सापडली :)
14 Oct 2008 - 4:34 pm | विजुभाऊ
डॉन्यासारख्या सदस्याला
याचा कृपया गैर अर्थ काढु नये.
केवळ एक मिपाकर म्हणून कोणी पूर्वी न पहिलेल्या कोणाचे आगत्याने परदेशात स्वागत करते यात तुम्हाला काहीच वेगळे वाटत नाही?
कुन्दन मला भेटायला ट्रेन मधुन गर्दीत अर्धापाऊण तास प्रवास करुन भेटायला येतो यात काही वेगळे वाटत नाही?
धमु च्या लग्नाला मिपाकर वर्हाडी म्हणून आनन्दाने मिरवतात
कोणताही स्वार्थ नसताना/वैयक्तीक काम नसतान मिपाकर केवळ मिपा या धाग्याला जागुन एकमेकाना भेटतात हे एका चांगल्या कल्चरचे उदाहरण आहे.
डॉन्याला विचारुन बघा परक्या मुलुखात एकटॅ रहाणे केवढे अवघड असते खास करुन सुरुवातीलाच. आणि तेंव्हाच अगदी असे घरचे लोक असतील तर काय फरक जाणवतो ते. डॉन्याला हे भाग्य मिपा मुळेच लाभले.
14 Oct 2008 - 4:59 pm | विसोबा खेचर
सुंदर प्रतिसाद,
जियो विजूभाऊ...! :)
तात्या.
14 Oct 2008 - 4:57 pm | धमाल मुलगा
अगदी!
अस्सं? बरं बरं!!! आम्हाला मात्र अजुनही तशीच मजा येते की!
नुसते तगलो नाही आहोत आम्ही....भिडलो..लढलो...आणि आता चढलो....
घ्या वाचा इथे
इथे लिहिलंय :
मिसळपाव डॉट कॉम ह्या जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्या आणि मराठींचे जागतीक स्पंदन मानले जाणार्या वेबसाईटवर.......
हे कोणी आम्ही सामान्य लोक म्हणत नाही आहोत...एका वर्तमानपत्रातले जसेच्या तसे शब्द आहेत!
धन्यवाद! आपल्यालाही!!
काय दसर्याची एखादी शिकार साधली की नाही अजुन?
नक्की ठिकाण कोण्तं (शिल्लक उरलंय)? म्हणजे तिकडे पत्रं पाठवता येतील :P
नक्की कुठे स्वागत करणार? जागतीक मराठींचं स्पंदन समजल्या जाणार्या ह्या संस्थळाला बोलावण्यासाठी त्या इतमामाला साजेशी जागा कुठे आहे?
सभ्य माणसांत की सभ्यतेचे बुरखे पांघरुन बसलेल्या संधीसाधूंमध्ये?
सभ्यतेची नक्की व्याख्या काय?
जीभेला गाठी येईपर्यंत अलंकारीक भाषेत समोरच्याची खोलुन मारणे?
की शिवराळ भाषेत बोलत पण समोरच्याला प्रेमानं मिठी मारणे आणि चुकल्यास तितक्याच झटक्याने जागा दाखवणे? की आणखी काही?
त्याचं काय हाय ना पोष्टमण राव, आमी पल्डो आडानी गाडाव. आमाला काय ठाव तुमचं सब्य काय आन् काय काय!!
---------------------
लंबू, सुक्या, ऍड्या, अभिजीत, एकराव लै लै भारी रे!!!
---
ओ तात्या, आता एक काम कराच तुम्ही. इनोची फ्याक्ट्रीच घ्या विकत. च्यामायला हल्ली जळजळ फार वाढलीये आजुबाजुला. च्याबायलीचं, आपल्या टपरीच्या दारातच इनोची पाकीटं ठिऊ लटकवून...आलं कोणी जळजळत की लगेच हातावर इनो ठिऊ.
14 Oct 2008 - 5:15 pm | कुंदन
अति जळजळ होते तर "किवी ड्रेनेक्स" का नाही देत तेन्ला?
