नमस्कार,
येथे केलेल्या घोषणेनुसार मिपावर येणार्या नवनवीन सदस्यांना लिहायला सुरुवातीच्या काळात खूप अडचणी येतात, त्यांना लेखन करण्याच्या प्रयत्नात काही अडचण आल्यास ती सोडविण्याकरिता 'साहित्य संपादक' नावाची नवीन रचना मिसळपाव व्यवस्थापनाने सुरू केली. सदस्यांना मदत करण्याव्यतिरिक्त गेल्या दोन वर्षात साहित्य संपादकांनी पुढाकार घेऊन सुनियोजित पद्धतीने मिपा पुस्तके, विविध लेखमालिका आणि विशेषांक यांच्या प्रकाशनात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेल्या दोन वर्षात मिपावरील सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग राहिला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. मिपावरील लिखाणाच्या व्यवस्थापनात अधिकाधिक सदस्यांचा सहभाग असावा, या धोरणानुसार आता यातील काही साहित्य संपादक थांबत आहेत आणि त्यांच्या जागी नवे साहित्य संपादक येत आहेत. मात्र आता थांबत असलेले साहित्य संपादक यापुढेही मिपाच्या वाटचालीत तेवढ्याच उत्साहाने सहभागी असतील, अशी आशा बाळगतो.
सध्या थांबत असलेले साहित्य संपादक
अजया
स्नेहांकिता
किसन शिंदे
श्रीरंग जोशी
मधुरा देशपांडे
स्रुजा
मिसळलेला काव्यप्रेमी
सतिश गावडे
अन्या दातार
विशाखा पाटील
यापुढेही कुठल्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही कार्यरत असलेल्या साहित्य संपादकांकडे मदत मागू शकता. तसेच एकदा प्रकाशित झालेल्या लेखनात काही बदल करायचे असतील किंवा फोटो, व्हिडिओ जोडण्याबाबत काही अडचण असेल, तरी हे साहित्य संपादक मदत करतील. मिसळपावच्या साहित्याची रचना, नवीन प्रकार आदिबाबत साहित्य संपादकांना वेगवेगळे अधिकार आहेत. वेळोवेळी निघणारे मिसळपाव विशेषांक किंवा साहित्याचे व्यवस्थापन आदी कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असेल.
तुम्ही लिहिते व्हावे आणि तुमचा लिहिण्याचा अनुभव सुखद व्हावा, यासाठी आपल्यातीलच काही लोक स्वतःहून तुम्हाला मदत करताहेत हे आनंददायक आहे. त्यांच्या मदतीचा लाभ घ्यावा.
नवीन साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि आधीच्या साहित्य संपादक टीमप्रमाणेच उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा!
पुढे त्यांची नावे देत आहे.
आदूबाळ
वेल्लाभट
कॅप्टन जॅक स्पॅरो
एस
अभ्या..
जव्हेरगंज
पैलवान
मंदार भालेराव
पद्मावति
नीलमोहर
प्रतिक्रिया
3 Apr 2017 - 3:36 pm | पुंबा
थांबलेल्या संपादकांचे आभार आणि नविन लोकांना शुभेच्छा..
3 Apr 2017 - 4:09 pm | मोदक
+१११
आभार आणि शुभेच्छा..!
3 Apr 2017 - 4:33 pm | राजाभाउ
+११११
असेच म्हणतो.
3 Apr 2017 - 5:46 pm | एमी
+१११११
थांबलेल्याचे आभार आणि नविनना शुभेच्छा!!
3 Apr 2017 - 4:24 pm | रातराणी
+1
जुनी टीम मस्त होती, नवीन पण भारी!
3 Apr 2017 - 3:43 pm | संजय क्षीरसागर
सर्वांचं अभिनंदन ! विशेषतः नवनिर्वाचित अभ्याचं .
3 Apr 2017 - 4:15 pm | पिंगू
नव संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन..
3 Apr 2017 - 4:31 pm | अद्द्या
सर्वांचे अभिनंदन .
