.
काल चिम्मी कोंतकी एक पुस्तक वांचत बसलोती. मध्ये मजंकडे, “बाप्पा, ब्रिटीश लोकं अत्तापणीं हायेंत का ?” मणूँ विचारली.
“ऑफ़कोर्स, हायेंत की. अस्का विचारलीस?”
“नाई, 1947 मध्ये अमाला सुतंत्रम् मिळ्लं तम्माच अमी तेनास अग्गिदनांसींइनं मारूँटाकलं असंल की मणूँ मला वाटलं...”
तिज ते निरागस प्रश्न योच्ना करूँ मला हांसू आलं. “गाँधी जन्म देल्ते अहिंसाचं देशांत असंपणीं एक गडबड का ?” असं विचार केलों.
तजनंतरं मला सुचलं, असल्ते प्रश्न विचाराला चिम्मी येऊँ एक ल्हाँ पोरी नहो म्हणून... पांचवींत वाचते, इतिहासांत पाठ अस्ना का ? सुतंत्रम् मिळाला अमी ब्रिटिशांना माराचं आवश्य नाई, एवढं ल्हाँ विषय तिला कळ्लं पज्जे, नोहो का ?
चिम्मी कडे विचारलों.
“‘India's freedom struggle’ नांवांचं पाठंच वांचतोते बाप्पा, त्यांत्सूनंच हे डौट्ट आलं” मणाली.
“मण्जे? तुमचं मिस्स तुमाला आमी ब्रिटिशांना मारूँटाकूँ सुतंत्रम् मिळिवलो मणूँ शिकिवली काय ?”
“नाई बाप्पा...!” चिम्मी येऊँ डोकेंच बडिवूंगिट्ली.
“मग? तस्का विचारलीस?”
“मिस्स काय शिकविली तं येऊँ मला काईंच समजलं नाई, बाप्पा...! देशाला सुतंत्रम् मिळ्लं मणूँ समजलं. पण कसं मिळ्लं मंटल्त्रं, काय की समजेना...! मणूँ विचार केले, की बहुधा ब्रिटिशांना मारूँ सुतंत्रम् मिळिवले की काय की मणूँ...”
काहाणींत येणारं विल्लनाला, हीरो कसं मारूँ जिंत्तो की त्यास्कं ब्रिटिशांना मारूँ सुतंत्रम् मिळिवलो की काय की अमी, असं विचार करू लागली चिम्मी. तिचं विचाराला तिचं पुस्तकपणींईं तिचं शिकिवणारीपणींईं बदल्लं नाई.
आता हेजांतं कोणावर अपराध चूक सांगणे हाये?
.
--लेखक : श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन्
--------------------------------------
तंजावर मराठी बोलीतून काही लेखन वाचावयाची इच्छा असलेल्या, मिपावरील काही रसिकांच्या समक्ष वैयक्तिक विनंतीस मान देवून हैयो हैयैयो ह्यांनी लेखकाच्या मौखिक कथनाचे लेखन केले आहे. Dakshini Marathi या तंजावर मराठीला वाहिलेल्या यूट्यूब चॅनेलवर या लेखाचे अभिवाचन लवकरच उपलब्ध होईल.
-
---------------------------------------
प्रतिक्रिया
27 Feb 2017 - 8:08 am | पैसा
तंजावर मराठीचा आपल्यासाठी दुर्मिळ नमुना असलेली छोटेखानी कथा श्री नागलिङ्गम् सोक्कनाथन् यांनी तोंडी सांगितली आणि श्री हैयो हैयैयो यांनी त्याचे देवनागरीत लेखन/टंकन करून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. या कथेसाठी श्री नागलिङ्गम् सोक्कनाथन् आणि श्री हैयो हैयैयो यांचे माझ्यातर्फे आणि मिपातर्फे विशेष आभार!!
2 Mar 2017 - 12:55 pm | तुषार काळभोर
आयुष्यात पहिल्यांदा तंजावरी मराठी वाचतोय!
जेव्हापासून तंजावरला अजून मराठी बोलली जाते, हे कळले होते, तेव्हापासून 'ती' मराठी कशी असेल, याची उत्सुकता होती.
श्री नागलिङ्गम् सोक्कनाथन् व श्री हैयो हैयैयो यांचे मनःपूर्वक आभार!!
27 Feb 2017 - 8:18 am | यशोधरा
अग्गिदनांसींइनं म्हणजे इंग्रजांस, असे का?
बडिवूंगिट्ली म्हणजे काय?
27 Feb 2017 - 8:25 am | पैसा
"बडिवूंगिट्ली = बडवुन घेतली" असणार. थोडक्यात म्हणजे कपाळावर हात मारला.