14 Oct 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर
धमाल्या मस्त हाणला आहेस रे! :)
ओ तात्या, आता एक काम कराच तुम्ही. इनोची फ्याक्ट्रीच घ्या विकत. च्यामायला हल्ली जळजळ फार वाढलीये आजुबाजुला. च्याबायलीचं, आपल्या टपरीच्या दारातच इनोची पाकीटं ठिऊ लटकवून...आलं कोणी जळजळत की लगेच हातावर इनो ठिऊ.
ओक्के बॉस! तसंच करू.. :)
आपला,
(ऍसिडिटिने बेजार!) तात्या.
15 Oct 2008 - 8:00 am | झकासराव
ओ तात्या, आता एक काम कराच तुम्ही. इनोची फ्याक्ट्रीच घ्या विकत.>>>>>>
हम्म. म्हणुनच तात्या त्या कट्ट्याला येताना इनो"व्हा" घेवुन आले होते काय?
जाता जाता दिसला ऍसिडीटी वाला की त्याला इनोव्हा दाखावयाची. :)
पण पुणे मुंबई प्रवासात कोणी नसेल ऍसिडीटी वाला अस वाटतय. काय तात्या बरोब्बर ना??
पाठवायची एक इनोव्हा तिकडे?? :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
14 Oct 2008 - 5:00 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
पहिल्या दिवशी मला जरा अंमळ चुकल्याचुक्ल्या सार्खे वाटत होते. थोड्क्यात् सोडला त्या पोस्ट्याला. आता कसे गार गार वाटले.
14 Oct 2008 - 5:30 pm | महेश हतोळकर
तुझा आक्षेप नक्की कशाला आहे?
शिवराळ बोलण्याला? का ग्राम्य बोलण्याला? का वर्षभर तगण्याला?
अरे राजा, प्रत्येक संस्थळाला स्वतःची एक संस्कृती असते, एक सभासद वर्ग असतो. म्हणजे बघ, टपरीवर जाणार्यांचा वर्ग वेगळा, वैशालीमध्ये जाणार्यांचा वर्ग वेगळा आणि एखाद्या स्टार हॉटेलात जाणार्याचा वेगळा. पण म्हणून टपरीवर जाणार्याने स्टार हॉटेलात जाऊच नये असे नाही ना? पण त्या त्या ठीकाणची संस्कृती पाळली म्हणजे झाले. झकपक कपडे घालून टपरी वर काटे चमच्याने वडापाव नाही ना खाता येणार. आणि उद्या तू स्टार हॉटेलात जाऊन वेटरला""गरम काय" म्हणून नक्कीच नाही विचारणार! त्यामुळे शिवराळ बोलण्याचा आक्षेप सोडून दे.
आता ग्राम्य बोलण्याबद्दल. ती एक मराठीचीच बोली आहे ना? मग एका बोलीने दुसर्या बोलीला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे? या सोवळेपणाने काय होईल कल्पना आहे ना? अरे जगाच्या पाठीवर मराठी बोलणार्यांची संख्या किती? आणि आपणच असे तुकडे पाडून घेतले तर मराठीला वाली कोण?
वर्षभर तगण्याबद्दल म्हणशील तर आपण आनंद वाटून घ्यायचा की जळफळाट करायचा? आरे मित्रा आंतरजालावर मराठी वाढते आहे याकडेतरी पहा ना. माझ्यासारख्या निष्क्रीय सभासदांची यामुळे किती सोय होते ते बघ. तू सवता सुभा म्हणालास म्हणून सांगतो आरे जितके सवते सुभे निघतील तीतके मराठीसाठी चांगलेच आहे. तुच विचार कर साप्ताहिक सकाळ आणि लोकप्रभाच्या जोडीला आणखी एक साप्ताहिक निघाले तर तुला आवडेल की नाही?
बघ पटतय का!
महेश हतोळकर
14 Oct 2008 - 5:36 pm | विसोबा खेचर
अरे जाऊ दे रे महेश!
तू कुणाला समजावतो आहेस? जे जाणूनबुजून येथे गरळ ओकायला येतात त्यांना समजावंण्यात काय अर्थ आहे?
छोड दो यार... :)
14 Oct 2008 - 5:43 pm | धमाल मुलगा
महेशराव,
काय संतुलीत प्रतिक्रिया आहे! वाह!
ह्याला म्हणतात विचार करणं. _/\_
आम्हाला तिच्याआयला असं शांत डोक्यानं का लिहिता येत नाही बॉ?
