संमिश्र व्हाटस्याप समूहात पुरुषांची कुचंबणा/फजिती

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
18 Apr 2017 - 7:09 pm
गाभा: 

मेरे प्यारे भाईयो,आज एक अतिमहत्वाचा विषय आपल्यासमोर मांडतोय......पुरुषांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती केव्हा निर्माण होते ? संमिश्र व्हाटस्याप समूहात आपल्या हातून मोठा प्रमाद घडतो आणि नको ते संदेश समूहात आपल्या नावे झळकू लागतात....

अजाणतेपणी अपराध जरी घडला तरी व्हायचं ते होतंच ! मेसेज रिकॉल पध्दत नसल्याने मार्कच्या आईबहिणीचा उध्दार होतो...मनाला एक अनामिक टोचणी लागते....अन्नपाणी गोड लागत नाही....हजारदा हताश मनाने तोच ग्रूप उघडून त्या मेसेजकडे भकासपणे पाहत राहणे इतकेच हातात उरते.....अडमिन समजूतदार असला तर बरं नाहीतर कारवाईला लगेच सुरुवात होते.....त्यासाठी पुन्हा ग्रूपमधल्या महिलांची परत परत माफी मागावी लागते...एकूणच धरणीमाता पोटात घेईल तर बरं असं वाटतं !

इथे ग्रूपमध्येही चर्वितचर्वण सुरु होतं ..... काही वेळा सगळेच ओळखीचे लोक असतात किंवा नसतात... कोणी हसून सोडून देतं तर कोणी नियमाचा कीस पाडत बसतं .....बहुतांशी पुरुषवर्ग दुर्लक्षच करतो (कारण अशी चूक त्यांनीही कधीतरी केलेली असतेच ! उलट मेसेज आवडल्यास खाजगी संदेश पाठवून अजून स्टॉक मागवला जातो....शेवटी एकाच माळेचे मणी !)

ग्रूपमधल्या महिला विनोद/मेसेज तर वाचतात....ते वाचल्याची खूणही सापडते..त्यामुळे नक्की कोणी ते पाहिलंय ते कळतं.....गुन्हेगार पुरुषातला शेरलॉक होम्स अचानक जागा होतो....जमेल त्या पध्दतीने पुढील अप्रिय गोष्टी टाळणं क्रमप्राप्तच असतं.....महिला सोशिक आणि सहनशील असतील तर हे शक्य होतं अन्यथा ग्रूपमध्ये उलटसुलट जाहीर चर्चा होऊन गुन्हेगाराला अडमिनच्या हस्ते नारळ दिला जातो (अडमिनशी घसट अथवा वैयक्तिक ओळख असल्यास बरं असतं...कमीत कमी त्रासात सुटका होते !)

ग्रूप ऑफिसचा असेल तर माणसाचं तोंड कायमचं काळं होतं....महिलावर्ग काम असल्याशिवाय जवळ फिरकत नाही...."वाटलं नव्हतं हा असला निघेल" असे भाव चेह-यावर असतात....लंचला माणूस एडस् च्या जाहिरातीतल्या माणसासारखा एकटाच बसतो....त्याला वाळत टाकलं जातं....

घरचा समूह असेल तर आगळीक केल्यावर ताबडतोब अज्ञातवासात निघून जावं लागतं...ग्रूपमधल्या नातेवाईक महिला जिथे जिथे भेटणार असतील ते सगळे इव्हेंटस् ठरवून चुकवावे लागतात....त्यातूनही माणूस अविवाहित असेल तर जरा तरी सहानुभूती मिळते...समूहातल्या महिला घरच्यांकडे "आता उरकून टाका लग्न पोराचं" असा धोशा लावतात....

माणूस विवाहित असेल तर असा घोटाळा केल्यावर पाचच मिनिटात त्याची पाचावर धारण बसते ! आपली अर्धांगिनी त्याच समूहात असेल तर अर्धांगवायूचा झटका येतो...डोळे पांढरे होतात....माणूस ऑफिसात असला तर काम सुचेनासं होतं...सीक लीव्ह टाकून निघून जावंसं वाटतं पण घरी जायची सोय नसतेच ! एकटंच समुद्राकाठी जाऊन बसावसं वाटतं...घरी काय काय सांगायचं याची इत्थंभूत तयारी करावी लागते....काय सांगितलं तर कमीत कमी शिक्षा होईल याचा अंदाज घेतला जातो.....

