अशा वेळी तुम्ही नक्की काय करता ... २

विदेशी वचाळ's picture
विदेशी वचाळ in काथ्याकूट
27 Apr 2017 - 4:38 am
गाभा: 

घरामध्ये कोणी तरी आजारी आहे. आजारी माणसाची कायम चीड चीड होत असते. तशी ती कोणाचीही होताच असते. आजार मुकाट्याने सहन करा असा सल्ला देणारा मी नाही.

पण जर का आजारपण दीर्घकाळ असेल तर? मग घरात कायमच चीड चीड होत राहते. कधी आजारी माणसाची तर कधी इतरांची. बरं प्रॉब्लेम असा होतो कि या आजारी माणसाशी काय बोलायचे आणि कसे बोलायचे? आपण म्हणावे आज सकाळी छान हवा पडली होती तर सकाळी नेमके त्या माणसाला गरगरत असावे. आपण गेल्या डिसेंबर च्या ट्रिप बद्दल बोलायचे म्हणाले तर त्याला तो माणूस येऊ शकलेला नसायचा. एकंदरीतच एकाच घरात असून पण आपले प्रांत वेग वेगळे होऊ लागलेले असतात. बोलायचे तर असते पण बोलणार काय? आजाराबद्दल बोलून त्या माणसाला दुखवायचे नसते. आणि बाकीच्या गोष्टी त्या माणसाला ऐकायच्या नसतात.

इतर घरातली माणसे तरी किती काळ त्या माणसाची चीड चीड सहन करणार? ती माणसे पण ह्या प्रकाराला वैतागलेली असतात.

मला माहिते आहे कि आपल्यातल्या कित्येक जणांनी हे सगळे पाहिलेले आहे. कित्येक जन त्यातून गेलेले आहेत. आणि ह्याला कोठले एका उत्तर सहज सूट होत नाही. प्रत्येकाला आप आपला रास्ता शोधायचा असतो. पण मला मार्गदर्शनाची गरज आहे.

विदेशी वाचाळ

प्रतिक्रिया

माझ्या मते, टीव्ही, पुस्तके वाचून दाखवणे, किंवा आपल्या नातेवाईकांच्या गोष्टी सांगणे (त्यांना आवडणार्‍या) हा एक पर्याय आहे.

पुंबा's picture

27 Apr 2017 - 12:46 pm | पुंबा

माझ्या अतिशय मर्यादीत अनुभवातुन खालील सल्ला देत आहे. माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठे असणारे अनेक मिपकर अधिक उपयुक्त आणि अनुभवसिद्ध उपाय सुचवू शकतीलच पण अश्या प्रकार्च्या दीर्घ आजारलेल्या माणसांबरोबर राहणे झाले असल्याने खालील प्रतिसाद द्यावासा वाटतो.
आजारी माणसाला सर्वात मोठे दु:ख असते ते बाकीची माणसे ज्या जोशात कामे उरकत आहेत, बाहेर हिंडत फिरत आहेत, ते आपणाला करता येत नाही. मला वेदना, दु:खे नशिबात आहेत तर ह्या सगळ्यांना मात्र वेदनामुक्त जीवन जगावयास मिळत आहे. ह्या उद्विग्नतेतून मग चिडचीड, धुसफूस सुरू होते. अनुभवविश्व आकुंचल्यामुळे, बोलण्यात तेच तेच विषय येतात. आठवणीत जुने संदर्भ, लोक येतात, तुमच्यादृष्टीने त्या लोकांचे महत्व तिर्तके राहिले नसेलही मात्र आजारी व्यक्ति वयस्कर असेल तर अश्या जुन्या नातेवाईक, संदर्भांना त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्व येते. तुम्हाला मत्र असे वाटते की, आम्ही एवढे यांचे करतो आहोत तर आमच्याबद्दल यांना काहीच वाटत नाही. तुमची चिडचीड होते ती त्यांची अवस्था बघून. हे आजीबात आनंदी नाहीत हा जणू त्यांचा गुन्हा आहे असे वाटते इतकी उद्विग्नता येते. अंथरुणाला जखडून असणार्‍या आजारी माणसांशी डील करणे अत्यंत अवघड होते ते या सर्व गोष्टींमुळे.
आता, उपायांबद्दल..
१. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अँबियन्स. आजार्‍याची खोली स्वच्छ, भरपूर सुर्यप्रकाश असणारी पाहीजेच. शेजारच्या टेबलावर वेगवेगळी फुले ठेवता आली तर उत्तम. त्यांच्या दिनक्रमात जितके वैविध्य आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न करावा.
२. त्यांचा छंद, आवड जपण्याची धडपड करावीच. वाचण्याचा, संगीत ऐकण्याची आवड असेल तर पुस्तके, संगीत उपलब्ध असेल असे पहावे. निराशा पसरेल असे साहित्य, गाणी जमेल तितके टाळावे. आजारी माणसापाशी गेल्यावर बोलायला छंदाविषयी बोलणे होईल, छंद पुरा करणे ही एक अचिव्हमेंट वाटून आजारी व्यक्ति प्रसन्न होईल असे वाटते.
३. आणखी एक महत्वाची गोष्ट आपली गार्हाणी, दु:खे चुकूनसुद्धा त्यांच्यापाशी बोलायला जाऊ नये, आजारी माणसाला कुणाहीबद्दल जरा जास्तच काळजी वाटत असते. विनाकारण तुमचे तणाव त्यांच्यावर लादले जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी.
४. आजारी माणसे मोठ्या माणसाशी चिडचीड करतील पण लहान मुले आली की त्यांचा चेहरा फुलतोच, ज्यांना शक्य असेल त्यांनी(सर्व आरोग्यविषयक खबरदारी घेऊन) लहान मुलांना त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला तर बरं.
५. आजार जर बरा होणारा असेल तर आशा पल्लवित ठेवणे हे आणी आजार टर्मिनल असेल तर उगाचच पुढचे मोठे प्लॅन्स करून आशा तेवत न ठेवणे हे अत्यंत गरजेचे.
६. आपल्या मनोरंजन, फिरणे, इतर कामे यांचे प्लॅनिंग आजारी माणसाच्या तब्येतीवर, परिस्थितीवरच अवलंबून रहणार आहे हे अ‍ॅक्सेप्ट करणेदेखिल गरजेचेच.