अर्थात,
हेच खरं म्हणा!
14 Oct 2008 - 8:14 pm | आंबोळी
पोष्टमन काकांना दसर्याच्या आणि दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! आणि मिसळपाव परिवारातर्फे प्रेमाची छोटीशी भेट.
(वि.सु. लब्बाडा एकटाच संपवू नको सगळे. तुझ्या बोलवित्या धन्यालाही ठेव थोडे.)
फुकटचा सल्ला: संडासला साफ होत नसेल तर इथे येउन कुंथण्यापरीस हे घ्यावे.
आंबोळी
15 Oct 2008 - 12:01 am | भाग्यश्री
पोष्ट मन काकांना मुन्नाभाई स्टाईल शुभेच्छा! गेट वेल सुन..
इथे येत रहा.. कदाचित मोकळ्या आणि जिंदादिल माणसांमधे आणि संस्थळावर राहून तुमचा आजार बरा होईल..
काय आहे, जे आहे ते इथे धाडकन बोलता येतं.. सभ्य्,शिवराळ्,ग्राम्य, इतर ज्या काही बोलीभाषा आहेत त्यात. शुद्ध्लेखन भान्गड नसल्याने जे आलं ते लिहीलं.. त्यामुळे मनात काही राहात नाही.. घुसमट नाही होत.. नाहीतर अशी जळजळ होते.. मिपावरचे सभासद कुठे जाऊन नाक खुपसताना पाहीले का कधी? नाही! कारण त्यांना गरजच नाहीए..
बर असो.. तुम्ही आलात, या वर्षीच्या 'तीट'ची काळजी मिटली.. सगळंच चांगलं असू नये ना.. एखादा काळा तीट लागतोच! धन्यवाद बर्का त्यासाठी.. पुढच्या दिवाळीतही या.. :)
15 Oct 2008 - 12:37 am | राम दादा
हे बघा ..पोष्ट्याने चुक केली..त्याला तसा मार पण मिळाला हाय्..आता जरा दमाणं घ्या..लय गरम हु नका..
आपला मार खाऊन पोष्ट्या अजुन उटला न्हाय्...आता बेनं कवा उटील तवां बोलंल..
तो पर्यंत जरा गप र्हावा.
दिवाळी तोंडावर आल्या..ऊगीच बोंबाबोंब नको...
ऑ.. लेकाच्यानो..एखाद्याला मरुस्तवर मारत्याती व्हय रं...
असु दे..सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
पोस्ट्याला एक सुचना:- मि.पा . बद्द्ल पुन्हा वाकडं बोल्लास तर हाग्यामार!! दिला जाईल..
राम दादा...( अजुन माझा मार न्हाय बघितलास तु)
15 Oct 2008 - 10:53 am | नीधप
तुम्हाला पटलं नाही म्हणून तुम्ही भांडून एक नवीन स्थळ चालू केलंत. तिथे हुकुमशाही सुरू केलीत. महा बोरींग स्थळ बनवलंत आणि त्यावर लोकांनी तुम्हाला धन्यवाद करून नवीन ठिकाण चालू केलं तर ही आडवी बोंबाबोंब.
तुम्हाला एक कळतंय का तुम्ही जिथून बाहेर पडलात ते स्थळ वा तुमच्याइथून बाहेर पडून नवीन तयार केलेलं स्थळ हे दोन्हीही सुखेनैव चालू आहेत.
तुमच्याच स्थळाला मात्र ग्रहण लागतंय. तेव्हा कोण माती खातंय ते आलंच ओघाने!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Oct 2008 - 11:20 am | मिसंदीप
पोष्टमन साहेब,
मिपा संस्कृतीप्रमाणे, सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
आपली हि आसुडी वृत्ती बघुन आम्हाला राग येण्यापेक्षा आपली दया आली !!
आपण पुढे जात नाही तेव्हा दुसर्याचे पाय ओढणे, हि मराठी माणसाची जुनी सवयच आहे.आपणही त्याचा प्रत्यय आणुन दिलात.
"मिपावाले " फारच ग्रामीण भाषेत बोलतात असे म्हणुन आपण आमची हेटाळणी करत आहात असे दिसते.
पण आमच्या मते, मराठी माणुस कुठल्याही संवादाचा मतितार्थ समजुन घेतो, त्याला भाषा किंवा त्याची शैली हे केवळ एक माध्यम असते.