अडमिनला विनंती करुन छोटा असलेला समूह जरी विसर्जित केला तरी त्याने झालेल्या अपराधाच्या खुणा मिटत नाहीत पण मनाची बोचणी कमी होते....आता काय हजेरी घेतली जाईल ते ज्याच्या त्याच्या बायकोच्या खुनशीपणावर अवलंबून असतं.....

असो....तर असा सखोल आढावा घेतल्यानंतर आपण यावर करायच्या उपायांकडे वळू :-

क्र.१-शक्यतो मेसेज डोकं,मन आणि डोळे ताळ्यावर असतानाच पाठवावेत...

क्र.२- काही विशिष्ट मेसेज आणि चित्रं पाहून माणसाच्या शरीरात बरीच संप्रेरकं कार्यरत होतात...त्यांचा प्रभाव कमी झाल्यावर मगच मेसेच फॉरवर्ड करावेत.

क्र.३- चुकीचा मेसेज चुकीच्या समूहात पोहचल्यास शक्यतो स्वत:च तिथून माफीनामा टाकून बाहेर पडावे.....आणि अडमिनचे प्राण आणि कष्ट वाचवावेत.

क्र.४- आपण पाठवलेला मेसेज कोणालाही दिसण्याआधीच अजून एखादा रटाळ आणि लांबलचक मेसेज त्याच ग्रूपमध्ये टाकावा जेणेकरुन संभाषणाचा रोख बदलेल...

क्र.५- फक्त मित्रांचा ग्रूप असेल तर तिथेच धांगडधिंगा घालावा पण मित्रांच्या बायकांबरोबर शक्यतो दुसरा ग्रूप बनवू नये (कितीही ओळख असली तरीही )

क्र.६- कोणत्याही दोन ग्रूपचे नाव सारखे असल्यास अडमिनला सांगून ते लगेच बदलून घ्यावं म्हणजे पुढचा अनर्थ टळेल.

क्र.७- अनभिज्ञपणे झालेली चूक मान्य करुन ताठमानेने त्याच ग्रूपमध्ये रहावे (पण शिक्का बसतोच काही दिवस तरी....पर हर जख्म़ का मरहम वक्त़ ही होता है )

क्र.८- अशा प्रकारचे मेसेज असणारे स्वतंत्र ग्रूप जॉईन करुन साध्या ग्रूपमध्ये राहूच नये किंवा राहिल्यास काही बोलू नये.

विशेष टिपण्णी - अशा प्रकारचे मेसेज एखाद्या ग्रूपमध्ये गेल्यास आणि त्या ग्रूपमधल्या एखाद्या महिलेने त्यावर आक्षेप घेतल्यास भारतीय दंड संहिता आणि सायबर कायदा यांच्या संयुक्त विद्यमाने पाठवणारा मनुष्य आणि अडमिन यांच्यावर कारवाई होऊ शकते तेव्हा सावधान ! तुमची चूक आणि भूक सांभाळा.....दिवस बायकांचे आहेत !

प्रतिक्रिया

#टर्बीयधागा असा काही हॅशटॅग लावायचा राहिला का?

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Apr 2017 - 7:38 pm | माम्लेदारचा पन्खा

माहिती नव्हतं बुवा हे !

मोदक's picture

18 Apr 2017 - 8:03 pm | मोदक

असल्या गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा.. लै दिवस झाले दोन धागे मागतो आहे ते दोन धागे टाकावेत अशी नम्र विनंती.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Apr 2017 - 9:08 pm | माम्लेदारचा पन्खा

दम धरा !

उपयोजक's picture

18 Apr 2017 - 8:39 pm | उपयोजक

यामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो.

कपिलमुनी's picture

18 Apr 2017 - 8:43 pm | कपिलमुनी

नको ते संदेश कधीही 'फॉरवर्ड' करू नयेत
त्या ग्रूपवर जावे आणि अ‍ॅटॅच करावेत. किंवा कॉपी करून मग त्या ग्रूपवर पोस्टावेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Apr 2017 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मापंचा स्वाणुभव ;)!!!!

डिपी बदलावा. तिथे कार्टून टाकावं.

हाणाइथंसारखे ग्रूप असले की असे प्रश्न भेडसावत नाहीत.

खटपट्या's picture

20 Apr 2017 - 7:44 pm | खटपट्या

हाणाइथं

मिपावर बरेच दीवसानी आल्याचं सार्थक झालं

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 9:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या...तुझी कमेंट कशी सुटली वाचण्यातुन. अरे ते एक त्रयाक्षरी डुआयडीवालं नावं राहिलं की रे.

