ढाक
बय्राचजणांनी ट्रेकमध्ये उत्सुकता दाखवल्याने एक ट्रेक ठरवला आहे.
एक दिवसाच्या ट्रेकला जाण्याचे ठरत आहे.
रविवार दि १९
कर्जत-वदप-ढाक गाव-कर्जत
सकाळी सहा ते संध्याकाळी आठला परत.
वाट सोपी ,दरी नसलेली, अवघड चढाई नसलेली, ढाकचे गाववाले वापरत असलेली आहे. आपण ढाक बहिरीला जात नाही. ढाक गावाकडे जाणार आहोत.
थोडी भटकंती आणि वनभोजन.
ट्रेन + ओटोरिक्षा ( अंदाजे प्रवास खर्च रु ८० अथवा कमी )
( ढाक बहिरी गुफा अथवा ढाक गड नाही)
उन्हाळ्यातला दिवसा ट्रेक जमत असेल त्यांनी यावे.
( cst karjat fast train. Dadar (6.24), kurla(6.30), ghatkopar(6.35),thane(6.50),Dombivli(7.00),kalyan(7.10)Karjat(8.00)
पुण्याकडून येणारी सिंहगड एक्सप्रेसही कर्जतला (8.00)लाच येते.
कर्जतला एक नं फलाटाकडे मोठे तिकिट ओफिस आहे तिथे सर्व भेटू. कर्जतला आल्यावर सर्वांनी तिकिट ओफिस एअरिआत येणे. रूळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा. पूल तिथेच उतरतो.
( पुण्यास परतण्यासाठी प्रगती (18.05), Deccan queen(18.33), बहुतेक मिळेल. अथवा सह्याद्री एक्स(19.28) आहेच.)
कर्जत रिटन तिकिट काढून शक्यतो
पुढच्या दुसय्रा डब्यात बसणे.
( जेवणाचा डबा,टोपी/छत्री,दोन लिटर पाणी)
बघुया कसं जमतं ते.
माझा फोन
8080627261
प्रतिक्रिया
17 Mar 2017 - 12:25 pm | प्रचेतस
उन्हाळ्यात ही चढाई खूप त्रासदायक होईल असे वाटते. ह्या वाटेवर फारशी झाडी नाहीत, किंबहुना खुरटी आहेत.
17 Mar 2017 - 1:24 pm | जगप्रवासी
मी येतोय
17 Mar 2017 - 1:42 pm | कंजूस
उन्हात एका दिवसात जाऊन येण्यासाठी ही चांगली जागा आहे. वरती गार झाडी आहे. शिवाय दोन मोठ्या विहिरी आहेत. बाराही महिने पाणी असते.
17 Mar 2017 - 1:46 pm | किसन शिंदे
अरे वा!!
पोहायला मिळते का त्या विहिरीत.?
17 Mar 2017 - 1:59 pm | प्रचेतस
असं पोहून पाणवठे खराब करू नयेत, आपल्याला शहरात भरपूर पाणी मिळतं तरी गावकऱ्यांचा जीव त्या साठयांवरच अवलंबून असतो.
17 Mar 2017 - 2:37 pm | कंजूस
होय. पण पायय्रा नाहीत.
पोहायला मागच्या वर्षीच्या ट्रिपला भरपूर वाव होता. स्पाला घेऊन जा बाइकने. तुडुंब तलाव.
17 Mar 2017 - 2:51 pm | कंजूस
पोहण्यासाठी
स्पा in भटकंती
25 Mar 2016 - 11:08
आडवाटेची भ्रमंती - जांभे धरण
धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून कंजूष काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते.
लिंक:http://www.misalpav.com/node/35449
17 Mar 2017 - 3:45 pm | स्वच्छंदी_मनोज
कंजूसकाका मस्त प्लॅन पण वल्ली म्हटल्याप्रमाणे उन्हाचा खूप त्रास होणार. तुम्ही वदप वरून म्हणजे कोकणातून वर चढणार म्हणजे ह्युमीडीटीचा चांगलाच त्रास होईल तेव्हा त्या तयारीने जा. तुम्ही फक्त पठारावरील ढाकवाडीपर्यंत जाणार की पुढे ढाक किल्ल्यावर?
वेळ मिळालाच तर वाटेवरचाच अतीसोपा असा भिवगडही पाहाता येईल.
मी हाच ट्रेक १५ वर्षांपुर्वी असाच एक दिवसाचा भर पावसाळ्यात ऑगस्टमध्ये केला होता. तेव्हा कर्जतवरून भल्यापहाटे काहीही वाहन न मिळाल्याने डांबरी रस्त्यावरूपावदप पर्यंत १३-१४ किमीची पायपीट घडली होती पण आम्ही ढाकवाडी वरून पुढे ढाक किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जाऊन आलो होतो.
17 Mar 2017 - 5:22 pm | कंजूस
फक्त पठारावरील ढाकवाडीपर्यंत जाणार?
होय.कारण पाचपर्यंत परत खाली यायचे आहे. मी दोनदा गेलो आहे. वाटेतल्या झय्राला फेब्रुअरीपर्यंत पाणी असते. जागा आवडली तर एरवी जाऊ शकतात.
उन्हाळ्याची सुट्टी मोठी असते आणि ट्रेक निघत नाहीत.
17 Mar 2017 - 5:26 pm | कंजूस
उन्हाचा खूप त्रास वाटू लागल्यास फार वर न जाता वनभोजन करून परत.
20 Mar 2017 - 4:09 pm | कंजूस
ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात-
कर्जत ट्रेनमध्ये चढलो तेव्हा येणाय्रांपैकी कुणी नव्हते. आमराई नाक्यावरून चहा घेऊन ( वदप कडे जाणाय्रा ) शेअर ओटोने निघालो आणि सहा किमी अंतरावरच्या संजयनगरला उतरलो तेव्हा ९ वाजलेले .वाटेत भाताची हिरवी शेते दिसतात याचे कारण भिवपुरी पावरहाउसचे खाली आलेले पाणी कॅनालने दिले आहे. इथूनच समोर दिसतो ढाकच्या पठाराचा कडा.( ढाकगड याच्या मागे आहे तो दिसत नाही.)