सर्वात शेवटी, आपणा स्वतःलादेखील ही दीर्घ आजारलेल्या माणसाची भुमिका पार पाडायला लागणार आहे असे मानून, आपल्या अनुभवांतून शिकून, आपण तेव्हा कसे वागायचे हे ठरवावे.
आपल्या घरातील आजारी व्यक्तिला लवकारत लवकर स्वास्थ्य लाभो हीच प्रार्थना.

पैसा's picture

27 Apr 2017 - 1:04 pm | पैसा

एकच एक सल्ला सगळ्या ठिकाणी उपयोगी पडेल असे नव्हे, पण आजार्‍याचे आणि आपले स्वतःचे मनःस्वास्थ्य टिकवणे हे कठीण काम आहे. त्यसाठी जे काय लागेल ते करावे. आजार्‍यालाच विचारून त्याला काय हवे ते करता येईल. त्याचवेळी स्वतःसाठी काही वेळ काढणे मी महत्त्वाचे समजते. मग त्याला कोणी स्वार्थी म्हटले तरी चालेल. पण आपले मनस्वाथ्य ठीक नसेल तर आपण आजार्‍यालाही जास्त प्रॉब्लेम्स तयार करू. थोडाफार अलिप्तपणा आणता आला पाहिजे. आजार्‍याच्या चिडचिडीकडे काणाडोळा करावा आणि त्याचे कारण कसे दूर करता येईल यावर उपाय त्याच्याकडूनच काढून घ्यावेत.

पण फॅक्ट अशीये :

१) कुठलीही सिक पर्सनॅलिटी हँडल करतांना (मग तो सिकनेस आजारामुळे आला असो की व्यक्ती धडधाकट असतांना आयुष्य झेपत नाही म्हणून आलेला असो), प्रथम आपण स्वतः प्रसन्न असायला हवं. आपण एकदा सॅड झालो की त्या व्यक्तिसकट गाळात जायला वेळ लागत नाही. आणि जगाची रहाटीच अशीये की आपला गडद रंग फेकायला एक व्यक्ती दुसरी व्यक्ती शोधत असते.

तुम्ही पाहा, कुणाकडेही गेल्यावर जास्तीत जास्त पाच मिनीटं, दोन्हीकडून सगळं विधायक बोललं जातं (सुरुवातीलाच अपशकुन नको म्हणून) आणि मग एकमेकांशी अहमिका करत माझी कशी गोची पडलीये हे सांगायला सुरुवात होते. एकतर आपली सुखं सांगायची तर त्यांना दृष्ट लागेल अशी काहीशी भीती माणसाला असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दु:खानं आपण एकमेकांच्या जास्त जवळ येतो. सुखाचा सांगावा इर्ष्या निर्माण करतो. सो, इट इज इंपॉसिबल टू रिमेन हॅपी ऑल थ्रू. ही झाली नॉर्मल पब्लिकची कथा !

२) आता आजारी व्यक्तीकडे तर गडद रंगाची बादलीच काय फुल ड्रम भरलेला असतो. ती व्यक्ती हक्कानं तो रंग कुणावरही, केव्हाही आणि कसाही फेकू शकते. तस्मात, पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला, तुझा हा अ‍ॅटिट्यूड (कितीही जस्टीफायेबल असला तरी) तुला आणखी गाळात नेतोयं आणि तुझ्यासाठी काम करणारे पण त्यात ओढले जातायंत हे सांगणं अत्यंत महत्त्वाचंय.....भले त्या व्यक्तीचे आता कितीही दिवस उरले असोत.

कारण अकृतज्ञता हा माणसाचा स्थायी भाव आहे. त्याला कधीही लाभलेल्याचं कौतुक तर नाहीच पण नसलेल्याची खंत जरूर आहे (तुम्ही तुमची पोस्ट पुन्हा एकदा वाचा ! म्हणजे माझं म्हणणं लक्षात येईल.) तर जोवर आजारी व्यक्ती लाभलेल्या प्रती कृतज्ञ होत नाही तोवर घराचा रंग बदलणं अशक्य आहे, तुम्ही काय वाट्टेल त्या सोयी-सुविधा पुरवा.

थोडक्यात, तुम्हाला किंवा इथल्या लोकांना पटो न पटो, आजारी व्यक्तीची मॅच्युरिटी वाढल्याशिवाय गत्यंतर नाही.

