स्टफ्ड बन (व्हेज आणि नॉन व्हेज)

केडी's picture
केडी in पाककृती
8 Apr 2017 - 11:28 am

STFDBN1

साहित्य
बन साठी
३ १/२ कप मैदा
१ मोठा चमचा यीस्ट
१/२ कप तेल (ऑलिव्ह असल्यास उत्तम)
२ मोठे चमचे कोमट पाणी
१/२ कप दूध
२ चमचे साखर
१ अंडं, फेटून
मीठ, चवीनुसार
पांढरे तीळ
एग वॉश (१ अंड्याचे पांढरे, २ चमचे पाणी घालून फेटून)

नॉन व्हेज सारणासाठी
१ १/२ कप उकडलेल्या चिकन चे बारीक तुकडे (boneless cooked shredded chicken)
२ कांदे, बारीक चिरून
१ मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ चिमूट चाट मसाला
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर

व्हेज सारणासाठी
१ १/२ कप पनीर चे छोटे तुकडे
बाकी सगळे नॉन व्हेज सारणा सारखे

कृती
आधी बन ची तयारी करून घ्या. कोमट पाण्यात यीस्ट, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मैदा घालून ते नीट मिसळून घ्या. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. दुधाला एक उकळी काढून ते हातांना कोमट लागे इतपत गार करून घ्या. ह्यात उरलेली साखर, तेल आणि मीठ (साधारण एक ते दिड चमचा) घालून, साखर विरघळे पर्येंत ढवळून घ्या. आता ह्या मध्ये १ कप मैदा घालून पातळसर पेस्ट बनवून घ्या. अंडे फेटून, ते आणि यीस्ट, ह्या पेस्ट मध्ये घाला. उरलेला मैदा घालून मऊ गोळा मळून घ्या. हा गोळा ओल्या फडक्याने झाकून साधारण दोन ते अडीच तास बाजूला ठेवा. तो पर्येंत सारणाची तयारी करून घ्या.

हा गोळा फुगून साधारण दुप्पट झाला कि हलक्या हातांनी दाबून त्याचे साधारण १२ गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा हाताने दाबून त्यात एक ते दिड चमचा सारण भरून घ्या. गोळ्याला बन सारखा आकार देऊन, वरून तीळ पेरून, सगळे बन अजून ३० मिनिटे ओल्या फडक्या खाली ठेवून द्या.

Step1

ओव्हन १८० ला प्री-हिट करून घ्या. हे सगळे बन साधारण १० ते १५ मिनिटे भाजून घ्या. वरून हलका रंग आला कि बाहेर काढून ब्रश ने एग-वॉश लावून पुन्हा ओव्हन मध्ये ठेवून अजून १० ते १२ मिनिटे खरपूस भाजून घ्या.

सारणाची कृती
तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट परतून, त्यात कांदा घालून तो परतून घ्या. गॅस बारीक करून ह्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून, मग ह्यात चिकन (किंवा पनीर चे तुकडे) घालून ते परतून घ्या. शेवटी गॅस बंद करून, वरून चाट मसाला आणि कोथिंबीर घालून, हे सारण गार करत ठेवा.

[सारणासाठी अजून काही कल्पना]

  1. बरेच लोक असे स्टुफ्ड बटाटे वडे करतात, आत मध्ये बटाटा वाड्याचे सारण भरून करू शकता
  2. अंडा भुर्जी, किंवा बॉईल्ड एग भुर्जी
  3. चिकन किंवा मटणाचा खिमा
  4. चीज चिल्ली टोस्ट सारखे चीज, हिरवी मिरची, कोथिंबीर
  5. गोड हवे असल्यास फ्रेश स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी जॅम किंवा सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे तर मँगो जॅम आणि आंब्याचे काप वैगेरे

STFDBN2

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Apr 2017 - 11:59 am | पैसा

अहाहा! खूप छान!

आनंदी गोपाळ's picture

8 Apr 2017 - 1:04 pm | आनंदी गोपाळ

३ १/२ कप मैदा

↑ १ कप किती मिलीचा? अमेरिकन २५० मिलि वाला कप का?

बेकिंग करताना वापरतात तो मोजायचा कप, एक कप म्हणजे साधारण 330 ग्राम.

किसन शिंदे's picture

8 Apr 2017 - 1:07 pm | किसन शिंदे

मस्त. शेवटचा फोटो पाहून पाणी सुटले तोंडाला.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2017 - 1:30 pm | अत्रुप्त आत्मा

रसना खवळवून आत् म्यास अत्रुप्त करणारा लेख! ;)

सविता००१'s picture

8 Apr 2017 - 3:29 pm | सविता००१

सुरेख

एस's picture

8 Apr 2017 - 4:42 pm | एस

चविष्ट!

वरुण मोहिते's picture

8 Apr 2017 - 4:56 pm | वरुण मोहिते
दिपस्वराज's picture

8 Apr 2017 - 7:34 pm | दिपस्वराज

चविष्ट ......स्वादिष्ट ! शेवटचा फोटो तर कातिल .

उन्हाळा सुरु होताच करून पाहीन. पाकृ व फोटू आवडले.

नूतन सावंत's picture

9 Apr 2017 - 11:21 pm | नूतन सावंत

मस्त,मस्त.नॉनव्हेज बन्स पावसाळ्यात मस्त वाटतील,थोडं थांबायला हवं

अगदी... गरम वाफाळलेल्या कॉफी सोबत नुकताच ओव्हन मधून काढलेला हा बन, एक सुंदर कॉम्बिनेशन होईल...

उदय के'सागर's picture

10 Apr 2017 - 6:17 pm | उदय के'सागर

क्या बात, मस्तच! ते तीळ अजिबात काळे झाले नाहीत हे विशेष.