दादा विल नॉट बी बॅक अगेन

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
8 Oct 2008 - 12:25 am
गाभा: 

दादा वोंट बी बॅक अगेन

मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ? आपल्या कारकिर्दीत अत्यंत खालच्या आणि अत्यंत वरच्या परिस्थितीतुन गेलेला , जगभर आपल्या 'फुटवर्क' आणि 'शैली' साठी एक फॅन्स क्लब असलेला, मैदानावर आणि मैदाना बाहेरही तेवढाच चर्चेत राइलेला, कधी चॅपेल वाद, कधी लॉर्डस वर शर्ट काढून सर्व भारतियांच्या वतीने 'अभिमानी फ्लिंटॉफ'च्या उद्दामपणाचा बदला घेणारा,कधी टॉस साठी उशीरा मैदानात जाणारा आपला सौरव गांगूली.
सचिन तेंडूलकर पेक्षा करियर मधे कमी यशस्वी असला तरी दादाने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिनची बरोबरी केलीच आहे. फार वाईट वाटलं तो '******' ग्रेग चप्पल आला आणि दादाच्या कारकिर्दीला जणू क्षयच झाला... त्याच्या बरोबर जी दुटप्पीपणाची वर्तणूक केली गेली.. त्यामुळे निश्चीत मनात कुठे तरी चिड येते ...

आता क्रिकेटचा एवढा फिव्हर राहिलेला नाही.. पण जवळजवळ दिडेक वर्षांपुर्वी , व्यावसायिक जिवनाला सुरूवात होण्या आधी इंग्लंड टाइमझोन असो वा ऑस्ट्रेलियन .. मध्यरात्री उठून मॅचेस पाहिल्याचं आठवतं ....भारत-पाकिस्तान डे-नाइट मॅच आहे... भारताला २९३ धावांचं लक्ष आहे .. सेकंड इनिंगला सुरूवात झाली आहे.. अशा वेळी सचिन-सौरव ही दिग्गज जोडी जेंव्हा मैदानात उतरचे तेंव्हा एका उंच डोंगतावरून एका दोरीवरून चाललो आहोत की काय असा रोमांच मिळत असे... किंवा विप्र म्हणतात तसं अँड्रिनलीन ची मात्रा अचानक वाढून श्वास रोखला जात असे... वकार किंवा वसिम अक्रम ज्यावेळी धाव सूरू करे .. तस तसे हृदयाचे ठोके वाढत.. आणि बॉल टाकायच्या नेमके पहिले सौरवच्या डोळ्यासमोर काही तरी येते आणि तो स्टंपच्या बाजूला होउन बॉलरला थांब म्हणे त्यावेळी एक व्यक्त न करता येणारं फिलींग येत असे... मग पुढच्याच चेंडूवर .. अगदी बॅटच्या एक मुंगळा (मुंगळा हे गोट्यांच्या खेळातलं एकक आहे, इत्ताड्,मुंगळा,इं.इ.) बाजुनं किपर कडे बॉल गेला की अगदी जीव भांड्यात पडे .. कधी हाच दादा तेंडल्याला धावबाद करी किंवा स्वतः बाद होइ तेंव्हा त्याचा फार राग येत असे...
पण एकदा ३-४ षटकं झाली .. की दादाला सुर सापडे .. मग स्टिव्ह वॉ म्हणतो त्या प्रमाणे .. सर्व ९ खेळाडू जरी ऑफ साइड ला ठेवले तरी सौरव तिथुन गॅप काढून चौकार वसूल करू शकतो ..
जो दिवस दादाचा असे .. त्या दिवशी प्रतिस्पर्धी बॉलर्सची दाणदाण् ऊडे .. तो जेंव्हा डाउन द विकेट येउन लॉग ऑनला लेग स्पिनरला षटकार खेचायचा तेंव्हा आम्ही जर शेजारून पामेला आंड्रेसन जरी पास झाली तरी दुर्लक्ष करू... सुपर स्क्वेअर कट , स्क्वेअर ड्राइव्ह आणि कव्हर शॉट्स मधे गांगुलीची बरोबरी करणारे कमीच ... नॅटवेस्ट सेरिजची फायनल ज्यात गांगुलीने तुफानी ६० धावांची खेळी केली त्यात एक ऑफ साइडला जो षटकार मारला त्याने 'जेफ बॉयकॉट ला ही बॉयकॉट केले .. हर्षा तर आनंदाने उसळला ... १९९९ च्या विषकरंडकात श्रीलंकेविरूद्ध १८३ धावांची दिवाळी केलेला गांगूली कालांतराने विस्मरणात गेला .. लाजिरवाण्या वागणूकीला बळी पडला ..