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2017 - 11:03 am | टवाळ कार्टा

सालस की प्यारी२

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2017 - 11:20 pm | नगरीनिरंजन

मुळात "भारतात बाया सोवळ्यातल्या असल्याचं नाटक का चालू असते सतत?" हा प्रश्न विचारायला हवा.
जनुकीय प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन पुरुषांनी एकनिष्ठ वगैरे राहण्याची संस्कृती इतपत ठीक आहे; पण वागण्या-बोलण्यातही सतत सोज्ज्वळपणा असण्याची अपेक्षा म्हणजे टिपिकल दुटप्पीपणा आहे.
सगळीकडे मग पुरुषांचं वेगळं, बायकांचं वेगळं अशी मध्ययुगीन व्यवस्था. अगदी वेबसाईट्सवरसुद्धा.

पिशी अबोली's picture

19 Apr 2017 - 11:20 am | पिशी अबोली

जनुकीय प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन पुरुषांनी एकनिष्ठ वगैरे राहण्याची संस्कृती

हैला. म्हणजे पतिव्रता वगैरे गोष्टी त्या नैसर्गिक वाटतं..

नगरीनिरंजन's picture

20 Apr 2017 - 6:28 pm | नगरीनिरंजन

असं मी कुठं म्हटलं? पतिव्रता हा शब्द तर निव्वळ स्वतःच्याच मुलांना स्वतःची संपत्ती मिळावी ह्यासाठी निर्माण झाला आहे.
अर्थात बायांनीच नंतर स्वतःच्या व स्वतःच्या मुलांच्या फायद्यासाठी तो डोक्यावर घेतला ही गोष्ट वेगळी.

पिशी अबोली's picture

21 Apr 2017 - 11:15 am | पिशी अबोली

नाही, जनुकीय प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन पुरुषांनी एकनिष्ठ राहण्याबद्दल बोललात म्हणून विचारलं.
एकनिष्ठतेत प्रॉब्लेम असेल तर तो कुणीही एकनिष्ठ राहण्याबाबत असावा. तिथे खास पुरुषांचा उल्लेख करण्याचं काय प्रयोजन?

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2017 - 11:49 am | टवाळ कार्टा

कारण बायासुद्धा पुरुषाइतक्याच बाहेरख्याली असतात असे लिहिले तर इथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असती =))

साहेब..'s picture

21 Apr 2017 - 11:55 am | साहेब..

+१

पिशी अबोली's picture

21 Apr 2017 - 12:47 pm | पिशी अबोली

अय्या, पण टक्कूमक्कूशोनू, तुला तर युद्धच बघायचंय ना.. फांदीवर मानाची जागा आहे किनई तुझी..

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2017 - 5:39 pm | टवाळ कार्टा

काहीही हा पि.......ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ

नगरीनिरंजन's picture

21 Apr 2017 - 1:24 pm | नगरीनिरंजन

बायांनी तर एकनिष्ठ राहण्याच्या जबरदस्तीविरुद्ध उठाव करायला हवा होता दहा हजार वर्षांपूर्वीच. ते सोडून पुरुषांच्याही पॉलीअ‍ॅमॉरस/पॉलीगॅमस सुविधांना अनैतिक व अनैसर्गिक ठरवण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे म्हणून तसं म्हणालो.

पिशी अबोली's picture

21 Apr 2017 - 7:25 pm | पिशी अबोली

अच्छा.

आनन्दा's picture

18 Apr 2017 - 11:29 pm | आनन्दा

....त्याला वाळत टाकलं जातं....

जाम आवडल गेलं आहे.

पिलीयन रायडर's picture

19 Apr 2017 - 12:31 am | पिलीयन रायडर

एकदा ऑफिसच्या ग्रुपवर एकाने चुकुन असा मेसेज टाकला होता. नंतर त्याने भारंभार मोठमोठाले मेसेजेस तिथे ओतले.. अचानक ग्रुप पहाणार्‍यांना ६०-७० मेसेज दिसले असते. बराच वेळ हे चालु होतं. मग मी त्याला @अबक करुन "असु दे बेटा.. इट्स ओके!" असा मेसेज ग्रुपवरच टाकला. =))

बिचारा किती तरी दिवस सॉरी सॉरी करायचा!

बादवे.. मेसेज रिकॉल करण्याची सुविधा येतेय म्हणे आता.. नक्की ठाऊक नाही.