३) मी वर म्हटल्याप्रमाणे, दुसर्‍याला गाळातून काढायचं तर प्रथम आपण उत्साही हवं. त्यामुळे एका बाजूला त्या व्यक्तीला तिच्या नेगटिविटीनं परिस्थितीत घंटा सुधारणा होणार नाही, (उलट बिघडेल) हे सांगणं आणि दुसर्‍या बाजूला, अर्थात, आपण सदैव प्रसन्न राहाणं हा एकमेव मार्ग आहे.

म्हणजे कुणी भेटायला वगैरे आलं की येडपटासारखं अमका (अतीतज्ञ) डॉक्टर काय म्हणाला, मागच्या आठवड्यात काय लफडा झाला होता, बिपी किती अणि शुगरची काय भानगडे, डायलॅसिसला किती खर्च येतो, रुग्णसेविका वॉटस-अ‍ॅपवर किती टिपी करते आणि गॅलरीत जाऊन किती वेळ फोनवर बोलते.... याची चर्चा अजिबात करु नका. आलेली मंडळी त्यांचे एकसोकक दारुण अनुभव(च) सांगतात त्यांचं तोंड धरता येत नाही. पण उगीच त्यांच्या सुरात सूर लावून, `हो ना, तरी बरं (अमक्यातमक्यासारखा) अल्झायमर झालेला नाहीये !' वगैरे दु:खाचे (लांब तंतूंचे) धागे विणू नका.

आहे त्या क्षणात आपण, तो पेशंट आणि आलेली मंडळी किमान जीवंत आहेत याची दखल घेऊन, तो क्षण साजरा कसा करता येईल ते बघा. मग सगळी भेट विधायक व्हायला लागेल. आलेल्याच्या भेटीनं पेशंट आनंदेल, तुम्हाला मजा येईल आणि आवागत पण निघतांना प्रसन्न असेल.

४) एकदा ही ट्रीक जमली की मग पेशंटची शारीरिक स्थिती काहीही होवो , मानसिक स्थिती सुधारते. तुम्हीही कायम प्रसन्न राहाता आणि मग घरातलं वातावरण आपसूक बदलतं.

आपण याबाबतीत फारसा फरक करु शकत नाही.

पण भविष्यकाळासाठी एक मात्र करु शकतो... आपण आपल्या वृद्धत्वात आपल्या प्रियजनांना कसा त्रास देऊ नये हे आपण ठरवावं / शिकावं. जमेल तितकं पाळावं. बस्स.

काही गोष्टी आधीच सांगायला हव्या होत्या पण राहून गेल्या. किंवा कसे प्रतिसाद मिळतील ते ओळखता आले नाही म्हणून आधीच गोष्टी सांगितल्या नाही.

१. आजारी माणूस म्हातारे वैगेरे काही नाही. चाळिशीतच आहे.
२. आजार बारा होणार नाही आहे. कर्क रोग आहे. आजार मुळे शारीरिक थकवा खूप असतो, चालता फिरता येते, थोडे फार बाहेर पण जाता येते, गाडी चालवता येते, पण या सगळ्याला मर्यादा खूप आहेत. दोन तीन तासात सगळी ऊर्जा संपते.
३. उपचार पण माणसाला मारून टाकणारे असतात. पण आमच्या नशिबाने चांगल्या उपचार पद्धती मिळाल्यामुळे एवढा तरी शारीरिक जोर आहे. पण हे सगळे माझे मत आहे.
४. खंगून गेलेली रोग प्रतिकारशक्ती, त्या मुळे होणारे सतत चे संसर्ग जाण्या रोग. एका व्याधी मुळे येणाऱ्या इतर व्याधी. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आजारी माणूस वैतागलेला आहे.
५. गेले आठ वर्ष रोगाशी झगडणे चालू आहे.
६. घरातली लहान मंडळी आता हळू हळू मोठी होत आहेत. त्यामुळे त्यांना पण शिंगे फुटत आहेत. बच्चे कंपनी पण कधी कधी काय बोलतील याचा नेम नसतो. त्यामुळे पण घरात आग पेटंट असते.
७. मॅच्युरिटी वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. धैर्य पण झाले नाही. विचार करतो. पाहूया जमते का ते. पण कठीण वाटते आहे.
८. पैसे ताई म्हणत आहेत तसे अलिप्त पण आणायचा प्रयत्न करत आहे. माझ्या साठी म्हणून काही करता येते का ते पाहून तसे करत असतो. पण मुले लहान आहेत, त्यांना पण कोणीतरी हवे असते.

एकंदरीत जेवढे प्रतिसाद आले आहेत ते सगळे मनोधैर्य वाढवणारे आहेत.

आभारी आहे.

विदेशी वाचाळ

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2017 - 6:58 am | संजय क्षीरसागर

कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते . जर केव्हा श्वास थांबेल याची निश्चिती नाही तर मग मिळालेला प्रत्येक श्वास कृतार्थ करून जातो. अशी व्यक्ती मृत्यूला अत्यंत ग्रेसफुली सामोरी जाऊ शकते.

एकहार्ट टोलेनं यावर जबरदस्त काम केलंय. तो वँकुव्हरला असतो. तुम्ही कॅनडात असाल तर त्याची भेट घ्या. शक्य नसेल तर त्याचे काउंसेलिंग विडीओज मिळवा. तुमच्या पेशंटला मृत्यूची मजा येईल. तुमच्या घरातलं सगळं वातावरण पूर्णपणे बदलेल.

