साहित्यः
१ मोठं भरताचं वांग
मिरच्या - ४
कांदा - १ मध्यम
कोथिंबीर
मीठ
साखर
तेल
मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ
सायीचं दही - २ चमचे
कृती:
१. वांग तेल लावून भाजून, गर काढून घेणे.
२. कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावा; मिरच्या मध्ये चिरून तुकडे करून घ्यावेत.
३. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ घालावे; मिरच्या परतून घ्याव्यात.
४. त्यामध्ये भाजलेल्या वांग्याचा गर घालावा; मीठ, साखर घालून परतून घ्यावे.
५. गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे.
६. ह्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करावे.
प्रतिक्रिया
9 Feb 2017 - 5:37 pm | पैसा
मस्त पारंपारिक पाकृ. फोटो तर अप्रतिम आलाय!
9 Feb 2017 - 5:56 pm | विशुमित
आपले सगळ्यात फेव्हरेट आयटम आहे हा. त्यात काचा कांडा आणि कोथांबीर म्हंटल्यावर तर काय बोलायलाच नको.
9 Feb 2017 - 6:16 pm | तुषार काळभोर
लहानपणापासून पूर्वग्रहदूषित तिरस्कार असल्याने, बटाटा टाकून ट्रायवले जाईल...
9 Feb 2017 - 6:56 pm | रेवती
वा! आवडता प्रकार. मीही भरीत असेच करते.
9 Feb 2017 - 7:39 pm | उगा काहितरीच
नक्की करून बघेल !
9 Feb 2017 - 9:23 pm | सूड
नारळाच्या दुधातलं जास्तं आवडतं. हेही ट्राय करुन पाह्यलं जाईल.
10 Feb 2017 - 12:17 pm | विशुमित
नारळातील दुधातील भरीत कसे बनवतात? कृपया थोडक्यात कृती सांगता का ?
10 Feb 2017 - 12:17 pm | विशुमित
नारळातील दुधातील भरीत कसे बनवतात? कृपया थोडक्यात कृती सांगता का ?
13 Feb 2017 - 12:55 pm | सूड
व्यनि केला आहे.
13 Feb 2017 - 4:10 pm | कैवल्यसिंह
मलाही नारळाच्या दुधामधील वांग्याचे भरीत कसे करायचे याची रेसिपी द्या ना....
13 Feb 2017 - 5:04 pm | सूड
भरीत बनवायला जसं वांगं भाजून घेतो तसंच भाजून आणि घोटून घ्यायचं. वांग्याच्या गराच्या प्रमाणात (म्हणजे एका मोठ्या वांग्याला साधारण एक बाऊल) नारळाचं दूध घेऊन त्यात चिंचेचा कोळ आणि किंचित गूळ घालायचा आणि मग त्यात वांग्याचा गर, मीठ घालून नीट मिसळून घ्यायचं. हवं असल्यास थोडं तिखट घालायचं (मिरच्याही घालायच्या आहेतच). साजूक तूपात जिरं, मोहरी, कढिपत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांची फोडणी करुन वांग्याच्या मिश्रणावर ओतायची.
किंचित गोडसर होत असलं तरी चवीत बदल म्हणून छान वाटतं
10 Feb 2017 - 7:42 am | पुंबा
सकाळी सकाळी तोंडाला पाणी सुटलं हो.. आता करुन बघणे आले..
10 Feb 2017 - 9:09 am | अजया
मस्त.खूप आवडतं.
10 Feb 2017 - 10:19 am | श्रीरंग_जोशी
वांग्यांची भाजी आवडत नसली तरी भरीत मात्र मला प्राणप्रिय आहे. या सुटसुटीत पाकृसाठी धन्यवाद.
11 Feb 2017 - 12:20 pm | मनिमौ
कृतीन भरीत बनवले. छान लागते आहे. कच्च्या कांद्याचा कुरकुरीत पणा. दही साखरेची आंबट गोड चव मस्तच
13 Feb 2017 - 12:39 pm | पल्लवी०८
वांग्याची भाजी तशी फारशी प्रिय नाही पण भरीत मात्र आवडते, नेहमीपेक्षा वेगळी पाककृती आहे बनवून बघावी लागेल.
आणि हो नारळाच्या दुधातील भरीत कसे बनवायचे? पाककृती देता का?
13 Feb 2017 - 5:40 pm | माहितगार
चवीष्ट आणि सुटसुटीत पदार्थ, पण बिन दह्याच्या भरीताची सवय झालेली मंडळी दही पाकृकडे कमी फिरकतात. वांगे भाजण्या एवजी तेलात फोडी परतून साल न काढता दह्यात स्मॅश करणे हि आमची पद्धती.