अग्गिदनांसींइनं हे संदर्भाने इंग्रजाना असं दिसतंय.
27 Feb 2017 - 8:48 am | जव्हेरगंज
'अजून एक कॉफी' पायजेल!!!
27 Feb 2017 - 8:49 am | हैयो हैयैयो
अग्गिदनांसींइनं = अख्ख्याजणांनाही
27 Feb 2017 - 8:50 am | यशोधरा
धन्यवाद. :) मराठी कानडी मिक्स असं काही ऐकू येत होत डोक्यात, वाचताना.
27 Feb 2017 - 8:49 am | सचिन७३८
पस्टक्लास ष्टोरी लिवून सोडलं बगा तुमी. असीच अजून लिवून सोडून सोडा. हे बाषा आमचेले बाषेला जरा लागू होतेलेसारके वाटरेले.
27 Feb 2017 - 9:07 am | वरुण मोहिते
मराठी भाषा दिनानिमित्त इतकी विविधता वाचायला मिळाली .
27 Feb 2017 - 9:28 am | जेपी
+1
27 Feb 2017 - 10:20 am | अभिजीत अवलिया
+१
27 Feb 2017 - 7:38 pm | मितान
+१११
27 Feb 2017 - 10:12 am | प्राची अश्विनी
काय सुरेख! ही लंपनची भाषा का? की रावसाहेबांची?
27 Feb 2017 - 1:04 pm | पैसा
लंपन आणि रावसाहेब हे बेळगाव आणि जवळच्या परिसरातले आहेत. तंजावर म्हणजे पार तमिळनाडूमधे जिंजी तंजावरला पूर्वी गेलेल्या लोकांनी टिकवून ठेवलेली बोली.
27 Feb 2017 - 10:17 am | एस
अतिशय सुंदर! फार छान वाटलं वाचून. अजून लेखन येऊ द्यात कृपया.
27 Feb 2017 - 10:24 am | सविता००१
किती छान वाटलं वाचताना काय सांगू..
फार सुरेख
27 Feb 2017 - 10:30 am | प्रीत-मोहर
__/\__
27 Feb 2017 - 12:01 pm | सतिश गावडे
मराठीची विविध रुपे पाहून भारी वाटत आहे.
27 Feb 2017 - 12:44 pm | पद्मावति
तंजावर मराठी विषयी वाचावं अशी खूप इच्छा होती माझी. ती या लेखाने पूर्ण झाली. पर दिल अभी भरा नही...अजुन लिहा प्लीज़.
27 Feb 2017 - 12:57 pm | खटपट्या
खूप छान. अजून येउदे मणतो मी.
27 Feb 2017 - 1:10 pm | पिशी अबोली
सुरेख!
तंजावूर मराठी काय गोड लागते कानाला, डोळ्यांना. तिच्या संवर्धनाचे समाजाकडून चाललेले प्रयत्न खरंच स्तुत्य आहेत..
27 Feb 2017 - 1:10 pm | पिशी अबोली
सुरेख!
तंजावूर मराठी काय गोड लागते कानाला, डोळ्यांना. तिच्या संवर्धनाचे समाजाकडून चाललेले प्रयत्न खरंच स्तुत्य आहेत..
27 Feb 2017 - 2:55 pm | इशा१२३
वेगळीच मराठी ! गोड वाटतेय वाचायला.
27 Feb 2017 - 2:55 pm | इशा१२३
वेगळीच मराठी ! गोड वाटतेय वाचायला.
27 Feb 2017 - 3:36 pm | नीलमोहर
मराठीमध्येही किती उपप्रकार आहेत आणि आपल्याला माहित नसलेल्या किती विविध बोलीभाषा आहेत ते आत्ता कळतंय.
लिखाण खूपच आवडलं, लेखक, लेखन आपल्यापर्यंत पोहोचवणारे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मिपाचे मनापासून आभार..
27 Feb 2017 - 4:19 pm | सूड
सुंदर !! तंजावूर मराठीत लेख बघून बरं वाटलं. मागल्या वर्षी बहुधा स्टार माझा वर तिथल्या भोसले घराण्याची मुलाखत आली होती. आपण इथे मराठी बोलायला बिचकतो आणि लोकांनी परक्या जागी राहून भाषा टिकवलेली पाह्यली की कौतुक वाटतं.
27 Feb 2017 - 4:30 pm | वरुण मोहिते
कुठल्यातरी दिवाळी अंकात . आताची पेशव्यांची पिढी कुठे राहते सध्या यावर पण लेख होता .प्रभात रोड ला बंगल्यात असं .
