मार्गदर्शन हवंय! मिनिएचर्स बद्दल!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
24 Apr 2017 - 9:00 pm
गाभा: 

मंजु यांच्या धाग्यावर मी माझ्या व्हिज्युअल स्पेशिअल सेन्स बद्दल उल्लेख केला आहे.निसर्गाच्या या थोड्याशा वरदानामुळे लहानपणापासून एक छंद सोबतीला आहे.
मिनिएचर्सचा!

गाव,शहर यांच्या प्रतिकृती बनवण्याचा छंद मला आहे.जे काही बनवतो ते चांगलं बनवतो असा माझ्या आर्किटेक्ट बंधूंचा अभिप्राय आहे.पण बरं बनवतो असं समजायला हरकत नाही.
कागद,कार्डबोर्ड,थर्माकोल हीच माध्यमं आजपर्यंत वापरली आहेत.
आतापर्यंत हे सगळं छंद या मर्यादेपर्यंतच होतं.त्यामुळे त्यात शास्त्रशुध्दपणा नव्हता.आता असा विचार करतो आहे की याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन त्याचा आर्थिक प्राप्ती वाढवण्यासाठी काही उपयोग करता येईल का?

म्हणूनच या विषयातील प्रशिक्षण कुठे घेता येईल? तसंच या कलेचा उपयोग अर्थार्जनासाठी कशा प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन हवं आहे.
सध्या मी कोल्हापुरात नोकरी करतो आहे.त्यामुळे पूर्ण वेळ शिक्षण घेणं शक्य होणार नाही.पण अर्धवेळ किंवा रविवारी असा वेळ मिळू शकतो.
या व्हिज्युअल स्पॅशिअल सेन्सचा उपयोग आणखी कुठे करता येईल का?
माझं शिक्षण आणि नोकरी दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातलं आहे.
सगळं व्यवस्थित जुळून आलं तर कालांतराने पूर्णवेळ इकडेच देण्याचा विचार आहे.तूर्तास प्रशिक्षण आणि याचा उपयोग करुन एखादा जोडव्यवसाय किंवा पार्टटाईम नोकरी एवढाच उद्देश ठेवला आहे!

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आगावू आभार मानतो!

प्रतिक्रिया

अत्रे's picture

25 Apr 2017 - 6:07 am | अत्रे

"miniature museum" असे गूगल सर्च करा. जगात वेगवेगळ्या देशात मिनिएचर्स ची म्युझिअम्स आहेत, त्याच्या वेबसाइट बघा. (लोणावळ्याला हि आहे एक असे दिसते https://www.tripadvisor.com/Attraction_Review-g608474-d8862892-Reviews-M... )

तुम्ही तुमच्या कलाकृती या म्युझिअम्स ला देऊ शकता किंवा स्वत: असे म्युझिअम तुमच्या शहरात सुरु शकता.

ऑनलाइन शोध घेतल्यास या विषयावरचे ग्रुप्स/कम्युनिटीज सापडतील, तिथे तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारता येतील.

उपयोजक's picture

25 Apr 2017 - 8:02 am | उपयोजक

link बद्दल धन्यवाद अत्रेसाहेब!

अत्रे's picture

25 Apr 2017 - 9:16 am | अत्रे

वेलकम! अजून एक कल्पना - एखाद्या इंटिरिअर डिझायनर / डेकोरेटर ला भेटा आणि विचारा कि घरातल्या शोकेसमध्ये/ इतर ठिकाणी मिनिएचर्स ठेवण्यासाठी लोकांकडून मागणी येऊ शकते का.

उपयोजक's picture

25 Apr 2017 - 11:15 am | उपयोजक

कल्पना खरंच छान आहे.नक्की विचारतो.यातूनच आणखी काही सूचेल.

राघवेंद्र's picture

25 Apr 2017 - 8:59 am | राघवेंद्र

जोशी म्युझीयमला भेट द्या. त्यांच्या कडे असे प्रोजेक्ट असतात.