आज दादाने निवृत्तीची घोषणा केली .. त्यामुळे आम्ही एक दिवसाचं लंघन करून त्याला त्याने दिलेल्या रोमांचा बद्दल ऋण व्यक्त करणार आहोत. दादा .. वी विल नेव्हर एव्हर फर्गेट यू... चियर्स

------------------------------------------------------------------------एक सौरवचा निस्सिम चाहता----------

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Oct 2008 - 12:57 am | प्राजु

सौरव च्या खेळीचा छान आढावा घेतला आहे.
असो. सौरव आता निवृत्ती घेतो आहे.. हरकत नाही. इट्स गूड फॉर हिम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

8 Oct 2008 - 1:15 am | भाग्यश्री

अरेच्या.. हे माहीतीच नाही मला.. निवृत्ती? :(
असो.. पण जोपर्यंत लोकांच्या मनाचा राजा आहे तोपर्यंत मैदानातून परतावं हे त्याला समजलं हे बरंच म्हणायचं..
वाईट तर वाटतेच आहे..
सौरव गांगुली नेहेमीच माझा आवडता क्रिकेटर होता! (खेळण्यात आणि दिसण्यातही! :) )

छान आढावा घेतलायस.. ते टीशर्ट काढून दाखवणं काही जणांना असभ्य वाटलं होतं, पण इंग्लंडच्या टीमचा माज कसा उतरवायचा हे गांगुलीला ठाऊक होतं! अगदी डिटेल्स नाही आठवत, पण त्याच्या काही सुंदर खेळी,शतकं, बेसिकली ऍटीट्युड अफलातून होता! काहीही म्हणा, बंगालचा वाघ्,राजा वगैरे विशेषणं सुट होतात त्याला..

गिरिजा's picture

8 Oct 2008 - 6:25 pm | गिरिजा

जोपर्यंत लोकांच्या मनाचा राजा आहे तोपर्यंत मैदानातून परतावं हे त्याला समजलं हे बरंच म्हणायचं..

अगदी खरं.. आणि त्यामुळेच वाईट वाटुनही बरं वाटतय..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

मृदुला's picture

8 Oct 2008 - 1:31 am | मृदुला

निवृत्तीच्या वेळेला चांगल्या गोष्टी तेव्हढ्या आठवायच्या. तसाच झाला आहे हा लेख. छान.

मुंगळा हे गोट्यांच्या खेळातलं एकक आहे, इत्ताड्,मुंगळा,इं.इ

या विषयीही सविस्तर लिहावे. दहा, वीस वर्षांनी गोट्या खेळ नामशेष होईल असेच वाटते आहे. तेव्हा मोठे संदर्भमूल्य असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

निवृत्तीच्या वेळेला चांगल्या गोष्टी तेव्हढ्या आठवायच्या. तसाच झाला आहे हा लेख. छान.
+१

या विषयीही सविस्तर लिहावे. दहा, वीस वर्षांनी गोट्या खेळ नामशेष होईल असेच वाटते आहे. तेव्हा मोठे संदर्भमूल्य असेल.
अगदी! :-D
टारू, लिहीच आता तू!

ऍडीजोशी's picture

8 Oct 2008 - 3:25 pm | ऍडीजोशी (not verified)

आमच्या सोसायटीत नाही होणार. अजूनही वेळ मिळाला की आम्ही गोट्या खेळतो मधून मधून. राजा राणी नी ढुस्स हे आमचे फेवरेट प्रकार.

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2008 - 2:26 am | मुक्तसुनीत

...धीरे धीरे ढलता है ढल जायेगा ! खरे ना ?

मिष्टर टारझन ,
गांगुलीबद्दलच्या भावनांशी मी समरस होऊ शकत नाही ; पण आपल्या कोवळ्या वर्षात आपला अतिशय आवडता असा खेळाडू निवृत्त होणे म्हणजे काय हे नेमके ओळखतो. कुणाचा सुनील गावस्कर असतो तर कुणाचा सचिन तर कुणाचा "दादा". त्यातला प्रेमाचा, देहभान हरपून क्रिकेट पहायचा , त्याविषयीच्या गप्पात रात्र रात्र गप्पा ठोकायचा धागा मात्र एकच - जो पिढ्यापिढ्याना जोडतो. खेळाडू येतात , कारकीर्द घडवतात, पडद्याआड जातात, दशकानुदशकानी पिढीच्या पिढीच पौगंडावस्थेतून तारुण्याकडे आणि चाळीशीकडे सरकते ; पण क्रिकेट आणि क्रिकेटर्स वर प्रेमाची (आणि कधीकधी शिव्यांचीही) बरसात करणे सुरूच रहाते..

तुमचे नि आमचे ग्लास वेगळे असतील , पण दारू तीच आहे :-)

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2008 - 2:56 am | मुक्तसुनीत

माझ्या खर्‍या भावना वर व्यक्त केल्याच आहेत ..पण थोडे ह.घे. : भारतीय संघात येण्याकरता सेवानिवृतीची घोषणा करणे ही उत्तम युक्ती आहे , नाही का ?? ;-)

- (टारझनच्या माराला घाबरून दडी मारणारा !)