27 Feb 2017 - 7:39 pm | मितान
खुपच गोड वाटलं वाचताना. अजुन वाचायला नक्कीच आवडेल.
27 Feb 2017 - 9:14 pm | साती
लेखमालेतला सर्वप्रथम हाच लेख वाचला.
छान आहे.
अग्गिदनासिइनं हाच शब्द अडला.
तंजावरी मराठीत अजूनही खूप जुने मराठी शब्द आणि बरेच फारसी/अरबी/इंग्रजी भेसळ न झालेले शब्द ऐकायला मिळतात.
आणि बोलण्याचा हेल अगदी कोंकणीसारखा गोड असतो.
27 Feb 2017 - 10:08 pm | मित्रहो
छोटीसी पण मस्त गोष्ट
बंगलोर असताना आमच्या इथे एक तंजावरी मराठी कुटुंब राहायचे. माझे फारसे बोलणे झाले नाही पण बायकोने सांगितले होते ते बोलतात ते मराठी असले तरी अजिबात कळत नाही.
28 Feb 2017 - 12:30 pm | इडली डोसा
मी काही वर्षांपुर्वी एका तंजावरी मित्रासोबात ट्रेक केला होता. तो फोनवर घरच्यांशी तंजावरी मराठीत बोलला त्यातला एकही शब्द मला कळाला नव्हता.
27 Feb 2017 - 11:25 pm | अभ्या..
अहाहाहा, कसलं सुंदर ते भासा, येतं की नाही की वाटलं.
ते तुमचं दक्षिणी मराठीचं युट्युब चॅनेलातलं श्रीमद उत्तरादि मठाचे सत्यात्मतीर्थ स्वामीजीनं सांगीतलेलं श्री सत्यानुभवतीर्थ स्वामीजीचं चरित्र ऐकलं. अदभुतच केलं. तेच सत्यात्मतीर्थाकडून ऐकलेलं आधी. सोलापूरात. तेच भासा अनि वाणी.
गुरुभ्यो नमः
28 Feb 2017 - 12:31 pm | इडली डोसा
यात अनुन मोठी कथा वाचायला आवडेल.
28 Feb 2017 - 7:07 pm | नूतन सावंत
मस्त वाटलं वाचायला.
28 Feb 2017 - 11:25 pm | सूड
आता दक्षिणी मराठी ऐकत बसलोय. खरंच अगदी श्रवणीय आहे.
2 Mar 2017 - 2:15 pm | धर्मराजमुटके
मागे ओक सरांनी तंजावुर मराठी पॉडकास्टबद्द्ल माहिती टाकली होती मिपावर. कुणाला ते ऐकायचे असतील तर हा दुवा आहे.
https://www.podomatic.com/podcasts/tanjavurmarathi
2 Mar 2017 - 2:19 pm | पैसा
लिंकसाठी धन्यवाद! ही लिंक शोधत होते. पण कोणी दिलेली ते न आठवल्यामुळे राहिली ती.
2 Mar 2017 - 10:58 pm | एस
या पॉडकास्टचीच आठवण आली होती. धन्यवाद.
या प्रसारणाचा सतरावा भाग ऐकत होतो. ऐकायला खूप छान वाटत होतं. सर्व भाग ऐकणार आहे. तंजावर मराठीचा 'टेम्पो' तामिळप्रमाणेच वेगवान आहे असं निरीक्षण आहे. शिवाय हल्लीच्या, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर 'पुणे मराठी'त फार वापरले जाणारे बरेच शब्द तेथे अजूनही वापरले जातात हे पाहून आश्चर्यमिश्रित आनंद वाटला. यंदा. 'सुरू झाला' ऐवजी 'आरंभ झाला', इ. तसेच 'वय' (व्हय च्या आसपास जाणारा उच्चार) हा शब्दही बऱ्याचदा वापरला जातोय.
मराठीची ही शाखा जपली गेली पाहिजे.
2 Mar 2017 - 5:23 pm | कविता१९७८
लेखन आवडलं
2 Mar 2017 - 10:04 pm | उत्तरा
खुपच सुंदर.. अजुन वाचायला आवडेल.
6 Mar 2017 - 6:09 pm | vikrammadhav
खूपच छान वाटतंय वाचायला !!!!! आपल्या मराठीची एवढी रूपं आहेत , अभिमान वाटतो मराठी असण्याचा !!!
13 Mar 2017 - 11:49 am | पैसा
श्री हैयो हैयैयो कळवतात की,
पुन्हा एकदा सर्व वाचकांना धन्यवाद!