पद्मावति's picture

19 Apr 2017 - 1:00 am | पद्मावति

फक्त तशा फॉर्वर्ड्स च्या बाबतीत अस नाही पण एकूणच लेखात सांगितलेला उपाय क्र. १ पाळला नाही तर स्त्री काय आणि पुरूष काय कोणाच्याही व्हत्सअपीय जीवनात वादळ येऊ शकते. इकडचे गॉसिप तिकडे आणि तिकडच्या चुगल्या इकडे =))

बादवे.. मेसेज रिकॉल करण्याची सुविधा येतेय म्हणे आता.. नक्की ठाऊक नाही. अशी सुवीधा आली तर फार बरं होईल बाबा, मी करते गोंधळ कधी कधी. एका ग्रूप वरच्या प्रश्नाला भलत्या ग्रूप वर उत्तर देते :)

सचिन काळे's picture

19 Apr 2017 - 8:06 am | सचिन काळे

झकास लेख!!! हा! हा!! हा!!!

पैसा's picture

19 Apr 2017 - 8:53 am | पैसा

=)) व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज फॉर्वर्ड करावे असं काय कंपल्शन असतं हेच मला कळत नाही. तत्काळ संपर्क साधण्याच्या कामापुरते उपयोगी आहे तेवढेच वापरावे. त्याहून जास्त वेळ त्यावर खर्च करणे परवडणारे नाही. व्हॉट्स अ‍ॅपवरून पेटलेली भांडणे यावर मी आता पी हेच्डी करू शकेन इतकी भांडणे अनेक ग्रुप्सवर पाहिली आहेत. आता Kids use whats app, grown ups use facebook and legends use Mipa वगैरे घोषणा तयार कराव्यात म्हणते! =))

हकु's picture

19 Apr 2017 - 10:05 am | हकु

नवीन घोषणा मस्तच आहे!

अभ्या,,ही घोषणा मस्तय रे टी शर्ट साठी...

सतिश गावडे's picture

19 Apr 2017 - 2:18 pm | सतिश गावडे

व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज फॉर्वर्ड करावे असं काय कंपल्शन असतं हेच मला कळत नाही.

जे जे आपणासी ठावे... किंवा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते...

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2017 - 4:22 pm | चौथा कोनाडा

एक नंबर टॅग !

होऊन जाऊ द्या टी शर्ट !

अशी चूक पुरुषाऐवजी एखाद्या तरुणीकडून झाली तर ? ;-)

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Apr 2017 - 10:24 am | माम्लेदारचा पन्खा

इतरांची विचाराची पध्दत चुकते !!

५०० प्रतिसाद गाठायचा चंगच बांधला आहे जणू... ;)

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Apr 2017 - 10:52 am | माम्लेदारचा पन्खा

असो...करा करा...तुमच्यासाठी धागे टाकायचं कँसल !!

मोदक's picture

19 Apr 2017 - 2:10 pm | मोदक

पत्ता द्या...

तरुणी चुकतात का कधी? काहीही हं!! =))

मराठी_माणूस's picture

19 Apr 2017 - 10:31 am | मराठी_माणूस

क्र.९- : व्हाटस्याप अनइन्स्टॉल करावे.

एकदा ऑफिस च्या ग्रुप वर असाच एकाने नको तो फोटो फॉरवर्ड केला.

तसं कोणाचं पटकन लक्ष गेलं नाही .. कारण इतर हि बराच दंगा चालू होता.. हे इथंच थांबलं हि असतं .. पण हा दादा राजा हरिश्चंद्र निघाला..

अर्ध्या तास गायब होऊन एकदम " sorry guys .. for my previous post" इत्यादी मेसेज टाकले.. आत्तापर्यंत दुर्लक्षित झालेला मेसेज सगळ्यांनी वर स्क्रोल करून बघितला =]]

वकील साहेब's picture

19 Apr 2017 - 3:02 pm | वकील साहेब

एकदा खास अशाच मेसेजेस चे अदान प्रदान करण्या साठी चोखंदळ मुलांनी एक ग्रुप बनवला होता. पण प्रश्न असा पडला होता की ग्रुप चा डी पी काय ठेवायचा? डी पी असला असला पाहिजे की ग्रुप च्या उद्देश अन ध्येय धोरणांना शोभला ही पाहिजे अन कुणी अचानक बघितला तर त्याला शंका ही आली नाही पाहिजे.
यावर एकाने सुचवलं होत आसराम बापू चा फोटो ठेवा. कारण काय तर म्हणे म्हंटलं तर धार्मिकते च रोल मॉडेल नाही तर चावट पनाच रोल मॉडेल