टारझन's picture

8 Oct 2008 - 3:24 am | टारझन

भारतीय संघात येण्याकरता सेवानिवृतीची घोषणा करणे ही उत्तम युक्ती आहे ,
ह्याला हुशारी म्हणतात ... नाही तर तेल विकत बसावं लागेल... आणि गांगुलीसारखं व्यक्तीमत्व असं शेवटच्या संधीसाठी झगडावं ? का ? वय वर्षे २५ आणि ३५ यात फरक पडतो .. आपण आपल्या अपेक्षा अवास्तव ठेऊ नयेत... २ मॅच निट नाही खेळला तर शिव्या घालायला मोकळे .. आणि तिसरी मॅच त्याने जिंकून दिली तर " बघ .. मी म्हटलो होतो ना .. आपला गांग्या करून दाखवेल म्हणून? मग ? .." असं म्हणून लगेच पाय वर करून खांब ओला करणारे भारतातच ..
असो ... गांगूलीने निवृत्ती घ्यावी पण सन्मानाने ... उगाच आता मला कोण घेत नाय ... मग नाकातला मेकूड हळूच खात कुठे तरी गावस्कर स्टँड वर उभं राहून प्रेक्षकांना बळंच अभिवादन करणारा हिरो आपल्याला अपेक्षित आहे काय ? ज्याने आपल्या खंबीर नेतृत्वाची चुणून दाखवुन म्हतार्‍या अझुरूद्दीन कडून नेतृत्व घेतलं तेंव्हा म्हणे भारत फायनलला ही जात नसे ...

अवांतर : तो गावस्कर फार बोर खेळाडू होता म्हणे... ज्येवेळी ६० षटकांचे एकदिवसीय सामने होत त्यावेळी काहीतरी १५०च्या वर चेंडू खाउन ३०च्या आत धावा केलेल्या, आणि भारत दारूण हरलेला .. आणि हे भटूरं चिंगम खात बॅट दाखवत आलेलं .. बरा मी नव्हतो .. नाय तर इथला पण राग तिकडे काढून त्याला तिथेच चोप दिला असता बॅटने ..
(ही आमची गंमत :) )

रवी शास्त्रीला त्याकाळी विकेट किपर्स फार शिव्या देत असं ऐकून आहे... कारण षटकातले ६ चेंडू किपरलाच झेलावे लागत ... आणि कुकाबुरा चेंडूने हात फार शेकतात म्हणे .. बाकी भारतीय टिमच्या इतिहासात सिद्धू,राजु,तो काला अंबरनाथ, वाड्डीज दिज मच्चा (श्रिकांत) असे महारथी होउन गेलेत म्हणे :)

दादा प्रेमी , नगमाचा फॅन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

बेसनलाडू's picture

8 Oct 2008 - 5:48 am | बेसनलाडू

बरा मी नव्हतो ..
अगदी खरंय (बरंय?) याहून अधिक लिहायची गरज नाही.
(सूचक)बेसनलाडू

टारझन's picture

8 Oct 2008 - 11:27 am | टारझन

याहून अधिक लिहायची गरज नाही.
तेवढंही लिहायची खरतर गरज नव्हती

(सुचक) टारलाडू
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2008 - 6:14 pm | मुक्तसुनीत

अवांतर : तो गावस्कर फार बोर खेळाडू होता म्हणे... ज्येवेळी ६० षटकांचे एकदिवसीय सामने होत त्यावेळी काहीतरी १५०च्या वर चेंडू खाउन ३०च्या आत धावा केलेल्या, आणि भारत दारूण हरलेला .. आणि हे भटूरं चिंगम खात बॅट दाखवत आलेलं .. बरा मी नव्हतो .. नाय तर इथला पण राग तिकडे काढून त्याला तिथेच चोप दिला असता बॅटने ..

मिष्टर टारझन ,
मला किरकुटातले काही कळत नाही राव. चिमूटभर गाणी तेव्हढी येता जाता ऐकतो. त्यातला एक दाखला देतो. पहा पटतो का. चालू काळ राहुल देशपांडेचा. तो आम्हाला दिवाळीतल्या फटाक्यासारख्या त्याच्या गाण्याकरता प्रचंड लाडका. नुसती पन्नास हजाराची माळ असते त्याची (ऐकून पहा कधीतरी :-) ) . पण म्हणून आता अल्लाघरी गेलेले अमीरखाँ साहेब आम्हाला तितकेच प्यार आहेत. त्यांचा अभोगी ऐक. दिवाळीतलेच अभ्यंगस्नान घडल्यासारखे वाटते.

दादाचे मोठेपण गाण्याकरता पूर्वसुरींच्या दिग्गजांना तुडवणे .... मित्रा, तुला थोडे मोठे व्हायचे आहे :-)

१. दादाचे मोठेपण गाण्याकरता २. पूर्वसुरींच्या दिग्गजांना तुडवणे ....
ही दोन वाक्य जोडण्याची गरज नव्हती .. कारण दादाच्या मोठेपणासाठी मी कोणाला तुच्छ लेखलं नाहीये.. गावस्कर च्या खेळ्यांचा अभ्यास केलेला आहे .. गांगुली पर्सनली आवडतो .. सर्वांना आवडावाच .. असा हट्ट नाही .. :)
१९८४चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिल देव चा बोलबाला झाला .. १९८७ मधे भारत प्रबळ दावेदार होता...जर हाही वर्ल्ड कप जिंकला तर कपिलने सगळ्यांना झाकून टाकले असते ... पण गावस्कर आणि कंपूमुळे .. जाउनदेत .. काय झालं ते सगळेच जाणतात ...

मित्रा, तुला थोडे मोठे व्हायचे आहे
होय मला माहीत आहे .. मी एवढाही छोटा नाही की बिन बुडाची बडबड करेल ...

कपिल देव या पुर्वसुरीच्या क्रिकेटरचा कट्टर फॅन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

संदीप चित्रे's picture

8 Oct 2008 - 10:25 pm | संदीप चित्रे

>> तो गावस्कर फार बोर खेळाडू होता म्हणे...
गावसकरच्या खेळ्यांचा अभ्यास करणं वेगळं आणि प्रत्यक्ष गावसकरच्या खेळ्या (मॅच चालू असताना) बघणं वेगळं आहे रे :)
विंडीजचा तोफखाना जेव्हा धडधडत असायचा तेव्हा एकटा गावसकर खंबीरपणे उभा असायचा. गावसकर पिचवर असेपर्यंत जी खात्री असायची ती अगदी सचिनच्याबाबतीतही देता येत नाही. (मी स्वतः सचिन आणि कपिलचा कट्टर पंखा आहे :) )

दुसरे म्हणजे खेळाच्या मैदानाबाहेर भारतीय खेळाडूंचे आत्मविश्वास आणि त्यांचे मानधन हे दोन्ही वाढवण्यात गावकरचा प्रचंड मोठा वाटा आहे.

६० षटकांत ३६ धावा ह्या (कु)प्रसिद्ध उदाहरणाबद्दल स्वतः गावसकरने काय लिहिले आहे ते वाचलं असशील अशी आशा करतो ;)
------
अवांतर: वेगवेगळ्या काळातल्या खेळाडूंची तुलना करू नये पण दादा गांगुली होल्डिंग, रॉबर्टस, गार्नर, मार्शल इ. लोकांसमोर तसेच कपिल, हॅडली, बॉथम, इम्रान ह्यांच्या मार्‍यासमोर कसा खेळला असता ते पहायला नक्कीच आवडेल. तसेच गावसकरही मॅकग्रा, ब्रेट ली, वॉर्न, मुरली इ. लोकांसमोर कसा खेळला असता ते ही पहायला आवडेल :)
---------
लता मंगेशकर, सुनील गावस्कर आणि आयुर्विमा ह्यांना पर्याय नाही ! -- (शिरीष कणेकर) :)

चतुरंग's picture

8 Oct 2008 - 11:37 pm | चतुरंग

झकणारे हेल्मेट न घालता फक्त स्कल कॅप घालून सुनील मनोहर गावस्कर जेव्हा विंडिजच्या तोफखान्यासमोर जाई तेव्हा धाडस वाखाणण्या जोगेच असे. नजर म्हणजे तीक्ष्ण ससाण्यासारखीच हवी, आणि पदलालित्य चित्यासारखे नाहीतर एखादा उसळता चेंडू थोबाड फोडून जाणार! अरे टारु तुलना नको रे करुस. प्रत्येकजण आपापले बाण भात्यात घेऊन येत असतो आणि लक्ष्याचा वेध करुन आपल्याला आनंद देऊन जात असतो त्यामुळे ब्रॅडमनही मोठा, गावसकरही मोठा आणि तेंडुलकरही मोठाच!

चतुरंग

रंगाकाका .. आहो गांगुली मला "व्यक्तीशः" आवडतो .. आणि वर आधिच उल्लेख केल्याप्रमाणे , गांगुली उजवा म्हणून गावसकर डावा असं म्हंटलं नाही .. गांगुलीचा खेळ पाहिला , त्याची शैली त्याची हिंमत पाहिली आणि ती प्रचंड आवडली ... प्रत्येकच वैशिष्ट्यांसह येतो ... पण सगळेच आवडतात असं नाही .. पॉटींग, सायमंड्स भले भारी असोत पण त्यांना पाहिलं की तळपायाची मस्तकात जातेच ना , जी लारा, केविन पिटरसन्,गिब्ज यांना पाहिल्यावर नाही जात ...
गावसकरांवर वेगळ्या कारणाने रोष आहे .. खेळामुळे नाही.. बाकी त्याची एक बोर खेळी डोक्यात आहे म्हणून उल्लेख केला ..
गांगुली झिंदाबाद ..

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Oct 2008 - 3:40 am | ब्रिटिश टिंग्या

:(

दादाचा एलिगंट स्वेअर ड्राईव्ह कायम स्मरणात राहील!

स्टिव्ह वॉ म्हणतो त्या प्रमाणे .. सर्व ९ खेळाडू जरी ऑफ साइड ला ठेवले तरी सौरव तिथुन गॅप काढून चौकार वसूल करू शकतो ..

सहमत!

खरेतर या गुणी फलंदाजाचे बर्‍याच आधी पदार्पण होउ शकले असते! तशी ९१-९२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधीदेखील मिळाली होती!
परंतु, केवळ राखीव खेळाडुत बसुन मैदानावर खेळाडुंना पाणी न्यायला नकार दिल्याने संघव्यवस्थापकाशी खटका उडला! परिणामी पदार्पणातच संघातुन डच्चु!

त्याची संघातुन डच्चु मिळवण्याची परंपरा तिथुनच सुरु झाली असावी! ;)

त्यानंतर सातत्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करुन १९९६ साली संघाचे परत दरवाजे ठोठावले! पदार्पणातच इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये शतक ठोकले!
आणि त्यानंतर सुरु झालेला झंजावात चॅपेल गुरुजी येईपर्यंत चालु होता! भारतीय संघाच्या पडत्या काळात सचिन तेंडुलकरला थोडीफार साथ मिळाली ती दादाकडुनच! ;)

गोलंदाजीतही चमक दाखवणारा हा खेळाडु मात्र कायम सचिनच्या छायेतच राहिला! त्याने कित्येक विक्रम केले परंतु सचिनने ते लीलया मोडले ;)
मग तो विक्रम सर्वाधिक धावांचा असो वा सर्वाधिक षटकारांचा!

मध्यंतरी खराव फॉर्म अन् गुरु चॅपेलशी खटका उडल्याने डच्चु मिळालेल्या या खेळाडुने दक्षिण आफ्रिकेत जोमात पुनरागमन केले अन् भारतीय संघाला प्रथमच आफ्रिकेच्या भुमीवर कसोटी सामन्यात विजय मिळवुन दिला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करत जवळपास ७०च्या सरासरीने धावा कुटल्या अन् मालिकावीराचा मान मिळवला!

२००७ साली कसोटी क्रिकेटमध्ये ११०० अन् एकदिवसीय सामन्यांमध्ये १२०० धावा करुन आपल्यात अजुनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे हे त्याने जगाला दाखवुन दिले!
परंतु या "बर्‍याच" क्रिकेटला इतका लगेचच सुरुंग लागेल याची अपेक्षा मात्र बर्‍याच दादा चाहत्यांना नव्हती :(

असो, कितीही वादळी कारकीर्द असली तरी क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र "प्रिन्स ऑफ कॅलकुटा" कायम "ऑफसाईडचा दादा" म्हणुन लक्षात राहील!

- (दादाचा एक चाहता) टिंग्या

अनिल हटेला's picture

8 Oct 2008 - 8:01 am | अनिल हटेला

कितीही वादळी कारकीर्द असली तरी क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र "प्रिन्स ऑफ कॅलकुटा" कायम "ऑफसाईडचा दादा" म्हणुन लक्षात राहील!

(ऑफसाइडचा दादा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ऋषिकेश's picture

8 Oct 2008 - 9:21 am | ऋषिकेश

भारताचा "कॅप्टन" शोभणार्‍या दादाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
टाऱोबा,
मस्त लेख - प्रकटन! खुप खुप खुप आवडला.. तुझ्या भा एकदम पो :)

-(घरातच दादा) ऋषिकेश

मदनबाण's picture

8 Oct 2008 - 9:38 am | मदनबाण

फार वाईट वाटलं तो '******' ग्रेग चप्पल आला आणि दादाच्या कारकिर्दीला जणू क्षयच झाला... त्याच्या बरोबर जी दुटप्पीपणाची वर्तणूक केली गेली.. त्यामुळे निश्चीत मनात कुठे तरी चिड येते ...
१००% सहमत.....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2008 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सौरवदा,
निवृत्त होतोय त्याच्याविषयी आमच्या मनात समीश्र भावना आहे. क्रिकेटमधील दादा माणसाच्या वाट्याला शेवटी संघात घ्यायचं की नाही, अशी परिस्थिती यायला लागली होती. परफॊर्म्स ही पूर्ण येत नव्हता, तेव्हा दादा योग्यवेळी निवृत्त होत आहे.

फिरकी गोलंदाजा बरोबर वेगवान गोलंदाजाला पुढे येत मिडऒन, मिडऒफला खेचलेले दादाचे षटकार पाहणे एक अवर्णनीय आनंद असतो. सचीन-दादाची ओपनींग जोडी मैदानात असली की देहभान हरपून क्रिकेट पाहिला आहे. अर्थात दादांनी जरा राजकारण केलं तो भाग सोडून द्या, जसे सचिनला मधल्या फळीत पाठवण्याचा प्रयोग वगैरे इत्यादी...असे असले तरी दादाला विसरणे काही दिवस जडच जाईल. दादाच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा !!!

शेवट्च्या छायाचित्रातला फोटो स्सही आहे. त्याच्या इतकाच आम्ही दोस्तांनी त्या प्रसंगाचा जब्रा आनंद घेतला आहे. मीच-मीच करणा-या डोळ्यांची याद येत राहील.

-दिलीप बिरुटे
(क्रिकेटचा पंखा )

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 11:20 am | विजुभाऊ

बारामतीच्या काकानी ज्या क्षणी दादाच्या खान्द्यावर हात ठेऊन त्याला पुढे आणले त्याच दिवशी दादा कोपर्‍यात जाणार असे एक जण म्हणाला होता
अवांतरः दादा आणि मराठी नटी निशीगन्धा वाड यांचे चेहेरे एकाशेजारी एक ठेउन पहा. जबरा साम्य दिसते.

रविराज's picture

8 Oct 2008 - 10:30 pm | रविराज

ते ज्याच कोतुक करतात तो संपला म्हणून समजावं..

मनस्वी's picture

8 Oct 2008 - 11:28 am | मनस्वी

मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ?

दादा .. वी विल नेव्हर एव्हर फर्गेट यू...

मनस्वी

जैनाचं कार्ट's picture

8 Oct 2008 - 11:29 am | जैनाचं कार्ट (not verified)


दादाच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा !!!

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मिसंदीप's picture

8 Oct 2008 - 11:36 am | मिसंदीप

काही वेबसाईट वर कुंबळे पण निवृती घेणार असे छापुन आले आहे.

जैनाचं कार्ट's picture

8 Oct 2008 - 11:43 am | जैनाचं कार्ट (not verified)

आजच्या न्युज पेपर मध्ये देखील कुंबळेने स्वतःच लिहले आहे की तो देखील सन्यास घेत आहे !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

चावटमेला's picture

8 Oct 2008 - 11:46 am | चावटमेला

जो दिवस दादाचा असे .. त्या दिवशी प्रतिस्पर्धी बॉलर्सची दाणदाण् ऊडे .. तो जेंव्हा डाउन द विकेट येउन लॉग ऑनला लेग स्पिनरला षटकार खेचायचा तेंव्हा आम्ही जर शेजारून पामेला आंड्रेसन जरी पास झाली तरी दुर्लक्ष करू... सुपर स्क्वेअर कट , स्क्वेअर ड्राइव्ह आणि कव्हर शॉट्स मधे गांगुलीची बरोबरी करणारे कमीच

सहमत..
इथे राहुल द्रविडचे एक वाक्य आठवते.
On off side, first there is god and then there is Ganguly

भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधाराला मानाचा मुजरा

मराठी_माणूस's picture

8 Oct 2008 - 12:01 pm | मराठी_माणूस

तो गावस्कर फार बोर खेळाडू होता म्हणे...

काही वर्षांनी आजच्या 'दादा' खेळाडुं बद्दल ही असेच बोलले जाईल

झकासराव's picture

8 Oct 2008 - 5:49 pm | झकासराव

टारु चांगल लिहिल आहेस रे. :)
ज्यावेळी क्रिकेटचा नॉशिया होइल एवढ क्रिकेट नव्हत तेव्हा क्रिकेट बघण्यात मजा असायची.
आणि त्यात आपली फेवरीट हीट्ट ओपनिन्ग म्हणजे दादा आणि तेन्डल्या.
जुगलबन्दी असायची त्यांची.
दादा नेहमी लक्षात राहील त्याच्या ऑफसाइडच्या फटक्यांसाठी, पुढे सरसावुन हाणलेल्या सिक्सांसाठी, आणि जिंकलो की दुसर्‍या टीमसमोर मान वर करुन माज करुन दाखवण्याच्या वृत्तीसाठी. (ह्याची मात्र भारताला खरच गरज होती. प्रत्येक वेळी काय शेपुट पाडून बसायच.)
दादाने मात्र जिंदगीत कधी लेगसाइडला नीट न खेळण्याचा पण का सोडला नाही हे कळाल नाही. तसच उसळत्या बॉलला घाबरणे. आणि स्वतः किंवा दुसर्‍याला धावबाद करणे. ह्या दोन तीन गोष्टीसाठी मी त्याला बर्‍ञाच वेळा शिव्या दिल्यात. आणि त्याने मारलेल्या अफलातुन ओफसाइड्च्या चौकारला आणि पुढे सरसावत बॉल भिरकावुन देणार्या सिक्सरला दाद देखील दिली आहे.
असो.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2008 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उसळत्या बॉलला घाबरणे. आणि स्वतः किंवा दुसर्‍याला धावबाद करणे. ह्या दोन तीन गोष्टीसाठी मी त्याला बर्‍ञाच वेळा शिव्या दिल्यात.

झकासराव वरील कारणासाठी दादाला आम्हीही शिव्या घातल्या आहेत.:)

-दिलीप बिरुटे
(क्रिकेटचा दिवाना )

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Oct 2008 - 7:33 pm | ब्रिटिश टिंग्या

;)

अवांतर : असाच रॉबिन सिंग नावाचा एक खेळाडु होता! तो आयुष्यात कधीही ऑफसाईडला खेळु शकला नाही! ऑफ स्टंपाच्या हातभर बाहेर असणारा चेंडू मात्र लीलया डीप मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर भिरकावण्यात पटाईत होता ;)

टारझन's picture

8 Oct 2008 - 7:39 pm | टारझन

रॉबीन सिंग वरून मला रित्तिंदर सिंग सोढ्ढी नावाचा एक (नुसताच) हार्डवर्किंग क्रिकेटर आठवला .. ह्याची तुलाना त्याच्याशी करता येइल जो २०-२० तास अभ्यास करून परिक्षेत पण २०च मार्क्स घेउन येतो =)) =)) =))
ज्या क्रिकेटर्सची किव आणि सहानुभूती वाटावी अशा अतितुरळक क्रिटेटर्स पैकी एक ... रित्तिंदर सिंग सोढ्ढी :)
आजकाल कुठे दिसत नाही तो ..

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Oct 2008 - 8:20 pm | ब्रिटिश टिंग्या

१. आकाश चोप्रा
२. शिवसुंदर दास
३. एस. रमेश
४. गगन खोडा
५. हेमांग बदानी
६. एल. बालाजी
७. अमेय खुरासिया
८. विक्रम राठोड....

असो, लिस्ट बरीच मोठी आहे......... ;)
हवीच असल्यास व्यनी पाठवणे! ;)

संदीप चित्रे's picture

8 Oct 2008 - 9:24 pm | संदीप चित्रे

मलाही मनापासून वाईट वाटलं रे !
राहुल द्रविड म्हणालाही होता -- ऑफ साईडला एक देव सोडला तर सौरवची बरोबरी करणारा दुसरा कुणी नाही :)
फिरकी गोलंदाजासमोर येऊन दादा जो षटकार मारतो ना त्याला खरंच तोड नाही !
एक पर्व संपतंय .. आपण खडी तालीम (स्टँडिंग ओव्हेशन) द्यायलाच हवं !!

देवदत्त's picture

8 Oct 2008 - 10:44 pm | देवदत्त

सौरव गांगुली निवृत्त होत आहे हे ऐकून बरे वाटले. खरं तर त्याने हा निर्णय खूप आधीच घ्यावयास हवा होता असे मला वाटते.
तो चांगला खेळाडू होता. पण निवड समितीने त्याला डावलणे सुरू केले तेव्हापासून मला वाटत होते की त्याने स्वत:च निवृत्ती घ्यावी. ह्याचा अर्थ हार मानावी हा नाही. पण २ वर्षांपूर्वी त्याने जसे सांगितले होते की, 'मी कोणत्याही क्रमांकावर खेळायला तयार आहे.' तेव्हा खरंच वाईट वाटले होते की एखाद्याने स्वतःची किंमत कमी होऊ न द्यावी.

-------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

संदीप चित्रे's picture

8 Oct 2008 - 11:25 pm | संदीप चित्रे

देवदत्त --
वन डे क्रिकेटमधून गच्छंती अटळ होती तेव्हा साक्षात राहुल 'द वॉल' द्रविडनेही हातात विकेटकीपरचे ग्लोव्हज चढवलेच होते की !

देवदत्त's picture

9 Oct 2008 - 11:12 am | देवदत्त

इथे मी फक्त गांगुलीबद्दल लिहिले पण माझे म्हणणे फक्त गांगुलीकरीता नाही आहे. सचिनने ही आता निवृत्ती घेतली पाहिजे असे मला वाटत होते. द्रविडही ह्यात येऊ नसेलही.
म्हणतात ना, Quit when people ask "Why?", not when people ask "Why not?"

असो, खरंतर गेले ३/४ वर्षे मी क्रिकेट बघणे सोडून दिले आहे. त्यामुळे ह्यावर भाष्य करणे चुकीचे वाटू शकेल. पण ह्या खेळाडूंचा खेळ आधी बघितला आहे, त्यामुळे जरी कधी समोर आले तर जुन्या आठवणींनी थोडावेळ तरी त्यांचा खेळ बघतो.

