जमिनीखाली ७५ फुटापासून शेवटचा पॉईंट १२० फुट खाली आहे.
सतत संगीत चालू असते कारण नाहीतर फारच भयाण वाटते.
सर्व ठिकाणी खेळती हवा पंप केलेली आहे तरीही काही ठिकाणी श्र्वास घ्यायला त्रास होतोच व हवेच्या झोताखाली उभे रहावे लागते नव्हे तेथे गाईड आपल्याला उभे करतात.
गाईड घेणे आवश्यक आहे व तो फुकट मिळतो.
हे ठिकाण ताडपत्रीपासून अंदाजे ३६ कि.मी. वर आहे...
लाईट वेगवेगळ्या प्रकारचे सोडलेले असतात.. कधी कधी काही रंगाचे बंद असतात...
पण एकंदरीत बघण्यासारखे आहे.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
29 Apr 2017 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट दिसतेय हे ठिकाण. भेट देण्याच्या जागांच्या यादीत भर पडली !
29 Apr 2017 - 11:13 pm | एस
यावर अजून वाचायला आवडले असते. रोचक जागा वाटते आहे.
30 Apr 2017 - 12:31 am | कपिलमुनी
अजून तपशीलवार माहिती हवी होती