अस्वस्थामा's picture

19 Apr 2017 - 3:26 pm | अस्वस्थामा

आमच्या एका कॉलेजच्या ग्रुपमध्ये पोरी विचारत होत्या इथे नॉन वेज मेसेजेस चालतील का ? आणि सगळ्या 'सभ्य' पुरुषांनी अगदी लगेच विरोध केला त्याला.
आता बोला.. ;))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 1:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या हापिसच्या संमिश्र गृपावर एका मुलीनी २-३ वेळा सामिष विनोद (सामिषमधे पण वरचा दर्जा आणि खालचा दर्जा असे प्रकार असतात. त्यापैकी खालच्या दर्जाचे) पाठवले. एकाने तिला क्या बात है मॅडम ऑफिस मे तो बडी शांत शांत रहेती हो म्हणुन विचारलं तर गृपमधल्या सगळ्या ऑफिसहिता जेंडर इक्वालिटी वगैरेंवर उतरल्या. पार भुस्काट पाडलं त्या प्रश्णं विचारणार्‍याचं. बिचारा गृप सोडुन गेला.

हापिसातल्या अनाहिता. अजुन काय.

यात जेंडर इक्विलिटी कुठून आली..??

कपिलमुनी's picture

20 Apr 2017 - 2:29 pm | कपिलमुनी

कुठलाही विषय कुठेही नेणे हेच त्या समूहाचे वैशिष्ट्य आहे =))

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2017 - 4:13 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 6:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे वहिचं बोल रेला है ना मोदक मामु.

पहिलं म्हणजे तो गृप मित्रमैत्रिणींचा नसुन कलिग्जचा आहे. कैक लोकं एकमेकांना पर्सनली ओळखतही नाहीत. आणि ऑफिसचा गृप असल्याने किमान प्रोफेशनलिझम बाळगणं गरजेचं नव्हे काय? कारण तो एकमेवं गृप असा आहे तिथे आजपर्यंत असा प्रसंग फक्तं तिसर्‍यांदा आलेला आहे. आधी दोघांची थेट मॅनेजरने कानउघडणी केलेली आहे. आता ही मुलगी आहे म्हणुन मॅनेजर गप्पं बसलेले. त्यांनी खाजगीत ते बोलुनही दाखवलं. बादवे ज्याने प्रश्णं विचारलेला त्याने गंमतीमधे प्रश्णं विचारलेला. बाकी तिकडे महिलामंडळाने जी संयुक्तं आघाडी उघडली ते पाहुन मिपावर आलो का काय असं वाटलं. म्हणजे करणारी सवरणारी राहिली बाजुला आणि ज्याने गंमतीमधे प्रश्ण विचारला तो फुकटात शाब्दिक फटके खाउन गेला. असो. धाग्यावर दंगा नको. मापं फटके देतील.

मी-सौरभ's picture

21 Apr 2017 - 3:23 pm | मी-सौरभ

मा पं ना फक्त ५०० प्रतिसाद हवेत. ते झाले की बास ;)

शब्दबम्बाळ's picture

20 Apr 2017 - 2:37 pm | शब्दबम्बाळ

असे जोक पाठवणाऱ्यानी ऑफिस मध्ये काही खास वर्तन करणे अपेक्षित असते का?
मुलाने असा जोक पाठवला तर तो ऑफिसमध्ये असे काय वेगळे वागत असतो?
आणि मुळात "क्या बात है मॅडम ऑफिस मे तो बडी शांत शांत रहेती हो" असा प्रश्न कोणाला तरी विचारण्याचा काय संबंध?
तिच्या कडून काय अपेक्षा आहेत अशा?

मुली ग्रुपमध्ये नॉनव्हेज जोक पाठवतात, आता त्यात विशेष नावीन्य राहिलेलं नाही. पण एखादी मुलगी "तसले" जोक पाठवते म्हणजे तिने काही खास वर्तन केले पाहिजे किंवा अजून तिच्याबद्दल काही अंदाज बांधणे अत्यंत चुकीचे आहे!
(एखाद्या ग्रुपवर "तसले" मेसेज चालत नसतील आणि पाठवले गेल्यास काय कारवाई करायची हे ठरलेले असल्यास प्रश्न येत नाही, पण पहिल्यांदाच कोणीतरी मुलगा/मुलगी असे मेसेज पाठवतो तेव्हा त्रेधा तिरपीट होते!)