आणखी काही माहिती लागली तर कळवा , नक्की मदत करेन.

तुमच्या प्रयत्नांना यश येवो, शुभेच्छा !

पैसा's picture

30 Apr 2017 - 12:03 pm | पैसा

मृत्युचि मजा वगैरे हे इथे फार अस्थानी वाटतय. एखद्या बुडणार्‍या माणसाला तू पोहायला शीक वगैरे सांगण्यासारखे हे आहे. लेखकाला स्वतःच्या समस्येवर उपाय हवा आहे. आजारी माणूस हे सगळे ऐकायच्या मनस्थितीत असेल असं तुम्हाला वाटतय का?

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 5:03 pm | संजय क्षीरसागर

माझ्या सख्या मावशीला कॅन्सर झाला होता. तिचा मला ऑलमोस्ट एकदिवसाआड फोन यायचा. आमच्या याविषयावर कित्येक तास चर्चा झाल्यात. मी तिला काही ध्यानप्रक्रिया सांगितल्या. ती इतकी ग्रेसफुली गेली की बाकीच्यानं त्याचं अजूनही आश्चर्य आहे.

आता या केसमध्ये तुम्ही समाजसेवा म्हणून तासंतास इंटरनॅशनल कॉल करून त्या रुग्णाला हे सगळे शिकवता का सांगा. असल्या गोष्टी उगीच उठून कोणी दुसर्‍याला शिकवत नाहीत. आणि स्वतः लेखकाला माहीत नसेल तर ते काय सांगणार आहेत? स्वतः गुरू बिरू असलेल्या तुमच्यासारख्या लोकांनी सांगायचे एकवेळ ठीक आहे.

पैसा's picture

30 Apr 2017 - 7:40 pm | पैसा

त्रासलेल्या लेखकाला पण तेवढीच मदत होईल. प्रत्यक्ष मदत तर आपण करू शकत नाही. आम्ही नुसते बोलून काय उपयोग आहे म्हणून बरेच जण गप्प बसतात अशा वेळी.

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 11:22 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला एकहार्ट माहितीये का ? आजच्या घडीला टर्मिनल इलनेसमधून व्यक्तीला सहज मृत्यूला सामोरं जाता येणारं काऊंसेलींग करणारा तो एकमेव सिद्ध आहे. त्यानं अशा हजारो केसेस हँडल केल्या आहेत. माझी लेखकाशी ओळख नाही आणि मला केसची पूर्ण माहिती नाही (जी माझ्या मावशीच्या केसमधे होती कारण ती मला मोठ्या बहिणीसारखी होती) त्यामुळे मी त्यांना एकहार्टच्या काऊंसेलींगचा उपाय सुचवला.

तुम्हाला कल्पना नसली तरी केवळ आकलनानं तुम्ही जाणू शकाल की आपलं विदेहत्त्व समजलेली व्यक्ती मृत्यूला सहज सामोरी जाऊ शकते. शिवाय (मृत्यूचा धसका संपल्यानं) जो काही उर्वरित काळ आहे तो सुद्धा अत्यंत आनंदानं घालवू शकते. त्यांच्या घरातलं सगळं वातावरण बदलू शकेल.

दशानन's picture

30 Apr 2017 - 11:54 pm | दशानन

त्यांना तुम्ही तो मार्ग
"त्यामुळे मी त्यांना एकहार्टच्या काऊंसेलींगचा उपाय सुचवला"
सुचवला त्या मागे कारण काय होते सर?

हा प्रश्न कारण तुम्हीच म्हणत आहात
"माझी लेखकाशी ओळख नाही आणि मला केसची पूर्ण माहिती नाही"

मग तो मार्ग योग्य हे तुम्हाला कसे व का जाणवले?

कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते . जर केव्हा श्वास थांबेल याची निश्चिती नाही तर मग मिळालेला प्रत्येक श्वास कृतार्थ करून जातो. अशी व्यक्ती मृत्यूला अत्यंत ग्रेसफुली सामोरी जाऊ शकते.

तुम्ही लिहायच्या वेळी व लिहिल्यावर पण वाचत जा!

तोच सिद्ध मार्ग आहे हे कसे ठरले?

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा

@तोच सिद्ध मार्ग आहे हे कसे ठरले? ››› एव्हढं पण कळत नै का? मी म्हणतो म्हणून! ;)

विशुमित's picture

2 May 2017 - 8:53 pm | विशुमित

''''मला माहिते आहे कि आपल्यातल्या कित्येक जणांनी हे सगळे पाहिलेले आहे. कित्येक जन त्यातून गेलेले आहेत. आणि ह्याला कोठले एका उत्तर सहज सूट होत नाही. प्रत्येकाला आप आपला रास्ता शोधायचा असतो. पण मला मार्गदर्शनाची गरज आहे.'''''

हे खुद्द धागा लेखकाने विनंती केली आहे. संक्षी नी त्यांना आलेल्या अनुभवांपैकी एक अनुभव सांगितला आहे अन त्याचा एक उपाय पण सुचवला आहे. तो धागा लेखकाला उपयोगी पडू ही शकेल. मी सुद्धा अशा वातावरणातून गेलो आहे.

