आय पी एल - दशकपूर्ती

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in काथ्याकूट
6 Apr 2017 - 1:47 am
गाभा: 

नमस्कार,

सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =))

अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल. तो इतिहास सर्वश्रृत आहेच त्यामुळे त्याचा वेगळा असा उल्लेख करत नाहीच, तरी त्या सर्व घडामोडींचा या स्पर्धेवर अगदी तसूभरही परिणाम झाला नाही हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

अगदी न चुकता असं म्हणता येणार नाही पण, अजूनही क्रिकेट हा खेळ मनापासून आवडणारा प्रेक्षक, ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर एखादा तरी सामना पाहतोच. सुरूवातीला थोडीशी निरस वाटणारी ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिकच रंगत जाते आणि प्रेक्षकही बहुदा सुरूवातीच्या काही सामन्यानंतरच या स्पर्धेमध्ये रुची दाखवतात असं दिसून येतं.

यावेळेला थोडी गडबड झाली खरी. ;) क्रिकेटवर अगदी विस्तृत धागे काढणारे आमचे प्रिय गुरूजी सध्या दुस-या एका धाग्यावर 'व्यस्त' असल्या कारणाने आज या ठिकाणी ही जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही स्वतःच घेतलेला आहे. =)) याबद्दल गुरूजी 'उस्मानाबाद' चर्चेतून वेळात वेळ काढून आमचा हा गुन्हा माफ करतील आणि आज या ठिकाणी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करतो.

विषयांचे वैविध्य जपणा-या मिपा बोर्डाला, ईपीएलशी(तीच ती, फूटबाॅलची इंग्लिश प्रिमियर लिग हो!=)) ) नावसाधर्म्य असणा-या आयपीएल नामक स्पर्धेचे वावडे नसावे अशी आशा व्यक्त करतो आणि हा धागा आयपीएलमधल्या घडामोडींवर, त्यातल्या क्रिकेटच्या सामन्यांवर चर्चा करण्यासाठी मायबाप मिपाकरांकडे सुपूर्द करतो.

#पहिला सामना#
सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राॅयल चॅलेन्जर्स बँगलोर

या मोसमातल्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने कोहली, डिव्हिलियर, के.एल. राहुलविना खेळणा-या राॅयल चॅलेन्जर्स बेंगलोर संघावर ३५ धावांनी विजय मिळवला. २०८ धावांचा पाठलाग करताना राॅचॅ बेंगलोर संघाचा तुक्का म्हणवाल्या जाणा-या श्रीयुत गेल नामक राक्षसासही आपला करिश्मा दाखवता आला नाही. 'डेथ ओव्हर'मधला आमचा आवडता बाॅलर नेहरा ;), भु.कुमार आणि राशिद खाने नामे अफगाणिस्तानचा कुणी एक बाॅलर यांनी प्रत्येकी दोन बळी टिपून सनरायझर्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी आमच्या आवडत्या युवीने २७ चेंडूत ६२ धावांची धडाकेबाज खेळी करत सनरायझर्सना २०७ धावांचा टप्पा गाठून दिला.

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2017 - 6:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरेच्चा.....आता सुर्यवंशम कुठे बघायचा किसनजी शिंदेजी? =))

चिनार's picture

6 Apr 2017 - 9:37 am | चिनार

हो ना...आयपीएल ला नाकं मुरडण्याचं हे आणखी एक कारण..

बाकी कारणं खाली नमूद केली आहेत
http://www.misalpav.com/node/30941

लोनली प्लॅनेट's picture

6 Apr 2017 - 9:51 am | लोनली प्लॅनेट

स्थानिक खेळाडूंना खेळण्याची आणि उत्पन्न मिळवण्याची संधी- आयपीएल चा हा एकमेव फायदा आहे.
एक सच्चा क्रिकेट प्रेमी म्हणून मला या तमाशाची अत्यंत चीड येते हि स्पर्धा म्हणजे क्रिकेट चा अपमान आहे असे मी मानतो. "तू बॉल टाक मी हाणतो सिक्स" असे याचे स्वरूप आहे. पुन्हा त्यात ते बॉलिवूड चे नौटंकी वाले,
मी फक्त पहिला सीझन पहिला होता त्यानंतर पुन्हा डुंकुनही पहिले नाही. कुठे कसोटी क्रिकेट आणि कुठे हा धिंगाणा.

हे सच्चे क्रिकेट काय असते भाऊ? कसे दिसते आणि कसे खेळले जाते?

चिनार's picture

6 Apr 2017 - 3:49 pm | चिनार

सच्चे क्रिकेट जाऊद्या तुम्हाला फक्त 'सच्चे' कुठेजरी आढळलं तर कळवा विशुमित भाऊ

पैसा's picture

6 Apr 2017 - 10:26 am | पैसा

झाली का जत्रा सुरू!

आधीच दिवे कामाच्या नावाने, आता हे भोकशेपना सुरु.
कमावनारे कमावतेत, बाकी बघत बसतेत.

कपिलमुनी's picture

6 Apr 2017 - 1:51 pm | कपिलमुनी

एसपीएल ( सोलापूर प्रीमियम लीग) नसते का भौ तुमचेकडे ?
( प्लास्टीक बॉल टूर्नामेंट ?)