( अभ्याच्या नावावर अजून एक पार्टी वाढवण्यात आलेली आहे )
3 Apr 2017 - 4:33 pm | किसन शिंदे
सहित्याचा का होईना, पण एकदाचा संपादक झाल्याबद्दल आमचे मित्र अभ्याशेठ सोलापूरकर याचे जोरदार हभिनंदन !! ;)
3 Apr 2017 - 4:59 pm | प्रसाद गोडबोले
चलो सोलापुर !
3 Apr 2017 - 6:03 pm | संजय क्षीरसागर
सहित्याचा का होईना, पण एकदाचा संपादक झाल्याबद्दल आमचे मित्र अभ्याशेठ सोलापूरकर याचे जोरदार हभिनंदन !!
एकदा मंत्रीपद मिळाल्यावर पुढची बढती यथावकाश होईल.
3 Apr 2017 - 4:46 pm | बरखा
नविन संघाचे अभिनंदन!
3 Apr 2017 - 4:56 pm | सुधांशुनूलकर
सर्व नव्या सासंचं अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा.
पूर्वीच्या सासंमंने नवे उपक्रम यशस्वीरित्या राबवले, दर्जेदार विशेषांक प्रकाशित केले, त्यांचे आभार.
3 Apr 2017 - 5:26 pm | नि३सोलपुरकर
पूर्वीच्या सासंमंचे आभार आणि नवनिर्वाचित सासंमंचे अभिनंदन...( विशेषतः अभ्याचं )
3 Apr 2017 - 5:48 pm | कुंदन
सं मं चे अभिनंदन अन शुभेच्छा !!!
3 Apr 2017 - 5:51 pm | अभ्या..
आहेराचे पा़किट इकडे द्यावे कुंदनशेठ.
पाया पडतो हं ;)
3 Apr 2017 - 5:54 pm | कंजूस
सर्वांचेच आभार. केलेल्या करायच्या कामासाठी.
जेपीचं तिकिट कापलं?
3 Apr 2017 - 6:00 pm | संजय क्षीरसागर
असं श्रेष्ठीचं अवलोकन आहे
3 Apr 2017 - 5:55 pm | यशोधरा
सं मं चे अभिनंदन अन शुभेच्छा!!!
3 Apr 2017 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
थांबलेल्या साहित्य संपादकांचे आभार ! नवागतांचे स्वागत आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा !
3 Apr 2017 - 8:36 pm | प्रचेतस
हेच म्हणतो
3 Apr 2017 - 6:02 pm | खेडूत
अभिनंदन..!
.
.
.
थांबलेल्या मंडळाचे आभार अन नव्या टीमला शुभेच्छा!!
3 Apr 2017 - 6:39 pm | पिलीयन रायडर
आधीच्या टीमचे आभार! आणि नव्या टिमचे स्वागत!
एस भाऊंसारखा नि:पक्षपाती आणि संयमित लिहीणारा व्यक्ति सासं मंडळात सामील झाल्याबद्दल अभिनंदन!
पद्मावति सारखी गोड बै सासं मध्ये आल्याचे पाहुन आनंद झाला. तिला बॅलन्स करायला अभ्या आहेच! (पळा.....!!!)
3 Apr 2017 - 7:12 pm | राघवेंद्र
उत्तर अमिरिकेतील प्रतिनिधित्व कमी झाले असे निरीक्षण नोंदवतो.
..
...
....
पण अभ्या सोलापूरकरव असल्यामुळे काहीच प्रश्न नाही.
3 Apr 2017 - 7:12 pm | राघवेंद्र
उत्तर अमिरिकेतील प्रतिनिधित्व कमी झाले असे निरीक्षण नोंदवतो.
..
...
....
पण अभ्या सोलापूरकर असल्यामुळे काहीच प्रश्न नाही.
3 Apr 2017 - 7:25 pm | चतुरंग
जुन्या सासंचे आभार आणि नवीन सासंचे अभिनंदन!