उपयोजक's picture

25 Apr 2017 - 11:21 am | उपयोजक

तुनळीवर व्हिडिओज पाहिलेत.जोशींच्या रेल्वे म्युझियमलाही भेट नक्की!

हा छंद म्हणून एकदम मस्त आहे. व्यवसायात रुपांतर करायचे अस्सेल तर काळाबरोबर जावे लागेल. आजकाल थ्रीडी प्रिंटिंगच्या जमान्यात ह्या हाताने करायच्या गोष्टीत काही इनोव्हेटिव्ह केले तरच पैसा आहे अन्यथा जे काम १ तासात मशिन फिनिश करुन देईल त्यासाठी कुणी तुम्हाला जास्त वेळ आणि पैसा मोजणार नाही.
माउंटबोर्ड आणि थर्मोकोल वापरुन मॉडेल करायचे दिवस आता नाहीत. अ‍ॅक्रेलिक शीट्स, ट्रान्सपरन्ट फिल्म्स, इको सॉल्व्हन्ट प्रिंट्स, डिसी प्रिंट्स असे जोडीला घेऊन, छोटे प्लान्ट्स, आर्टिफिशिअल ग्रास,छोटे एलईडी वापरुन रिअल लुक देणारे मॉडेल्स जास्त सुपिरिअर दिसतात.
माझे तर मत असे आहे की तुम्ही थ्रीडी स्टुडिओ मॅक्स, ऑटोकॅड आणि माया सारखे अ‍ॅप्लिकेशन एक्सपर्ट व्हा. त्यात अगदी वॉक थ्रुज, टेक्स्शर रेंडरिंग, लाईटिंग अशा फॅसिलिटिज वापरता येतात. तुम्हाला आवड अन ह्या फिल्ड मधल्या कन्सेप्ट्स माहीत असल्याने सोपे जाईल. येत्या काही वर्षातच थ्रीडी मॉडेल्स प्रिंटिंग मध्ये काही इनोव्हेटिव्ह देऊ शकाल. कोल्हापुरात माझे खूप मित्र हे काम केलेले आहेत. त्यात पैसा नाही जास्त. काम देणारा वरचढ असतो. शिवाय ह्या कामाला मागणी जास्त नाहीये कारण वेळ खाऊ आहे. नुसते कागदाचे मॉडेल बनवणे हि कारागिरी आहे, कला नाही. आणि येणारा काळ कारागीरांवर कुर्‍हाड आहे. कलेवर नाही.
सो.... अपनी अकल लगाओ, समय के साथ चलो.

खेडूत's picture

25 Apr 2017 - 11:43 am | खेडूत

+१
मस्त...सल्ला एकदम पटेश रे..!

अभ्या..'s picture

25 Apr 2017 - 11:49 am | अभ्या..

थॅन्क्स खेडूतकाका,
तुम्हाला हि विचारसरणी आवडली म्हन्जे मी योग्य ट्रॅकवर आहे याची खात्री झाली.
थॅन्क्स अ लॉट्ट्

उपयोजक's picture

25 Apr 2017 - 1:59 pm | उपयोजक

खरंय! काळाबरोबर जायला हवं! यात पुरेसा पैसा नसेल तर थांबणं चांगलं!

यात वेळ खुप जातो.हेही खरंय!अनेक तास बसल्यावर दर्जेदार कलाकृती निर्माण होते.

खरंतर यात पैसा नाही म्हणूनच इतके दिवस थांबलो होतो.

3D प्रिंटींगचा विचारसुध्दा करतो आहे!

उपयोजक's picture

26 Apr 2017 - 8:17 am | उपयोजक

या थ्रीडी मॉडेल्स प्रिंटिंगला बाजारभाव चांगला आहे का?
कुठे वापरता येतं हे 3D प्रिंटींग?