"दशानन" आणि " अतृप्त " जी ह्या थोड्या गंभीर धाग्याचा "ट्युलिप चित्रच्या" धाग्यासारखा विचका करू नका. संक्षींशी तुम्हाला काय वैयक्तिक वाद घालायचा आहे तो त्यांच्या खरडवहीवर घाला.

हेच त्यांना पण सांगा ना प्लिज!

संजय क्षीरसागर's picture

2 May 2017 - 9:58 pm | संजय क्षीरसागर

पहिला प्रतिसाद आणि नंतरचे उद्योगही तुमचेच आहेत. आता वरचा प्रतिसादही कळत नसेल तर कमाल आहे.

आता किती सपोर्ट उभे करणार सर ;)
तुम्ही विनोद मात्र छान करता, आपल्याला हवे तेवढेच हाती ठेवून !

बाकी अजून काय विशेष?
आपले सोडून इतरांचे प्रतिसाद पण वाचा वेळ मिळेल तेव्हा. तुमची "लाल"च आहे , त्याला नकार नाही. फक्त तुम्ही जी मज्जा करता त्याचे नवल वाटते.

=धागा लेखक
क्षमा असावी , येथे हा दन्गा करण्याचे मनात नव्हते पण ओशोचे गुरू शांत बसत नाही आहेत म्हणून हा वाद. तुम्ही हे सगळे दुर्लक्ष करा प्लिज.
मला काय सांगायचे आहे तव सांगून झाले आहे पण स्वतः ला देव योनीत समाविष्ट करणाऱ्या एका व्यक्तीमुळे हे रामायण सुरू झाले. त्यांना देव असेल तर बुद्धी देईल नसेल तरी कोणी ना कोणी देईलच यावर माझा विश्वास आहे.

आता किती सपोर्ट उभे करणार सर Wink
==>> हे जर मला उद्देशून असेल तर आणखी एकदा सांगतो मोठे व्हा. हा सुद्धा सल्ला नाही, हे खेदाने नमूद करू इच्छितो.

कंपुगिरीचा छद्‍मवेष करण्याची मला कधी आवश्यकता नाही भासली.

विशुमित's picture

2 May 2017 - 10:02 pm | विशुमित

मोठे व्हा...!!

विशुमित's picture

2 May 2017 - 10:03 pm | विशुमित

मोठे व्हा..!!

दशानन's picture

2 May 2017 - 10:13 pm | दशानन

लहान व्हा!
हाच सल्ला! मोठे होऊन मला वेडपट होणे नाही आहे. मला माझ्या नसलेल्या बुद्धीचा ना माज आहे ना फुकट ना मागता सल्ला देण्याची कुवत! तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय व्हायचे आहे.

मी तुम्हाला सल्ला नव्हता दिला. तुमचा बाळबोध पाहून मी तुम्हाला फक्त जाणीव करून दिली की मोठे व्हा..!!

तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय व्हायचे आहे.

चित्रगुप्त's picture

28 Apr 2017 - 11:06 am | चित्रगुप्त

कॅन्सरवर एक उपाय: खालील दुव्यावरून अभ्यास करून बघा:
http://gerson.org/gerpress/the-gerson-therapy/

अमेरिकेतील माझ्या एका मराठी परिचितांना या थेरॅपीचा चांगला फायदा झालेला आहे. हवा असल्यास त्यांचा संपर्क क्रमांक देऊ शकतो.

विदेशी वचाळ's picture

28 Apr 2017 - 5:46 pm | विदेशी वचाळ

संजय साहेब, धन्यवाद. मी विडिओ मिळवायचा प्रयत्न करतो. चित्रगुप्त साहेब , गरसन डाएट चा प्रयत्न केला होता. मेक्सिको मध्ये जाऊन राहायची तयारी पण केली होती. पण ते लोक म्हणतात कि लंग्ज मध्ये पाणी झालेले आहे त्यामुळे आता गरसन चालणार नाही. पण हे डाएट चालते असे सांगणारे बरेच आहेत हेही खरे.

विदेशी वाचाळ

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2017 - 6:08 pm | संजय क्षीरसागर

तर इकहार्टला डायरेक्ट काँटॅक्ट करा हा साईट अ‍ॅड्रेस आहे तिथेच हा Tolle Free Phone: 844-595-3316 हेल्पलाईन नंबर पण आहे.

तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगतो : पेशंटला आपण देहापेक्षा वेगळे आहोत ही एकमेव गोष्ट कळली की तुमचा सगळा प्रश्न सुटला ! त्या एकाच डिरेक्शननी सगळा प्रयत्न करा.

विदेशी वचाळ's picture

28 Apr 2017 - 6:41 pm | विदेशी वचाळ

धन्यवाद. वेब साईट वाचून पाहतो आणि मगच फोन करतो. म्हणजे नीट बोलता येईल.

विदेशी वाचाळ

विदेशीजी, तुम्ही ग्रेट आहात. मोठे काम करताय.
तुम्हाला हवे ते येथे लिहून काढू शकाल, तेवढेच मन हलके होईल.
उपाय सांगण्यास असमर्थ आहे, क्षमस्व.

यशोधरा's picture

1 May 2017 - 7:51 am | यशोधरा

असेच म्हणते..

सल्ले देणे व प्रत्यक्ष तेथे उपस्थित राहून परिस्थिती पाहणे यात फरक आहे, दुःखाचे करू सोहळा इत्यादी कवी कल्पना आहेत, ज्याचे जळत आहे त्यालाच कळतं. असो, तुमच्या दुःखात सहभागी आहे व त्या व्यक्तीच्या देखील. धैर्य व मन शांती ठेऊन सामोरे जा एवढेच सांगणे हाती आहे.

" जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे अशक्य काय
माझे मला कळाया दे बुद्धी देवराया " !

कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते . जर केव्हा श्वास थांबेल याची निश्चिती नाही तर मग मिळालेला प्रत्येक श्वास कृतार्थ करून जातो. अशी व्यक्ती मृत्यूला अत्यंत ग्रेसफुली सामोरी जाऊ शकते

वर स्वदेशी वाचाळ हे गृहित धरुन लिहित आहेत की कँसर = मृत्यू
अनेक कँसरग्रस्त मोठ्या ट्रीटमेंट घेऊन का होईना कँसरमुक्त जीवन घालवु शकतात. त्यांच्या ट्रीटमेंटच्या मधल्या टप्प्यात थोडी निराशा, थोडा कंटाळा, थोडे टेंशन हे येऊ शकते याचा अर्थ असा नाही की त्याचे काउन्सेलिंग म्हणजे मृत्यू येणार बरं का आता.अगदी मजा आहे त्यात. भ्यायचं कारण नाही.
तुम्ही लिहिलेले वाचतानासुध्दा बरे वाटले नाही तर कोणाचे तरी जिवलग यातून जात असेल त्यांना कसे वाटत असेल याने प्रचंड विषाद वाटला.
बाकी चालू द्यात...

संजय साहेब , पैसा ताई, तुमचे दोघांचेही म्हणणे योग्य आहे. पहिल्यांदा मला संजय साहेबांचे म्हणणे अजिबात पटले नव्हते. मी पण थोडासा वैतागलो होतो. पण तथ्य आहे. माझ्यासाठी जरूर आहे. मी शिकू शकेन काहीतरी त्यातून कारण मी त्या परिस्थितून जात नाही आहे. मी जर का आजारी असतो तर मी ते ऐकायला गेलो नसतो हे पण तितकेच खरे.

पण म्हणून आत्ताच ऐकून घ्यावे म्हणज वेळ आलीच तर (येऊ नये हि त्या परमात्म्याला विनंती) आणि बुध्धीने साथ दिली तर योग्य प्रमाणे उत्क्रमण होईल.

पण आत्ताच सध्याचा प्रश्न हा मी काय करू हा असा आहे, आणि मला आजारी माणसाला हे ऐकवणे कठीण जाईल. अथवा आजारी माणूस ऐकणार नाही हि माझी ठाम समजूत आहे.

बऱ्याचदा प्रश्न हा संभाषण सुरुवात कशी करावी हाच असतो. पण आजारी मानस बाबत संभाषण सुरु झाले तरी ते कधी तुटेल ते सांगता येत नाही. नेमकी कुठली गोष्ट कोणाला लागून जाईल ते पण सांगता येत नाही.

असो. बहुदा माझे पर्सनल प्रॉब्लेम पण आड येत असावेत .

रेवती ताई, अजया ताई, यशोधरा ताई, दशानन साहेब, आपण सर्वच मला आधार वाटतो. धन्यवाद.

आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मलाच नव्हे तर इतर काही जणांना तरी हा प्रश्न सतावतो आहे हे पाहून बरे बाटले. (मी विघ्नसंतोषी नाही पण समदुःखी पाहून बरे वाटते)

विदेशी वाचाळ

संजय क्षीरसागर's picture

2 May 2017 - 12:17 am | संजय क्षीरसागर

१) आत्ताच सध्याचा प्रश्न हा मी काय करू हा असा आहे, आणि मला आजारी माणसाला हे ऐकवणे कठीण जाईल. अथवा आजारी माणूस ऐकणार नाही हि माझी ठाम समजूत आहे.

अर्थात, घरच्यांचे व्यूज एकमेकांबद्दल फिक्स झालेले असतात. कुणी कुणाला चटकन मानत नाही आणि अशा परिस्थितीत तर नाहीच. म्हणून तुम्हाला म्हटलं की एकहार्ट शक्य असेल तर बेस्ट आहे.

२) पहिल्यांदा मला संजय साहेबांचे म्हणणे अजिबात पटले नव्हते. मी पण थोडासा वैतागलो होतो. पण तथ्य आहे.

८ वर्ष हा मोठा कालावधी आहे. इथे लोक माझ्याविषयी काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्यापेक्षा मला चूक ठरवण्यात रस असतो. पेशंटची मानसिकता बदलणं हीच एकमेव प्राथमिक स्टेप आहे आणि त्याबरोबर आपली चित्तदशा प्रसन्न असणं आगत्याचं आहे. वेळ हा पेशंट आणि घरचे दोघांसाठी अमूल्य आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या.

दशानन's picture

2 May 2017 - 9:10 am | दशानन

पण थोडे बुद्धीने पण व्हावे अशी अपेक्षा एक तुमच्यापेक्षा लहान म्हणून ठेवली आहे, प्रत्येक वेळी मीच कसा गरीब व मलाच इथे टार्गेट केले जाते, हे कार्ड खेळणे बंद करून आपले प्रतिसाद व त्यातील भाषा एकदा त्रयस्थ नजरेने वाचा व तुम्हाला जाणवेल असे का होत आहे.
असो,
माझ्याकडून हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. मी नेहमी म्हणतो की मोठयांच्या ज्ञान व माहितीचा सतत सदुपयोग होणे गरजेचे, पण हे असले ?
पीडित काय अवस्थेत आहे, तुम्ही सल्ले काय देताय! किमान सद्विवेकबुद्धी असलेला व्यक्ती पण अश्यावेळी हातचे राखून सल्ले देतो, तुम्ही तर पार अंतिम यात्रेच्या गोष्टी करू लागला?
कर्करोग म्हणजे फक्त मृत्यू हेच तुमचे मत आहे का? यातून देखील सुखरूप बाहेर आलेले व शांत सुखी जीवन जगत असलेले माझ्या पाहण्यात आहेत,
आणि मृत्यू अपरिहार्य जरी असला तरी त्याचा सोहळा नक्कीच होऊ शकत नाही जे त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी. त्यांच्या समोर तरी किमान आपले शब्द व वाक्य रचना समतोल राहील हे पाहणे अपेक्षित असते.
या जगात असा कोण आहे ज्याने मृत्यू नाही पाहिला? ते सत्यच आहे पण ते सत्य सांगणे किंवा त्याबद्दल बोलणे याचे काही माप दंड समाज म्हणून आपण पाळावयाचे असतात.
हा धागा लिहला म्हणजे तो फक्त लेखकाचा धागा होत नाही, अनेक वाचक, सदस्य यांचा तो धागा होतो, तेव्हा आपण काय लिहितो, काय मत व्यक्त करतोय व त्याचे काय परिणाम समोर येतील याचा ही कुठेतरी हिशोब ठेवणे गरजेचे नाही का?

परत एकदा, असो,
कोणी तुमचा उल्लेख आभार म्हणून केला तरी तुम्ही लगेच हा बघा पुरावा त्यांना माझे मत मान्य आहे म्हणून ढोल वाजवू लागता, हे तुम्हाला शोभत नाही सर.

पण फोरमवर सगळे सारखे असतात आणि मुद्दा महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला तरी समजायला हरकत नाही. तस्मात, मुद्यावर फोकस ठेवा. एकतर तुम्हाला माझे प्रतिसाद समजत नाहीत शिवाय तुमचे पूर्वग्रह आणि त्यात तुमची प्रतिसाद द्यायची हौस असा सगळा प्रकार आहे.

२) आता तरी नीट वाचा :

कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते

याचा अर्थ केवळ मॅच्युरिटी कमी असलेली व्यक्ती, `कॅन्सर इज इक्वल टू डेथ' असा काढू शकते. मृत्यू सगळ्यांनाच आहे हा प्रतिसादाचा फोकस आहे (आणि थोडी फार मॅच्युरिटी असेल तर ती वस्तुस्थिती आहे हे कुणाच्याही लक्षात येईल) . एकेक क्षण कमी होत जाणं ही कॅन्सर असो की नसो, प्रत्येकाची एकसारखी परिस्थिती आहे. पण अज्ञानाचा अंधःकार इतका गहन आहे की धडधाकट माणसाला त्याची कल्पनाच नसते. टर्मिनल इलनेसची व्यक्ती अशा दृष्टीनं सुदैवी की तिला मात्र त्याची यथार्थ जाणीव होऊ शकते, असा प्रतिसादाचा अर्थ आहे आणि विवांना तरी तो समजला आहे.

तुम्हाला आणि इतरांना समजेल किंवा नाही पण विवांना निश्चित समजेल म्हणून एक स्टोरी सांगतो:

यक्ष एकदा धर्मराजाला विचारतो की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं ?

(आपल्या मंडळीं नी उत्तर दिलं असतं की `अरे तुला माहितीच दिसत नाही. या जगात एकूण सात आश्चर्य आहेत !' आणि नंदन छाप भौगोलिक आश्चर्य सांगितली असती.) पण धर्मराजाचं उत्तर एकदम भन्नाट आहे. तो म्हणाला :

` जीवनात मृत्यू इतकी शाश्वत, निश्चित आणि केव्हाही घडू शकणारी घटना कोणतीही नाही. तरी सुद्धा, जनसामान्य आपल्याला मृत्यू येणार नाही अशा भ्रमात जगतात !'

एकदा हे समजल्यावर, पुढचं वाक्य सोप्या मराठीत लिहीलंय ते समजायला अवघड नाही : दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते

३) मृत्यू अपरिहार्य जरी असला तरी त्याचा सोहळा नक्कीच होऊ शकत नाही जे त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी.

ज्याला जगण्याचा सोहळा करता येत नाही त्याला मृत्यूचा काय करता येणार ? तर हा मुद्दा तुमच्या आकलनापलिकडे आहे. सध्या तो राहू द्या.

४) कोणी तुमचा उल्लेख आभार म्हणून केला तरी तुम्ही लगेच हा बघा पुरावा त्यांना माझे मत मान्य आहे म्हणून ढोल वाजवू लागता, हे तुम्हाला शोभत नाही सर.

तुमच्याकडे ना आकलन ना परिस्थितीचं गांभिर्य (तुमचा दुसरा प्रतिसाद आणि त्यावर इथल्या सदस्यानी टाकलेली स्मायली पुरेशी बोलकी आहे). विवांना माझा प्रतिसाद समजला हीच गोष्ट माझ्या दृष्टीनं थोर आहे. पण इथे केवळ टिपी करणं, फालतू विडंबनं टाकणं आणि त्यावर बालीश टाळ्या पिटणं इतपतच मजल असलेले ते जाणू शकत नाहीत, त्याला माझा इलाज नाही.

५) माझ्याकडून हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. मी नेहमी म्हणतो की मोठयांच्या ज्ञान व माहितीचा सतत सदुपयोग होणे गरजेचे, पण हे असले ?

एकदम योग्य निर्णय ! तुम्हाला माझे प्रतिसाद समजतच नाहीत म्हटल्यावर तुम्ही उपप्रतिसाद देण्याची किंवा प्रश्न विचारण्याची तसदीच घेऊ नका.

ओ! तात्या... शांत घ्या जरा वाईच!

तुमचा दुसरा प्रतिसाद आणि त्यावर इथल्या सदस्यानी टाकलेली स्मायली पुरेशी बोलकी आहे).

=))
तुम्हाला माझा दंडवत!

संजय क्षीरसागर's picture

2 May 2017 - 7:27 pm | संजय क्षीरसागर

आता निरूत्तर होण्याची पाळी आली आहे. कारण कळलं नाही म्हणावं तरी गोची आणि मान्य केलं तर स्वतःच्या प्रतिसादामुळे उघड झालेलं अज्ञान लपवायला जागा नाही !

एनी वे, मागे ही सांगितलं होतं, माझ्या प्रतिसादामागे बराच मोठा विचार असतो, तुम्हाला ते झेपणारं नाही कारण तुमचा पूर्वग्रह आड येतो. तस्मात, उगीच सरकास्टिक कमेंटस करून स्वतःच हसं ( जे वरच्या प्रतिसादात केलं आहे ) करून घेऊ नका.

संक्षी जी कृपया इग्नोर मारा. तुमच्या पहिल्या प्रतिसादातच तुम्हाला काय म्हणायचं आहे ते उमगले होते. बऱ्याच अंशी पटले सुद्धा आहे.
परखड वगैरे काही नव्हते. उलट आजारी माणसाला गुलुगुलु बोललेले आणखी चिडवून देते.

ही अशी परिस्थिती घरातील खूप प्रिय व्यक्ती बाबत मी ३ वर्ष स्वतः अनुभवली आहे. ती बिचारी आता जगात नाही पण तिचे मरण अजून सुसह्य झाले असते असे अजून वाटते. ती आजारी असताना तिच्या मनाची घालमेल ती जायच्या अगोदरच मोकळी झाली असती तर तिच्या जाण्याचा चटका लागला नसता.

विदेशी जी तुमच्या घरातील तणावपूर्ण वातावरण समजू शकतो. धीर सोडू नका. तुमच्या प्रयत्नांना यश लाभो..!!

पैसा's picture

2 May 2017 - 9:36 am | पैसा

विदेशी वचाळ, धाग्याला जरा वेगळे वळण लागले त्यात माझ्याकडून लिहायचे राहून गेलेले काही.

कॅन्सरसारख्या रोगात रुग्ण खूपदा डिनायल मोडमधे जातो. कधी कधी हे माझ्याच नशिबी का म्हणून आत्यंतिक निराश होतो. अशा वेळी त्याच्यासोबत रहाणार्‍यांनाही खूप त्रास होतो. परिस्थिती आहे तशी स्वीकारली की त्यातून बाहेर पडायचे मार्ग दिसायला लागतात. आता काही प्रकारचे कॅन्सर सोडता अन्य कॅन्सर रुग्ण उपचार घेऊन बरीच वर्षे व्यवस्थित आयुष्य जगू शकतात. (अर्थात तुमच्या जवळच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे हे मला माहीत नाही आणि ते सांगायची इथे फार आवश्यकता आहे असे वाटत नाही.) तेव्हा कॅन्सर म्हणजे मृत्यू ही कल्पना तुमच्या दोघांच्याही मनातून जाईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. चांगल्या आयुष्यासाठी रुग्णाची इच्छाशक्ती वाढवणेही चांगले ठरेल. या सगळ्यात कौन्सेलर्सची प्रोफेशनल मदत उपलब्ध असते. रुग्ण आणि त्याचे आप्त यांना परिस्थिती स्वीकारायला कौन्सेलर्स खूप मदत करतात. रुग्ण कौन्सेलरकडे जाणे शक्य नसेल तर माझा मित्र आहे असे काही सांगूनही तुम्ही त्यांची भेट घडवून आणू शकाल.

या जगात चमत्कारही घडतात! तेव्हा तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!

वरुण मोहिते's picture

2 May 2017 - 10:42 pm | वरुण मोहिते

वाचलं . तर कॅन्सर वर बेस्ट डॉक्टर म्हणजे सुलतान प्रधान (जर तुम्ही मुंबई ला राहत असाल तर )..पवार साहेबानी पण तिथे उपचार घेतलेत सुरवातीला .बाकी प्रत्येकानी प्रत्येकाचं ठरवायचं .अध्यात्म , काय शिकवायचं समोरच्या माणसाला ह्या फंदात पडू नये . कारण मनस्थिती कधीच जुळत नाही . आजारी आणि धडधाकट माणसांची .