-चतुरंग
3 Apr 2017 - 7:36 pm | धर्मराजमुटके
जुन्या संघाने केलेल्या सेवेबद्दल आभार आणि नवीन मंडळींना शुभेच्छा ! मिपावृक्ष असाच उत्तरोत्तर बहरत राहो !!
अवांतर : जुन्या संपादकांपैकी कुणी "संपादक असतानाचे दिवस" किंवा तत्सम सदराखाली आपले बरेवाईट संपादकीय अनुभव लिहिले तर वाचायला आवडतील. लिहितांना जरुर तिथे आयडींची नावे टाळून / मिपाचे वातावरण चांगले राहावे म्हणून झाकली मुठ सव्वालाखाची इतपत गुप्तता राखुन केलेले लिखाण नक्कीच वाचनीय होईल असे मला वाटते.
3 Apr 2017 - 8:28 pm | संजय क्षीरसागर
बरेवाईट संपादकीय अनुभव लिहिले तर
साहित्य संपादकांना असे काही अनुभव येत नसावेत !
3 Apr 2017 - 8:33 pm | आदूबाळ
करेक्ट! नो ब्लॅक डॉग आस्कस हो मुटकेभाऊ...
3 Apr 2017 - 7:49 pm | मितान
नवीन टीम ला शुभेच्छा :)
3 Apr 2017 - 8:55 pm | पैसा
आधीच्या साहित्य संपादकांनी गेल्या दोन वर्षात मिपासाठी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यासाठी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. ती एक छान टीम जमलेली होती. They have raised the bar higher for the next team. नवीन साहित्य संपादकांनीही एक टीम म्हणून असेच उत्तम काम करून मिपाला अधिक उंचीवर न्यावे यासाठी हार्दिक शुभेच्छा!
3 Apr 2017 - 9:59 pm | जुइ
आता थाबंत असलेल्या चमूचे आभार!!
3 Apr 2017 - 10:50 pm | आषाढ_दर्द_गाणे
नव्या संपादकांचे स्वागत आणि अभिनंदन!
थांबलेल्यांचे आभार आणि कौतुक!
अजून कोणी एक सामील झाले असते तर नवनिर्वाचित संघाचे नामकरण 'संपादक इलेव्हन' असे करता आले असते असे एक सूक्ष्म निरीक्षण नोंदवून खाली बसतो.
3 Apr 2017 - 11:01 pm | एस
धन्यवाद मंडळी. संपादक आहेत तेच आहेत. साहित्य-संपादकांपैकी काही थांबत आहेत तर काही नवीन सुरुवात करीत आहेत.
या निमित्ताने 'संपादक' आणि 'साहित्य संपादक' या दोहोंमध्ये गल्लत होऊ नये यासाठी साहित्य आणि संपादक हे शब्द 'साहित्य-संपादक' असे जोडून लिहावेत असा प्रघात पाडूयात असे सुचवतो. मिपाच्या अधिकृत घोषणेत आणि मिपावर इतरत्रसुद्धा 'साहित्य-संपादक' असे लिहिले जावे ही विनंतीवजा सूचना. काय म्हणता?
4 Apr 2017 - 12:06 am | आषाढ_दर्द_गाणे
एस,
क्षमा असावी.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
चूभूद्याघ्या.
बाकी जोडदंडयुक्त (हायफनेटेड, मराठी संज्ञा आठवत नाही आहे) 'साहित्य-संपादक' हा शब्दप्रयोग उचित असला तरीही त्याचा 'संपादक' ह्या शब्दाबरोबर गोंधळ होऊ शकतो, विशेषतः नवख्या सदस्यांकडून, असे वाटते.
4 Apr 2017 - 12:51 pm | एस
:-) अहो त्यात क्षमा कसली मागायची? वुइ आर वन मिपा-फॅमिली.