अभ्या..'s picture

6 Apr 2017 - 2:32 pm | अभ्या..

अर्र लै,

एमार लोकाची पण झालि परवा. पत्रकार, इंजिनिअर, डोक्टर कोण पण लीग भरवायलेत.

मला बरय, जेव्ढ्या टिमा जास्त तेवढी टिशर्ट आणि युनिफॉर्म ऑर्डर मलाच. ;)

आम्च्या सोलापुरात चिंधी बॉल स्पर्धा असतेत बे, खाली सिमेटाचं मौसुत गिलावा केलेलं पिच असतंय आणि चिंधी बॉल,

स्पेशल टुन्रामेंट जिपिएस समोरचं ग्राउंड

पार ५ लाखापर्यंतचे ट्रॉप्या असतेत आणि तुम्ही काय ते प्लॅस्टिक बॉल घेउन बसलाय,

चिंधी बॉल थोडा वल्ला करुन हानला ना बक्कदिशी पाठीत दोन चार मणके हालतेत बे

सस्ते मे मस्ती, हल्ली बहुधा ३०रु ला ड्झन असावेत.

प्रसाद गोडबोले's picture

6 Apr 2017 - 3:16 pm | प्रसाद गोडबोले

काय किसनराव , जिलब्या टाकत बसलाय ?
जरा कामं करा,, उन्हाळा आहे तोवर कुरवड्या टाकुन घ्या =))))

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 3:18 pm | श्रीगुरुजी

कसोटी सामने हेच खरे क्रिकेट. कसोटी सामन्यांचा थरार इतर प्रकारात नाही. अर्थात मला ५० षटकांचे एकदिवसीय सामनेही आवडतात. परंतु ट-२० हा प्रकार फारसा आवडत नाही. आयपीएल मधील माझा रस हा फॅन्टसी लीग खेळण्यापुरताच मर्यादीत आहे. क्रिकइन्फोची फँटसी लीग आणि आयपीएलची फँटसी लीग या दोन्ही लीगमध्ये माझा सहभाग आहे. आयपीएलचे सामने अधूनमधून थोडा वेळ बघतो. परंतु त्यात फार रस नाही. हा प्रकार बंद झाला तर बरे होईल.

किसन शिंदे's picture

6 Apr 2017 - 3:22 pm | किसन शिंदे

हा प्रकार बंद झाला तर बर्‍याच लोकांचा वर्षातला एकमेव कमाईचा स्त्रोत काढून टाकल्यासारखा होईल.

चार लोकं पैसे कमावतात हे मान्य..पण चाळीस लोकं सट्टा लावून श्रीमंत होतात किंवा कंगालही होतात. आयपीएल हे सट्टेबाजांसाठी केलेली एक व्यवस्था आहे ज्यात देशातले बडे बडे धेंड सामील आहेत.
अर्थात ज्या देशात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरही सट्टा लागतो तिथे हे काय चुकीचं वाटणार नाही.

ज्याला जे पटते त्याने ते करावं..काय चुकीचं काय बरोबर हे ठरवण्याची आमची योग्यता नाही असे म्हणून जागेवर बसतो.

या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी न होता पैसे मिळ्वायचं काही मार्ग माहित असल्यास मार्गदर्शन करावे.

गामा पैलवान's picture

6 Apr 2017 - 6:40 pm | गामा पैलवान

किसन शिंदे,

तुम्ही आयप्येलला चक्कं क्रिकेट म्हणता? कुफेहेपा?

आ.न.,
-गा.पै.

माझीही शॅम्पेन's picture

11 Apr 2017 - 8:36 pm | माझीही शॅम्पेन

तुम्ही आयप्येलला चक्कं क्रिकेट म्हणता? कुफेहेपा?

+ १२३

जेवढे जास्त लोक त्याला नाकं मुरडतील तितकं ते जास्त फोफावत जाणारं आहे. कसोटी क्रिकेट हे अभिजात ख्याल, वन डे क्रिकेट हे सुगम संगीत तर टी ट्वेंटी हा झणझणीत तमाशा आहे आणि रसिकांना तिन्ही आवडू शकतात. विनोद सोडा पण आयपीएल यशस्वी झाल्यामुळे इतर खेळांच्या (ज्यात कबड्डीसारख्या अस्सल भारतीय खेळाचाही समावेश आहे) लीग स्पर्धा भरु लागल्या आणि लाखो लोकांपर्यंत पोचल्या. त्यातली सट्टेबाजी आणि स्पाॅट फिक्सिंग इत्यादी गैरप्रकारांवर मात्र कडक नियंत्रण असलं पाहिजे. एकेकाळी वनडे क्रिकेटबद्दलही लोकांच्या अशा टोकाच्या भावना होत्या पण हळूहळू त्याची लोकांना सवय झाली. टी२० ची पहिलीच विश्वचषक स्पर्धा आपण आणि तीही पाकिस्तानला हरवून जिंकल्यामुळे आपल्याकडे हे चालणार हे तर उघड आहे. शिवाय एप्रिल - मेचा सुट्ट्यांचा माहोल असल्यामुळे त्याचा आवाज जास्त आहे.

विशुमित's picture

10 Apr 2017 - 2:56 pm | विशुमित

अभिजात ख्याल, सुगम संगीत आणि तमाशा अशी उतरंड का बरं केली असावी ?