मराठी भाषा दिन २०१७: मई (वर्‍हाडी)

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in लेखमाला
26 Feb 2017 - 6:21 am

1
मई

नाल्या काठचं साजरं
असं वावरं मईचं
वानं म्हनूनं पीकाची
नाई पळतं कईचं

नाई गरजं खताची
बसे गायाचाचं थरं
टाका पेरुनं बियानं
वाढे पीकं भरं भरं

पुरुस पुरुस धांडा
छात्या यवढी पराटी
मांड्या मांड्या वाढे मुंगं
त्यातं तुरं करे दाटी

जरी पुरातं वावरं
गेलं सारचं वाहूनं
नाई फरकं काईचं
रब्बी पीके खन्नाऊनं

रब्बी नाईतं खरीपं
नाई हारतं काईचं
नाई ठेवतं उपाशी
असं वावरं मईचं
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Feb 2017 - 10:36 am | पैसा

सुंदर कविता! अल्लाळ शेतीबद्दल एक लेख होता मागे त्याची आठवण झाली.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

26 Feb 2017 - 2:00 pm | अॅस्ट्रोनाट विनय

छान. बालभारती मधील कविता वाचल्यासारखं वाटलं

बबन ताम्बे's picture

26 Feb 2017 - 2:34 pm | बबन ताम्बे

आवडली

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 10:04 pm | मित्रहो

सुंदर

रब्बी नाईतं खरीपं
नाई हारतं काईचं
नाई ठेवतं उपाशी
असं वावरं मईचं

अगदी पटले

सविता००१'s picture

27 Feb 2017 - 6:00 pm | सविता००१

छान आहे कविता

नूतन सावंत's picture

27 Feb 2017 - 6:04 pm | नूतन सावंत

सुरेख कविता.

मितान's picture

27 Feb 2017 - 8:08 pm | मितान

सुंदर आशादायक कविता !
चालीत गुणगुणताना अजून गोड वाटतेय..

अभिजीत अवलिया's picture

28 Feb 2017 - 9:30 am | अभिजीत अवलिया

आशादायक कविता ...