असे नसते, तर बहिणाबाईंच्या ग्रामीण भाषेतील संसाराचा अर्थ मांडणार्या कविता आम्हांला "अमृताहुनी गोड" वाटल्या नसत्या.
असो...
आम्ही सुज्ञ आहोतच ;) व आपणही लवकरच सुज्ञ व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
15 Oct 2008 - 11:55 am | ऍडीजोशी (not verified)
आपणही लवकरच सुज्ञ व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना.>>>>
भलत्या अपेक्षा ठेऊ नका राव
15 Oct 2008 - 11:24 am | अनिल हटेला
>>> >>> धो डाला !!! >>> >>>
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
15 Oct 2008 - 3:06 pm | छोटा डॉन
खुप दिवस हा लेख व त्यावरील प्रतिसाद पहात होतो.
मिपाचे हितचिंतक आदरणीय टिकाकार "पोष्ट मन" साहेब बर्याच दिवसांनी आपली चौकशी करण्यास आले हे पाहुन आम्हाला फार बरे वाटले, माणसाला कुठेतरी आश्रय किंवा प्रसिद्धीझोत हवाच असतो ना, मग फिरतात कुठेतरी बिचारे मन मानेल तसे, जाईल तिकडे बेदम मार खातात हा भाग वेगळा ....
काय आहे की " बदनाम क्यु न हो, नाम तो हुवां" अशी काही तरी म्हण आहे बाबा, आपल्याला जास्त काही कळत नाही कारण आम्ही एकदम अडाणी गाढाव माणसं पण माझ्या मते हाच हेतु असावा ...
तर ते आपली खास चौकशी करण्यासाठी आले, सध्या त्यांची अवस्था " ना घर का, ना घाट का " अशी झाली आहे पण तो भाग वेगळा, आपल्याला काय करायचे त्याच्याशी, आपण आपले मिपापुरते पाहुयात ...
तर पोष्टमन महाशयांनी ( हो, काही ठिकाणी तशीच पद्धत आहे संबोधायची. ते भाऊ, दादा, काका किती अडाणी व गावठी आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे का ? ) त्यांच्या खास शैलीत आपली चौकशी केली. आता त्यानंतर "मिपाकरांनी " त्यांना धु धु धुतले हा भाग वेगळा ....
पण ह्यावरुन त्यांच्यात मिपाबद्दल किती प्रेम आहे हे दिसुन नाही का आले ? भले त्यांची शैली ही "सभ्य माणसाची" असेल, आपण अडाण्यांनी थोडा तरी त्यांची शैली आत्मसात करुन "त्यांच्या लेव्हलला" उतरुन प्रतिसाद दिला का ?
असो. आता "खास त्यांच्या शैलीत आमचे त्यांना उत्तर" ....
अवांतर : ह्यात सुदलेखणाच्या चुका काढायचा प्रयत्न करुन सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्याचा मुर्खपणा करु नये ...
तसेही आम्ही "सुदलेखण विश्लेशकाचे श्राद्ध" घालुनच लिहायला बसतो म्हणा, त्यामूले चिंता नसावीच.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
15 Oct 2008 - 3:09 pm | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
15 Oct 2008 - 3:19 pm | विजुभाऊ
सोडुन द्या रे मित्रानो.आता दुर्लक्षण्याइतकेही महत्व द्यायला नको या असल्याना
यांच्या बोलानी दोनघटका करमणूकही होत नाही.
तुमचा सात्वीक संताप समजु शकतो. पण आपणच प्रतिसाद देऊन वा जोड्यानी हाणून ह्या लोकांचे महत्व वाढवुन ठेवतो.
नव्या वर्षात इथे आनन्दात राहु या. मजा करु या. दाताखाली येणारे खडे थुंकुन द्यायला शिकुयात . ते रगडण्यात शक्ती कशाला वाया घालवायची
15 Oct 2008 - 3:08 pm | नाम्या झंगाट
पोष्टमन काका,
तुमचे (तुमच्या) बायको बरोबर भांडण झाले की काय?
स्वगत : राम दादाच्या लाल रंगातील सुचनेचा गंभीरपणे विचार करतो आहे.
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट