आंब्याची शिकरण (दूध आंबा):

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
1 May 2017 - 11:44 am

साहित्य:
5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ.
aamba
कृती:
आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा. त्यात दूध आणि साखर आणि अगदी चवीला मीठ घालावे. नीट मिक्स करावे. आणि गारेगार खावे. मिठाने दूध नासत नाही, पण जर नको असेल तर नका घालू. चवीला मीठ घातले तर छान लागते. एक नवीन सोपी स्वीट डिश, अजून शाही करायचे तर देताना आईसक्रीम चा गोळा ठेवा. चविनुसार साखर वाढवण्यास हरकत नाही.
aamba

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाहीये, हे नशीबच म्हणायचे! छान रेश्पी.

अनन्न्या's picture

1 May 2017 - 12:07 pm | अनन्न्या

नेहमीप्रमाणेच टाकलाय फोटो

यशोधरा's picture

1 May 2017 - 12:09 pm | यशोधरा

अगो, तू टाकलायस गो, पण मला हापिसात दिसत नाही.

अभ्या..'s picture

1 May 2017 - 12:12 pm | अभ्या..

ते शिकरण असते ना?
असो
शाही कारभार आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2017 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे

आमच्याकडे बायको ती शिकरण म्हणते मी ते शिकरण म्हणतो. कोब्रा ती शिकरण म्हणतात

अनन्न्या's picture

4 May 2017 - 1:41 pm | अनन्न्या

ते ही असेल पण बोलीभाषा असतेच ना! शाही आहे हेच महत्त्वाचं!!

आंब्याचे आणि शिकरण म्हणत धागा उघडला. फोटोने गारद केले!

सविता००१'s picture

1 May 2017 - 1:19 pm | सविता००१

आत्ताच करून खाल्ल पण. पहा माझा उत्साह....... :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 7:45 pm | अत्रुप्त आत्मा

पातेलं पाहून कल्पनेनीच आंत उडी मारल्या गेली आहे. http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

मंजूताई's picture

1 May 2017 - 8:53 pm | मंजूताई

सोप्पी .... उद्या च करुन पाहण्यात येईल ...

ए बाई, असे फोटू दाखवून का त्रास देतेस?
कृती चांगली नसायला काय झालय? येऊ का तुझ्या गावात रहायला?
आमच्याकडे ही पाकृ पाठवून सिद्ध कर की हा पदार्थ छान लागतो.
अजून इथे बाजारात पुरते पिकलेले आंबे आले नाहीयेत. मागील अठवड्यात सहा मेक्सिकन आंबे आणले. दोन बरे निघाले.
उरलेल्या चारांचा मुरांबा करावा लागला. तुझी आठवण अश्यावेळी येतेच!

अनन्न्या's picture

2 May 2017 - 2:27 pm | अनन्न्या

विचारतेस कशाला? अगं जेव्हा आंबे येतील तेव्हा कर आत्ता बघू नको

यशोधरा's picture

1 May 2017 - 9:17 pm | यशोधरा

दिसले फोटो.
अनन्या तू दुष्ट बाई आहेस.

रुपी's picture

2 May 2017 - 1:38 am | रुपी

छान पाकृ!

पण मला पहिलाच फोटो इतका आवडला की माझी त्यानंतर शिकरण बनवायला आंबेच राहणार नाहीत. :)

विशाखा राऊत's picture

2 May 2017 - 2:13 am | विशाखा राऊत

वाह :)

पैसा's picture

2 May 2017 - 9:08 am | पैसा

:)

मला आधी सांगा पहिल्या फोटो प्रमाणे आंबा कापण्याचा कसा!

शन्वारी आणि काल आमरस झालाय, त्यामुळे फार जळजळ झाली नाही.

आंबा कापून असा पुढे ठेवल्यावर कसला रस आणि कसले शिकरण !!!!

फोटु मस्त !

मनिमौ's picture

4 May 2017 - 2:20 pm | मनिमौ

तो आंबा ईतका सुबक चिरल्यावर शिकरण करायला दम तरी कसा धरवतो

रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा कधी जमनारे कापायला :प

रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा कधी जमनारे कापायला :प

आधी नीट टायपिंग शिक मग मग आंबेकापिंग.
=)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2017 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा

@आधी नीट टायपिंग शिक मग मग आंबेकापिंग.››› =))

त्ला ल्ह्याय्ला जम्लं की म्बा क्पाय्ला शिंक!!