आणि अशावेळी ऑफिसमधल्या फक्त बायकांनीच तिची बाजू घेतली असेल तर पुरुषांना विचार करायला अजूनही वाव आहे...

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2017 - 4:12 pm | टवाळ कार्टा

+११११११११११११११११११११११११११११११११

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 6:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऑफिसचा गृप ह्या दोन शब्दात सगळं आलं की नाही? तिथे प्रोफेशनल असणं अपेक्षित आहे. त्याचा प्रश्णं जरी चुकीचा वाटत असला तरी त्या मुलीनेही प्रोफेशनल गृपात असं काही टाकायला नको होतं. खासगी गृपात काय पाहिजे तो धिंगाणा केला तरी काही हरकत नाही.

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2017 - 7:21 pm | बोका-ए-आझम

सध्या फेमिनाझींचा सुकाळ आहे. त्या समस्त पुरुषजातीलाच ज्यू समजत असल्यामुळे असले प्रसंग उदंड आहेत. षे

फेमिनाझी हा शब्द प्रचंड आवडला गेला आहे !!!!

पैसा's picture

20 Apr 2017 - 9:57 pm | पैसा

=)) तुला माहीत नव्हता?

कवितानागेश's picture

21 Apr 2017 - 4:33 pm | कवितानागेश

मुळात "क्या बात है मॅडम ऑफिस मे तो बडी शांत शांत रहेती हो" असा प्रश्न कोणाला तरी विचारण्याचा काय संबंध?--------
मला वाटते कि त्याला असे विचारायचे होते कि तू तर इथे ग्रुपवर पुरशांसारखीच वागतेयस ! मग ऑफिस मध्ये बायकांसारखी कशी काय वागतेस?!!

तुम्ही म्हणजे अगदी अस्से आहात कॅप्टन ! ऑफिसमध्ये पण अनाहिता !!! थक्क झाले बाई ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळ्या अनाहिता नै ओ. फक्तं कंपुबाजी करणार्‍या अनाहितांबद्दल आक्षेप आहे. किंबहुना आक्षेप अनाहिता असण्याबद्दल नसुन चुकीच्या बाजुने एकत्र टोळधाडी हल्ला करणार्‍या समस्तं मानवजमातीवर आहे. अनाहितांचा उल्लेख फक्तं आणि फक्तं ३०० व्हावेत म्हणुन आहे. ;)!!!

मितान's picture

20 Apr 2017 - 9:54 pm | मितान

मग मज्जा येणार ! बसले फांदीवर येऊन :))

पैसा's picture

20 Apr 2017 - 10:27 pm | पैसा

जरा मला पण जागा ठेव!

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2017 - 11:05 am | टवाळ कार्टा

तिथेपण मानाचे पण असते म्हणे

पैसा's picture

21 Apr 2017 - 11:19 am | पैसा

तू आपला माणूस आहेस. खास जागा देऊ.

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2017 - 11:50 am | टवाळ कार्टा

कशाला गैरसमज पसरवत आहात =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2017 - 11:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळं झाड तुमचचं आहे. तुम्ही दुसर्‍यांना जागा द्यायची. =))

दशानन's picture

21 Apr 2017 - 1:11 pm | दशानन

यह सब क्या हो रहा है भाई! - जाने भी दो यारो!

मी-सौरभ's picture

21 Apr 2017 - 3:25 pm | मी-सौरभ

असं कसं

असं कसं

असं कसं

५०० पाहीजेत

समाधान राऊत's picture

21 Apr 2017 - 4:09 pm | समाधान राऊत

स्वााार्री हा मेसेजसुद्धा इथे चुकुन आला सॅारी बरका आयाम एक्स ट्रीमली स्वारी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2017 - 11:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

छ्या अजुन शंभरी नै भरली. पुर्वीचं मिपा आणि 'हाणाहिथा'चं राहिल्या नैत राव.

पिशी अबोली's picture

22 Apr 2017 - 12:44 pm | पिशी अबोली

दोन मिपा-आधुनिकोत्तर स्लोगन्स म्हणून टाका बरं ही दोन्ही वाक्यं आमच्या अभ्यादादाच्या धाग्यात..

पुरुषांची कुचंबणा/फजिती होते म्हणजे नक्की काय होत असेल? धरलं तर चावतं सोडलं तरी चावतं?