-------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

भास्कर केन्डे's picture

9 Oct 2008 - 12:12 am | भास्कर केन्डे

दादाचे क्रिकेट पहायला मलाही आवडायचे. पण मला वाटतं प्रत्येक क्रिकेट पटूला तो इतरांपेक्षा चांगला खेळत असेल तेव्हाच संधि द्यायला पाहिले. लाखो खेळाडू आहेत आपल्या कडे. त्यांच्यातले जबरा १५ खेळाडू प्रत्येक मालिकेसाठी निवडायला हवेत. यामुळे कदाचित वैयक्तिक विक्रम करणारे खेळाडू आपल्याकडे निर्माण होणार नाहीत पण संघ अजिंक्य रहिल असे वाटते. उदा. ऑस्ट्रेलियाचे धोरण आणी त्यांचा संघ पहा. त्यांच्या निवृत्त खेळाडूतही किती क्रिकेट आहे ते आयपीएल पाहिल्यावर लक्षात येते (उदा. शेन वॉर्न).

दादा सारख्या खेळाडूंनी निवृत्ती नंतर उदयोन्मुख खेळाडुंना प्रशिक्षण देऊन क्रिकेटमधले आपले योगदान चालू ठेवावे अशी अपेक्षा.

आपला,
(क्रिडाप्रेमी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

संदीप चित्रे's picture

9 Oct 2008 - 2:19 am | संदीप चित्रे

टारू --
गैरसमज नको करून घेऊस पण तुला गावसकरची लक्षात राहिलेली बोअर खेळी विसरायची असेल तर १९८७ च्या वर्ल्ड कपला त्याने, अंगात ताप असतानाही, नागपूरला केलेली खेळी पहा -- न्यूझिलंडच्यविरूध्द !! समोरून बघणारा कृष्णम्माचारी श्रीकांत ही 'बघा' झाला होता. (श्रीकांतची बॅटिंग किती स्फोटक होती ते सांगणे न लगे !)

आपण क्रिकेटवेडे लोक काही गोष्टी फारच मनात ठेवून देतो रे ! आता बघ ना -- तो चेतन शर्मा ! शारजाला जावेद मियांदादने शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मारला होता हे पटकन आठवतं पण त्याने वन डे क्रिकेटमधे हॅट ट्रिक केली आहे ते लगेच आठवत नाही.
(अगदी जावेद मियांदादने एका मुलाखतीत सांगितलय की चेतनच्या जागी दुसरा कुणी गोलंदाज असता तर त्यानेही यॉर्कर टाकायचाच प्रयत्न केला असता आणि आणि मी तो यॉर्कर फुल टॉसमधे कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला असता !!!)

मुंबईलाच विडीजविरुद्ध कसोटी. अँडी रॉबर्ट्स समोर श्रीकांत्.पहिला चेंडू सरळ ऑफस्टंपबाहेर. दुसरा लेगवर आणि बाहेर जाणारा श्रीकांतची मनगटे आणि बॅट फक्त हललेली दिसली आणि चेंडू लेगसाईडला सीमापार झालेला होता! नेहेमीप्रमाणेच नाक तोंड वाकडे करत पुढे येऊन श्रीकांतने पीचवर बॅटने थोपटले आणि अँडीकडे एक कटाक्ष टाकला. तिसरा चेंडू एक अफलातून इन्स्विंग, ह्याही वेळी श्रीकांतची मनगटे आणि बॅट फक्त हललेली दिसली आणि मधली यष्टी उखडलेली! ;)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

9 Oct 2008 - 2:30 am | संदीप चित्रे

तस्साच स्फोटक आणि तितकाच बेभरवशाचा ;)

मराठी_माणूस's picture

9 Oct 2008 - 9:53 am | मराठी_माणूस

फारच चांगलि आठवण काढली. चेतन शर्मा अत्यंत जीगरबाझ खेळाडु होता. त्या वेळेस खेळासाठीच खेळ खेळला जायचा. खेळाडु ने खेळा व्यतरीक्त काही केल्याचे फारसे आठ्वत नाही, तुरळक अपवाद वगळता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2008 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीगरबाझ असेल पण शारजात शेवटच्या चेंडूवर पाकींना जिंकण्यासाठी अवघ्या चार धावा हव्या असतांना त्याने जावेद मियादादला फुलटॊस टाकल्यावर त्यावर त्याने षटकार खेचला आणि आपण हरलो,ही आठवण फारच त्रासदायक आहे. चेतन शर्मा पुढे गोलंदाजी करतांना टप्पे विसरला हा भाग सोडून द्या !!!

मराठी_माणूस's picture

9 Oct 2008 - 10:30 am | मराठी_माणूस

हो ती आठ्वण त्रासदायक असली तरी चीत्रे लिहतात त्याप्रमाणे त्याची हॅट्रीक ही पण न विसरण्यासारखीच आठ्वण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2008 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याची हॅट्रीक ही पण न विसरण्यासारखीच आठ्वण आहे