4 Apr 2017 - 3:12 am | विशाखा राऊत
नवीन सासंचे हार्दिक अभिनंदन
4 Apr 2017 - 4:43 am | स्रुजा
साहित्य संपादक म्हणुन जे काही थोडं फार काम केलं ते करताना मजा आली. रुटिन पेक्षा काही तरी नवं, थोडं फार साहित्यिक आवडीला खतपाणी घालणारं काम झालं. आवर्जुन करणं होत नाही निदान माझं तरी. चार उपक्रमांच्या निमित्ताने नवीन लोकांशी ओळखी झाल्या, काही दर्जेदार साहित्य आवर्जुन वाचलं गेलं - एक छान अनुभव पदरी बांधला.
कॅप्टन, आदुबाळ, वेल्ला, स्नेहांकिता ताई, पंत आणि नुलकर काका - तुमच्यामुळे हा अनुभव अधिकच चांगला झाला , धन्यवाद. इट वॉज नाईस वर्किंग वुइथ यु.
नवीन सासं मंडळाला भरपूर शुभेच्छा . नव्या दमाचे, नव्या उत्साहाचे लोकं अजुन काही कल्पक प्रकल्प राबवतील आणि आमची वाचनाची भूक भागवतील अशी खात्री वाटते.
एस भाऊंची सार्थ निवड केल्याबद्दल नीलकांतचंच खरं म्हणजे अभिनंदन करायला हवं !
बाकी नवीन सासं मंडळी पण भारी लोकं आहेत - होऊन जाऊ द्या आता दणक्यात !!4 Apr 2017 - 9:21 am | लाल टोपी
विविध उपक्रम यशस्वीपणे राबऊन मिपाला सतत जागते ठेवणार्या मावळत्या संपादक मंडळाचे मनापासून आभार. तुम्ही केलेल्या परिश्रमांमुळे मिपाचा आनंद द्विगुणीत झाला.
नविन संपादक मंडळाचे स्वागत आणि शुभेच्छा!!
4 Apr 2017 - 10:52 am | शार्दुल_हातोळकर
सर्व नवनिर्वाचित साहित्य संपादकांचे हार्दिक अभिनंदन!!
4 Apr 2017 - 11:32 am | संजय पाटिल
थांबलेल्या टिमचे आभार.. आणि नविन मंडळाला शुभेच्छा...
4 Apr 2017 - 11:56 am | अॅस्ट्रोनाट विनय
जुन्या मंडळाचे आभार..नविन मंडळाला शुभेच्छा...
4 Apr 2017 - 12:42 pm | नीलमोहर
आधीच्या सा सं मंडळाचे अनेक आभार, मालकांनी दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी नवीन सा सं मंडळाला शुभेच्छा...
4 Apr 2017 - 12:43 pm | दीपक११७७
थांबलेल्या संपादकांचे आभार आणि नविन संपादकांना शुभेच्छा..
4 Apr 2017 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्य संपादकपदी उत्तम काम करून थांबलेले सर्वांचे आभार. नव्यांच्या निवडीबड्डल अभिनंदन आणि शुभेच्छा !!
हे कलापुरचे अंबे मा, तुझ्याकडं लेकराचं लै मागनं न्हाय,
अभ्याकड़ून चांगलं काम करून घे. आणि त्याची बुद्धी स्थिर ठेव वो माय. अच्छर पेड़े निव्वद म्हणून दाखवीन.... (भरोसा ठेव)
-दिलीप बिरुटे
4 Apr 2017 - 3:29 pm | किसन शिंदे
हे मागणं जोरदार हाय. =))
4 Apr 2017 - 4:29 pm | अजया
नव्या सासंमंचे स्वागत आणि अभिनंदन!
5 Apr 2017 - 8:48 am | चौकटराजा
वर वाचले 'थांबलेल्या साहिय संपादकांचे आभार !' मला वाटले हे काय प्रकार आहे ? थांबल्याबद्द्ल आभार ? ;)
5 Apr 2017 - 12:18 pm | मित्रहो
जुन्या सासं मंडळाचे आभार आणि नवीन सासं मंडळाला शुभेच्छा !!
5 Apr 2017 - 12:54 pm | गणामास्तर
सर्व नवीन सासंचे अभिनंदन !
आम्हाला आता शीग मटन पार्टी मिळणार म्हणून अभ्याचे खास अभिनंदन. .