फोटो १
फोटो २

तसं पाहिलं तर सह्याद्री कर्जत स्टेशनपासून इतका जवळ इथेच आहे. अर्ध्या तासात २५०मिटर्सच्या भिवगडा पाटीपाशी येतो तिथे डावीकडची एक वाट वर गडाकडे आणि एक खाली पलिकडच्या गावात ( गौडकामत) उतरते. उजवीकडे वर वळल्यास ढाककडे. अजून थोडे वर गेल्यास आपण भिवगडाच्या उंचीइतके २५०मि वर येतो. इथून वरचा पाचपन्नासमिटर्सचा भिवगडाचा पसारा,झेंडा,खालची दोन टाकं दिसतात.

फोटो ३
इथे दोन वाटा आहेत डाविकडची ढाककडे नेहमीच्या वापरातली, उजवीकडे एका ओढ्याकडून परत मुख्यवाटेकडे जाण्याची. ही वाट सावलीची आहे आणि ओढ्यात थोडे पाणी चुळकाभरतरी असतेच. त्यावर अवलंबून पाच ठाकर घरं आहेत. त्यांच्याशी बोलून निघालो. इथून सर्व वाट दहापंधरा मिनिटांचे थोडे उजाड भाग सोडल्यास सदाहरीत गार सावली देणाय्रा झाडांची आहे. उन असे जाणवत नाहीच. पक्षांचे कुजन सतत चालूच असते.
ढाक झाडीतले पक्षांचे आवाज
Recording 2017-03-19 Sunday.
फाइल साइज 1 MB
फोटो ४

कड्यावर/ पठारावर (बारा वाजता) पोहोचल्यावर गाव दिसत नाही ते दिडशे मिटर्स पुढे आहे. ग्रामदेवता गारुआई मंदिर स्वागतासाठी आहे. इथे आसरा आहे.

फोटो
फोटो ५

शेतातून थोडे पुढे गावाच्या वाटेवर विहीर आहे. गावची पाणवठा विहीर वेगळी आहे.

फोटो ६
रूट ट्रेस

फोटो ७
फोटो ८

देवळाच्या पडवीत जेवण करून आराम केला आणि दीड वाजता निघालो. अडिच वाजता काही मुलेमुली भिवगडावरून येताना दिसली. चार आंधळे मुलांना वर नेऊन आणत होते. अकराजण होते. अकरावाजता येऊन उन्हात गडसैर करवून अडिचला परत खाली. संजयनगरला रस्त्यावर आलो तेव्हा तीन वाजलेले. पुन्हा सकाळचाच ओटोरिक्षावाला भेटला! कर्जतच्या बाजारात काजुबोंडे खरेदी करून चारच्या गाडीने परत निघालो.
20 Mar 2017 - 6:25 pm | नमिता श्रीकांत दामले
छान भटकंती. जीपीएस् ट्रॕक उपयुक्त.
एकटेच गेला होतात?
मस्त फिरत रहा आणि असेच लिहित रहा.
20 Mar 2017 - 9:47 pm | सुमीत
कंजूस शेठ, आता एप्रिल मधे परत आल्या वर करु हाच ट्रेक.
20 Mar 2017 - 4:10 pm | कंजूस
ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात-
कर्जत ट्रेनमध्ये चढलो तेव्हा येणाय्रांपैकी कुणी नव्हते. आमराई नाक्यावरून चहा घेऊन ( वदप कडे जाणाय्रा ) शेअर ओटोने निघालो आणि सहा किमी अंतरावरच्या संजयनगरला उतरलो तेव्हा ९ वाजलेले .वाटेत भाताची हिरवी शेते दिसतात याचे कारण भिवपुरी पावरहाउसचे खाली आलेले पाणी कॅनालने दिले आहे. इथूनच समोर दिसतो ढाकच्या पठाराचा कडा.( ढाकगड याच्या मागे आहे तो दिसत नाही.)

फोटो १
फोटो २

तसं पाहिलं तर सह्याद्री कर्जत स्टेशनपासून इतका जवळ इथेच आहे. अर्ध्या तासात २५०मिटर्सच्या भिवगडा पाटीपाशी येतो तिथे डावीकडची एक वाट वर गडाकडे आणि एक खाली पलिकडच्या गावात ( गौडकामत) उतरते. उजवीकडे वर वळल्यास ढाककडे. अजून थोडे वर गेल्यास आपण भिवगडाच्या उंचीइतके २५०मि वर येतो. इथून वरचा पाचपन्नासमिटर्सचा भिवगडाचा पसारा,झेंडा,खालची दोन टाकं दिसतात.

फोटो ३
इथे दोन वाटा आहेत डाविकडची ढाककडे नेहमीच्या वापरातली, उजवीकडे एका ओढ्याकडून परत मुख्यवाटेकडे जाण्याची. ही वाट सावलीची आहे आणि ओढ्यात थोडे पाणी चुळकाभरतरी असतेच. त्यावर अवलंबून पाच ठाकर घरं आहेत. त्यांच्याशी बोलून निघालो. इथून सर्व वाट दहापंधरा मिनिटांचे थोडे उजाड भाग सोडल्यास सदाहरीत गार सावली देणाय्रा झाडांची आहे. उन असे जाणवत नाहीच. पक्षांचे कुजन सतत चालूच असते.
ढाक झाडीतले पक्षांचे आवाज
Recording 2017-03-19 Sunday.
फाइल साइज 1 MB
फोटो ४

कड्यावर/ पठारावर (बारा वाजता) पोहोचल्यावर गाव दिसत नाही ते दिडशे मिटर्स पुढे आहे. ग्रामदेवता गारुआई मंदिर स्वागतासाठी आहे. इथे आसरा आहे.

फोटो
फोटो ५

शेतातून थोडे पुढे गावाच्या वाटेवर विहीर आहे. गावची पाणवठा विहीर वेगळी आहे.

फोटो ६
रूट ट्रेस

फोटो ७
फोटो ८

देवळाच्या पडवीत जेवण करून आराम केला आणि दीड वाजता निघालो. अडिच वाजता काही मुलेमुली भिवगडावरून येताना दिसली. चार आंधळे मुलांना वर नेऊन आणत होते. अकराजण होते. अकरावाजता येऊन उन्हात गडसैर करवून अडिचला परत खाली. संजयनगरला रस्त्यावर आलो तेव्हा तीन वाजलेले. पुन्हा सकाळचाच ओटोरिक्षावाला भेटला! कर्जतच्या बाजारात काजुबोंडे खरेदी करून चारच्या गाडीने परत निघालो.
20 Mar 2017 - 4:34 pm | प्रचेतस
मस्त उपवृत्तांत.
20 Mar 2017 - 4:17 pm | सूड
भारीच!!
20 Mar 2017 - 4:28 pm | एस
छान!
20 Mar 2017 - 4:33 pm | मोदक
काकानू.. एकटे नका फिरत जाऊ...
खास करुन उन्हाळ्यात तर नकोच नको.
25 Mar 2017 - 5:32 pm | ऋतु हिरवा
छान व्रुतांत. फोटो आणि पक्ष्यांचे आवाज मस्तच.
26 Mar 2017 - 12:55 pm | जव्हेरगंज
व्वा!!
1 Jun 2017 - 2:24 pm | कंजूस
परवा ३०-३१मे भिमाशंकरला खांडसमार्गे जाऊन आलो.

खांडसला पोहोचायला साडेअकरा वाजले. पुढे दोन किमी उन्हात पायपीट करताना समोरचा पर्वत वाटू लागतो.
फोटो १
झाडांच्या सावलीतून जाताना आंबे खाण्याची मजा याच दिवसांत.
गणपती घाट चढून कलावंतीणीच्या सुळक्याला वळसा घालून जाताना-

३)
उन्हाच्या तडाक्यात दुपारी वर जायला वेळ लागला.
४)रेकॅार्ड
५)रूट ट्रेस

वर वडा चहा घेऊन मुक्काम ठोकला. संध्याकाळी साडेसात आणि दहाला जोरदार पाऊस झाला. सकाळी ढग उतरलेले त्यात दिसणारे देऊळ
६)
१) रस्त्याकडे आणि बस स्टँड परिसरात फक्त सात - आठ हॅाटेल्स चहा वडा जेवणाची उरली आहेत. देवळाकडे जाणाय्रा पायर्यांच्या बाजूला असलेली सर्व हॅाटेल्स पाडली आहेत. फक्त पुढे -हारांची दुकाने दहाबारा आहेत. पायय्रांवर संपूर्ण शेड घातली आहे.
२) खांडसची वाट जिथे तळ्याकडे वर येते तिथे संपूर्ण कुंपण घालण्याचे काम चालू आहे. पायय्रा सुरू होतात तिथे " भिमाशंकर अभयारण्य , प्रवेश ३०रु, कॅम्रा फी १५ ही पाटी लावली आहे. हनुमानतळ्याकडे , व्हु् पॅाइंटकडे जाण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावे लागेल. सगळीकडे कुंपण लावत आहेत. आता खांडसकडून वर जाता येणार का नाही हा प्रश्न आहे कारण संध्याकाळी सहानंतर बंद करतील असं वाटतं.
३) देवळामागच्या राममंदिराला चिकटून एक काशीचा हनुमान आखाडावाला आला आहे तो पहाटे चारपासून भजनांच्या रेकॅार्डस जोरात लावून ठेवतो.
४) व्होडाफोन आणि आइडियाचे नेटवर्क चालते. बिएसएनेल अधुनमधून चालू असते . Rcom, docomo नाही.
1 Jun 2017 - 2:47 pm | प्रचेतस
तगडी भटकंती झाली.
जेमतेम महिन्याभरापूर्वीच भीमाशंकरला जाऊन आलो होतो तेव्हा पायर्यांच्या कडेला दुकाने होतीच, शिवाय प्रवेश फीच्या पाट्याही नव्हत्या. एव्हढ्यात बरेच काही काही झाले वाटते.
खांडसकडून येणारी वाट बंद व्ह्यायची नाही. गावकर्यांच्या वहिवाटीची आहे. धुक्यातलं मंदिर खूप छान दिसतंय.
1 Jun 2017 - 5:30 pm | स्वच्छंदी_मनोज
छान भटकंती. भिमाशंकरच्या दुकानांबद्दलची माहीती नवीन कळली.
पण वल्ली म्हणतो तसे, खांडस कडची वाट बंद व्हायची नाही. त्या भागातील कोकणातून येणार्या लोकांची वाहती वाट आहे ती.
1 Jun 2017 - 6:19 pm | एस
मस्त फिरता तुम्ही एकटेच. बाकी खांडसची वाट बंद होणे कठीण वाटते कारण वहिवाटीची आहे आणि लोक ही कुंपणे, दरवाजे वगैरे जास्त दिवस ठेवत नाहीत. तोडतात.
2 Jun 2017 - 10:58 pm | चौथा कोनाडा
भन्नाट भिमाशंकर ट्रेक !
फोटो आवडले हेवेसांनल !
आंबेवाला फोटो पाहुन आमची गेल्या वर्षीचे १० जूनचे भिमाशंकर पदभ्रमण आठवले.
पावसाच्या सरी वरून पडणार्या आंब्याच्या सड्यात नहायला जाम धमाल आली होती.
सालं भोरगिरी टू भिमाशंकर ट्रेक आमच्या नशिबात नाहीय असं दिसतंय :-(
8 Mar 2018 - 12:54 pm | कंजूस
भिमाशंकरला २७-२८ फेब्रुवारीला गेलेलो. यावेळी दोघे बरोबर होते.
थोडक्यात वृत्तांत -
१) ऊन वाढणार म्हणून लवकरच्या ट्रेनने पावणे सातलाच नेरळला पोहोचलो.
२) नेरळ - कशेळे टॅक्सीच्या शिटा भरण्यात एक तास गेला. ( २०रु/ दहा शिटा)
३) पुढे कशेळे -खांडस टॅक्सीच्या शिटा भरायला आणखी एक तास लागेल असे ड्रायवर म्हणाला. वरचे अधिक पैसे भरून (२५/-,१०) निघालो.
४) उन्हामुळे साडे पाच तास लागले. साडेतीनला खोली घेतली राममंदिरच्या मागे डबेवाले धर्मशाळा. (१००रु/प्रतीव्यक्ती)
५) वरती सहानंतर गारवा आला. गर्दी नव्हती.
६) सध्या शेकरु गायब आहेत. घरटीसुद्धा नाहीत.
७)दुसरे दिवशी साडेनऊला निघालो. तीनरा खाली आलो. टॅक्सी मिळून नेरळला ५-१०ची में लोकल मिळाली.
फोटो - व्हिडिओ -
फोटो १

द्वादशीचा चंद्र, भिमाशंकर
फोटो २

आमटी फळे
फोटो ३

भिमाशंकर एसटी डेपोतले वेळापत्रक
फोटो ४

डोलीतून जाणारी भक्त.
फोटो ५

राममंदिराच्या मागची धर्मशाळा
फोटो ६

फोटो ७

वनखात्याने तळ्याभोवती कुंपण घालून ठेवले आहे.
फोटो ८

देवळाजवळची उंची जिपिएस
वरच्या झाडीच्या वाटेत
व्हिडिओ १, फाइल साइज ९५ एमबी, रेझलुशन 850x480
झाडीच्या वाटेनंतरव्हिडिओ २, फाइल साइज १०० एमबी, रेझलुशन 850x480