मिपाकर मंडळींना निमंत्रण

इन कम's picture
इन कम in मिपा कलादालन
17 Apr 2017 - 9:06 pm

माझे, इचिंग या प्रकारातील कलाकृतीचे प्रदर्शन मंगळवार दि.१८ एप्रिल ते सोमवार २४ एप्रिल २०१७ पर्यंत काळा घोडा,मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचे उदघाटन, मा.पद्मश्री. कुमार केतकर (वरिष्ठ पत्रकार )ह्यांच्या हस्ते, मंगळवार १८ एप्रिल २०१७ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता होणार आहे.
इच्छुकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत

प्रतिक्रिया

अरे वा! मुंबईला येणं शक्य नाही, पण तुमच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला शुभेच्छा. इथे काही नमुने दिले असते तर अजून उत्सुकता वाढली असती.

खेडूत's picture

18 Apr 2017 - 10:13 am | खेडूत

+१
शुभेच्छा!!

अभ्या..'s picture

18 Apr 2017 - 1:23 pm | अभ्या..

+१०१
खूप खूप शुभेच्छा.
कलाकॄतींचे फोटो अवश्य टाका. आवडेल पाहायला.

रुपी's picture

17 Apr 2017 - 10:55 pm | रुपी

अरे वा! अभिनंदन.
प्रदर्शन झाल्यावर कलाकृतींचे फोटो इथेही टाका.

चित्रगुप्त's picture

18 Apr 2017 - 8:38 am | चित्रगुप्त

प्रदर्शनासाठी हार्दिक शुभेच्छा. सवडीप्रमाणे तुमच्या चित्रांचे नमुने आणि इचिंग विषयी माहिती, तुम्ही या कलाप्रकाराकडे कसे आकर्षित झालात, साधना कशी, कुठे केली/करता वगैरे सर्व काही लिहावे ही विनंती.

या निमित्याने चित्रकलेविषयी माझ्या काही लेखांचे दुवे:

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
http://www.misalpav.com/node/18587

चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी ...
http://www.misalpav.com/node/31110

चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद
http://www.misalpav.com/node/26407

'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल
http://www.misalpav.com/node/26519

खटपट्या's picture

18 Apr 2017 - 9:36 am | खटपट्या

वेळात वेळ काढून प्रदर्शन बघीतल्या जाइल. धन्यवाद...

पैसा's picture

18 Apr 2017 - 10:02 am | पैसा

अभिनंदन आणि प्रदर्शनाला हार्दिक शुभेच्छा! या कलाप्रकाराबद्दल नंतर सवडीने जरूर लिहा.

यशोधरा's picture

18 Apr 2017 - 1:30 pm | यशोधरा

प्रदर्शन यशस्वी व्हावे ह्यासाठी शुभेच्छा!

भिंगरी's picture

21 Apr 2017 - 6:00 pm | भिंगरी

उद्घाटनाच्या निमित्ताने पद्मश्री कुमार केतकर आणि डॉली ठाकोर यांना भेटण्याची संधी मिळाली.

राघवेंद्र's picture

21 Apr 2017 - 6:08 pm | राघवेंद्र

पद्मश्री असे लिहायचे नसते. राष्ट्रीय पारितोषिके नावासमोर लिहिता येत नाहीत. link

भिंगरी's picture

21 Apr 2017 - 6:12 pm | भिंगरी

ओह! हे मला माहित नव्हतं.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

सप्तरंगी's picture

21 Apr 2017 - 6:36 pm | सप्तरंगी

खूप खूप शुभेच्छा. फोटो पाहायला आवडतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2017 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! अभिनंदन आणि प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

प्रदर्शन झाल्यावर मिपावर त्याचा सचित्र वृत्तांत जरूर टाका.

कंजूस's picture

22 Apr 2017 - 8:46 pm | कंजूस

कालाघोडा,जहांगिर आर्ट गॅलरीतले इन-कम यांचे प्रदर्शन पाहिले आज दुपारी. पोर्टफोलियो दिलाय. तिथे फोटोला बंदी आहे. सात वर्षांनी प्रदर्शनाचा नंबर लागला. चाळीसेक चित्रे आहेत.स्टुडिओ ठाण्यात.
एचिंगची माहिती कळली. मेटलप्लेटवर नेगटिव करून नंतर त्याच्या प्रिंट्स काढतात. पंधरा दिवसाला एक चित्र बनते.
फोटो १)

फोटो २)

वरुण मोहिते's picture

22 Apr 2017 - 9:01 pm | वरुण मोहिते

प्रचंड चिकाटीचे काम आहे . छान होतं प्रदर्शन

इन कम's picture

4 Jun 2017 - 8:45 pm | इन कम

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! शुभेच्छांसाठी आणि प्रतिसादासाठी आणि वेळात वेळ काढून प्रदर्शनास भेट दिल्याबद्दल ...
(उशिर झाल्याबद्दल क्षमस्व ! ) माझ्या कला प्रवासाबद्दल नक्की सवडीने लिखाण करेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2017 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

शुभेच्छा !

थोडा वेळ काढून इथे तुमच्या कलेची चित्रे थोड्या मजकूरासह टाकले तर तुमच्या कलेसंबंधी व व्यासंगासंबंधी मिपाकराना माहिती होईल.

सूड's picture

5 Jun 2017 - 6:54 pm | सूड

+१